बुद्धिबळा विषयी माहिती Chess Information in Marathi

Chess Information in Marathi बुध्दीबळ खेळाची माहिती आज या लेखामध्ये चेस chess in marathi म्हणजेच बुध्दीबळ या खेळाविषयी माहिती देणार आहे. बुध्दीबळ हा असा खेळ आहे ज्यामुळे माणसांची बौधिक पातळी विकसित होते. खेळामध्ये मुख्य २ प्रकार असतात मैदानी खेळ आणि बैठा किवा घरगुती खेळ आणि बुध्दीबळ हा खेळ बैठ्या खेळामध्ये मोडतो कारण हा खेळ आपण घरी बसून खेळतो. या खेळामध्ये आपल्याला बुध्दीचा उपयोग करून खेळावे लागते म्हणून या खेळाला बुध्दीबळ हे नाव दिले आहे. हा खेळ खेळण्यासाठी खेळाडू कडे उत्कृष्ट बुध्दीमत्ता आणि चांगल्याप्रकारे निर्णय घेण्याची क्षमता असावी लागते.

बुध्दीबळ हा खेळ खूप प्राचीन काळापासून खेळला जातो आणि या खेळाची सुरुवात भारतामध्ये झाली आहे. पूर्वीच्या काळी हा खेळ मनोरंजनासाठी भारतामध्ये खेळला जात होता पण आता हा खेळ संपूर्ण जगभरामध्ये खेळला जातो आणि आता हा खेळ रशिया या देशाचा राष्ट्रीय खेळ आहे. बुध्दीबळ हा खेळ २ खेळाडूंमध्ये खेळला जातो आणि अचूक हालचाल, रणनीती आणि खेळ जिंकण्यासाठी अधिक चांगले स्थान मिळवण्याची गरज असते.

chess information in marathi
chess information in marathi / how to play chess in marathi

बुद्धिबळा विषयी माहिती – Chess Information in Marathi

बुध्दीबळ खेळाचा इतिहास – history 

बुध्दीबळ या खेळाची सुरुवात कशी झाली हे जरी स्पष्ट झाले नसले तरी हा खेळ खूप पूर्वीपासून भारतामध्ये खेळला जात होता. हा खेळ भारतातूनच लोकप्रिय झाला आणि पर्शिया मध्ये सुध्दा या खेळाचे महत्व वाढू लागले. ६ व्या शतकात या खेळाला चतुरंगा म्हणून ओळखले जात होते. या खेळाचे महत्व पर्शियामध्ये हि वाढत असल्यामुळे जेव्हा मुस्लीम लोकांनी पर्शिया जिंकले त्यावेळी पासून ते हि हा खेळ खेळू लागले.

आपण विरुध्द गटाचा राजा मारल्या नंतर चेक मेट म्हणतो तसे त्यावेळी पर्शियामध्ये ‘शाह मॅट’ म्हणातले जायचे आणि या शब्दापासूनच चेक मेट हा शब्द आला आहे. १५ व्या शतकामध्ये हा खेळ युरोप, ग्रीस, स्पॅनिश, आयबेरिया आणि रशिया  या देशांमध्ये पसरला. १४७५ मध्ये या खेळामध्ये काही बदल करण्यात आले आणि ते अजूनही तसेच आहेत.

बुध्दीबळ खेळाविषयी माहिती – Chess Game Information in Marathi

बुध्दीबळ हा घरगुती खेळ indoor game आहे ज्यासाठी मैदान लागत नाही हा खेळ घरामध्ये खेळला जावू शकतो. या खेळामध्ये खेळाडूंची संख्या शक्यतो २ असते आणि जर हा खेळ गटामध्ये असेल तर त्यामध्ये जास्त खेळाडू असू शकतात.

प्रश्नउत्तर
बुध्दीबळ खेळण्यासाठी किती खेळाडूंची आवश्यकता असते?बुध्दीबळ खेळण्यासाठी २ खेळाडूंची आवश्यकता असते.
बुध्दीबळ खेळण्यासाठी लागणारे साहित्य ?बुध्दीबळ पट आणि सोंगट्या
बुध्दीबळ खेळामध्ये किती सोंगट्या असतात ?पांढऱ्या सोंगट्या १६ आणि काळ्या सोंगट्या १६ असतात.
बुध्दीबळ कोणता खेळाचा प्रकार आहे ?बुध्दीबळ हा बैठा खेळ आहे जो घरामध्ये किवा बंदिस्त जागेमध्ये खेळला जातो.
बुध्दीबळ खेळामधील सोंगट्यांची नावे काय आहेत ?१ राजा, १ राणी, २ घोडे, २ उंट, २ हत्ती आणि ८ प्यादे असतात.
या खेळाची चाम्पीयनशिप केव्हा पासून सुरु झाली ?या खेळाची चाम्पीयनशिप १८८६ पासून झाली.
बुध्दीबळ हा खेळ किती वेळचा असतो ?हा खेळ १ मिनिट ते ६ तासाचा असू शकतो.
भारतातील सर्वात लोकप्रिय बुध्दीबळ खेळाडू कोण आहे ?भारतातील सर्वात लोकप्रिय बुध्दीबळ खेळाडू विश्वनाथम आनंद हे आहेत.

बुध्दीबळ खेळण्यासाठी लागणारे साहित्य

बुध्दीबळ खेळण्यासाठी बुध्दीबळाचा पट आणि सोंगट्या लागतात. बुध्दीबळाचा पट हा एकूण ६४ घरांचा असतो आणि यामध्ये ३२ घरे काळ्या रंगाची आणि ३२ घरे पांढऱ्या रंगाची असतात. काळ्या सोंगट्यांची संख्या १६ असते आणि पांढऱ्या सोंगट्यांची संख्या १६ असते.

बुध्दीबळ खेळातील सोंगट्या 

बुद्धिबळ खेळ कसा खेळायचा – How to Play Chess in Marathi

बुध्दीबळ खेळाचे नियम – Chess Game Rules in Marathi

 • पांढरा सेट असणारा खेळाडू प्रथम चाल खेळतो.
 • एखादी सोंगटी जर बेशिस्त चौकोनात हलवली गेली तर प्रतिस्पर्ध्याच्या सोंगटीने घेतलेला चौरस, जो पकडला जातो आणि खेळाच्या बाहेर काढला जातो.
 • प्रत्येक सोंगटीचा मार्ग हा वेगळा असतो उदाहरणार्थ जोपर्यंत प्यादे प्रतिस्पर्ध्याची सोंगटी हस्तगत करत नाही तोपर्यंत ते पुढे जावू शकत नाही.
 • उंट चौरस ओलांडून पुढे किवा मागे असलेल्या कोणत्याही जागेसाठी तिरपे फिरतात.
 • राणी कोणत्याही जागेसाठी आणि कोणत्याही दिशेने अडवी, उभी, तीरापू पुढे सरकू शकते.
 • राज फक्त एका दिशेने एक घर पुढे सरकू शकतात.
 • जेव्हा एखादा खेळाडू एखादी सोंगटी हलवतो तेव्हा तो त्या भागाच्या हालचालीसाठी वैध असलेल्या ठिकाणी ठेवू शकतो. एकदा सोंगटी एका घरामध्ये ठेवल्यानंतर सोंगटी काढली जावू शकत नाही.
 • जर राजा शह आणि मातने सुटला नाही तर खेळ संपतो.

सोंगट्यांच्या चाली 

 • हत्ती अडवा किवा उभा चालू शकतो.
 • उंटाला आपण तिरप्या चालीमध्ये चालवू शकतो.
 • वजिराला आपण उभा, अडवा किवा तिरपा चालवू शकतो.
 • राजा उभ्या, आडव्या आणि तिरप्या दिशेने एक घर चालतो.
 • प्यादेही एक घर चालते पण ते मारताना तिरपे चालू शकतात
 • घोडा २ घरे उभ्या दिशेन आणि एक घर उभ्या दिशेने किवा २ घरे आडव्या दिशेने आणि एक घर उभ्या दिशेने चालू शकतात.

खेळाडूनुसार राजा राणीची स्थीती बदलते

 • ब्लॅक किंग – व्हाईट हाऊस
 • व्हाईट किंग – ब्लॅक हाऊस
 • ब्लॅक क्वीन – व्हाईट हाऊस
 • व्हाईट क्वीन – ब्लॅक हाऊस

बुध्दीबळ खेळाबद्दल काही तथ्ये – facts about chess game 

 • २० जुलै हा दिवस जागतिक बुध्दीबळ दिवस म्हणून साजरा केला जातो.
 • बुध्दीबळ या खेळाला शतरंज किवा चतुरंगा या नावाने ओळखले जाते.
 • बुध्दीबळाच्या एका खेळामध्ये अधिक अधिक ५९४९ चाली खेळल्या जातात.
 • जगामध्ये इंग्रजी भाषेमध्ये जे दुसरे पुस्तक छापले आहे ते बुध्दीबळ खेळाबद्दल आहे.
 • पहिला काळ्या आणि पांढऱ्या रंगाचा बुध्दीबळ पट १०९० मध्ये युरोपमध्ये बनवला होता.
 • १९८७ मध्ये विश्वनाथम हे भारतामधील पहिले ग्रॅन्ड मास्टर होते.
 • २०११ मध्ये जगभरामध्ये ६०० मिलियन लोक बुध्दीबळ खेळत होते.
 • १९८५ मध्ये एरिक नोपार्ट या खेळाडूने ६८ तासामध्ये ५०० बुध्दीबळाचे खेळ खेळले होते.

आम्ही दिलेल्या chess information in marathi language माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू. मित्रानो तुमच्याकडे जर बुद्धिबळ या खेळाबद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या how to play chess in marathi  या article मध्ये update करू, मित्रांनो हि chess game rules in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!