Squash Game Information in Marathi स्क्वॅश या खेळाविषयी माहिती स्क्वॅश हा खेळ जगभरामध्ये खेळल्या जाणाऱ्या खेळापैकी एक आहे. स्क्वॅश हा खेळ आधुनिक काळापासून म्हणजेच १९ व्या शतकापासून खेळला जातो आणि तो रॅकेटद्वारे खेळला जातो. स्क्वॅश हा खेळ सध्या ऑलिम्पिक खेळला जात नसला तरी त्याची एक वेगळी शिखर स्क्वॅश वर्ल्ड चॅम्पियनशिप आहे. ज्यामध्ये जगभरातील सर्वोत्कृष्ट खेळाडू अंतिम स्क्वॉश चॅम्पियन होण्यासाठी स्पर्धा करतात. स्क्वॅश खेळ हा रॅकेट द्वारे चेंडू भिंतीवर मारून खेळला जाणारा खेळ असून या खेळामध्ये २ खेळाडू असतात आणि ते एकमेकांचे प्रतिस्पर्धी असतात.
स्क्वॅश हा खेळ अगदी चपळतेने, रणनीती वापरून आणि मानसिक आणि शारीरिक ताकद लावून खेळला जाणारा खेळ आहे. तसेच हा खेळ आरोग्य आणि तंदुरुस्तीसाठी हा एक आश्चर्यकारकपणे फायदेशीर खेळ आहे आणि फोर्ब्स मॅगझिनने याने सर्वप्रथम आपला अनुभव सांगितला कि हा खेळ खेळल्यामुळे खेळाडूंचे आरोग्य चांगले राहू शकते आणि त्यामुळे त्यांना प्रथम क्रमांकाचा दर्जा आरोग्यदायी खेळ म्हणून मतदान केल्यामुळे मिळाला.
स्क्वॅश खेळाविषयी माहिती – Squash Game Information in Marathi
खेळाचे नाव | स्क्वॅश (squash) |
खेळाची सुरुवात | इ.स १८३० |
खेळाडूंची संख्या | खेळाडूंची संख्या एका वेळी दोन (एकेरी) किंवा चार (दुहेरी) असू शकते. |
खेळाचे मैदान | कोर्ट |
संघ | दोन |
स्क्वॅश या खेळाचा इतिहास – history of squash game
स्क्वॅश हा खेळ स्क्वॅश आधुनिक काळापासून म्हणजेच बहुतेक १८ व्या किंवा १९ व्या शतकापासून खेळला जातो. या खेळाची सुरुवात हि युके मधील हॅरो स्कूलमध्ये इ.स १८३० मध्ये झाली. तेथिल विद्यार्थ्यांनी हे शोधून काढले की पंक्चर झालेला रॅकेटबॉल भिंतीच्या आघाताने ‘स्क्वॅश’ झाला, यामुळे विविध प्रकारचे शॉट्स असलेला खेळ तयार झाला आणि अश्याप्रकारे या खेळाची आणखीन लोकप्रियता वाढत गेली.
इ.स १९३३ मध्ये महान इजिप्शियन खेळाडू एफ. डी. अमर बेने त्याच्या पाच ब्रिटिश ओपन चॅम्पियनशिपपैकी पहिले विजेतेपद जिंकले आणि त्यानंतर ५ दशकांहून अधिक काळ पाकिस्तानचे वर्चस्व गाजवले. त्याचबरोबर ज्या खेळाडूंचा या खेळाच्या विकासावर सर्वाधिक परिणाम झाला ते ऑस्ट्रेलियाचे जेफ हंट आणि आयर्लंडचे जोनाह बॅरिंग्टन होते.
इ. स. १९६० च्या दशकाच्या उत्तरार्धापासून ते इ. स १९८० च्या दशकाच्या सुरुवातीपर्यंत त्यांनी स्क्वॅशमध्ये वर्चस्व गाजवले. अश्या प्रकारे या खेळाची प्रसिध्दी वाढत गेली आणि आज हा खेळ जगभरामध्ये २५ दशलक्षाहून अधिक जन खेळतात.
स्क्वॅश खेळ कसा खेळला जातो – how to play squash game
स्क्वॅश या खेळ जगभरामध्ये खेळला अगदी आवडीने खेळला जातो. या खेळामध्ये खेळाडूंची संख्या एका वेळी दोन (एकेरी) किंवा चार (दुहेरी) असू शकते म्हणजेच या खेळामध्ये २ किंवा ४ खेळाडू असतात आणि ते एकमेकांचे प्रतिस्पर्धी म्हणून खेळतात. हा खेळ कोर्ट मध्ये खेळला जातो आणि हा कोर्ट बॉक्स सारखा असतो.
एकदा बॉल सर्व्ह केल्यावर, खेळाडू समोरच्या भिंतीवर, टिनच्या वर आणि आउट लाइनच्या खाली बॉल मारतात. बॉल कोणत्याही वेळी बाजूच्या किंवा मागील भिंतींवर आघात करू शकतो.
खेळाचा उद्देश
- या खेळामध्ये जोपर्यंत एक खेळाडू आपल्या प्रतिस्पर्ध्याला चेंडू परत करण्यात अयशस्वी होऊ शकत नाही तोपर्यंत मागील भिंतीवरून चेंडू मारला जातो असे केल्याने गुण मिळतात आणि हे या खेळाचा मुख्य उद्देश आहे.
- तसेच या खेळाडूला जिंकण्यासाठी गुण सेट बनवावा लागतो.
खेळासाठी लागणारे साहित्य – equipment
स्क्वॅश खेळ हा एक अगदी सोपा खेळ असल्यामुळे या खेळासाठी विशेष असे काही साहित्य लागत नाही पण या खेळासाठी महत्वाचे लागणारे साहित्य म्हणजे रॅकेट (स्क्वॅश रॅकेट हे टेनिस च्या आकाराचे असते पण त्याचा वरचा डोक्याचा भाग थोडा लहान असतो) आणि चेंडू (स्क्वॅश बॉलचा व्यास सुमारे अडीच इंच असतो आणि तो बरापासून बनवला जातो).
स्क्वॅश खेळाचे मैदान – ground
स्क्वॅश खेळ हा एका खोलीसारख्या बॉक्समध्ये खेळला जातो ज्याला कोर्ट असे म्हणतात. या स्क्वॅश कोर्टवर अनेक ओळी असतात त्यामधील पहिली ओळ आउट लाइन आहे जी मागील भिंतीच्या वरच्या बाजूला आणि बाजूच्या भिंतीच्या बाजूने जाते. तसेच खेळाडूंच्या मागील भिंतीला तळाशी नेट बांधलेला असतो ३ बोर्डाच्या फूट वर सर्व्हिस लाइन आहे. कोर्टाचा मागील भाग दोन आयताकृती विभागांमध्ये विभागलेला आहेत आणि प्रत्येक विभागात एक सर्व्हिस बॉक्स असतो.
स्क्वॅश खेळाचे नियम – rules of squash game
- या खेळामध्ये खेळाडूंची संख्या एका वेळी दोन (एकेरी) किंवा चार (दुहेरी) असू शकते.
- जेंव्हा २ खेळाडू हा खेळ खेळत असतात आणि त्यावेळी एक खेळाडू त्याच्या प्रतिस्पर्ध्याच्या मार्गात येतो त्यावेळी तो मार्ग सोडू शकत नाही आणि तो मार्ग न सोडू शकल्यामुळे त्याला लेट असे म्हणतात.
- या खेळाच्या कोर्टवर अनेक ओळी असतात त्यामधील पहिली ओळ जी असते त्याला आउट लाइन म्हणतात जी मागील भिंतीच्या वरच्या बाजूला आणि बाजूच्या भिंतीच्या बाजूने असते आणि या क्षेत्राबाहेर आदळणारा कोणताही चेंडू आऊट मानला जातो आणि तुमच्या प्रतिस्पर्ध्याला एक गुण दिला जातो.
- हा खेळ खेळताना रॅकेटचा वापर केला जातो या रॅकेटच्या वापरणे खेळाडूला चेंडूला मागच्या भिंतीच्या सीमेमध्ये मारले पाहिजे.
- स्क्वॅश हा खेळ खेळताना एकदा खेळाडू मुद्दाम किंवा उन्गाचा जर एकाद्या खेळाडूच्या किंवा त्याच्या प्रतिस्पर्ध्याच्या मार्गावर येत असेल तर त्याला फॉल मनाला जातो आणि त्यामुळे खेळाडूचे नुकसान होऊ शकते.
- जर एखादा गेम १० – १० असा झाला तर तो गेम जिंकण्यासाठी खेळाडूला दोन स्पष्ट गुणांनी जिंकणे आवश्यक आहे.
- हा खेळ खेळत असताना खेळाडूला दोनदा चेंडू टाकता येत नाही आणि चेंडूला वाहून नेता येत नाही.
- ज्यावेळी एखादा खेळाडू चेंडू सर्व्ह करत असेल तर त्याचा एक पाय सर्व्हिस बॉक्समध्ये असणे आवश्यक आहे.
- बॉलची गती बॉलवरील लहान स्पॉट्सच्या संख्या आणि रंगांद्वारे निर्धारित केली जाते जसे कि पिवळा – सुपर स्लो, लाल – मध्यम, हिरवा किंवा पांढरा – मंद गती आणि निळा – वेगवान.
स्क्वॅश या खेळाविषयी अनोखी आणि मनोरंजक तथ्ये – some interesting facts about squash game
- टेनिस आणि स्क्वॅश हे खेळ रॅकेट आणि बॉल वापरून आणि कोर्टवर खेळले जाणारे खेळ असल्यामुळे हा खेळ प्रसिध्द टेनिसपटू देखील खूप आवडीने स्क्वॅश खेळ खेळतात.
- मॅनहॅटन प्रकल्पादरम्यान स्क्वॅश कोर्टचा वापर करण्यात आला होता.
- स्क्वॅश हा खेळ सुरक्षितपणे खेळला जाणारा खेळ आहे.
- जगभरात एकूण १९५ देश आहेत आणि त्यामधील १८५ देश स्क्वॅश खेळ खेळतात.
- या खेळाची सुरुवात हि युके मधील हॅरो स्कूलमध्ये इ.स १८३० मध्ये झाली.
- या खेळाच्या मैदानाला कोर्ट म्हणतात आणि या खेळामध्ये २ किंवा ४ खेळाडू खेळतात.
आम्ही दिलेल्या squash game information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर स्क्वॅश खेळाची माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या squash game information in marathi language या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि information of squash game in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये squash game information in marathi wikipedia Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट