sti information in marathi – sti meaning in marathi एसटीआय म्हणजे काय, आज आपण या लेखामध्ये एसटीआय म्हणजेच स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर या विषयी माहिती घेणार आहोत म्हणजे हे पद काय आहे तसेच या पदाची कार्ये काय आहेत तसेच या पदावर निवड होण्यासाठी त्या संबधी व्यक्तीला काय करावे लागेल तसेच या पदावर काम करताना आपल्याला वेतन किती मिळू शकते आणि इतर काही या पदाविषयी माहिती आपण आता खेळी सविस्तर पाहणार आहोत.
एसटीआय म्हणजेच स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर (state tax inspector) ज्याला मराठीमध्ये राज्य कर निरीक्षक म्हणून ओळखले जाते आणि जर एखाद्या व्यक्तीला राज्य कर नरीक्षक व्हायचे असेल तर त्या व्यक्तीला एक विशिष्ठ परीक्षा द्यावी लागते.
आणि मग तो कर निरीक्षक बनल्यानंतर कर निरीक्षकाचे काम हे एखाद्या व्यक्तीचे किंवा संस्थेचे आर्थिक उत्पन्न आणि कर भरणा यांचे सखोल विश्लेषण असते तसेच जर कर भरण्यास चूक झाल्याच्या प्रकाशात वेळेत कर भरणा सुनिश्चित करण्यासाठी कर निरीक्षक कायदेशीर पावले उचलण्यास बांधील असतात.
जर एखाद्या व्यक्तीने एसटीआय हि परीक्षा दिली आणि त्या तो उर्तीर्ण झाला तर त्या व्यक्तीला भारतीय महसूल सेवा, आयकर विभाग आणि केंद्रीय अन्वेषण ब्युरो या सारख्या ठिकाणी निकारी मिळू शकते आणि त्याला ३ ते ३.५ लाख रुपये पगार सुरुवातीला मिळू शकतो आणि त्या व्यक्तीची कामाची वेळ हि सकाळी ९ ते संध्याकाळी ५ पर्यंत असू शकते.

एसटीआय म्हणजे काय – STI Information in Marathi
एसटीआय फुल फॉर्म – STI full form in marathi
स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर – State Tax Inspector – राज्य कर निरीक्षक
कर निरीक्षकाची कार्ये – responsibilities
कर निरीक्षक हा कर विषयक अनेक कार्ये पार पडण्यास बांधील असतो आणि म्हणूनंच खाली आपण राज्य करा निरीक्षकाची कार्ये काय काय आहेत ते पाहणार आहोत.
- कर निरीक्षकाचे महत्वाचे काम म्हणजे एखाद्या व्यक्तीचे किंवा संस्थेचे आर्थिक उत्पन्न आणि कर भरणा यांचे सखोल विश्लेषण करणे.
- त्याचबरोबर अहवाल तयार करणे आणि तो अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांना सादर करणे.
- अनैतिक मार्गाने अवैद्य उत्पन्न टाळण्यासाठी कायदेशीर पावले उचलणे.
- एकाद्या व्यक्तीचे किंवा कंपनीच्या आर्थिक स्थितीचे मुल्यांकन करणे.
- करचुकवेगिरिचा संशय असल्यास लोकांच्यावर किंवा त्या संबधीत संस्थेवर छापे टाकणे.
राज्य कर निरीक्षक होण्यासाठी असणारे पात्रता निकष – eiligibility
जर एखाद्या व्यक्तीला एकाद्या संस्थेमध्ये किंवा विभागामध्ये काम करायचे असल्यास त्या व्यक्तीला त्या संस्थेने किंवा विभागाने ठरवलेले काही पात्रता निकष पार पाडावे लागतात तसेच राज्य कर निरीक्षक बनण्यासाठी देखील त्या संबधित व्यक्तीला काही पात्रता निकष पार पाडावे लागतात आणि ते कोणकोणते आहेत ते आता आपण खाली पाहणार आहोत.
- जर एखाद्या व्यक्तीला राज्य कर निरीक्षक बनायचे असल्यास त्या व्यक्तीला कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही पदवीचे शिक्षण पूर्ण केलेले असले पाहिजे आणि त्या व्यक्तीला कमीत कमी ५० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुण असणे आवश्यक आहे.
- तसेच त्या संबधी विद्यार्थ्याने बारावीचे शिक्षण देखील कोणत्यातरी मान्यताप्राप्त विद्यापीठातून केले पाहिजे आणि ते कोणत्याही केह्त्रातून म्हणजेच विज्ञान, वाणिज्य किंवा कला क्षेत्रामधून असू दे.
- तो संबधित व्यक्ती त्या संबधित राज्याचा रहिवासी किंवा नागरिक असला पाहिजे.
- जर एखाद्या व्यक्तीला या परीक्षेला बसायचे असल्यास त्या व्यक्तीचे वय हे कमीत कमी २१ असले पाहिजे आणि जास्तीत जास्त त्या व्यक्तीचे वय हे ३८ वर्ष इतके असले पाहिजे.
एसटीआय परीक्षेचे टप्पे
एसटीआय म्हणजेच राज्य कर निरीक्षक परीक्षेचे एकूण तीन टप्पे आहेत ते आपण खाली पाहूयात.
- प्राथमिक परीक्षा (preliminery).
- मुख्य परीक्षा (mains).
- मुलाखत (interview).
सर्व प्रथम इच्छुक व्यक्तीची उदिष्ट चाचणी घेतली जाते ज्याला आपण preliminery म्हणून ओळखतो आणि इच्छुक व्यक्तीला यामध्ये उतीर्ण व्हावे लागते कारण यामध्ये उतीर्ण झाल्या शिवाय तो व्यक्ती मुख्य परीक्षेसाठी पात्र होत नाही.
मग त्यानंतर त्या व्यक्तीची लेखी परीक्षा घेतली जाते मग तो संबधित व्यक्ती त्या परीक्षेमध्ये उतीर्ण झाला कि तो पुढच्या प्रक्रियेसाठी पात्र ठरतो.
मग मुख्य परीक्षेमध्ये पात्र झालेला व्यक्तीला मुलाखतीसाठी म्हणजेच त्याचा व्यक्तिमत्व चाचणी घेण्यासाठी बोलवले जाते. मुलाखतीचा उद्देश हा सक्षम आणि निपक्षपाती निरीक्षकांच्या मंडळाद्वारे सार्वजनिक सेवेतील करियरसाठी उमेदवाराच्या वैयक्तिक योग्यतेचे मुल्यांकन केले जाते आणि मग त्या संबधित व्यक्तीची त्या जागेसाठी निवड केली जाते.
एसटीआय विषयी विचारली जाणारी काही महत्वाचे प्रश्न – questions
महाराष्ट्रातील राज्य कर निरीक्षकाचा पगार किती असतो?
राज्य कर निरीक्षकांना महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) द्वारे चांगले वेतन दिले जाते. राज्य कर निरीक्षकासाठी मासिक इन हँड मोबदला सामान्यता रुपये ४०००० हजार ते १ लाख २० हजार पर्यंत वेतन मिळू शकतो.
राज्य कर निरीक्षकाचे कार्य काय असते ?
कर निरीक्षक बनल्यानंतर कर निरीक्षकाचे काम हे एखाद्या व्यक्तीचे किंवा संस्थेचे आर्थिक उत्पन्न आणि कर भरणा यांचे सखोल विश्लेषण असते तसेच जर कर भरण्यास चूक झाल्याच्या प्रकाशात वेळेत कर भरणा सुनिश्चित करण्यासाठी कर निरीक्षक कायदेशीर पावले उचलण्यास बांधील असतात.
राज्य कर निरीक्षक बनण्यासाठी शिक्षण पात्रता काय आहे ?
राज्य कर निरीक्षक बनण्यासाठी त्या संबधित व्यक्तीने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून त्या व्यक्तीने पदवीचे शिक्षण पूर्ण केलेले असले पाहिजे आणि ते कोणत्याही शाखेतून असो म्हणजेच विज्ञान, वाणिज्य किंवा कला शाखेतून पूर्ण केलेले असावे.
आम्ही दिलेल्या sti information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर एसटीआय म्हणजे काय माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या sti meaning in marathi या sti full form in marathi article मध्ये update करू, मित्रांनो हि sti full information in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये sti exam information in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट