एमपीएससी परीक्षा माहिती MPSC Exam Information in Marathi

MPSC Exam Information in Marathi राज्यसेवा परीक्षा माहिती एमपीएससी म्हणजेच राज्य लोकसेवा आयोग मार्फत महाराष्ट्र राज्यातील विविध विभागातील वर्ग १, २ आणि वर्ग ३ श्रेणीची पदे भरली जातात. त्यामध्ये राज्यातील सरकारी इंजिनिअर, डॉक्टर तसेच सरकारी कॉलेज मधील प्राचार्य सुद्धा एमपीएससी च्या वेगवेगळ्या परीक्षेतून निवडले जातात. राज्यातील प्रशासन सांभाळण्यासाठी जे महत्वाचे अधिकारी उदा. उपजिल्हाधिकारी (Dy.collector), तहसीलदार, उप मुख्य कार्यकारी धिकारी, पोलीस उपाधीक्षक (Dy.SP) असतात त्यांची निवड ही एमपीएससी च्या राज्यसेवा स्पर्धा परीक्षेतून होते. आणि PSI, STI, ASO म्हणजेच पोलीस उपनिरीक्षक ही वर्ग 2 ची पदे दुय्यम सेवा (Combine) परीक्षे मार्फत भरली जातात.

mpsc exam information in marathi
mpsc exam information in marathi

एमपीएससी परीक्षा माहिती – MPSC Exam Information in Marathi

स्वरूप

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून राज्यसेवा परिक्षा, विक्रीकर निरीक्षक परीक्षा, पोलिस उपनिरीक्षक परीक्षा, मंत्रालयीन सहाय्यक परीक्षा, महाराष्ट्र वन सेवा परीक्षा, महाराष्ट्र अभिांत्रिकी परीक्षा, महाराष्ट्र न्यायालयीन सेवा परीक्षा, महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा, मोटर वाहन निरीक्षक परीक्षा, लिपिक टंकलेखक परीक्षा इत्यादी व सरळसेवेतून विविध पदाच्या परीक्षा सामान्य चाचणी परीक्षा घेतल्या जातात.

तसेच प्रशासकीय सेवेच्या विभागांतर्गत परीक्षा सुद्धा घेतल्या जातात. राज्यसेवा परीक्षा मधून अधिकारी होण्याकरिता पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा व मुलाखत / शारीरिक चाचणी या तीन टप्प्यातून जावे लागते. राज्यसेवा परीक्षेमध्ये राज्य शासनाच्या अतंत्रिक राजपत्रित गट-अ व गट-ब या संवर्गातील पदे शासनाच्या मागणीनुसार भरली जातात.

पात्रता

१) २१ वर्षे वय पूर्ण असले पाहिजे.

२) उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असला पाहिजे.

३) त्याच्याकडे कोणत्याही शाखेची पदवी असली पाहिजे.

४) सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, गट-ब पदाकरिता भौतिकशास्त्र व गणित या विषयासह विज्ञान अथवा अभियांत्रिकी या शाखेतील पदवी

५) मराठीचे ज्ञान आवश्यक

६) जास्तीत जास्त वयोमर्यादा ही पुढीप्रमाणे असली पाहिजे

  • साधारण प्रवर्गासाठी कमाल ३८ वर्ष कमाल वयोमर्यादेची अट इतर मागास व प्रवर्गासाठी ३ वर्षे
  • अनुसूचित जाती / जमातीसाठी ५ वर्षे शिथिलक्षम
  • खेळाडूंसाठी ५ वर्षे एवढी शिथिलक्षम असेल.
  • अपंग उमेदवारांना वयाच्या ४५ वर्षापर्यंत शिथिलक्षम असेल.

परिक्षा पॅटर्न – MPSC Exam Paper Pattern in Marathi

एमपीएससी राज्यसेवा परीक्षा 3 टप्यात घेतली जाते.

पहिला टप्पा – पूर्व परीक्षा Prelims(४०० marks)

दुसरा टप्पा – मुख्य परीक्षा mains (८०० marks)

तिसरा टप्पा – मुलाखत Interveiw (१०० marks)

यातील मुख्य परीक्षेचे आणि मुलाखतीचे गुण अंतिम यादीसाठी विचारात घेतले जातात. पूर्व परीक्षेचे गुण अंतिम यादीत ग्राह्य नसतात फक्त मुख्य परीक्षेला पात्र होण्यासाठी पूर्व परीक्षेचे महत्व आहे.

एमपीएससी अभ्यासक्रम – MPSC Syllabus 2022 in Marathi 

नव्या पॅटर्न नुसार २ पेपर प्रत्येकी २०० गुणांचे हे पूर्व परीक्षेला असतात. ह्या वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी प्रश्नपत्रिका इंग्रजी व मराठी मध्ये असतात. त्यासाठी पुढीप्रमाणे अभ्यासक्रम आहे.

पेपर पहिला –

  • राज्य , राष्ट्रीय , आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वपूर्ण चालू घडामोडी.
  • भारताचा इतिहास (महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह) आणि भारतीय राष्ट्रीय चळवळ
  • महाराष्ट्र , भारत आणि जगाचा भूगोल- भौतिक, सामाजिक आणि आर्थिक.
  • महाराष्ट्र व भारत – राज्यव्यवस्था आणि शासन- राज्यघटना, राजकीय व्यवस्था , पंचायती राज, शहरी प्रशासन, शासकीय धोरणं, हक्कविषयक घडामोडी आदी.
  • आर्थिक आणि सामाजिक विकास- शाश्वत विकास, गरिबी, समावेशन, लोकसंख्याविषयक मुद्दे, सामाजिक धोरणं इ.पर्यावरणीय परिस्थिती , जैव विविधता, हवामान बदल यामधील सर्वसामान्य मुद्दे व सामान्य विज्ञान.

पेपर दुसरा –

  • इंटरपर्सनल स्किल्स (कम्युनिकेशन स्किलसह)

तर्कशुद्ध युक्तिवाद आणि मीमांसा/ पृथ:करण क्षमता (लॉजिकल रिझनिंग आणि एनालिटिकल एबिलिटी)

  • निर्णय क्षमता व प्रश्नांची उकल ( डिसिजन मेकींग आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंग)
  • सामान्य बुद्धिमापन क्षमता (जनरल मेंटल एबिलिटी)

बेसिक न्यूमरसी , डेटा इंटरप्रिटेशन (चार्ट , ग्राफ , टेबल्स) (दहावीचा स्तर असेल)

  • इंग्लिश व मराठी भाषा आकलन क्षमता – कॉम्प्रिहेन्शन स्किल (दहावीस्तर)

महत्वाची पुस्तके 

  • इतिहास – इ.६ वी ते १० वी पर्यंत ची महाराष्ट्र शासनाची पुस्तके, प्राचीन व मध्ययुगीन इतिहास साठी luncent GK, आधुनिक भारत – स्पेक्ट्रम/ग्रोवर
  • भूगोल – इ. ५ वी ते १२ वी महाराष्ट्र शासनाची पुस्तके, ११ वी NCERT ची पुस्तक.
  • अर्थशास्त्र – भगीरथ – रंजन कोळंबे, किरण देसले (भाग१-२) दीपस्तंभ प्रकाशन
  • पर्यावरणIAS शंकर/ तुषार घोरपडे यांचं पुस्तक
  • राज्यशास्त्र – लक्ष्मीकांत/ कोळंबे सरांचे पुस्तक
  • विज्ञान – इ. ८ वी ते १० वी महाराष्ट्र शासनाची पुस्तके, कोलते सरांचे पुस्तक, luncent science.
  • चालु घडामोडी – रोजचा वर्तमानपत्र, यशाची परिक्रमा, अभिनव वार्षिकी.
  • अंकगणित – आर. एस. अग्रवाल quantitative aptitude
  • बुद्धिमापन – आर. एस. अग्रवाल verbal and non verbal reasoning.

एमपीएससी परीक्षा संकेतस्थळ:

https://mpsc.gov.in/

पूर्व परीक्षा

पूर्व परीक्षा ही ४०० गुणांची असते. ह्यामध्ये २०० गुणांचे दोन पेपर असतात. पेपर १ व पेपर २ मध्ये मिळून पास व्हावे लागते.

मुख्य परीक्षा

मुख्य परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांची खरी कसोटी असते. ही परीक्षा ८०० गुणांची असते. ह्यामध्ये एकूण ४ पेपर असतात व प्रत्येक पेपर हा १५० गुणांचा असतो. तसेच मराठी व इंग्रजी ह्या भाषा विषयांवर प्रत्येकी १०० गुणांचे २ पेपर असतात.

मुलाखत

मुख्य परीक्षा पास होऊन आलेल्या विद्यार्थांसाठी त्यातून शेवटी निवड करण्यासाठी ही मुलाखत असते. हि १०० गुणांची असते व ह्यामध्ये पास झाल्यावरच अंतिम यादीत निवड होते. मुलाखत हि खूप कठीण असते. यामध्ये विद्यार्थ्यांचं खासकरून व्यक्तिमत्त्व तपासल जात.

संयुक्त परीक्षा

पी. एस. आय., एस. टी. आय. व सहाय्यक या तीन पदांसाठी पूर्व परिक्षा ही संयुक्त घेतली जाते. ही परीक्षा १०० गुणांची असते. मुख्य परीक्षा मात्र तिन्ही साठी वेगवेगळ्या घेतल्या जातात. तिन्ही मुख्य परीक्षे नंतर शेवट मुलाखतीद्वारे अंतिम निवड होते. फक्त पोलिस उपनिरीक्षक साठी १०० गुणांची मुलाखत व ५० गुणांची शारीरिक चाचणी सुद्धा घेतली जाते. बाकी साठी फक्त मुलाखत असते. ह्या दोन्ही मध्ये सुद्धा पास होन महत्वाचं असतं.

अशी हि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा ह्या कठीण असतात पण जर ह्यासाठी प्रामाणिक कष्ट घेण्याची तयारी असेल तर एक चांगला अधिकारी हा कुणीही बाजू शकतो ह्या परीक्षा देऊन. जेवढी परीक्षा अवघड दिसते तेवढीच थोड कष्ट घेतलं तर पास होन हे जास्त अवघड नाही. ऑल दी बेस्ट..!!

पेपरएकूण प्रश्नांची संख्याएकूण गुणडिग्रीमेडियमवेळपेपर pattern
पेपर I100200डिग्रीइंग्रजी आणि मराठी2 तासओब्जेकटीव
पेपर II80200डिग्री आणि डिग्री स्कूलचे मिश्रणइंग्रजी आणि मराठी2 तासओब्जेकटीव

वरील सर्व मजकूर पाहून आपणास अंदाज लागला असेलच, एमपीएससी परीक्षा म्हणजेच राज्यसेवा परीक्षा mpsc exam information in marathi language कशी असते? त्याचे स्वरूप व पात्रता काय आहे? त्याचा अभ्यासक्रम काय आहे ? पेपर कोणते व किती मार्क्स चे असतात महत्वाची पुस्तके कोणती आहेत या सर्वाचे थोडक्यात मार्गदर्शन केले गेले आहे. mpsc information in marathi हा लेख आपल्याला आवडल्यास आपल्या मित्र परिवारासोबत फेसबुक ओट्सअप्प सारख्या विविध सोशियल मेडिया वरून माहिती पोहचवा. तसेच mpsc exam all information in marathi हा लेख कसा वाटला व अजून काही एमपीएससी परीक्षा म्हणजेच राज्यसेवा परीक्षेविषयी राहिले असेल तर आपण comments द्वारे कळवू शकता धन्यवाद.

आम्ही दिलेल्या mpsc marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही mpsc information in marathi pdf त्यामध्ये नक्की बदल करू. अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

1 thought on “एमपीएससी परीक्षा माहिती MPSC Exam Information in Marathi”

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!