करकोचा पक्षी माहिती Stork Bird Information in Marathi

Stork Bird Information in Marathi या पक्ष्याला मराठीमध्ये करकोचा, चामढोक, सारस किवा चित्रबलाक या नावांनी हि ओळखले जाते. अंटार्क्टिका प्रदेश सोडला तर करकोचा हे पक्षी सर्वत्र आढळतो या पक्ष्यांना उष्ण कटिबंधिय प्रदेशांमध्ये राहायला खूप आवडते. करकोचा या पक्ष्याच्या जगभरामध्ये १९ प्रजाती आहेत. काळा करकोचा, लाल करकोचा, पांढरा करकोचा किवा रंगीबेरंगी करकोचा ह्या काही करकोच्या पक्ष्याच्या प्रजाती आहेत. रंगीबेरंगी करकोचा हा भारतातील सामान्य पक्षी आहे जो भारतामध्ये आढळतो आणि या रंगीबेरंगी करकोचा पक्ष्याचे वैज्ञानिक नाव ‘आयबीस ल्युकोसेफॅलस’ असे आहे. या पक्ष्याचे वर्णन करायचे म्हंटले तर या पक्ष्याचे पाय लांब, इंच आणि पातळ काळ्या किवा राखाडी रंगाचे असतात, लांब मान, दंडीदार बिले, विस्तृत पंख असा हा प्रतिष्ठीत स्वरूपाचा पक्षी आहे. हे पक्षी भारत, युरोप, आशिया आणि आफ्रिका मध्ये आढळतात.

white stork bird information in marathi
white stork bird information in marathi

करकोचा पक्षी माहिती – Stork Bird Information in Marathi

नावकरकोचा, चामढोक, सारस किवा चित्रबलाक
प्रकारपक्षी
इंग्रजीstork
कुळ / कुटुंबसिकोनिडी
उंची४७ ते १५२ सेंटी मीटर
वजन८ ते ९ किलो
आयुष्य२५ ते ३० वर्ष
पंखांचा विस्तार ६५ ते १५५ सेंटी मीटर

करकोचा पक्षी कुठे व कसे राहतात – white stork bird nest information in marathi

हे पक्षी भारत, युरोप, आशिया आणि आफ्रिका या देशांमध्ये आढळतात. अंटार्क्टिका प्रदेश सोडला तर करकोचा हे पक्षी सर्वत्र आढळतो या पक्ष्यांना उष्ण कटिबंधिय प्रदेशांमध्ये राहायला खूप आवडते. करकोचा पक्ष्यांचे घरटे हे या पक्ष्यांचा प्रजातीवर अवलंबून असते. काही पक्षी झाडांवर तर काही पक्षी इमारतींवर, खडकांवर किवा जमिनीवर बनवतात. या पक्ष्यांची घरटी मोठ्या आकाराची असतात आणि ती दीर्घ काळासाठी वापरली जातात. या पक्ष्यांचे घरटे डहाळ्या, वाळलेले गवत किवा मोठ मोठ्या काट्यापासून बनवतात.

करकोचा पक्ष्याचा आहार ( food ) 

करकोचा हा पक्षी पूर्णपणे मांसाहारी पक्षी आहे. हा पक्षी पाण्याजवळ राहत असल्यामुळे ते पाण्यामधील लहान मासे, लहान उभयचर प्राणी, खेकडे, बेडूक, कीटक, गांडूळ, लहान प्राणी आणि लहान पक्षी या प्रकारचा आहार खातात.

विणीचा हंगाम आणि सवयी ( mating season and habits )

विणीचा हंगाममार्च किवा एप्रिल
अंड्यांची संख्यामादी एका वेळी २ ते ५ अंडी देते
उष्मायन कालवधी२५ ते ३५ दिवस
पिल्लांचा स्वतंत्र्य कालावधी३ किवा ४ आठवडे

करकोचा हे पक्षी आयुष्यासाठी सोबती बनवत नाहीत. हे स्थलांतरित पक्षी असल्यामुळे हे स्थलांतर केल्यावर नवीन जोडीदार शोधतात पण काही प्रजाती अश्या आहेत ज्यामध्ये ते जोडीने स्थलांतर करतात. या पक्ष्यांचा विणीचा हंगाम हा मार्च किवा एप्रिल मध्ये असतो आणि नर आणि मादी विणीच्या हंगामाच्या अगोदरच घरटे बनवायला सुरुवात करतात. हे पक्षी कळपाने राहतात आणि त्यांची घरटी हि कॉलनी सारखी असतात. मादी करकोचा पक्षी एका वेळी २ ते ५ अंडी देते आणि ती एक एक दिवसाच्या अंतरावर देते. अंडी उबण्याचे काम नर आणि मादी दोघे करतात आणि अंडी उबवण्याचा कालावधी २५ ते ३५ दिवसाचा असतो. हि पिल्ले जेव्हा २५ ते ३५ दिवसांनी अंड्याच्या बाहेर येतात त्यावेळी ती नग्न असतात पण ते त्वरित पंखाचे आवरण विकसित करतात.

हे पक्षी ३ ते ४ आठवड्यानंतर घरट्यामध्ये उभी राहू शकतात आणि काही महिन्यानंतर त्यांचे उड्डाण पंख वाढू लागतात तसेच ते काही दिवसांनंतर उड्डाण हि करू लागतात पण त्यांना काही दिवसांसाठी आहारासाठी आपल्या पालाकांच्यावर अवलंबून राहावे लागते. घरटे बनवणे, अंडी उबवने, अन्न गोळा करणे, पिल्लांचे संगोपन करणे हि सर्व कामे नर आणि मादी दोघे मिळून करतात.

करकोच्या पक्ष्यांची लोकसंख्या

आययुसीएन च्या रेड लिस्ट नुसार करकोच्या पक्ष्यांची संख्या वाढत चालली आहे. जगभरामध्ये या पक्ष्यांची संख्या अंदाजे ७००००० ते ७०४००० इतकी असून त्यामधील २२४००० ते २४७००० करकोचे युरोपमध्ये आहेत.

करकोच्या पक्ष्याच्या १९ प्रजाती खाली दिल्या आहेत 

अनु. क्रप्रजाती
काळा करकोचा
२.पांढरा करकोचा- white stork bird information in marathi
३.आफ्रिकन ओपणबिल
४.एशियन वूलीनॅक
५.आशियाई ओपणबिल
६.ग्रेटर डजेस्टंट
७.काळी बॅक असलेला करकोचा
८.लेसर अॅडजूटंट
९.जाबिरू
१०.मराबऊ करकोचा
११.ओरीएंटल करकोचा
१२.अब्दिमचा करकोचा
१३.मिल्की करकोचा
१४पेन्टेड करकोचा
१५.सॅडल बिल करकोचा
१६.यल्लो बिल करकोचा
१७.स्टोर्म करकोचा
१८.वूड करकोचा
१९.मग्वारी करकोचा

 करकोचा पक्ष्याविषयी तथ्ये ( facts about stork bird )

  • करकोचा हे पक्षी आवाजहीन किवा जास्त प्रमाणात शांत पक्षी आहेत.
  • करकोचा या पक्ष्याच्या गटांचा उल्लेख करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या साज्ञांचा वापर केला जातो.
  • या पक्ष्यांचे घरटे २ मीटर लांब आणि तीन मीटर खोल बनवलेले असते.
  • ४० ते ५० दशलक्ष वर्षापूर्वी पालेओजीनमध्ये करकोचा पक्ष्याची उतपत्ती झाली आहे.
  • ग्रीक आणि पौराणिक कथेमध्ये करकोचा पक्ष्यांना पालकांचे रोल मॉडेल म्हणून चित्रित केले गेले आहे.
  • हे पक्षी काही वेळेला अन्न गोळा करण्यासाठी घरट्यापासून ३० ते ५० किलो मीटर लांब जातात.
  • या पक्ष्यांच्या एका कळपामध्ये १५ ते २० करकोचे असतात.
  • मादी एका वेळी २ ते ५ अंडी देते.
  • करकोचा हा पक्षी गीधाडाच्या आकाराचा असतो.
  • अंटार्क्टिका प्रदेश सोडला तर करकोचा हे पक्षी सर्वत्र आढळतो.

वरील सर्व गोष्टी पाहून आपणास अंदाज लागला असेलच कि हा करकोचा पक्षी stork bird information in marathi language हा पक्षी कसा आहे त्याची रचना, त्याचे जीवन कसे आहे तसेच त्यांची वैशिट्ये कोणती आहेत. white stork bird information in marathi wikipedia हा लेख आपल्याला आवडल्यास आपल्या मित्र परिवारासोबत फेसबुक ओट्सअप्प सारख्या विविध सोशियल मेडिया वरून माहिती पोहचवा. तसेच information about stork bird in marathi हा लेख कसा वाटला व अजून काही करकोचा पक्षाविषयी राहिले असेल तर आपण comments द्वारे कळवू शकता धन्यवाद.

आम्ही दिलेल्या stork bird in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही duck information in marathi त्यामध्ये नक्की बदल करू.  अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!