पांढरा सारस (श्वेतबलाक) पक्षाची माहिती White Stork Bird Information in Marathi

White Stork Bird Information in Marathi सारस पक्षीची माहिती या पक्ष्याला मराठीमध्ये श्वेतबलाक या नावाने ओळखले जाते त्याबरोबर या पक्ष्याला अनेक नावांनी ओळखले जाते आणि ती नावे म्हणजे पांढरा सारस, पांढरा करढोक, पांढरा भुज्या, बहाडा ढोक अशी नवे आहेत. श्वेतबलाक हा पक्षी खास करून पाणथळ भागामध्ये राहणे पसंत करतो. या पक्ष्याचे वैज्ञानिक नाव ‘सिकोनिडे’ असून हा पक्षी ‘सिकोनीडाय’ पक्षी कुळातील आहे आणि हा पक्षी आकाराने मोठा, लांब मान, लांब पाय, लांब आणि टोकदार चोच तसेच ह्या पक्ष्याचा वरचा अर्धा भाग हा पांढऱ्या रंगाचा आणि अर्धा राहिलेला भाग हा काळ्या रंगाचा असतो. श्वेतबलाक हे स्थलांतरित पक्षी आहेत आणि हे स्थलांतर करत असताना मोठ्या कळपाने करतात.

white stork bird information in marathi
white stork bird information in marathi

पांढरा सारस पक्षाची माहिती White Stork Bird Information in Marathi

श्वेतबलाक या पक्ष्याचे शारीरिक वर्णन ( physical description )

श्वेतबलाक हा आकाराने मोठा आहे तसेच या पक्ष्याचा काळा प्राथमिक पंख वगळता या पक्ष्याचे पूर्ण शरीर हे पांढऱ्या पंखांनी झाकले आहे. लांब आणि तीक्ष्ण बिले, पातळ पाय असून ते चमकदार केशरी रंगाचे आहेत. मादी श्वेतबलाक पक्ष्याचे काळ्या रंगाचे बिल आहेत आणि पिवळसर राखाडी रंगाचे पाय आहेत. या पक्ष्यांची उंची १०० ते ११५ सेंटी मीटर इतकी असते तर आणि या पक्ष्यांचे पंख १५० ते १६० सेंटी मीटर लांब पसरतात. नर आणि मादी श्वेतबलाक पक्षी दिसायला एकसारखेच असतात त्यांना ओळखणे खूप अवघड असते.

नावश्वेतबलाक ( white stork )
प्रकारपक्षी
उंची१०० ते ११५ सेंटी मीटर
वजन२.५ ते ४.५ किलो
आयुष्य२० ते २२ वर्ष

श्वेतबलाक हे पक्षी कोठे आढळतात ? 

श्वेतबलाक हा पक्षी मुळचा युरोप, मध्य आणि पूर्व आशिया आणि उत्तर आफ्रिका या देशातील आहे. ऐतिहासिकदुष्ट्या युरोप देशामध्ये बऱ्याच भागामध्ये या पक्षाची पैदास होते. श्वेतबलाक हा पक्षी हिवाळ्यामध्ये उष्णदेशीय आफ्रीका , मध्यपूर्व मधील काही भाग आणि भारतीय उपखंडामध्ये स्थलांतरित होतात.

श्वेतबलाक पक्ष्याचा आवास ? white stork bird nest information in marathi

हे पक्षी शक्यतो गवताळ प्रदेश, सवाना, शेत किवा कुरण या ठिकाणी राहणे पसंत करतात तसेच हे पक्षी उथळ आणि पाणी असलेल्या ठिकाणी राहतात. श्वेतबलाक हा पक्षी प्रजनन काळामध्ये घरटे बांधण्यासाठी योग्य जागा शोधतात बहुतेकदा हे पक्षी उंच झाडावर किवा छपरांवर आपली घरटी बनवतात.

श्वेतबलाक या पक्ष्याचा आहार  (food ) 

हे पक्षी शक्यतो मासे, उभयचर, सरपटणारे प्राणी, किडे, अळ्या आणि लहान सस्तन प्राणी या प्रकारचा आहार खातात.

विणीचा हंगाम आणि सवयी ( mating period and habits )

विणीचा हंगाममार्च ते एप्रिल
स्वतंत्र वय८ ते १० आठवडे
उद्भावन काळ३३ ते ३४ दिवस
अंडीएका वेळी २ ते ५ अंडी
पक्ष्याचे पिल्लूचिक

 या पक्ष्याच्या आयुष्यामध्ये एकदा विन मिळवणारी एकपात्री प्रणाली असते. या पक्ष्याचा विणीचा हंगाम हा वसंत ऋतूमध्ये असतो विशेषता मार्च ते एप्रिल या काळामध्ये असतो. विनीनंतर मादी श्वेतबलाक हा पक्षी दोन दोवासाच्या अंतराने २ ते ५ अंडी देतात. नर आणि मादी हे दोन्ही पक्षी अंडी उबवण्याचे काम करतात आणि अंडी उबवण्याचा काळ हा ३३ ते ३४ दिवस असतात. जेव्हा पिल्ले बाहेर पडतात तेव्हा नर आणि मादी त्यांना ६० ते ६५ दिवस अन्न देतात व त्यांची काळजी घेतात. या पिल्लांचे ३ ते ५ वर्षाच्या वयानंतर प्रजनन सुरु होते.

श्वेतबलाक या पक्ष्याविषयी तथ्ये ( facts of white stork )

  • हिब्रूमध्ये या प्रजातीला ‘चासिदा’ असे म्हणतात आणि याचा अर्थ दयाळू असा होतो.
  • सामान्यता हे पक्षी मनुष्यांना घाबरत नाहीत आणि हे आपले घरटे इमारतीच्या वरच्या बाजूला बांधतात.
  • मादी २ दिवसाच्या अंतरावर २ ते ५ अंडी देतात.
  • नर आणि मादी दोघेही उंडी उबवण्याचे काम करतात आणि पिल्लांसाठी लागणारे अन्न गोळा करतात.
  • श्वेतबलाक हा पक्षी मुळचा युरोप देशाचा आहे म्हणजेच या पक्ष्याची उत्पत्ती युरोप मध्ये झाली.
  • आययुसीएन च्या मते हे पक्षी धोक्यात आहे आणि या पक्ष्यांची संख्या हळू हळू कमी होत चालली आहे.
  • श्वेतबलाक हे पक्षी मोठ्या गटामध्ये स्थलांतर करतात तसेच यांच्या कळपामध्ये रेप्टर्स आणि पांढरे पेलीकन हे सुध्दा सामील होतात आणि त्यामुळे ज्यावेळी हे पक्षी स्थलांतर करत असताना आकाशामध्ये या पक्ष्यांचा गट १२५ मैलापर्यंत पसरलेला दिसतो.
  • श्वेतबलाक हा पक्षी शेतामध्ये, गवताळ प्रदेशामध्ये, सवाना मध्ये, दलदलीच्या प्रदेशामध्ये आणि जंगलामध्ये २० ते २२ वर्ष जगू शकतो आणि जर या पक्ष्याला पिंजऱ्यामध्ये ठेवले तर हा पक्षी ३५ ते ४० वर्ष जगू शकतो.

विवध भारतीय भाषेतील श्वेतबलाक पक्ष्याची नावे ( names in different langauge )

श्वेतबलाक या पक्ष्याला वेगवेगळ्या भाषेमध्ये वेगवेगळी नावे आहे आणि त्यामधील काही नावे खाली दिली आहेत.

भाषानाव
मराठीश्वेतबलाक, पांढरा भुज्या, बहाडा ढोक
इंग्रजीwhite stork
भोजपुरीलगलग
हिंदीउजली, गैबर
नेपाळीसेतो गरुड
गुजरातीसफेडा श्वेतबलाक
मल्याळमवेलूट्टा पनीं
तमिळवेल्लाई नराई
बंगालीसाडा सारसा
कन्नडबिळी कोक्करे

वरील सर्व गोष्टी पाहून आपणास अंदाज लागला असेलच कि हा पांढरा सारस पक्षी white stork bird information in marathi language हा पक्षी कसा आहे त्याची रचना, त्याचे जीवन कसे आहे तसेच त्यांची वैशिट्ये कोणती आहेत. white stork bird information in marathi wikipedia हा लेख आपल्याला आवडल्यास आपल्या मित्र परिवारासोबत फेसबुक ओट्सअप्प सारख्या विविध सोशियल मेडिया वरून माहिती पोहचवा. तसेच information about white stork in marathi हा लेख कसा वाटला व अजून काही पांढरा सारस पक्षाविषयी राहिले असेल तर आपण comments द्वारे कळवू शकता धन्यवाद.

आम्ही दिलेल्या white stork in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू. अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!