tait exam information in Marathi – tait exam eligibility in marathi शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा, महाराष्ट्रामध्ये शिक्षकांची भारती करून घेण्यासाठी तसेच त्यांची पात्रता ओळखण्यासाठी अनेक वेगवेगळ्या परीक्षा घेतल्या जातात आणि तश्याच प्रकारची टीएआयटी (tait) हि देखील एक परीक्षा आहे आणि आज आपण या लेखामध्ये टीएआयटी (tait) परीक्षेविषयी माहिती घेणार आहोत. टीएआयटी या परीक्षेला मराठीमध्ये महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी म्हणून ओळखले जाते तसेच या परीक्षेचा इंग्रजी मधील पूर्ण स्वरूप टीचर अॅप्टीट्युड अँड इंटॅलीजंस (teacher aptitude and intelligence test) असा आहे.
महाराष्ट्र राज्यामध्ये शिक्षक भरतीसाठी हि शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा घेतली जाते आणि हि परीक्षा वर्षातून एकदा फेब्रुवारी घेतली जाते ज्यामध्ये शिक्षकांची योग्यता पडताळली जाते. हि परीक्षा हि प्राथमिक, माध्यमिक, उच्च प्राथमिक, उच्च माध्यमिक, कॉलेज, अनुदानित अध्यापक विद्यालय शिक्षकांच्या भरतीच्या पदावर भरती होण्यासाठी सर्वांना समान संधी मिळावी म्हणून हि परीक्षा घेतली जाते.
हि परीक्षा प्राथमिक किंवा माध्यमिक शिक्षक होऊ इच्छिणाऱ्या शिक्षकांच्यासाठी घेतली जाते आणि हि परीक्षा एकूण २०० प्रश्नाची असते आणि प्रत्येक प्रश्नाला १ मार्क असतो म्हणजेच होई परीक्षा २०० मार्काची असते आणि या मध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारची प्रश्न विचारली जातात.
जसे कि इंग्रजी भाषा आणि व्याकरण, मराठी भाषा आणि व्याकरण, आकलन शक्ती, वेग आणि अचूकतेविषयी प्रश्न, तर्क आणि अनुमान विषयी प्रश्न तसेच गणिता विषयी प्रश्न अश्या वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात आणि यामधील प्रश्न सोडवण्यासाठी २ तासाचा कालावधी असतो. चला तर आता आपण शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा या विषयी सविस्तर माहिती खाली घेवूया.

शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी – TAIT Exam Information in Marathi
परीक्षेचे नाव | टीएआयटी |
मराठी नाव | शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी |
इग्रजी नाव | टीचर अॅप्टीट्युड अँड इंटॅलीजंस (teacher aptitude and intelligence test) |
मार्क | २०० |
वेळ | दोन तास |
हेतू | प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक किंवा कनिष्ट व्याख्यता बनण्यासाठी |
टीएआयटी परीक्षेचे स्वरूप – TAIT exam pattern in marathi
कोणत्याही परीक्षेला कोणते ना कोणते नियम घालून दिलेले असतात आणि तसेच टीएआयटी परीक्षेचे देखील काही नियम आहेत किंवा ती कशी घ्यायची, केंव्हा घ्यायच्या अश्या सर्व गोष्टींच्या बद्दल स्वरूप ठरवले आहेत ते आता आपण खाली पाहणार आहोत.
- महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी या परीक्षेमध्ये २०० प्रश्न असतात आणि परीक्षा २०० मार्काची असते म्हणजेच या परीक्षेमध्ये प्रत्येक प्रश्नासाठी एक गुण दिला जातो.
- या परीक्षेमध्ये दोन विषयांचे प्रश्न असतात ते म्हणजे योग्यता आणि बुध्दीमत्ता.
बुद्धिमत्ता विभाग : बुद्धिमत्ता विभाग मध्ये त्या संबधित शिक्षकाची बुध्दीची चाचणी घेतली जाते म्हणजेच त्या विभागामध्ये बुध्दीच्या संबधित प्रश्न विचारलेले असतात आणि यामध्ये एकूण ८० प्रश्न असतात आणि हा वोभाग ८० मार्क असलेला बहु पर्यायी विभाग असतो.
अभियोग्यता विभाग : अभियोग्याता विभाग देखील बहु पर्यायी प्रश्नांचा असतो आणि यामध्ये १२० प्रश्न असतात आणि प्रत्येक प्रश्नाला १ मार्क असतो म्हणजेच हा विभाग १२० मार्काचा असतो आणि यामध्ये शिक्षक अभिरुचीवर अवलंबून प्रश्न विचारले जातात. हा विभाग जास्त मार्कांच्यासाठी असल्यमुळे परीक्षा देणाऱ्या व्यक्तीने या भागाकडे जास्त लक्ष दिले पाहिजे.
- शिक्षक अभियोग्यता आणि बुध्दीमत्ता चाचणी हि परीक्षा ऑनलाईन पध्दतीने घेतली जाते.
- हि परीक्षा प्राथमिक किंवा माध्यमिक शिक्षक बनण्यासाठी किंवा कनिष्ट व्याख्याता बनू इच्छिणाऱ्या व्यक्तीला हि परीक्षा द्यावी लागते.
- शिक्षक अभियोग्यता आणि बुध्दीमत्ता चाचणी हि परीक्षा बहुपर्यायी प्रश्नांची असते आणि या परीक्षेमधील प्रश्न सोडवण्यासाठी २ तासाचा वाढी असतो.
परीक्षेतील प्रश्न आणि गुण
परीक्षेतील विभाग | प्रश्न | गुण |
अभियोग्यता विभाग | १२० | १२० |
बुध्दीमत्ता विभाग | ८० | ८० |
एकूण | २०० | २०० |
टीएआयटी परीक्षेचा अभ्यासक्रम – tait exam syllabus in marathi
प्रत्येक परीक्षेचा अभ्यासक्रम हा वेगवेगळा असतो म्हणजे ती परीक्षा ज्या संबधित आहे त्या विषयाचे प्रश्न त्यामध्ये विचारले जातात त्यामुळे आपल्याला त्या संबधित परीक्षेसाठी योग्य आहेत तो अभ्यासक्रमाचा सराव करावा लागतो. चला तर आता आपण टीएआयटी परीक्षेचा अभ्यासक्रम काय आहे ते पाहूया.
टीएआयटी हि परीक्षा दोन विभागामध्ये घेतली जाते एक म्हणजे अभियोग्यता विभाग आणि दुसरा बुध्दीमत्ता विभाग आणि या दोन्ही विभागामध्ये त्या संबधित प्रश्न विचारले जातात त्यामुळे हि परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या व्यक्तीला दोन्ही प्रकारचा अभ्यासक्रमाचा सराव करावा लागतो.
अभियोग्यता विभाग (aptitude test) | बुध्दीमत्ता विभाग (intelligence test) |
मराठी भाषेविषयाची क्षमता | सांकेतिक भाषा |
इंग्रजी भाषा आणि व्याकरण | क्रम श्रेणी |
तर्क क्षमता आणि गणितीय क्षमता | कुट प्रश्न |
वेग आणि अचूकता | वर्गीकरण |
अवकाशीय क्षमता | तर्क आणि अनुमान |
व्यक्तिमत्व | आकलन |
शिक्षक अभियोग्यता चाचणी पात्रता – tait exam eligibility in marathi
- शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा हि प्राथमिक किंवा माध्यमिक शिक्षक होऊ इच्छिणाऱ्या शिक्षकांच्यासाठी आहे.
- या परीक्षेला बसण्यासाठी कमीत कमी त्या संबधित व्यक्तीचे वय हे १८ वर्षापेक्षा जास्त असले पाहिजे आणि त्याचे वय जास्तीत जास्त ३८ इतके असले पाहिजे आणि हा नियम ओपन कॅटॅगरीमध्ये (open category) असणाऱ्या व्यक्तीला लागू होतो.
- मागास वर्गीय उमेद्वारांच्यासाठी कमीत कमी वय हे १८ वर्षाहून अधिक आणि ४३ वर्षाहून कमी असले पाहिजे.
आम्ही दिलेल्या tait exam information in Marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा माहिती बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या tait exam eligibility in Marathi article मध्ये update करू, मित्रांनो हि tait exam syllabus in Marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट