talathi exam information in marathi तलाठी भरती परीक्षा माहिती, तलाठी हे पद एक गाव पातळीवर काम करणारे एक पद आहे आणि या पडला सजा या नावाने देखील ओळखले जाते आणि आज आपण या लेखामध्ये तलाठी या पदाविषयी माहिती तसेच याची प्रवेश प्रक्रिया आणि परीक्षा पक्रिया कशी असते या विषयी माहिती घेणार आहोत. हि एक गावपातळीवर काम करणारे पद आहे म्हणजेच हे पद ज्या ठिकाणी ग्रामपंचायत आहे, त्या ठिकाणी नेमले जाते .आणि त्यावेळी तलाठी या पदावर काम करणाऱ्या व्यक्तीला त्याच्या हाताखाली असणाऱ्या गावांच्यामधील ग्रामविकास कामांच्यावर तसेच गावातील इतर समस्यांच्यावर (पाणी तुटवडा, स्वच्छता) लक्ष देणे आणि त्यावर काम करणे हे काम असते.
तसेच या व्यक्ती हा महसूल विभागामध्ये काम करतो आणि म्हणून त्या संबधित क्षेत्राची महसूल विषयक कामे पाहणे हे त्याचे महत्वाचे काम असते. परंतु तलाठी हे पद मिळवण्यासाठी त्या संबधित व्यक्तीला एक विशेष परीक्षा द्यावी लागते आणि त्याला त्या परीक्षेमध्ये उतीर्ण देखील व्हावे लागते आणि हि परीक्षा सरकार मार्फत आयोजित केली जाते.
त्यानंतर त्या संबधित व्यक्तीची लेखी परीक्षा (Written Test), तोंडी परीक्षा (Interview), कौशल्य चाचणी (Skills Test), टायपिंग चाचणी (Typing Test) आणि दस्ताऐवज पडताळणी (Documents Verification) करून केली जाते. तलाठी हि परीक्षा देण्यासाठी त्या संबधित व्यक्तीचे वय हे १८ ते ३८ यामधील असले पाहिजे आणि त्याने पदवीधर शिक्षण देखील पूर्ण केलेले असले पाहिजे, तरच त्या व्यक्तीला या परीक्षेला अर्ज करण्यास अनुमती असते.
तलाठी भरती परीक्षा माहिती – Talathi Exam Information in Marathi
परीक्षेचे नाव | तलाठी परीक्षा |
वयोमर्यादा | १८ ते ३८ वर्ष |
शैक्षणिक पात्रता | कोणत्याही शाखेचे पदवीधर शिक्षण |
परीक्षेचे टप्पे | लेखी परीक्षा, कौशल्य चाचणी, टायपिंग चाचणी आणि दास्ताऐवज पडताळणी |
नोकरी वर्ग | राज्य सरकारी नोकरी |
वेतन | सुरुवात १५००० ते २०००० |
तलाठी परीक्षेचे स्वरूप – exam pattern
तलाठी हे पद मिळवण्यासाठी त्या संबधित विद्यार्थ्याला तलाठीची परीक्षा द्यावी लागते आणि हि परीक्षा देण्यासाठी त्या संबधित विद्यार्थ्याने पदवीचे शिक्षण चांगल्या मार्काने पूर्ण करणे आवश्यक असते आणि त्याचे वय हे १८ ते ३८ यामधील असावे लागते आणि मागास जातीसाठी ते बदलू शकते.
तलाठी बनण्यासाठी दिली जाणारी पहिली परीक्षा हि लेखी स्वरुपाची असते आणि यामध्ये १०० प्रश्न असतात आणि हि परीक्षा २०० मार्काची असते म्हणजेच प्रत्येक एक प्रश्नाला दोन मार्क असतात आणि हि परीक्षा देण्यासाठी २ तास असतात आणि यामध्ये इंग्रजी, मराठी, गणित आणि सामान्य ज्ञान या विषयक प्रश्न विचारले जातात आणि हि परीक्षा जिल्हा निवड सामिती मार्फत घेतली जाते.
तसेच जर विद्यार्थी लेखी परीक्षा पात्र ठरला तर त्याची तोंडी परीक्षा तसेच टंकलेखन परीक्षा (typing test) आणि नोकरी विषयक इतर कौशल्य चाचणी घेतली जाते आणि तो संबधी व्यक्ती या सर्वामध्ये पात्र ठरला तर शेवटी त्याची कागदपत्रांची पडताळणी केली जाते आणि कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर त्याची तलाठी पदासाठी निवड केली जाते.
तलाठी परीक्षेचे टप्पे – stages
- लेखी परीक्षा (written test).
- तोंडी परीक्षा (interview).
- कौशल्य चाचणी (skills test).
- टायपिंग चाचणी (typing test).
- दस्ताऐवज पडताळणी (documents verification).
तलाठी भरती शैक्षणिक पात्रता – eligibility
कोणतीही परीक्षा देण्यासाठी त्या संबधित व्यक्तीला त्या संबधित संस्थेने ठरवलेले काही पात्रता निकष पार पडावे लागतात आणि तसेच तलाठी परीक्षा देण्यासाठी देखील समितीने ठरवलेले काही पात्रता निकष आहेत ते आपण खाली पाहणार आहोत.
- तलाठी परीक्षा देण्यासाठी इच्छुक असणारा व्यक्ती किंवा उमेदवार हा भारतीय नागरिक असला पाहिजे.
- जर एखाद्या व्यक्तीला तलाठी परीक्षेसाठी अर्ज करायचा असेल तर खुल्या वर्गातील व्यातीचे वय हे १८ ते ३८ या मधील असले पाहिजे. तसेच जर तो उमेदवार एससी/ एसटी / ओबीसी वर्गातील असेल किंवा आरक्षित वर्गातील असेल तर त्याची वयोमर्यादा हि १८ ते ४३ पर्यंत असली पाहिजे.
- तसेच त्या संबधित व्यक्तीला मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेचे चांगले ज्ञान असले पाहिजे.
- जर संबधित व्यक्तीला तलाठी परीक्षेसाठी अर्ज करायचा असेल तर त्या व्यक्तीने कोणत्याही शाखेचे पदवीधर शिक्षण हे मान्यताप्राप्त विद्यापीठातून पूरब केलेले असले पाहिजे आणि त्याने कमीत कमी ५० टक्के तरी गुण मिळवले असले पाहिजेत.
तलाठी भरती अभ्यासक्रम – Talathi Exam Syllabus in Marathi
तलाठी परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा – how to apply
- तलाठी अर्ज करण्यासाठी त्या संबधित व्यक्तीला महसूल आणि वन विभागाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागते.
- आता महसूल विभाग तलाठी आणि मंडळ अधिकारी भरती अधिसूचना लिंकवर क्लिक करा. आणि प्रेत्येक सूचना हि काळजी पूर्वक वाचा.
- आता जर तुम्ही अटींच्यानुसार पात्र असाल तर अर्जाची प्रिंटआऊट घ्या.
- मग कोणत्याही प्रकारची स्पेलिंग किंवा व्याकरणाची चूक न करता अर्जामधील सर्व मजकूर भर आणि तो परत एकदा तपासा.
- त्यानंतर अर्ज पूर्ण भरल्यानंतर तुमच्या नोंदणी अर्जासोबत तुमचा पासपोर्ट आकाराचा एक फोटो जोडा आणि इतर प्रमाणपत्रे देखील जोडा.
- आता शेवटी आधीसूचनेमध्ये दिलेल्या पोस्टल पत्त्यावर शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज आणि डिमांड ड्राफ्ट पाठवा.
आम्ही दिलेल्या talathi exam information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर तलाठी भरती परीक्षा माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या talathi exam syllabus in marathi या talathi bharti syllabus article मध्ये update करू, मित्रांनो हि talathi information in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये talathi bharti information in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट