tirupati balaji history in marathi – Tirupati balaji information in marathi तिरुपती बालाजी मराठी माहिती, आपल्या भारत देशामध्ये मंदिरांचे पावित्र्य मोठ्या प्रमाणात जपले जाते आणि भारतामध्ये अशी अनेक मंदिरे आहेत जी मोठ्या प्रमाणात लोकप्रिय आहेत आणि त्यामधील बालाजी मंदिर हे एक लोकप्रिय मंदिर आहे जे आपल्या भारतामध्ये तर प्रसिध्द आहेच परंतु हे मंदिर जगामध्ये देखील प्रसिध्द आहे म्हणजेच जगातील अनेक लोक या मंदिराला भेट देण्यासाठी येतात.
तिरुपती बालाजी मंदिर हे भारतामध्ये इतके प्रसिध्द आहे कि या मंदिराविषयी कोणाला माहित नाही असे नाही तर या मंदिराविषयी सर्वांना माहिती आहे. तिरुपती बालाजी मंदिर हे भारतातील आंध्र प्रदेश राज्यातील चित्तूर जिल्ह्यातील तिरुपती जवळील तिरुमला या शहर टेकडीवर हे मंदिर वसलेले आहे आणि या मंदिरामध्ये भगवान व्यंकटेश्वराची मूर्ती विराजमान आहे.
आणि असे म्हटले जाते कि हि मूर्ती भगवान विषाणूंचा अवतार आहे. तिरुपती बालाजी मंदिर हे अतिशय प्राचीन मंदिर जरी असले तरी सध्या देखील अनेक भक्त लोक दरवर्षी या मंदिराला भेट देतात आणि तिरुपती बालाजीचे दर्शन घेतात.
आणि भारतासोबतच भारताबाहेरील लोक देखील या मंदिरामध्ये दर्शनासाठी येतात त्याचबरोबर या मंदिराची बांधकाम शैली इतकी सुंदर आहे कि ते देखील पाहण्यासाठी येतात आणि हे पहिल्या नंतर मन अगदी प्रसन्न होते. चला तर खाली आपण तिरुपती बालाजी विषयी संपूर्ण माहिती पाहूया.
तिरुपती बालाजी मराठी माहिती – Tirupati Balaji History in Marathi
बालाजी मंदिरातील मूर्तीचे वर्णन
तिरुपती बालाजी मंदिरामध्ये जी भगवान विष्णूचा अवतार असणारी व्यंकटेश्वराची मूर्ती आहे ती एक काळ्या रंगाची उभी असलेली मूर्ती आहे आणि त्या मूर्तीची उंची २ मीटर इतकी असून या मूर्तीची एक विशेषता म्हणजे या मूर्तीला खरोखरचे केस आहेत. या मूर्तीला अभिषेक घातला जातो आणि मग नंतर अनेक वेगवेगळ्या दागिन्यांनी आणि आभूषनांणी सजवले जाते.
तिरुपती बालाजी मंदिराचा इतिहास – tirupati balaji information in marathi
तिरुपती बालाजी मंदिराचा इतिहास हा इतका परिचित नाही म्हणजेच या मंदिराच्या इतिहासाविषयी काहीच अचूक सांगता येत नसले तरी काही इतिहासकारांनी असे सांगितले आहे कि हे मंदिर २ हजार वर्षापूर्वीचे जुने वैष्णव मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये जी भगवान व्यंकटेश्वराची मूर्ती आहे.
ती मूर्ती स्वयंभू आहे म्हणजेच हि मूर्ती आपोआप त्या ठिकाणी प्रस्तापित झाली आहे असे म्हटले जाते. इ.स १५१७ मध्ये राजा कृष्णदेवराय यांनी या मंदिरासाठी दान दिले होते आणि तसेच या परिसरावर वेगवेगळ्या घराण्यांनी राज्य केले होते.
आणि त्यामधील काही घराण्यांनी देखील या मंदिरासाठी दान दिले होते आणि इतिहासामध्ये चोळ आणि पल्लव घराण्यांचा देखील उल्लेख आहे ज्यांनी या मंदिरासाठी दान दिले होते.
तिरुपती बालाजी मंदिराची वास्तूकला – architecture
तिरुपती बालाजी मंदिर हे एक प्राचीन मंदिर आहे म्हणजेच हे मंदिर २ हजार वर्षापूर्वीचे मंदिर असून हे द्रविडीयन प्रकारातील मंदिर आहे, म्हणजेच या मंदिराची वास्तूकला हि द्राविडीयन प्रकारातील आहे.
मंदिराचा सर्वात महत्वाचा भाग म्हणजे आनंद नीलयम ज्या रचनेमध्ये मुख्य मूर्ती आहे. त्याचबरोबर या मंदिराला तीन प्रवेश दरवाजे आहेत आणि पहिल्या दरवाज्याला महाद्वारम या नावाने ओळखले जाते
तिरुपती बालाजी विषयी काही मनोरंजक आणि विशेष तथ्ये – facts
- तिरुपती बालाजी हा भारतातील सर्वात श्रीमंत देव मानला जातो कारण या ठिकाणी धान्य, दागिने आणि इतर संपत्ती अनेक भक्तलोक दान करतात.
- आपण अनेक वेळा पाहतो कि अनेक मंदिरांच्यामध्ये मंदिरामध्ये आणि मंदिरांच्या गाभाऱ्यामध्ये रोशनाई करण्यासाठी इलेक्ट्रिक दिव्यांचा वापार केला जातो परंतु तिरुपती बालाजीच्या गाभाऱ्यामध्ये कोणत्याही प्रकारची विद्युत रोशनाई केली जात नाही.
- या मंदिरामध्ये गाभाऱ्यामध्ये वातीचा दिवा (तेलाचा दिवा) लावला जातो आणि तिरुपती बालाजीची मूर्ती हि वातीच्या प्रकाशामध्ये आहे आणि गाभाऱ्यामध्ये कोणत्याही प्रकारची विद्युत रोशनाई नाही.
- तिरुपती बालाजीच्या मूर्तीला खरोखरचे केस आहेत आणि हे केस कधीच गुंफत नाहीत.
- असे म्हटले जाते कि मंदिरामध्ये असणाऱ्या व्यंकटेश्वराच्या मूर्तीला अभिषेक झाल्यानंतर घाम फुटतो म्हणजेच असे वाटते कि या मूर्तीमध्ये साक्षात देव आहेत.
- तिरुपती बालाजीच्या मूर्तीला जी फुले, हार, दुध आणि इतर पूजेसाठी वापरले जाणारे सामान हे गुप्त गावातून येते जे इतर लोकांना या बद्दल काहीच माहिती नाही परंतु हे गाव तिरुपतीपासून २० किलो मीटर अंतरावर आहे असे म्हटले जाते.
- व्यंकटेश स्वामींनी घातलेला पोशाख हा ६ किलो वजनाचा आहे आणि या मूर्तीला वरचा भाग साडीने आणि खालचा भाग हा धोतराने झाकलेला असतो.
- तिरुपती बालाजी मंदिरामध्ये असणाऱ्या मूर्तीची पूजा हि वैखानाच्या परंपरेनुसार दिवसातून सहा वेळा केली जाते आणि दिवसभराच्या सहा पूजांना वेगवेगळी नावे दिली जातात ती म्हणजे उषाकला, प्राथकला, मध्यानिका, अपहार, संध्याकाल आणि मध्यरात्री पूजा.
- तिरुपती मंदिरामध्ये रोज ६५ ते ७० हजार लोक भेट देण्यासाठी आणि दर्शन घेण्यासाठी येतात.
- तिरुमला हि एक छोटीशी दगडी टेकडी आहे आणि हि गरुडासारखी दिसते आणि या ठिकाणी व्यंकटेश स्वामी विश्रांती घेत होते आणि म्हणून या टेकडीला गरुड टेकडी असे नाव पडले होते कारण भगवान विष्णूंचे वाहन गरुड होते.
- तिरुपती बालाजी मंदिर हे जरी हिंदू मंदिर असले तरी त्या ठिकाणी हिंदू भक्तांच्या सोबत मुस्लीम भक्त देखील दर्शनासाठी येतात.
- असे म्हणतात कि पाचाई कर्पूर हे दगडाला लावले तर त्या दगडाला भेगा पडतात परंतु या मूर्तीला हे लावल्यानंतर कोणत्याही प्रकारच्या भेगा पडत नाहीत.
- या ठिकाणी जो तेला दिवा लावला आहे तो केंव्हा लावला गेला ते कोणालाच माहित नाही परंतु हा दिवा लावल्यापासून आज पर्यंत कधीही विझू देखील दिला नाही.
- असे म्हटले जाते कि १८०० मध्ये हे मंदिर बंद होते आणि याचे कारण म्हणजे तेथील १२ लोकांनी गुन्हा केला होता म्हणून राजाने त्यांची हत्या करून त्यांना मंदिराच्या भिंतींना लटकवले होते आणि याच वेळी त्या ठिकाणी व्यंकटेश स्वामी प्रगट झाले होते.
- मुख्य प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला अनंतहल्वर यांनी व्यंकटेश्वर स्वामींना मारण्यासाठी वापरलेली काठी आहे.
आम्ही दिलेल्या tirupati balaji information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर तिरुपती बालाजी मराठी माहिती बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या tirupati balaji history in marathi या tirupati balaji story in marathi article मध्ये update करू, मित्रांनो हि tirupati balaji and mahalaxmi story in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट