तिरुपती बालाजी मंदिर माहिती Tirupati Balaji Temple Information in Marathi

Tirupati Balaji Temple Information in Marathi आजच्या ब्लॉग मध्ये तिरुपती बालाजी या प्रसिद्ध तीर्थक्षेत्राची माहिती घेणार आहोत. ही कथा श्रीविष्णू भगवान यांच्यावर आधारित असून, आज आपण या  मंदिराची सविस्तर माहिती या ब्लॉगद्वारे जाणून घेणार आहोत. ऐतिहासिक माहितीनुसार मंदिर जवळपास दोन हजार वर्षे जुने आहे. मंदिराच्या बांधकामात सगळ्यात जास्त योगदान चोळं व पल्लव साम्राज्यांनी दिले आहे. असे म्हटले जाते की इसवी सन 614 मध्ये पल्लवची राणी सवाई ने येथील मंदिराची पहिली वेदी बांधली होती पण चोळ राजवटीमध्ये मंदिराच्या वैभवात वाढ होत गेली. 

tirupati balaji temple information in marathi
tirupati balaji temple information in marathi

तिरुपती बालाजी मंदिर माहिती – Tirupati Balaji Temple Information in Marathi

तिरुपती बालाजी मंदिरमाहिती
मंदिराचे नावतिरुपती बालाजी मंदिर
उत्सव, यात्राब्रह्मोउत्सव
मंदिर कोठे आहेआंध्र प्रदेश येथील चित्तूर जिल्ह्यात
मंदिराचे दुसरे नावव्यंकटेशवर मंदिर
पाहाण्यासारखी ठिकाणेपद्मावती समोवर मंदिर, गोविंदराज स्वामी मंदिर,  अंजनेयस्वामी मंदिर

मंदिराचा इतिहास:

तिरुपती बालाजी मंदिराचा इतिहास आगळावेगळा आहे. मंदिराच्या स्थापनेची अचूक माहिती आज पर्यंत कोणासही माहित नाही आहे. ऐतिहासिक माहितीनुसार मंदिर जवळपास दोन हजार वर्षे जुने आहे. मंदिराच्या बांधकामात सगळ्यात जास्त योगदान चोळं व पल्लव साम्राज्यांनी दिले आहे. असे म्हटले जाते की इसवी सन 614 मध्ये पल्लवची राणी सवाई ने येथील मंदिराची पहिली वेदी बांधली होती पण चोळ राजवटीमध्ये मंदिराच्या वैभवात वाढ होत गेली. कृष्णदेवराय राजाने १९१७ मध्ये दिलेल्या दानातून मंदिराच्या गर्भगृहातील शिखराला सोन्याचा थर दिला. मंदिराच्या कायमस्वरुपी देखभालीची व्यवस्था आपले मराठी सेनापती राघोजी भोसले यांनी घेतली होती.

त्यानंतर म्हैसूर व गदवलांच्या माध्यमातून मंदिराला मोठ्या देणग्या मिळाल्या होत्या. त्याच्यानंतर ब्रिटिशांच्या काळामध्ये मंदिराची देखभाल हाथीरामजी मठाला सोपवण्यात आली होती. त्यानंतर ही व्यवस्था १९३३ पर्यंत अशीच पुढे चालू राहिली. मग पुढे १९३३ मध्ये मद्रास विधानसभेमध्ये कायदान सोबत तिरुमला तिरुपती देवस्थान संस्थेची स्थापना केली आणि आता मंदिराची व्यवस्था हीच संस्था बघते.

तिरुपती बालाजी ची कथा :

तिरुपती बालाजी हे एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असून दरवर्षी लाखोच्या संख्येने भक्त तिरुपती बालाजी ला भेट देण्यास येतात. तिरुपती बालाजी ला दरवर्षी अर्पण करण्यात येणाऱ्या किमती वस्तू, सोने-चांदी, पैसे, त्यामुळे तिरुपती बालाजी मंदिर हे व्हीआयपी मंदिर म्हणून देखील ओळखले जाते. भक्तांनी चढवलेले करोडो रुपये मिळून देखील तिरुपती बालाजी मंदिरातील देव तिरुपती म्हणजेच विष्णु हे सगळ्यात गरीब देव मानले जातात. पुरानातील कथांनुसार महात्रृषी भृग यांना संपूर्ण विश्वाचा महादेव कोण आहे हे जाणून घ्यायचे होते.

ते ब्रह्मदेव व देव शिवा यांच्यापासून समाधानी नव्हते.  मग ते थेट वैकुण्ठला पोहोचले आणि झाडाखाली विश्रांती करत बसलेल्या भगवान विष्णूच्या छातीवर जोरात लाथ मारली. भगवान विष्णु यांनी महारिशी यांचे पाय पकडले व त्यांना विचारले, ऋषी तुम्हाला लागले तर नाही ना? हे पाहून महाऋषि यांना त्यांची चूक कळाली व त्यांना समजले की पूर्ण विश्वाचे महादेव हे भगवान विष्णू आहेत. महाऋषी यांनी दोन्ही हात जोडून भगवान विष्णू यांची माफी मागितली व म्हणाले की तुम्हीच पूर्ण विश्वातील महान देवता आहात.

पण भगवान विष्णू यांचा झालेला अपमान देवी महालक्ष्मी यांना सहन झाला नाही. देवीलक्ष्मी यांनी भगवान विष्णू यांना महाऋषीना शिक्षा देण्यास सांगितले परंतु भगवान विष्णू याच्यावर काही बोलले नाहीत हे पाहून लक्ष्मीदेवी नाराज झाल्या आणि त्या वैकुण्ठ सोडून निघून गेल्या. भगवान विष्णु यांनी देवीलक्ष्मी यांचा शोध घेण्यास सुरुवात केली आणि त्यांना कळाले की देवीलक्ष्मी यांनी पृथ्वीवर पद्मावती या नावाने पुनर्जन्म घेतला आहे.

मग भगवान विष्णूंनी लगेच रूप बदलून ते पद्मावती कडे पोहोचले व पद्मावती समोर विवाह करण्याचा प्रस्ताव ठेवला  देवी लक्ष्मीनी लगेच तो मान्य देखील केला पण आता विवाह करण्यासाठी धन कुठून आणायचे या समस्येचं उत्तर म्हणून भगवान विष्णू यांनी शंकर देव व ब्रह्मदेव यांना साक्षी ठेवून कुबेर यांच्याकडून कर्ज घेतले व ते कर्ज हा कलियुग संपेपर्यंत फेडण्याचे वचन दिले. या कथेनुसार महाविष्णू कर्जात बुडाले असल्यामुळे त्यांचे अनेक भक्त दरवर्षी तिरुपती बालाजी या मंदिरात मोठ्या प्रमाणामध्ये सोने, चांदी, पैसे अर्पण करतात जेणेकरून महाविष्णू कर्जातून मुक्त व्हावे.

तिरुपती पाहाण्यासारखी ठिकाणे:

तिरुपती बालाजी मध्ये पाहण्यासारखे खूप सारी आकर्षक स्थळे आहेत. त्यातलीच काही स्थळे म्हणजे पद्मावती समोवर मंदिर हे मंदिर भगवान श्रीवेंकटेश्वर यांची पत्नी पद्मावती यांना समर्पित केले आहे. या मंदिराला तिरुचनूर असे देखील म्हणतात. तिरुपती पासून हे मंदिर फक्त पाच किलोमीटर दूर आहे. असे मानले जाते की तिरुपती ची यात्रा तो पर्यंत पूर्ण होत नाही जो पर्यंत भक्त या मंदिराचे दर्शन घेत नाहीत.

त्याच्यानंतर तिरुपती बालाजी या मंदिराचे मुख्य आकर्षण आहे श्री गोविंदराज स्वामी यांचे मंदिर श्री गोविंदराज स्वामी हे भगवान बालाजी यांचे मोठे भाऊ आहेत. या  मंदिराचा गोपुर सर्वात भव्य असून तो लांबूनच दिसून येतो या मंदिरात होणारे सगळे कार्यक्रम उत्सव हे व्यंकटेश्वर मंदिराच्या समोरच होतात. श्री कोंडदरामस्वमी मंदिर हे तिरुपती मंदिराच्या मध्य भागात आहे या मंदिरा मध्ये श्री राम, लक्ष्मण व सीता यांची पूजा केली जाते. या मंदिराची बांधणी दहाव्या शतकामध्ये चोळ राजवटीतील राजाने केली होती. या मंदिराच्या अगदी समोरच श्री अंजनेयस्वामी यांचे मंदिर आहे. हे मंदिर कोंडदरामस्वमी या मंदिराचे ऊपर मंदिर आहे.

रामनवमी साठी हे मंदिर मुख्य आकर्षण आहे. त्याच्यानंतर श्री कपिलेश्वर स्वामी मंदिर हे तिरुपती मधील एकमेव शिवमंदिर आहे. त्यानंतर तिरुपती पासून  बारा किलोमीटर लांब असलेले श्री कल्याण वेंकटेश्वरस्वामी मंदिर पश्चिमेस श्रीनिवास मंगापुरम येथे आहे. पुरान कथांमध्ये असे सांगितले जाते की श्री पद्मावती त्यांचा विवाह झाल्यानंतर तिरुमाला जाण्याआधी भगवान श्री वेंकटेश्वरां सोबत ईथेच थांबल्या होत्या. तसेच श्री वेदनारायणस्वामी मंदिर, श्री वेणुगोपालस्वामी मंदिर, श्री प्रसंनावेंकटेश्वरस्वामी मंदिर, श्री चेत्राकेशवस्वामी मंदिर, श्री करियामाणिक्य स्वामी मंदिर असे अनेक आवर्जून भेट देण्यासारखे धार्मिक स्थळे आहेत. असेच अजून एक आकर्षक स्थळ म्हणजे आकाशगंगा जलप्रपत ही आकाश गंगा प्रसिद्ध असण्याचे प्रमुख कारण म्हणजे यात येणाऱ्या जळातून सर्व देवांचे स्नान केले जाते.

तिरुपती बालाजी मंदिर चालू आहे का? (कोरोनामुळे):

भारतात कोविंड-१९ च्या रुग्णात वाढ होत असल्याने भारतातील आज अनेक जिल्हे लॉकडाऊन मध्ये आहेत. तसेच कोविंड-१९ चा प्रभाव तिरूमला व तिरुपती मध्ये देखील दिसून येतोय. दरवर्षी लाखोंच्या संख्येने तिरुपतीला भेट देणाऱ्या भक्तांवर कोविंड-१९ ने लघाव घातला आहे. कारण तिरुमला तिरुपती मध्ये कोरोना व्हायरसचा प्रभाव जास्त प्रमाणात दिसून येतोय. तिरुमला तिरुपती  देवस्थान ट्रस्ट यांच्या अधिकाऱ्यांनी श्रीवारी मेथुल पदयात्रा व अलीपिरी पदाला मंडप पदयात्रा या दोन रस्त्यांवरून जाणाऱ्या पदयात्रा बंद करण्यात आल्या आहेत.

या दोन पदयात्रा जेथून अनेक नागरिक दररोज श्री बालाजी यांचे दर्शन घेण्यासाठी तिरुपती वरून तिरुमला मध्ये जातात‌. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार आदी अलीपिरी पदाला मंडप पदयात्रा येथून सकाळी सहा वाजल्यापासून ते संध्याकाळी चार वाजेपर्यंत श्रद्धाळू भक्त देवाचं दर्शन घेऊ शकतात.

तिरुपती बालाजी मंत्र:

भारतातील तिरुपती बालाजी हे मंदिर पवित्र स्थानांपैकी एक मानले जाते. असे म्हटले जाते श्री तिरुपती बालाजी यांचे नामस्मरण केल्याने मानवी जीवन सुखी होते व तसेच शरीरातील वाईट ऊर्जा नष्ट होऊन शरीरात चांगली ऊर्जा येते. मंत्र:

व्यंकटेश्वराये  नमो नमः 

श्रीमन नारायण नमो नमः

तिरुमला तिरुपती नमो नमः

जय बालाजी नमो नमः

मंदिराची वैषिष्ट:

तिरुपती बालाजी मंदिरात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा श्री व्यंकटेश देवाचे दर्शन घेणे ही खूप मोठी इच्छा असते परंतु दरवर्षीपेक्षा दररोज मंदिरामध्ये जवळपास एक लाख श्रध्दाळू भक्त देवाचे दर्शन घेण्यास येतात. इतकंच नव्हे तर पर्यटकांच्या रांगा सुद्धा लागलेल्या असतात यावरुन तुम्हाला कळलं असेल की हे मंदिर किती अद्भुत व परिपूर्ण आहे. दरवर्षी येणाऱ्या भक्तांच्या आकड्यांवरून ह्या मंदिराची प्रसिद्धी कळून येते. श्री व्यंकटेश वरांचे प्राचीन व प्रसिद्ध असलेलं हे मंदिर  तिरुमाला पर्वतरांगेच्या सातव्या डोंगरात स्थित आहे.

जे श्रीस्वामी पुष्प करीन तलावाजवळ स्थित आहे. तर याच कारणामुळे श्री भगवान बालाजी यांना श्रीव्यंकटेश्वर असे म्हटले जाते. हे मंदिर भारतातील सर्वात प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. पर्यटकांचे मुख्य आकर्षण असलेल्या या मंदिरात सर्व जातींच्या भक्तांना प्रवेश दिला जातो. पुरान व प्राचीन कथांनुसार असे मानले जाते की भगवान वेंकटेश्वर यांचे दर्शन घेतल्याशिवाय मुक्ती असंभव आहे. मंदिराच्या परिसरात अतिशय सुंदर असे प्रवेशद्वार मंडप विविध शिल्पकलाचे छोटे-छोटे मंदिरे देखील आहेत. मंदिराच्या परिसरातील मुख्य आकर्षण म्हणजे पडीकवली महाद्वार संपंगी प्रदक्षिणम, कृष्णदेवर्या मंडप रंगमंडप, तिरुमाला राय मंडप, आईना महाल, ध्वजस्तंभ मंडप, नदीमीकडी पवली, विमान प्रदक्षिणम, श्रीवरदराजस्वामी श्राइन पोटु, इत्यादी आहेत.

मंदिराचे रहस्य :

तिरुपती बालाजी मंदिर हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असून ते अतिशय रहस्यमय देखील आहे. त्यातलीच काही रहस्य अशी आहेत की, मुख्य द्वारी डाव्या बाजूला असलेल्या बालरूप बालाजींच्या हनुवटी मधून रक्त आले तेव्हापासूनच बालाजींना हनुवटीवर चंदन लावण्याची प्रथा सुरू झाली आहे. दुसरा आश्चर्यजनक रहस्य म्हणजे भगवान बालाजी यांची पाठ कधीच सुखी नसते. कितीही वेळा ती पुसली तरी ती ओलीच राहते. आणि असा म्हटले जाते जर तुम्ही पाठीवर कान लावून ऐकले तर तुम्हाला समुद्र घोष देखील ऐकायला येऊ शकतो.

भगवान बालाजी यांना रेशमी रंगाचे केस असून त्यांच्यामध्ये कधीच गूंणता होत नाही ते नेहमीच सरळ व तेजस्वी दिसतात. मंदिराच्या  २० किलोमीटर लांबी वर एक गाव आहे. त्या गावात कुठल्याच बाहेरच्या व्यक्तीला कधीच प्रवेश मिळू शकत नाही. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याच गावातून येणारे फळ,फूल,दूध इत्यादी गोष्टी भगवान बालाजी यांच्यावर चढवल्या जातात. मंदिराच्या बाहेरून असे दिसते कि भगवान बालाजी हे मंदिराच्या मध्यभागी गर्भगृहात उभे आहेत पण खरं तर भगवान बालाजी हे मंदिराच्या डाव्या बाजूला कोण्यामध्ये स्थित आहेत. गर्भगृहात दान केलेली प्रत्येक वस्तू कधीच बाहेर येत नाही ती गर्भगृहाच्या मागे असलेल्या जलकुंडाला जाऊन मिळते व तिकडे तिचं विसर्जन देखील होत.

श्री बालाजी यांच्या हृदयात लक्ष्मीदेवी यांचे स्थान असल्यामुळे गुरुवारच्या निजरूप दर्शनाच्या वेळी श्री बालाजी यांच्या छातीवर चंदन लावले जाते ते चंदन काढल्या वरती लक्ष्मीदेवी यांची प्रतिमा दिसते. गर्भगृहामध्ये असलेला दिवा हा आजपर्यंत कधीच विजला नाही आहे आणि तो दिवा कधीपासून तेवत आहे हे आजपर्यंत कोणालाच माहित नाही आहे. पण असं म्हटलं जाते हा दिवा गेली हजारो वर्ष असाच तेवत आहे.

उत्सव, यात्रा:

तिरुपती बालाजी म्हटलं की देवाच्या दर्शनासाठी आलेल्या भक्तांची लांबलचक रांग डोळ्यासमोर येते. प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असल्यामुळे प्रत्येक वर्षी येथे प्रत्येक उत्सव प्रत्येक यात्रा एकदम जोरात धूमधामात साजरे होतात. तिरुपती बालाजी इथला महत्त्वाचा उत्सव आहे ब्रह्मोउत्सव. या सणाची दुसरी अशी ओळख म्हणजे आनंदउत्सव म्हणजे, आनंद देणारा उत्सव. दरवर्षी कन्या राशि मध्ये सूर्याचा अगमण झाल्यावर या सणाला सुरुवात होते आणि मग हा सण पुढे नऊ दिवस चालू राहतो.

त्याच्या सोबतच महत्त्वाचे असे सण म्हणजे वंसतोत्सव, तपोत्सव पवित्रत्सव, अधिकामासम, त्यासोबतच साजरा केला जाणारा सण म्हणजे विवाह संस्कार इथे एक “पुरोहित संघम” आहे. जिथे विविध चालीरिती व संस्कार  पार पडले जातात. त्यातले काही महत्त्वाचे संस्कार म्हणजे विवाह संस्कार, नामकरण संस्कार, उपनयन संस्कार, इत्यादी संपूर्ण केले जातात. इथे पार पाडण्यात आलेले प्रत्येक संस्कार दक्षिण व उत्तर भारताच्या चालीरीतीनुसार संपन्न होतात.

तिरुपती बालाजी मंदिर फोटो 

tirupati balaji temple information in marathi
tirupati balaji temple information in marathi

मंदिर कोठे आहे? कसे जायचे? :

तिरुपती बालाजी किंवा व्यंकटेशवर मंदिर हे भारतातील अगदी प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असून. ते आंध्र प्रदेश येथील चित्तूर जिल्ह्यात आहे. तिरुमाला पर्वतरांगेत हे मंदिर आहे तिरुमाला पर्वत रांगेत एकूण सात डोंगर आहेत त्यातल्या एका डोंगराचे नाव आहे व्यंकट पर्वत आणि त्याच पर्वताजवळ व्यंकटेश्वर हे मंदिर आणि म्हणूनच श्री बालाजी यांना श्रीवेंकटेश्वर असे म्हटले जाते. हजारो वर्षांपूर्वी बनवलेलं हे मंदिर शिल्पकलेच अद्भुत उधारण आहे तिरुपती बालाजी मंदिराला भेट देण्यासाठी जयपूर ते तिरुपती अशी स्पेशल ट्रेन आहे.

वरील सर्व गोष्टी पाहून आपणास अंदाज लागला असेलच कि हा तिरुपती बालाजी मंदिर tirupati balaji temple information in marathi language हे मंदिर कुठे आहे? ह्याचे वैशिष्ट्य, त्याचे सौंदर्य, याचा इतिहास,  मंदिरातील रहस्य, मंदिरात घडणारे उत्सव, जत्रा याची थोडक्यात माहिती  दिली आहे. tirupati balaji temple information in marathi wikipedia हा लेख आपल्याला आवडल्यास आपल्या मित्र परिवारासोबत फेसबुक ओट्सअप्प सारख्या विविध सोशियल मेडिया वरून माहिती पोहचवा. तसेच information about tirupati balaji temple in marathi हा लेख कसा वाटला व अजून काही तिरुपती बालाजी मंदिर विषयी राहिले असेल तर आपण comments द्वारे कळवू शकता धन्यवाद.

आम्ही दिलेल्या tirupati balaji temple in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू. अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!