ट्यूलिप फुलाची माहिती Tulip Flower Information In Marathi

tulip flower information in Marathi ट्यूलिप हे फुल जगातील लोकप्रिय फुल आहे जे वसंत ऋतूमध्ये फुलते आणि ट्यूलिप च्या फुलाला एका देठावर एकच फुल उमलते म्हणून या फुलांना cut flower म्हणून हि ओळखले जाते या फुलांच्या काही प्रजाती अश्याहि आहेत कि ज्याला एकापेक्षा जास्त फुले लागतात. १६ व्या शतकात हे फुल युरोपमध्ये मध्ये उदयास आले तेव्हापासून हे फुल प्रसिध्द झाले आहे. ट्यूलिप या फुलाच्या  ४ उपप्रजाती १०० प्रजाती आणि ३००० हून जास्त वेगवेगळे प्रकार आहेत.(Tulip in Marathi)

tulip-flower-information-in-marathi
tulip flower information in marathi
अनुक्रमणिका hide
3 ट्यूलिप फुलांचे विविध प्रकार ( different types of tulip flower )

ट्यूलिप फुलांची माहिती (tulip flower information in Marathi)

या फुलांची सर्वात अधिक शेती नेदरलँड्स मध्ये केली जाते. हि फुले पांढरा, पिवळसर, लाल तपकिरी, जांभळ्या आणि काळ्या रंगामध्ये आढळतात. ट्यूलिप हि फुले एशिया, अफगाणिस्तान, इराणी, टर्की, चीन, कुमाऊ आणि काश्मीर या देशामध्ये आढळतात. हि फुले जास्ती जास्त भारतात काश्मीरमध्ये आणि एशिया महाव्दीप मध्ये मिळतात.

rose information in marathi

ट्यूलिप फुलासाठी लागणारे वातावरण ( climate for tulip flower )

हि फुले उत्तर भागामध्ये सप्टेंबर किवा ऑक्टोंबर मध्ये लावली जातात आणि दक्षिण भागामध्ये हि नोव्हेंबर किवा डिसेंबर मध्ये लावली जातात. ह्या फुलांची वाढ थंड वातावरणामध्ये चांगली होवू शकते त्यामुळे हि हिमालय भागामध्येच आढळतात आणि या फुलांना वसंत ऋतूमध्ये बहार येते.

ट्यूलिप फुलांचे विविध प्रकार ( different types of tulip flower )

ट्यूलिप फुलांच्या ४ उपजाती ८० पेक्षा जास्त प्रजाती आणि ३००० हून जास्त प्रकार आहेत. हि फुले पांढरा, पिवळसर, लाल तपकिरी, जांभळ्या, गुलाबी आणि काळ्या रंगामध्ये आढळतात. ट्यूलिपचे काही प्रकार खाली दिलेले आहेत.

अक्रोपोलीस ट्यूलिप ( acropolis tulip )

अक्रोपोलीस ट्यूलिप फुल हे साधारण गडत गुलाबी रंगाचे असते आणि हे फुल २१ ते २४ इंच उंच असते. अक्रोपोलीस ट्यूलिप हे फुल वसंत ऋतूच्या मधल्या काळामध्ये बहरते आणि हे फुल सूर्यप्रकाशामध्ये चांगले येते.

पर्पल प्रिन्स ट्यूलिप ( purple prince tulip )

पर्पल प्रिन्स हे फुल जांभळ्या रंगाचे असते आणि हे वसंत ऋतूमध्ये मधल्या काळात किवा वसंत ऋतूच्या शेवटी बहरते. या फुलाची उंची १४ इंच पर्यंत असते तसेच या फुलाचा देठ मजबूत असतो त्यामुळे वारा आणि पाऊस यापासून फुलाचे रक्षण होते.

क्विन ऑफ नाईट ट्यूलिप ( queen of night tulip flower information in marathi)

क्विन ऑफ नाईट हे गडद किरीमिजी रंगाचे असते या फुलाचा रंग इतका गडद असतो कि हे काळ्या रंगाचे फुल आहे असे वाटते म्हणूनच या फुलाला क्विन ऑफ नाईट असे नाव पडले असावे. हे फुल २५ इंचापर्यंत वाढते आणि या फुलाचे देठ सुद्धा बळकट असल्यामुळे या फुलांचे वाऱ्यापासून संरक्षण होते. जर हि फुले मोठ्या प्रमाणात लावाली तर ती खूप आकर्षित दिसतात.

द्रविण हायब्रीड ट्यूलिप ( drawin hybrid tulip )

द्रविण हायब्रीड ट्यूलिप हे फुल फोस्टेरींना आणि काही वेगवेगळी ट्यूलिप फुले एकत्र करून बनवलेले फुल आहे. हि फुले लाल, पिवळा, गुलाबी आणि केशरी रंगामध्ये येतात . ह्या फुलांची उंची  २६ ते २७ इंचापर्यंत वाढू शकते  आणि हि फुले  वसंत ऋतूच्या शेवटच्या काळामध्ये लागतात.

तारदा ट्यूलिप ( tarda tulip )

तारदा ट्यूलिप हे फुल स्टार आकारामध्ये असते आणि या फुलाचा रंग पांढरा आणि पिवळा असतो. हे फुल ६ इंच उंच वाढते आणि ह्या फुलाला ६ पाकळ्या असतात आणि हि फुले सूर्यप्रकाशामध्ये चांगली बहरतात.

अप्रीकॉट पॅरॉट ट्यूलिप ( apricot parrot tulip )

अप्रीकॉट पॅरॉट ट्यूलिप हे फुल गुलाबी रंगाचे असते आणि हिरव्या आणि पिवळ्या पट्ट्या असतात. या फुलांच्या पाकळ्या पोपटाच्या पंखांसारख्या असतात आणि हे २४ इंचापर्यंत उंच वाढते.

कोल्पकोव्स्किअन ट्यूलिप ( kolpakowskiana tulip )

कोल्पकोव्स्किअन ट्यूलिप हे फुल प्राचीन काळापासून म्हणजेच १८४४ पासून आहे हे फुल वर्षभर लागते आणि या फुलाची इंची ८ ते ९ इंचापर्यंत वाढते. हे फुल पिवळ्या रंगाचे असते आणि फुलांच्या बाहेरील भागाला लाल, हिरव्या आणि गुलाबी रेषा असतात.

ब्लशिंग ब्युटी ट्यूलिप ( blushing beauty tulip )

ब्लशिंग ब्युटी ट्यूलिप फुलाला मोठ्या प्रमाणात काळ्या असतात आणि फिकट गुलाबी रंगाच्या सतत आणि त्यावर फिकट जांभळ्या रंगाच्या छटा असतात. हे फुल वसंत ऋतूच्या शेवाच्या कालावधी मध्ये बहरते आणि हे ३० इंच वाढते.

सिंगल ट्यूलिप ( single tulip )

सिंगल ट्यूलिप या फुलाला शक्यतो पाच पाकळ्या असतात आणि हि फुले कधी वसंत ऋतूच्या सुरुवातीच्या काळात बहरतात तर काही फुले वसंत ऋतूच्या शेवटच्या कालावधीत फुलतात. हे फुल ३० इंचापर्यंत वाढते.

फॉक्सट्रॉट ट्यूलिप ( foxtrot tulip flower information in marathi )

फॉक्सट्रॉट ट्यूलिप हि फुले वसंत ऋतूच्या सुरुवातीस बहरतात आणि या फुलांचे देठ हि बळकट असतात. हि फुले गुलाबी आणि पांढऱ्या शेड मध्ये असतात त्यामुळे टी खूप आकर्षक दिसतात. या फुलांना हि जास्त पाकळ्या असतात. हि फुले १२ इंच पर्यंत वाढू शकतात.

कॅलीप्सो ट्यूलिप ( calypso tulip )

कॅलीप्सो हे केशरी आणि लालसर रंगाचे फुल आहे आणि त्याला तपकिरी पिवळ्या कडा आहेत. या फुलाची सूर्यप्रकाशामध्ये उत्तम वाढ होते. या फुलाची वाढ १२ इंचापर्यंत होते आणि हे फुल दरवर्षी लागते.

व्हित्तल्ली ट्यूलिप (whittallii tulip )

 व्हित्तल्ली ट्यूलिप हे केशरी रंगाचे असते आणि या फुलाला ६ पाकळ्या असतात आणि या पाकळ्य टोकदार असतात. हे फुल १० ते १२ इंचापर्यंत वाढते.

ऑरेंज प्रीन्सेसा ट्यूलिप ( orange princess tulip )

ऑरेंज प्रीन्सेसा ट्यूलिप या फुलाला जास्त पाकळ्या असतात आणि त्या वाटीच्या आकाराच्या असतात आणि हि फुले १४ इंचापर्यंत वाढतात. या फुलांचे झाड नाजूक असते पण ह्या फुलांचा सुगंध खूप छान असतो.

पेपरमिंट स्टीक ट्यूलिप ( peppermint stick tulip )

पेपरमिंट स्टीक हि फुले १२ इंचापर्यंत वाढू शकतात आणि हि फुले सूर्यप्रकाशामध्ये चांगली वाढतात. हे पांढऱ्या रंगाचे फुल असते आणि त्यावर आमसुली लाल कलरच्या पट्ट्या असतात.

अल्लादिन ट्यूलिप ( alladin tulip )

अल्लादिन ट्यूलिप हे  फुल शेंदरी रंगाचे असते आणि त्याच्या कडा पिवळ्या रंगाच्या असतात  आणि हे फुल पेल्याच्या आकाराचे असते. ह्या फुलाची उंची १९ ते २० इंचापर्यंत वाढू शकते.

बिग स्माईल ट्यूलिप ( big smile tulip )

बिग स्माईल ट्यूलिप हे फुल दिसायला कळी सारखे असते आणि या फुलाचा रंग पिवळा असते.एका फुलाच्य देठाला एकाच फुल लागते. हे फुल २५ ते २६ इंचापर्यंत वाढते आणि हे फुल सूर्यप्रकाशामध्ये चांगले येते.

एक्झॉटीक इम्पेरोर ट्यूलिप ( exotic emperor tulip )

एक्झॉटीक इम्पेरोर ट्यूलिप हे फुले पांढऱ्या रंगाचे असते आणि त्यावर प्रत्येक पाकळीच्या मधी हिरव्या रंगाच्या पट्ट्या असतात. हे फुल दरवर्षी लागते आणि या फुलाची उंची १६ इंच पर्यंत वाढू शकते. हे फुल दिसायल खूप आकर्षक असते.

अॅड रेम ट्यूलिप ( ad rem tulip )

अॅड रेम या फुलालाया फुलाचा रंग लाल किवा लाल आणि पिवळ्या पट्ट्या असतात. हि फुले कोणत्याही बागेत फुलतात आणि या फुलांची उंची २४ इंचापर्यंत वाढू शकते. हि फुले सौम्य वातावरणा मध्ये चांगली येतात.

बॅल्लड ट्यूलिप ( ballade tulip flower information in marathi)

बॅल्लड ट्यूलिप हे फुल पेल्याच्या आकाराचे असतात आणि या फुलांच्या पाकळ्या टोकदार असतात आणि या फुलाच्या पाकळ्या जांभळ्या रंगाच्या असतात आणि त्याला पांढऱ्या रंगाच्या कडा असतात. या फुलाची  उंची ५ ते ६ इंचापर्यंत वाढी शकते.

ब्लॅक पॅरॉट ट्यूलिप ( black parrot tulip )

ब्लॅक पॅरॉट ट्यूलिप या फुलांचा रंग गडद जांभळा असतो आणि या फुलाच्या पाकळीला मधी काळ्या रंगाची रश असते त्याचबरोबर या फुलाच्या पाकळ्या पक्षांच्या पिसांसारख्या असतात. हे फुल दिसायला खूप सुंदर असते. हे फुल वसत ऋतूच्या शेवटच्या काळात बहरते.

बेल सॉंग ट्यूलिप ( bell song tulip )

 बेल सॉंग ट्यूलिप फुल हे गर्द जांभळा गुलाबी रंगाचे असते आणि या फुलाच्या पाकळ्यांना  पांढऱ्या रंगाच्या कडा असतात आणि या फुलाला हि पक्षांच्या पिसांसारख्या पाकळ्या असल्यामुळे हे फुल हि खूप आकर्षक दिसते. या फुलाची उंची १९ ते २० इंचापर्यंत वाढते.

गावोता ट्यूलिप ( gavota tulip flower information in Marathi)

गावोता ट्यूलिप ह्या फुलाच्या पाकळ्या तपकिरी रंगाच्या असतात आणि कडा पिवळसर रंगाच्या असतात. या फुलाला पाकळ्या जास्त असतात आणि फुलाच्या झाडाला पणे हि जास्त असतात. हि फुले कोणत्याही दुसऱ्या ट्यूलिप फुलामध्ये उटून दिसतात.

आरमा ट्यूलिप ( arma tulip )

आरमा ट्यूलिप या फुलाचा पाया पिवळ्या रंगाचा असतो आणि वरच्या पाकळ्या लाल रंगाच्या असतात. या फुलांना सूर्यप्रकाश गरजेचा असतो आणि हि फुले २२ इंच उंच वाढतात.

गोल्ड डस्ट ट्यूलिप ( gold dust tulip flower information in Marathi )

गोल्ड डस्ट ट्यूलिप फुलाच्या पाकळ्या वाटीसारख्या आकाराच्या असतात आणि हि दिसायला गुलाबासाराखीच असतात. या फुलांचा रंग आतल्या पाकळ्या लालसर रंगाच्या असतात आणि पाकळीचा थोडासा वरचा भाग सोनेरी रंगाचा असतो. हि फुले १७ ते १८ इंच उंच असतात.

सॅनटॅनडर ट्यूलिप ( santander tulip )

सॅनटॅनडर ट्यूलिप हे फुल खूप आकर्षक आणि कोणत्याही बागेमध्ये शोभून दिसणारे फुल आहे. हे फुल सुवासिक असून या फुलाचा रंग फिकट गुलाबी असतो आणि या फुलाची उंची १५ ते २० इंचापर्यंत वाढते.

डेड्रीम ट्यूलिप ( daydream tulip flower information in Marathi )

डेड्रीम ट्यूलिप हे पांढऱ्या पिवळसर रंगामध्ये असते आणि हे फुल वसंत ऋतूच्या मधल्या काळात बहरते आणि या फुलाचा देठ मजबूत असतो त्यामुळे पाऊस आणि वारा यापासून या फुलाचे रक्षण होते. या फुलाने इंटरनॅशनल अवार्ड हि मिळवले आहे.

सेन्सुयल टच ट्यूलिप ( sensual touch tulip )

सेन्सुयल टच ट्यूलिप हि फुले दिसायला गुलाबासारखीच असतात आणि या फुलांचा रंग पिवळसर नारंगी असतो. हि फुले सूर्य प्रकाशामध्ये चांगल्या पप्रकारे वाढू शकतात आणि या फुलांची उंची १७ इंचापर्यंत वाढू शकते.

स्वान विंग्स ट्यूलिप ( swan wings tulip )

स्वान विंग्स ट्यूलिप हे फुल पांढऱ्या शुभ्र रंगाचे असते आणि या फुलांच्या पाकळ्याच्या कडा झालर सारख्या असतात. हे फुल २२ इंच उंच वाढू शकते आणि हे फुल वसंत ऋतूमध्ये बहरते.

विरीडीफ्लोरा ट्यूलिप ( viridiflora tulip )

 विरीडीफ्लोरा ट्यूलिप हे फुल लाल रंगाचे असते आणि त्यावर हिरव्या छटा असतात. या फुलाचा देठ बळकट असतो आणि हे फुल २१ ते २४ इंच उंच वाढते. हे फुल वसंत ऋतूच्या शेवटच्या काळात बहरते. या फुलाला ग्रीन ट्यूलिप या नावानेही ओळखले जाते.

स्पेसीस ट्यूलिप ( species tulip flower information in marathi )

स्पेसीस ट्यूलिप या फुलाला वाइल्ड किवा बॉटनिकल ट्यूलिप असेही म्हणतात. हि फुले उंचीने लहान असतात आणि या फुलांचा आकारही लहान असतो. हि फुले बारामहिने लागतात याला विशिष्ठ असा काळ नसतो.

ट्राययम्फ ट्यूलिप ( triumph tulip )

 ट्राययम्फ ट्यूलिप हे फुल सिंगल आरली आणि द्रविण ट्यूलिप या दोन जाती एकत्र करून बनवलेले फुल आहे. हि फुले वसंत ऋतूच्या मधल्या काळात बहरतात तसेच या फुलाचा देठ हि खूप मजबूत असतो.

डावेनपोर्ट ट्यूलिप ( davenport tulip )

डावेनपोर्ट ट्यूलिप नारंगी रंगाचे असते आणि पाकळ्यांच्या कडा झालर सारख्या असतात. हे फुल सूर्य प्रकाशामध्ये चांगले वाढते आणि याची उंची १८ इंचापर्यंत वाढी शकते त्याच बरोबर हे फुल विश्री असते.

विन्नीपेग ट्यूलिप ( winnipeg tulip flower information in Marathi)

विन्नीपेग ट्यूलिप या फुलाच्या पाकळ्या मधी गुलाबी असतात आणि कडा फिकट नारंगी असतात. हे फुल ८ इंचापर्यंत वाढू शकते आणि हे फुल वसंत ऋतूच्या सुरुवातीपासून मधल्या काळापर्यंत लागते. हे फुल विषारी असल्यामुळे या फुलांचा त्वचेला त्रास होतो.

मोन्डीयल ट्यूलिप ( mondial tulip )

मोन्डीयल ट्यूलिप हे फुल गुलाबासारखे दिसते आणि या फुलाला हि जास्त प्रमाणात पाकळ्या असतात. हे फुल पांढऱ्या रंगाचे असते आणि या फुलाची उंची १२ इंचापर्यंत वाढते. हे फुल सुद्धा  विषारी असल्यामुळे या फुलांचा त्वचेला त्रास होतो.

डबल शुगर ट्यूलिप ( double sugar  tulip flower information in Marathi )

डबल शुगर ट्यूलिप या फुलांचा रंग गुलाबी असतो आणि कडा साधारण पांढऱ्या रंगाच्या असतात या कडा पक्षांच्या पंखांसारख्या असतात. हि फुले १८ इंच उंच वाढतात आणि फुले वसंत ऋतूमध्ये शेवटच्या काळामध्ये बहरतात.

ट्यूलिप फुलाबद्दल काही मनोरंजक तथ्ये ( some interesting facts about tulip flower )

  • ट्यूलिप हे फुल लिली कुटुंबातील आहेत.
  • ट्यूलिप हे वसंत ऋतूमध्ये ३ ते ७ दिवसच बहरते.
  • ट्यूलिप ची फुले जवळ जवळ सगळ्या रंगमामध्ये असत्तात.
  • ट्यूलिप हे फुल सर्वात महाग फुल आहे.
  • जगातील सर्वात मोठे ट्यूलिपची बाग नेदरलँड मध्ये आहे.
  • ट्यूलिप फुलांचा वापर खाण्यामध्येही केला जातो.
  • ट्यूलिप हे फुल त्याच्या वाढीसाठी प्रकाशाकडे वळते.
  • तुर्की आणि अफगाणीस्तानचे हे राष्ट्रीय फुल आहे.
  • ट्यूलिप हा शब्द ‘पगडी’ या शब्दापासून आला आहे.
  • या फुलाच्या झाडाचे आयुष्य दोन वर्षापेक्षा जास्त असते.
  • या फुलांचा वापर जेवणामध्ये कांद्या ऐवजी केला जातो.
  • फुलांचे आयुष्य ३ ते ७ दिवस इतके असते.
  • ट्यूलिप च्या बियाला बल्ब म्हणतात.

ट्यूलिप फुलाचे रंग आणि त्याचे अर्थ  (colors of tulip and their meanings)

लाल ट्यूलिप : लाल ट्यूलिप हे प्रेम दर्शविते.

पांढरे ट्यूलिप : पांढरे ट्यूलिप हे क्षमा मागण्यासाठी वापरले जाते

जांभळे ट्यूलिप : जांभळे ट्यूलिप हे उदारता दर्शविते.

बहुरंगी ट्यूलिप : बहुरंगी ट्यूलिप हे समोरच्या व्यक्तीच्या डोळ्यांचे कौतुक करण्यासाठी वापरतात.

ट्यूलिप कसे लावावे ( how to plant tulip flower)

  • ट्यूलिपचे बल्ब जमिनीमध्ये घालण्यासाठी ७ ते ८ इंच खोल खड्डा खणावा लागतो.
  • त्यानंतर त्या खड्यामध्ये लागवड घाला मग त्यामध्ये बल्ब घाला आणि ते मातीने झाका आणि ती माती घट्ट दाबा.
  • ट्यूलिपचे बल्ब मातीमध्ये रोवून झाल्यानंतर त्याला पाणी घाला. हे फुल अधिक पाणी सहन करू शकत नाही पण त्याच्या वाढीसाठी त्याला पाणि देणे अवश्यक असते.

भारतामधील काही प्रसिध्द ट्यूलिप बागा ( some famous tulip gardens in india )

इंदिरा गांधी मेमोरिअल ट्यूलिप गार्डेन

इंदिरा गांधी मेमोरिअल ट्यूलिप गार्डेन हे भारतामधल्या श्रीनगर मध्ये आहे आणि हे भारतातील सर्वात मोठे ट्यूलिप गार्डेन आहे. हि बाग ३० एकर मध्ये आहे आणि या बागेमध्ये वेगवेगळ्या प्रकारची ट्यूलिप फुले आहेत आणि बहुरंगी ट्यूलिप फुलांच्या ६० जाती आहेत.

लाल बाग

लाल बाग हि बेंगळूरू मध्ये आहे. ह्या बागेमध्ये फुले तसेच वनस्पतीची सुद्धा बाग आहे. हि बाग ४० एकर जमिनीमध्ये आहे. या बागेमध्ये ट्यूलिप तसेच दुसऱ्या वेगवेगळ्या फुलांच्या जाती आहेत.

लोधी गार्डन

लोधी गार्डन हे आपल्या देशाच्या राजधानीत म्हणजेच दिल्ली मध्ये आहे आणि हि बाग ९० एकर क्षेत्रामध्ये आहे. या बागेमध्ये ट्यूलिप फुलांसह अनेक इतर जातीची फुले आहेत.

वरील सर्व गोष्टी पाहून आपणास अंदाज लागला असेलच कि हा सुंदर असे दिसणारे ट्यूलिप फुल व त्याचे प्रकार किती आहेत तो कसा लावावा व तोडावा. tulip flower information in Marathi/information about tulip flower in marathi language हा लेख आपल्याला आवडल्यास आपल्या मित्र परिवारासोबत फेसबुक ओट्सअप्प सारख्या विविध सोशियल मेडिया वरून माहिती पोहचवा. तसेच हा लेख कसा वाटला व अजून काही ट्यूलिप या फुलाविषयी  राहिले असेल तर आपण comments द्वारे कळवू शकता धन्यवाद.
आम्ही दिलेल्या माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू. अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!