ट्विटर बद्दल माहिती Twitter Information in Marathi

twitter information in marathi ट्विटर बद्दल माहिती, सध्या लोकांच्याकडून मोबाईलचा वापर हा मोठ्या प्रमाणात होत चालला आहे आणि त्यामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे अॅप वापरले जातात आणि त्यामधील एक म्हणजे ट्विटर हे अॅप आहे. जे अनेकजण वापरतात आणि हा एक सोशल मिडिया प्लॅटफॉर्म आहे आणि आज आपण या लेखामध्ये ट्विटर या मोबाईल अॅप विषयी माहिती पाहणार आहोत. ट्विटर हे वर सांगितल्याप्रमाणे हे एक सोशल मिडिया प्लॅटफॉर्म आहे.

ज्यामध्ये आपण आपले कोणत्याही गोष्टींच्या विषयी जे मत असते ते संदेशाच्या स्वरुपात लिहून पाठवू शकतो. या अॅपमध्ये वापरकर्ता किंवा एखादा व्यक्ती जो ट्विट करतो हे कोणत्याही प्रकारचे असू शकते म्हणजेच हा लिहिलेला संदेश (मजकूर)असू शकतो, फोटो असू शकतो किंवा व्हिडीओ असू शकतो आणि त्याचबरोबर मजकुरासोबत तो संबधित व्यक्ती फोटो आणि व्हिडीओ देखील लिंक करू शकतो.

जर एखाद्या व्यक्तीला ट्विटर वापरायचे असेल तर त्या व्यक्तीला प्रथम खाते उघडून घेतले पाहिजे आणि मग त्यावर इंटरनेटच्या मदतीने लॉग इन करणे आवश्यक असते आणि मग पुढे तो व्यक्ती त्याच्या मोबाईलवर हे अॅप वापरू शकतो.

twitter information in marathi
twitter information in marathi

ट्विटर बद्दल माहिती – Twitter Information in Marathi

मोबाईल अॅपट्विटर (twitter)
स्थापना२००६
मुख्यालयसन फ्रान्सिस्को (युएस)
सीईओइलॉन मस्क

ट्विटर म्हणजे काय – twitter meaning in marathi

ट्विटर हे सोशल मिडिया प्लॅटफॉर्म आहे आहे जे कोणत्याहि वापरकर्त्याला विनामूल्य वापरता येते आणि यामध्ये वापरकर्ता ट्विट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या छोट्याश्या पोस्ट (मजकूर) किंवा संदेश प्रसारित करू शकतो.  

ट्विटर विषयी महत्वाची माहिती – information about twitter in marathi language

ट्विटर या मोबाईल अॅपची सुरुवात २००६ मध्ये इव्हान विल्यम्स, जॅक डोर्सी, बीझ स्टोन आणि नोहा ग्लास यांनी केली आणि या मोबाईल अॅपच्या कार्यालयाचे चीफ एक्सिक्युटीव्ह ऑफिसर (सीईओ) हे इलॉन मस्क हे आहेत.

यामध्ये आपल्याला मायक्रोब्लॉगिंग सेवा पुरवल्या जातात आणि तसेच इंस्टंट मेसेजीस, शेअर करणे, लाईक करणे तसेच संदेशाला उत्तर देणे या सारखे सेवा ट्विटरवर पुरवल्या जातात. २०१२ च्या सर्व्हे नुसार १०० दशलक्षहून अधिक वापरकर्ते हे दररोज ३४० दशलक्ष ट्विट पोस्ट करतात.

ट्विटर अॅप कसे कार्य करते ?

जर एखाद्या व्यक्तीला ट्विटर या मोबाईल अॅपचा वापर करायचा असल्यास प्रथम इतर वापरकर्ते आणि वेगवेगळ्या कंपन्यांचे अनुसरण करून आणि ट्विटरवर वेगवेगळे विषय शोधून ते त्यांना ट्विटरवर या पाहायचे आहे ते निवडतात.

ट्विटर या अॅपवर वापरकर्त्यांची प्राधान्ये प्रतीबिंबित केली जातात आणि हे टाइमलाईनच्या मदतीने केली जातात. ट्विटरवर लोक ट्विट करू शकतात आणि रीट्विट देखील करू शकतात अश्या प्रकारे ट्विटर हे वेगवेगळ्या प्रकारे कार्य करते.

ट्विटर डाटा मिळवणे आणि तो डाऊनलोड करणे

 • जर तुम्हाला ट्विटर डाटा मिळवायचा असल्यास तुम्हाला प्रथम लॉग इन करावे लागेल.
 • मग तुमच्या खात्यावर डावीकडील बाजूला मुख्य नेव्हीगेशन मेनूमध्ये क्लिक करा किंवा टॅप करा.
 • त्यानंतर सेटिंग आणि गोपनीयता निवडा आणि मग त्यानंतर तुमचे खाते निवडा.
 • आता खाते निवडल्यानंतर तुमच्या डेटाचे संग्रहण डाऊनलोड करा.
 • आता तुमच्या पासवर्डची पुष्टी करा आणि त्यानंतर संग्रहानाची विनंती निवडा.

ट्विटरमधील काही सेवा किंवा वैशिष्ट्ये

खाली आपण ट्विटर हे अॅप वापरत असताना आपल्या समोर येणाऱ्या काही कन्सेप्ट किंवा ट्विटर मार्फत पुरवल्या जाणाऱ्या काही सेवा काय आहेत ते पाहणार आहोत.

ट्विट

ट्विट हा शब्द सगळ्यांच्या परिचयाचा आहे जे ट्विटर हे अॅप वापरतात आणि ट्विटरवर १४० किंवा त्यापेक्षा कमी वर्ण असलेला एक मानक संदेश असतो आणि या संदेशाला ट्विट असे म्हणतात.

रीट्विट

ट्विटर या अॅपवर रीट्विट देखील करता येते आणि यामध्ये एक ट्विट असते जे वापरकर्त्यांच्या सर्व फॉलोवर्सना रीशेअर केले जाते.

उल्लेख

उल्लेख ज्याला आपण मेन्शन (mention) म्हणून ओळखतो. यामुळे ट्विट्समध्ये @ या चीन्हासोबत उत्तरे आणि उल्लेख समाविष्ट असू शकतात.

हॅशटॅग

हे एक प्रकारचे चिन्ह आहे ज्या चिन्हाचा वापर हा ट्विट्समध्ये कीवर्ड किंवा विषय टॅग करण्यासाठी केला जातो जेणेकरून ते शोध हेतूसाठी सहज ओळखता येईल.

फीड

तुमच्या ट्विटर खात्याच्या मुख्य पृष्ठावर ट्विट्सच्या प्रवाहात तुम्ही फॉलो करत असलेल्या सर्व खात्यांचा समावेश असतो.

थेट संदेश

ट्विटर या अॅपमध्ये थेट संदेश देखील पाठवता येतो ज्याला डीएम ( DM ) देखील म्हटले जाते आणि हे वापरकर्त्यामधील खाजगी संप्रेषनासाठी ट्विटरच्या थेट संदेशान प्रणालीचे प्रतिनिधित्व करते.

याद्या

ट्विटर मध्ये याद्या देखील असतात ज्याला आपण लिस्ट म्हणून ओळखतो आणि यामध्ये ट्विटर तुम्हाला फॉलो करत असलेल्या वापरकर्त्यांना गटामध्ये किंवा सूचीतील सर्व वापरकर्त्यांचे ट्विट दर्शवलेल्या सूची सूचीबद्ध करते. 

ट्विटर या अॅपविषयी काही विशेष आणि मनोरंजक तथ्ये – facts

 • ट्विटर या अॅपचा वापर अनेक लोक करतात आणि यामध्ये ७१ टक्के वापरकर्ते हे पुरुष आहेत आणि २८ टक्के स्त्रिया ट्विटर वापरतात.
 • ट्विटर हि जगभरातील नवव्या क्रमांकाची सर्वाधिक भेट दिलेली वेबसाईट आहे.
 • युएसमधील ६९ ते ७० टक्के वापरकर्ते असे म्हणतात कि त्यांना जगातील अनेक प्रकारच्या बातम्या ह्या ट्विटरवरून मिळतात.
 • ट्विटर या अॅपवर दररोज २२९ दशलक्षहून अधिक लोक हे सक्रीय असतात.
 • ४५ टक्के लोकांनी असा दावा केला आहे कि ट्विटर ने त्यांना जागतिक घटना चांगल्या प्रकारे समजण्यासाठी मदत केली.
 • अमेरिकेतील ७० ते ७५ टक्के लोक हे ट्विटर या अॅपचा वापर हा मनोरंजनासाठी करतात.

आम्ही दिलेल्या twitter information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर ट्विटर बद्दल माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या twitter app information in marathi या twitter meaning in marathi article मध्ये update करू, मित्रांनो हि information about twitter in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये twitter information in marathi language Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!