ujjwala gas yojana information in marathi उज्वला गॅस योजना माहिती आज आपण या लेखामध्ये उज्वला गॅस योजनेविषयी माहिती घेणार आहोत. सरकारने आजपर्यंत महिलांच्या कल्याणासाठी अनेक योजना राबवल्या आणि त्यामधील हि एक म्हणजे उज्वला गॅस योजना जी महिलांना चुलीवर किंवा स्टोव्ह वर जेवण करताना घ्यावे लागणारे कष्ट लक्षात घेवून भारतातील दारिद्र्य रेषेखालील महिलांना गॅस कनेक्शन देण्याचा संकल्प केंद्र सरकारने केला आणि यालाच उज्वला गॅस योजना असे म्हणतात. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सुरु केलेली प्रधान मंत्री उज्वला गॅस योजना हि ज्या लोकांच्याकडे बिपीएल ( BPL ) कार्ड आहे किंवा जे लोक द्ररीद्र्य रेषेखालील आहेत.
अशा लोकांच्यासाठी गॅस कनेक्शन किंवा एलपीजी कनेक्शन सेवा पुरवण्यासाठी या योजनेची सुरुवात झाली. भारताच्या काही भागामध्ये अजूनही जीवाश्म इंधन वापरून जेवण बनवले जायचे पण या जीवाश्म इंधनाच्या वापरामुळे आरोग्याला होणारा धोका कमी करण्यासाठी तसेच निरीगी स्वयंपाक इंध पुरवण्यासाठी आणि महिला सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आणि प्रधान मंत्री उज्वला गॅस योजना ( PMUGY ) सुरु केली.
उज्वला गॅस योजना माहिती – Ujjwala Gas Yojana Information in Marathi
योजनेचे नाव | प्रधान मंत्री उज्वला गॅस योजना ( PMUGY ) |
कोणी सुरु केली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने सुरु केली |
केंव्हा सुरु केली | १ मे २०१६ |
लाभार्थी | बिपीएल ( BPL ) कार्ड धारक किंवा द्रारिद्र्य रेषेखालील लोक किंवा कुटुंब |
प्रधान मंत्री उज्वला गॅस योजना काय आहे ?
प्रधान मंत्री उज्वला गॅस योजना ( PMUGY ) हि ज्या लोकांच्याकडे बिपीएल ( BPL ) कार्ड आहे किंवा जे लोक द्ररीद्र्य रेषेखालील आहेत अश्या लोकांच्यासाठी गॅस कनेक्शन किंवा एलपीजी कनेक्शन सेवा पुरवण्यासाठी या योजनेची सुरुवात झाली.
प्रधान मंत्री उज्वला गॅस योजना कोणी व केंव्हा सुरु केली ?
प्रधान मंत्री उज्वला गॅस योजना ( PMUGY ) हि माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने १ मे २०१६ मध्ये सुरु केली.
प्रधान मंत्री उज्वला गॅस योजना योजनेची पात्रता – eligibility
प्रधान मंत्री उज्वला गॅस योजना ( PMUGY ) हि ज्या लोकांच्यासाठी आहे जे अजूनही जीवाश्म इंधन वापरून जेवण बनवतात तसेच ह्या योजनेसाठी बिपीएल ( BPL ) कार्ड धारक किंवा द्रारिद्र्य रेषेखालील लोक किंवा कुटुंब पात्र असतात तसेच जे लोक ग्रामीण भागामध्ये राहतात, secc २०११ सूचीमध्ये किंवा नदीच्या बेटावर राहणाऱ्या लोकांच्यासाठी, चहाच्या बागेमध्ये काम करणाऱ्या जमाती अश्या प्रकारे अनेक श्रेणीतील लोक या योजनेसाठी पात्र ठरतात. या योजनेसाठी पात्र होण्यासाठी खाली काही पात्रता निकष दिलेले आहेत.
- प्रधान मंत्री उज्वला गॅस योजना ( PMUGY ) या योजनेचा लाभ घेणारा व्यक्ती हा भारतीय नागरिक असला पाहिजे.
- ज्या द्रारिद्र्य रेषेखालील किंवा बिपीएल ( BPL ) लोकांच्या घरामध्ये किंवा कुटुंबामध्ये महिला असावी तरच हा लाभ त्या कुटुंबाला मिळू शकतो.
- जो व्यक्ती या योजनेमार्फत गॅस कनेक्शन किंवा एलपीजी ( LPG ) कनेक्शन घेणार आहे त्याचे वय हे १८ वर्षापेक्षा जास्त असते पाहिजे.
- लाभार्थी SC / ST वर्गातील, PMAY ( ग्रामीण ), वनवासी, नदी बेटावर राहणारे, SECC २०११ या सूचीमध्ये समाविष्ट असणारे लोक या योजनेसाठी पात्र ठरतात.
- तसेच जे लोक अंत्योदय अन्न योजनेमध्ये आहेत ते देखील प्रधान मंत्री उज्वला गॅस ( PMUGY ) योजनेसाठी पात्र ठरतात.
- अनुदानाची रक्कम प्राप्त करण्यासाठी अर्जदाराकडे कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेचे खाते असते खूप गरजेचे असते.
- अर्जदाराच्या कुटुंबाकडे आधीपासून गॅस कनेक्शन नसावे.
प्रधान मंत्री उज्वला गॅस योजनेपासून मिळणारे फायदे – benefits of PMUGY
- प्रधान मंत्री उज्वला गॅस ( PMUGY ) मंत्री उज्वला योजने अंतर्गत दारिद्र्य रेषेखालील लोकांना किंवा बिपीएल ( BPL ) कार्ड धारकांना एलपीजी कनेक्शनसाठी सरकार कडून १६०० रुपयाची आर्थिक मदत दिली जाईल तसेच एलपीजी स्थापनेसाठी लागणारा प्रशासकीय खर्च हा सरकार उचलेल.
- स्टोव्ह आणि रिफील खर्चासाठी EMI सुविधा दिली जाईल.
- प्रधान मंत्री उज्वला गॅस ( PMUGY ) मंत्री उज्वला योजनेमार्फत सरकारचा असा हेतू आहे कि भारतातील बिपीएल ( BPL ) कुटुंबांना ५ कोटी एलपीजी ( LPG ) कनेक्शन दिले जाणार आहेत.
प्रधान मंत्री उज्वला गॅस योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे – Documents
ज्या व्यक्ती किंवा कुटुंबे प्रधान मंत्री उज्वला गॅस ( PMUGY ) योजनेसाठी पात्र आहेत त्यांना या योजनेतील लाभ मिळवण्यासाठी नोंदणी करावी लागते आणि हि नोंदणी करण्यासाठी काही कागदपत्रे गरजेची असतात ती खाली दिलेली आहेत.
- बिपीएल ( BPL ) शिधापत्रिका.
- फोटी असणारा ओळखपत्राचा पुरावा ( मतदान ओळखपत्र किंवा आधार कार्ड ).
- बँक पासबुक किंवा जन धन बँक खात्याचा तपशील.
- जात प्रमाण पत्र.
- पंचायत प्रधान किंवा पालिका अध्यक्ष यांनी जरी केलेले बिपीएल ( BPL ) प्रमाणपत्र.
- रहिवासी पुरावा.
- कुटुंबातील सदस्यांचे आधार क्रमांक.
- पासपोर्ट आकाराचा फोटो ( एक ).
प्रधान मंत्री उज्वला गॅस योजनेसाठी अर्ज कसा करावा – how to apply for PMUGY
- सर्वप्रथम ज्या दारिद्र्य रेषेखालील किंवा बिपीएल ( BPL ) धारक महिलेच्या कुटुंबाकडे गॅस नाही अश्या महिलेने एलपीजी ( LPG ) वितराकडे अर्ज करणे आवश्यक असते.
- अर्जदाराने या योजनेसाठी अर्ज करत असताना अर्जदाराने आपले नाव, पत्ता, जन धन किंवा बँक खाते, रहिवासी पुरावा, फोटो पुरावा, आधार कार्ड नंबर यासारखी अनेक माहीती पुरवावी लागते आणि सर्व कागदपत्रे देखील सबमिट करावी लागतात.
- मग त्यानंतर ( LPG ) वितरक हे त्यांच्या बिपीएल ( BPL ) स्थितीची पृष्टी करतील आणि ते दिलेले तपशील ऑईल मार्केटिंग कंपन्यांना ( OMC ) ने दिलेल्या पोर्टलमध्ये प्रविष्ट करतील.
- अश्या प्रकारे सर्व पृष्टी झाल्यानंतर ऑईल मार्केटिंग कंपन्यांन ( OMC ) द्वारे एलपीजी ( LPG ) कनेक्शन जरी केले जाईल.
- तसेच एलपीजी स्थापनेसाठी लागणारा प्रशासकीय खर्च हा सरकार उचलेल आणि स्टोव्ह आणि रिफील खर्चासाठी EMI सुविधा दिली जाईल.
- मग पात्र असणाऱ्या लोकांना एलपीजी ( LPG ) सेवा पुरवली जायील.
सरकार सतत अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या योजना जनतेसाठी तयार करत असते आणि त्या गरीब जनतेसाठी राबवत असते आणि प्रधान मंत्री उज्वला गॅस योजना ( PMUGY ) ज्या लोकांच्यासाठी राबवली जाते ज्या कुटुंबामध्ये अजूनही एलपीजी ( LPG ) गॅस नाहीत आणि हि योजना बिपीएल ( BPL ) कार्ड धारक किंवा द्रारिद्र्य रेषेखालील कुटुंबासाठी लागू होते.
आम्ही दिलेल्या ujjwala gas yojana information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर उज्वला गॅस योजना माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या ujjwala gas yojana in marathi language pdf या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट