युनिसेफ काय आहे ? UNICEF Information in Marathi

UNICEF Information in Marathi युनिसेफ म्हणजेच युनायटेड नेशन चिल्ड्रन्स इमर्जन्सी फंड ही युनायटेड नेशन्सची विशेष संस्था आहे. जी जगभरातील मुलांना मानवतावादी आणि विकासात्मक मदत पुरवते. जगभरातील लहान मुलांना अन्न व आरोग्याची सेवा पुरवणे हे युनिसेफचे ध्येय आहे. युनिसेफ हे संयुक्त राष्ट्राचे एक महत्त्वाचे अंग आहे. युनिसेफची स्थापना डिसेंबर 1946 साली झाली. या संघटनेचे मुख्यालय न्यूयॉर्क येथे आहे. 11 डिसेंबर 1946 रोजी युनायटेड नेशन्स इंटरनॅशनल चिल्ड्रन्स इमर्जन्सी फंड तयार करण्यात आला आणि दुसऱ्या महायुद्धाच्या धर्तीवर झालेल्या मुलांमध्ये अन्न आणि आरोग्य सेवा प्रदान करण्यात आली.

युनिसेफचे संस्थापक म्हणून लुडविक राजचमॅन यांना ओळखले जाते. त्यांनी 1946 पासून त्याचे पहिले अध्यक्ष म्हणून कार्य केले. युरोपमध्ये दुसऱ्या महायुद्धाची झळ पोहोचलेल्या व तातडीच्या मदतीची गरज असलेल्या बालकांना अन्न, वस्त्र, निवारा, औषधोपचार इत्यादी पुरवण्याचे कार्य युनिसेफने केले.

1950 नंतर युनिसेफने अविकसित देशात आपले सेवा क्षेत्र विस्तारले बालकांमधील रोगराई, कुपोषण, निरक्षरता यांचे उच्चाटन करण्यासाठी उपक्रम सुरू केले.

unicef information in marathi
unicef information in marathi

संयुक्त राष्ट्रे बाल निधी  – UNICEF Information in Marathi

माहितीयुनिसेफ
मुख्यालयन्यूयॉर्क, युनायटेड स्टेट्स
हेडहेनरीटा एच. फोर
अध्यक्षतोरे हॅट्रम
स्थापना11 डिसेंबर 1946, न्यूयॉर्क, न्यूयॉर्क, युनायटेड स्टेट्स
सहाय्यकयुनिसेफ आयर्लंड, यू-अहवाल, युनिसेफ मलेशिया, अधिक
संस्थापकःयुनायटेड नेशन्स जनरल असेंब्ली, लुडविक राजचमन

युनिसेफ विस्तारित रूप – UNICEF Full Form in Marathi

युनिसेफ – UNICEF – युनायटेड नेशन चिल्ड्रन्स इमर्जन्सी फंड – संयुक्त राष्ट्रे बाल निधी 

सध्या युनिसेफ अविकसित तसेच विकसनशील देशातील बालकांचे जीवनमान सुधारण्यासाठी त्या त्या देशातील शासन राबवत असलेल्या कार्यक्रमांना सहाय्यक करते युनिसेफ अनेक देशातील बालकांचे अनारोग्य, निरक्षरता, उपासमार यासारखे प्रश्न सोडवण्यासाठी मदत करते.

युनिसेफ बालकांसाठी रोग नियंत्रण कार्यक्रम, आरोग्य केंद्र, शालेय आहार योजना यासारखे उपक्रम राबवण्यासाठी सहाय्य पुरवते. तसेच अध्यापणाची सेवांचे प्रशिक्षण देण्यासाठी युनिसेफ मार्फत अनुदान हे दिले जाते.

लहान मुलांचे हक्क अबाधित ठेवण्यासाठी युनिसेफ जगभरातील अवघड ठिकाणी पोहोचते. 190 पेक्षा जास्त देशांमध्ये आणि भूप्रदेशांमध्ये लहान मुलांना जगण्यासाठी आणि त्यांच्यामधील पोटेन्शियल फुल्फिल करण्यासाठी मदत करत आहे. 1976 युनिसेफने अविकसित देशातील बालके व माता यांच्या आरोग्य सुधारण्यासाठी पोषक आहार, पर्यावरण, स्वच्छता, शिक्षण, समाजकल्याण इत्यादी बाबींमध्ये मूलभूत सेवा सुविधा विषयक योजना तयार केली.

बाल हक्काच्या जाहीरनाम्याची अंमलबजावणी करण्यासाठी करण्याची जबाबदारी युनीसेफवर संयुक्त राष्ट्राच्या आमसभेने सोपवली आहे. त्यानुसार मुलांच्या शारीरिक व मानसिक वाढीसाठी पोषक आहार इत्यादी सुविधा व सवलती त्यांना प्राप्त करून द्याव्यात असे निवेदन त्यात आहे या जाहीरनाम्यामध्ये बालकांचे हक्क जपण्यात आले आहे.

युनिसेफच्या कार्यावर देखरेख ठेवण्यासाठी आणि मार्गदर्शन करण्यासाठी 36 सदस्य असलेली एक कार्यकारी मंडळ आहे. हे मंडळ धोरण आखते, कार्यक्रमांना मान्यता देते. आर्थिक आणि प्रशासकीय योजना ठरवते कामाच्या समन्वयासाठी एक शासकीय अभिकरण असते ज्यामध्ये एक अध्यक्ष आणि 4 उपाध्यक्ष असतात.

ज्या मधील प्रत्येक अधिकारी पाच प्रादेशिक समूहाचे प्रतिनिधित्व करत असते. प्रतिनिधी दरवर्षी  कार्यकारी मंडळाच्या सदस्यांकडून निवडले जातात संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेच्या स्थायी सदस्यांची निवड कार्यकारी मंडळावर होत नाही. कार्यकारी मंडळाचे सचिव कार्यालय हे कार्यकारी मंडळ आणि युनिसेफ सचिवालय या दोघांमध्ये प्रभावी संबंध राखण्यासाठी कार्यशील असते.

युनिसेफ ची प्रादेशिक कार्यालये –

  • अमेरिका आणि कॅरिबियन प्रादेशिक कार्यालय – पनामा शहर, पनामा
  • युरोप आणि मध्य आशिया प्रादेशिक कार्यालय – जेनेव्हा, स्वित्झर्लंड
  • पूर्व आशिया आणि पॅसिफिक प्रादेशिक कार्यालय – बँकॉक, थायलंड
  • पूर्व आणि दक्षिण आफ्रिका प्रादेशिक कार्यालय – नैरोबी, केनिया
  • मध्य पूर्व आणि उत्तर आफ्रिका प्रादेशिक कार्यालय – अम्मान, जॉर्डन
  • दक्षिण आशिया प्रादेशिक कार्यालय – काठमांडू, नेपाल
  • पश्चिम आणि मध्य आफ्रिका प्रादेशिक कार्यालय – सेनेगल

युनिसेफ नॅशनल कमिटी –

युनिसेफच्या समित्या 36 विकसित देशांमध्ये आहेत. ज्या अशासकीय संस्था म्हणून कार्यरत आहेत. युनिसेफ हे स्वेच्छा वर्गणीवर अवलंबून असल्यामुळे त्याचे प्राथमिक कार्य हे खाजगी क्षेत्रामधून निधी गोळा करणे हे आहेत. महामंडळ, नागरी संस्था आणि जगभरातील जवळजवळ सहा दशलक्ष वैयक्तिक देणगीदार हे युनिसेफ मला देणगी देतात.

प्रायोजकत्व-

युनिसेफ कीड पॉवर-

2015 मध्ये युनिसेफ कीड पावरी एक डिव्हिजन तयार केली यामध्ये लहान बालके हे दुसऱ्या लहान बालकांना मदत करण्यासाठी त्यांच्या गरजा भागवण्यासाठी प्रयत्नशील असतात.

ट्रिक ऑर ट्रीट यूनिसेफ बॉक्स-

1950 आयशाडो मस्ताराम पासुन फिलाडेल्फिया पेनसिल्व्हेनिया येथील लहान  संपूर्ण बालकांच्या समूहाने त्यांना हॅलोवीनच्या  दिवशी मिळालेले 17 डॉलर दुसऱ्या महायुद्धात बळी पडलेल्याना  मदत म्हणून देऊ केले तेव्हापासून ट्रिक ऑर ट्रीट युनिसेफ बॉक्सही उत्तर अमेरिकेतील एक परंपरा बनली.

कार्टून फॉर चिल्ड्रन राइट –

कार्टून फॉर चिल्ड्रन राईट हे आणि ॲनिमेटेड लघुपटांचा समूह आहे. जे युनिसेफ ची बालकांच्या हक्कांसाठी अधिवेशने झाली त्यावर आधारित आहेत. 1994 मध्ये युनिसेफने जगभरात असेच लघुपट घेण्यासाठी उत्तेजन देण्यासाठी एक समिती ऑर्गनाइज केले होती.

कार्टून्स ची लिस्ट-

  1. Children have the right to protection from abuse that can be cruel.
  2. Children have the right to survive to the fullest.
  3. Children have the right to freedom of thought.
  4. Children have the right to an education.
  5. Children have the right to play.
  6. Children have the right to a drug-free world.
  7. Children have the right to protection from hazardous work.
  8. Children have the right to protection in time of war.

गर्ल स्टार –

गर्ल स्टार ही चित्रपटाची सेरिज आहे ज्यामध्ये ईशान्य भारतातील मुलींनी अतिशय अवघड परिस्थितीमध्ये आर्थिक, सामाजिक अडचणींवर मात करून शिक्षणाच्या माध्यमातून स्वतःला स्वयंपूर्ण कसे बनवले  हे दाखवले आहे. या महिला त्यांच्या समुदायातील मुलींना शाळेला जाण्यासाठी त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी प्रेरणा देत आहेत त्यांच्या रोल मॉडेल बनले आहेत.

यु- रिपोर्ट –

यु रिपोर्ट हे मोफत  एस एम एस टूल आहे. जी रियल टाइम माहिती देते जिच्यामुळे सामाजिक विकास होण्यास मदत होत आहे समाजामध्ये सकारात्मक बदल होण्यास मदत होत आहे.

युनिसेफ आणि भारत-

युनिसेफने 1949 पासून भारतात कार्याचा प्रारंभ केला आणि दिल्लीमध्ये कार्यालय स्थापले.

नोडल मिनिस्ट्री-

महिला व बाल विकास मंत्रालय

पोलिओ अभियान 2012-

  • भारतातील पोलिओ दर 2008  मधील 559 पासून 2012 मध्ये 0  पर्यंत खाली आला.
  • यामध्ये भारत सरकार सोबत युनिसेफ जागतिक आरोग्य संघटना, द बिल अंड गेट्स फाउंडेशन यांनी महत्त्वाचे योगदान दिले. त्यामुळे 2014 मध्ये भारताला पोलिओ मुक्त करण्यात आले. मृत्युदर खाली आणणे-
  • नॅशनल हेल्थ मिशनच्या प्रयत्नांमुळे गरोदर स्त्रियांची डिलिव्हरी आरोग्य केंद्रात होऊ लागले त्यामुळे मातामृत्यू दर खाली आला. नॅशनल  हेल्थ मिशन ला युनिसेफने मदत केले.
  • 1965 मध्ये त्याच्या बालकल्याण कार्यर्थ, तसेच आंतरराष्ट्रीय बंधुभाव वृद्धिंगत करण्याच्या भूमिकेबद्दल शांततेसाठी असलेल्या नोबेल पुरस्कार देण्यात आला.

आम्ही दिलेल्या unicef information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर जागतिक व्यापार संघटना बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या unicef information in marathi pdf या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि unicef full form in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये unicef meaning in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!