संयुक्त राष्ट्र संघटना UNO Information in Marathi

UNO Information in Marathi – United Nations Organisation in Marathi संयुक्त राष्ट्र संघटना मराठी माहिती गेल्याच वर्षी एक बातमी खूपच चर्चेत होते. ती म्हणजे भारताची 2021 -2022 या वर्षासाठी संयुक्त राष्ट्र परिषदेचे म्हणजेच युएनएससी च्या अस्थायी सदस्यपदी निवड करण्यात आली. यूएनएससी म्हणजे युनायटेड नेशन्स सेक्युरिटी कौन्सिल म्हणजे संयुक्त राष्ट्र संघ. म्हणजेच युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन. तर आज आपण जाणून घेणार आहोत युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन म्हणजे यूएनओ बद्दल.

दुसऱ्या महायुद्धानंतर जागतिक शांतता, सुरक्षितता आणि सहकार्य या करता स्थापन झालेल्या आंतरराष्ट्रीय संस्था म्हणजे संयुक्त राष्ट्र संघ म्हणजे यूएनओ.

uno information in marathi
uno information in marathi – United Nations Organisation in Marathi
अनुक्रमणिका hide
1 संयुक्त राष्ट्र संघटना मराठी माहिती – UNO Information in Marathi

संयुक्त राष्ट्र संघटना मराठी माहिती – UNO Information in Marathi

संस्थापकः – Founders:
युनायटेड स्टेट्स – United States
भारत – India
युनायटेड किंगडम – United Kingdom
फ्रान्स – France
ब्राझील – Brazil

संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना 24 ऑक्टोबर 1945 रोजी झाली. याचे मुख्यालय न्यूयॉर्क येथे असून सदस्य देशांची संख्या 193 आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या सहा अधिकृत भाषा आहेत. त्या पुढील प्रमाणे – अरबी, चिनी, इंग्रजी, फ्रेंच, रशियन, स्पॅनिश. संयुक्त राष्ट्र संघाचे प्रमुख पद सर चिटणीस असे असून सध्या हे पद पोर्तुगालचे अँटॉनिया गुटेरेस यांच्याकडे आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सनदेनुसार ती एकदा स्वीकार केल्यानंतर ती संबधीतांवर बंधनकारक आहे.

संयुक्त राष्ट्रांची उद्दिष्टे:

  • जागतिक शांतता आणि सुरक्षितता प्रस्थापित करणे.
  • राष्ट्र राष्ट्रांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करणे.
  • आंतरराष्ट्रीय सहकार्य निर्माण करून त्याद्वारे राष्ट्र राष्ट्रांमधील सांस्कृतिक सामाजिक आर्थिक व मानवी समस्यांची उकल करणे. लिंग, भाषा, धर्म, वंश यांच्या आधारे भेदभाव न करता मूलभूत हक्क व मानवी हक्क  यांची जोपासना करणे.
  • समान उद्धीष्टे गाठण्यासाठी विविध देशांत कडून केल्या जाणाऱ्या प्रयत्नांमध्ये सुसंवाद साधणारे केंद्र म्हणून कार्य करणे.
  • आंतरराष्ट्रीय कायद्याचे पालन करणे.

संयुक्त राष्ट्राची तत्वे:

  • सर्व राष्ट्रीय सार्वभौम व समान आहेत.
  • सनदेनुसार येणाऱ्या जबाबदाऱ्या पार पाडण्याचे बंधन सर्व सदस्य राष्ट्रांवर आहे.
  • आंतरराष्ट्रीय संघर्षाची शांततामय मार्गाने सोडवणूक करणे.
  • कोणत्याही राष्ट्राच्या अंतर्गत व्यवहारात हस्तक्षेप करण्यास प्रतिबंध.
  • आंतरराष्ट्रीय संबंधात कोणत्याही राष्ट्राची भौगोलिक अखंडता किंवा राजकीय स्वातंत्र याविरुद्ध बळाचा वापर करण्यास प्रतिबंध.
  • संयुक्त राष्ट्रांच्या कार्यात सर्व सदस्य राष्ट्रांचे सहकार्य.
  • सदस्तव – कोणत्याही राष्ट्राला संयुक्त राष्ट्राचे सदस्य होता येते. सनदेमध्ये मूळ सभासद आणि स्वीकृत सभासद असे फरक केले आहेत.
  • 1942 च्या वॉशिंग्टन जाहीरनाम्यावर स्वाक्षरी करणारे आणि 1945 मध्ये सॅन फ्रान्सिस्को परिषदेला उपस्थित राहणारी 50 राष्ट्रे मूळ सभासद मानली जातात.
  • इतर राष्ट्राना सदस्यत्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडण्याची क्षमता आणि इच्छा या अटींवर सदस्यत्व देता येते. त्यासाठी सुरक्षामंडळाची शिफारस व आम सभेतील दोन तृतीयांश सदस्यांच्या पाठिंबा आवश्यक असतो.

संयुक्त राष्ट्र प्रणालीमध्ये समाविष्ट असलेल्या संस्था पुढीलप्रमाणे-

  1. जागतिक बँक
  2. जागतिक आरोग्य संघटना
  3. जागतिक अन्न कार्यक्रम
  4. युनेस्को
  5. युनिसेफ

जागतिक बँक-

जागतिक बँकेची स्थापना 1945 साली वॉशिंग्टन येथे झाली. संयुक्त राष्ट्रांची संलग्न संस्था म्हणून वर्ल्ड बँक  करते. सभासद राष्ट्रांना आर्थिक मदत करून विकासाच्या काळात दीर्घकालीन भांडवल पुरवठा करणे हे जागतिक बँकेचे महत्त्वाचे कार्य आहे तसेच अल्प विकसित देशात संसाधने व उत्पादन क्षमता विकासासाठी मदत करणे.

जागतिक आरोग्य संघटना

जागतिक आरोग्य संघटना हे संयुक्त राष्ट्र या संस्थेच्या मार्गदर्शनानुसार कार्य करते. 7 एप्रिल 1948 रोजी जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना करण्यात आली. म्हणून 7 एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा करण्यात येतो. सर्वांचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी जागतिक आरोग्य संघटना विविध उपाय योजना करते.

जागतिक अन्न कार्यक्रम-

जागतिक अन्न कार्यक्रम ही संयुक्त राष्ट्रांची अन्न सहायक शाखा आहे. जागतिक अन्न कार्यक्रमाची स्थापना 1969 साली झाली असून याचे मुख्यालय रोम येथे आहे. जगभरातील उपासमार संपुष्टात आणण्यासाठी खाद्य सुरक्षिततेला प्रोत्साहन देण्यासाठी एक सर्वात मोठी संघटना आहे. या संस्थेला 2020 सालचा शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाला आहे.

युनेस्को-

संयुक्त राष्ट्रसंघ शैक्षणिक,वैज्ञानिक व सांस्कृतिक संघटना. या संघटनेची स्थापना 16 नोव्हेंबर 1945 रोजी लंडन येथे करण्यात आली. भौगोलिक आणि सांस्कृतिक स्थळांना जागतिक वारसा हा दर्जा युनेस्कोकडून दिला जातो. युनेस्को चे ध्येय शांतता प्रस्थापित करणे, दारिद्रय निर्मूलन शाश्वत विकास शिक्षणाच्या माध्यमातून आंतर सांस्कृतिक संवाद आहे.

युनिसेफ-

संयुक्त राष्ट्रीय बाल निधी किंवा युनिसेफ ही संयुक्त राष्ट्रांची एक विशेष संस्था आहे. जगभरातील लहान मुलांना अन्न व आरोग्याची सेवा पुरवणे हे युनिसेफच्या ध्येय आहे. युनिसेफ ची स्थापना डिसेंबर 1946 मध्ये झाली असून त्याचे मुख्यालय न्यूयॉर्क येथे आहे.

संरचना-

संयुक्त राष्ट्राच्या सहा प्रमुख घटक संस्था आहेत त्या पुढील प्रमाणे-

जनरल असेम्ब्ली:

संयुक्त राष्ट्रांची सर्व सभासद राष्ट्रे आम सभेचे सदस्य असतात. ही सर्वात मोठी घटक संस्था आहे. वर्षातून एकदा आमसभेची सर्वसाधारण बैठक भरते. आमसभा दरवर्षी अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सात प्रमुख समित्यांच्या सभापतींची निवड करते. आमसभेच्या कार्याचे स्वरूप हे चर्चात्मक असते. आम सभेचे कार्यक्षेत्र व्यापक आहे. एक शांतता व सुरक्षितता या चर्चा करून सुरक्षा मंडळाला निर्णय घेण्याबाबत सूचना करण्याचा अधिकार तिला आहे. सर्वसाधारण कार्यपद्धतीचा प्रश्नांवर आमसभा बहुमताने निर्णय घेते.

सुरक्षा परिषद: 

ही परिषद अत्यंत महत्त्वाची आहे. या परिषदेमध्ये 5 स्थायी तर 10 अस्थायी सदस्य असतात. 5 स्थायी सदस्यांमध्ये अमेरिकेची संयुक्त संस्थाने, रशिया, चीन, फ्रान्स, ग्रेट ब्रिटन हे देश आहेत. दहा आस्थायी सदस्यांची निवड हे दोन वर्षासाठी असते. सुरक्षा परिषदेत प्रत्येक सदस्याला एक मत असते. स्थायी सदस्याना वेटो पॉवर म्हणजेच नकाराधिकार उपलब्ध असतो. पाचपैकी एका सदस्यांनी जरी नकाराधिकार वापरला तरी निर्णय फेटाळण्यात येतो.

आर्थिक व सामाजिक परिषद:

संयुक्त राष्ट्राच्या सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रात सुसंवाद प्रस्थापित करण्यासाठी या परिषदेची निर्मिती करण्यात आली. या परिषदेचे 54 सदस्य त्यांची निवड 3 वर्षांसाठी केली जाते. विविध राष्ट्रांच्या राजकीय क्षेत्राबाहेर व समस्यांची सोडवणूक करण्याचे महत्त्वाचे कार्य ही परिषद करते. बाल कल्याण, मानवी हक्क, अमली पदार्थांच्या प्रसाराला प्रतिबंध, आंतरराष्ट्रीय व्यापार, अज्ञान व दारिद्र्य यांचे निर्मूलन, दहशतवाद नष्ट करणे इत्यादी विषय या परिषदेच्या कार्यक्षेत्रात येतात.

विश्वस्त परिषद: 

संयुक्त राष्ट्रसंघाने मागासलेल्या प्रदेशांच्या विकासासाठी योजना सुरू केली होती. ही परिषद या योजनेची सुधारित आवृत्ती होय. या परिषदेची सदस्य संख्या निश्चित नसते.  तिच्यामध्ये विश्वस्त राष्ट्रे, सुरक्षा परिषदेतील राष्ट्रे व तीन वर्षाकरिता आमसभेने निवडलेले राष्ट्रीय सदस्य असतात.

आंतरराष्ट्रीय न्यायालय: 

यामध्ये 15 न्यायाधीश असतात. त्यांची निवड आमसभा व सुरक्षा परिषदेकडून नऊ वर्षांसाठी केली जाते. सर्व न्यायाधीश आपल्यातून तीन वर्षांसाठी अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची निवड करतात. या न्यायालयात सर्व निर्णय बहुमताने घेतले जातात. याचा कारभार इंग्रजी व फ्रेंच या भाषांमधून चालतो.

सचिवालय:

संयुक्त राष्ट्राच्या प्रशासकीय व्यवस्थापनासाठी हे एक कायमस्वरूपी सचिवालय आहे. त्याचा प्रमुख अधिकारी असून त्याची सुरक्षा परिषदेच्या शिफारशीनुसार आमसभेचे कडून पाच वर्षांसाठी होते. या संघटनेने लोककल्याण कार्य उल्लेखनीय असे कार्य केले आहे. मानवतावादी दृष्टिकोनातून छोट्या गरीब देशांना दिलासा दिला आहे.

काही प्रश्नाची उत्तरे:

संयुक्त राष्ट्र संघटना कधी स्थापन झाली ?

संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना 24 ऑक्टोबर 1945 रोजी झाली.

संयुक्त राष्ट्र संघटनेचे मुख्यालय कोठे आहे ?

याचे मुख्यालय न्यूयॉर्क येथे आहे.

राष्ट्रसंघाचे सचिवालय कोठे आहे ?

याचे मुख्यालय न्यूयॉर्क येथे आहे.

कोणत्या युद्धानंतर राष्ट्रसंघाची स्थापना झाली ?

दुसऱ्या महायुद्धानंतर राष्ट्रसंघाची स्थापना झाली

संयुक्त राष्ट्र संघटनेचे आज सभासद असणाऱ्या राष्ट्रांची संख्या ?

सदस्य देशांची संख्या 193 आहे.

आम्ही दिलेल्या uno information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर संयुक्त राष्ट्र संघटना United Nations Organisation बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या information about uno in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि sanyukt rashtra sangh माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

4 thoughts on “संयुक्त राष्ट्र संघटना UNO Information in Marathi”

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!