vatvaghul information in marathi – bat bird information in marathi वटवाघळाची माहिती, अनेकांना असे वाटते कि वटवाघुळ या प्राण्याकडे आकाशात उडण्याची क्षमता असते त्यामुळे हा एक प्रकारचा पक्षी आहे परंतु तसे नाही कारण हा प्राणी पक्षी प्रकारात मोडत नाहीत तर याला एक सस्तन प्राणी म्हणून ओळख आहे आणि आज आपण या लेखामध्ये वटवाघुळ या प्राण्याविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. वटवाघुळ हा एक सस्तन प्राणी आहे जो रात्री सक्रीय असतो म्हणजे हा एक निशाचर प्राणी आहे.
वटवाघुळ या प्राण्याचे अनेक प्रकार आहेत आणि बहुतेक वटवाघुळांचे १००० प्रकार आहेत आणि यामधील काही प्रकार हे मांसाहारी असतात तर काही प्रकार हे शाकाहारी असतात.
वटवाघुळ हे प्राणी काळ्या किंवा तपकिरी रंगाचे असतात आणि या प्राण्याला मोठ्या आकाराचे जाड असे पंख असतात आणि त्यामुळे ते आकाशामध्ये उडू शकतात आणि या पंखांचा आकार हा २.७ सेमी ते १५०० सेमी इतका असतो.
या प्राण्यांचे वजन ५ ग्रॅम ते १३०० ग्रॅम इतके असू शकते. वटवाघुळ हा प्राणी गडद रंगाच्या ठिकाणी जास्त राहतो म्हणजेच हा ज्या ठिकाणी प्रकाश येत नाही अश्या ठिकाणी म्हणजेच गुहेमध्ये राहतो.
वटवाघळाची माहिती – Vatvaghul Information in Marathi
प्राण्याचे नाव | वटवाघुळ |
इंग्रजी नाव | बॅट (bat) |
शास्त्रीय नाव | चिरोप्टेरा |
रंग | काळा किंवा तपकिरी |
वजन | ५ ग्रॅम ते १३०० ग्रॅम |
वटवाघुळ बद्दल माहिती – bat bird information in marathi
वटवाघुळ हा एक सस्तन प्राणी आहे आणि हा एक सर्वात जुना प्राणी म्हणजेच या प्राण्याचे २० दशकाहून अधिक काळातील वास्तव्य आहे. वटवाघुळ या प्राण्याचे शास्त्रीय नाव हे चिरोप्टेरा असे आहे आहे आणि हे एक प्रकारचे निशाचर प्राणी असून या प्राण्याचा रंग हा काळ्या किंवा तपकिरी रंगामध्ये असतो.
आणि या प्राण्याला मोठ्या आकाराचे जाड असे पंख असतात आणि त्यामुळे ते आकाशामध्ये उडू शकतात आणि या पंखांचा आकार हा २.७ सेमी ते १५०० सेमी इतका असतो या प्राण्यांचे वजन ५ ग्रॅम ते १३०० ग्रॅम इतके असू शकते. हे प्राणी गुहेमध्ये किंवा गडद ठिकाणी राहणे पसंत करतात आणि ते झोपतेवेळी झाडांना उलटे लटकतात.
हा प्राणी रात्रीच्या वेळी अनेक हालचाली करतात कारण त्यांना रात्रीच्या वेळी चांगले दिसते आणि हा प्राणी जमिनीवरून धावण्यास असक्षम असतो कारण हा प्राणी जमिनीवरून धाऊ शकत नाही.
वटवाघुळ हा प्राणी उंदराच्या आकाराचा असतो आणि ह्या प्राण्याला पक्ष्याप्रमाणे उडण्यासाठी जरी पंख असले तरी या प्राण्याला पक्ष्याप्रमाणे चोच नसते पण या प्राण्याला कान असतात. वटवाघुळ हा प्राणी अंडी घालत नाही तर हा प्राणी छोट्या पिल्ल्यांना जन्म देतो
वटवाघुळ झाडाला का लटकतात ?
हे प्राणी झाडाला उलटे लटकण्याचे कारण म्हणजे या प्राण्यांना जमिनीवरून आकाश्यामध्ये झेप घेता येत नाही आणि याचे कारण म्हणजे या प्राण्याचे पाठीमागचे पाय हे छोट्या आकाराचे असतात त्यामुळे त्याचे पाठीमागचे पाय जमिनीवर असताना त्या प्राण्याचे संपूर्ण वजन पेलू शकत नाहीत आणि म्हणून ते झाडाला लटकतात कारण त्यांना झाडाला उलटे लटकल्यामुळे उडण्यासाठी सोपे होते.
घरामध्ये वटवाघुळ येणे शुभ कि अशुभ – bat bird entering home in marathi
भारतामध्ये वास्तुशास्त्राचे नियम अनेक घरामध्ये पाळले जातात आणि त्यामध्ये घरामध्ये अनेक प्राण्यांचे येणे म्हणजे हा एक संकेत किंवा संदेश असतो जो संदेश शुभ किंवा अशुभ असू शकतो आणि आता आपण वटवाघुळ घरामध्ये आल्यानंतर त्या व्यक्तीला कोणत्या प्रकारचे संदेश मिळतात ते पाहूया.
- वटवाघुळ हा प्राणी घरामध्ये येणे हे अशुभ मानले जाते कारण वटवाघुळ घरामध्ये आल्यानंतर घरामध्ये किंवा कुटुंबामध्ये अनेक भांडणे होतात तसेच कुटुंबामध्ये अनेक समस्या निर्माण होतात.
- जर आपला कोणत्याही बाजूने आर्थिक नफा होणार असेल आणि जर वट वाघुळ आपल्या घरामध्ये आले तर आपले आर्थिक नुकसान होते.
- हा प्राणी घरामध्ये आल्यानंतर असे म्हटले जाते कि आपल्याला अशुभ गोष्टी किंवा अशुभ बातम्या समजतात.
वटवाघुळ या प्राण्याविषयी काही विशेष आणि मनोरंजक तथ्ये – facts
- वटवाघुळ हे प्राणी निशाचर प्राणी आहेत म्हणजेच हे प्राणी रात्रीचे जास्त सक्रीय असतात म्हणजेच आपले अन्न हे रात्रीचेच गोळा करतात तसेच एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर देखील रात्रीचेच करतात कारण त्यांना रात्रीचे जास्त दिसते.
- वटवाघुळ हे प्राणी झाडाला उलटे लटकून झोपतात.
- जगामध्ये असणाऱ्या सर्वात मोठ्या वटवाघुळाचे पंख हे ६ फुट लांब असतात.
- वटवाघुळ हा प्राणी अमेरिका या देशामध्ये मोठ्या प्रमाणात आढळतो आणि अमेरिका देशातील टेक्सस या राज्यामधील ऑस्टीनम मध्ये १५ लाख पेक्षा अधिक वटवाघळाचे अभयारण्य आहे.
- जगभरामध्ये वटवाघुळ या प्राण्याचे १४०० हून अधिक प्रजाती आहेत आणि जगामधील सर्वात मोठी वटवाघुळ हि फ्लाइंग फॉक्स आहे आणि हि प्रजाती दक्षिण पॅसिफिकमधील बेटावर राहते.
- वटवाघुळ हा प्राणी ३० वर्षाहून अधिककाळ जगू शकतो आणि हा प्राणी ६० मैल प्रती तास वेगाने उडू शकतात.
- त्यांच्या उलटे लटकण्याच्या सवयीला आणखीन एक कारण आहे ते म्हणजे ते उलटे लटकून आपली उर्जा वाचवतात.
- वटवाघुळ या प्राण्याच्या खाण्याची सवय हि त्याच्या प्रजातीवर अवलंबून असू शकते म्हणजेच हे प्राणी फळे, कीटक खातात त्याबरोबर काही वटवाघुळाचे प्रकार हे रक्त देखील पितात.
- वटवाघुळ या प्राण्याचे शास्त्रीय नाव हे चिरोप्टेरा असे आहे.
आम्ही दिलेल्या vatvaghul information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर वटवाघळाची माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या bat bird information in marathi या Vatvaghul information in marathi wikipedia article मध्ये update करू, मित्रांनो हि information about bat bird in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये bat bird entering home in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट