पक्षी आणि त्यांचे घरटे माहिती Birds and Their Nest Information in Marathi

Birds and Their Nest Information in Marathi पक्षांचे घरटे वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी आपली अंडी सुरक्षित ठेवण्यासाठी विविध ठिकाणी जागा शोधतात आणि आपले घरटे तेथे बनवतात. घरटी बनवण्याचे ठिकाण हे पक्ष्यांच्या राहणीमानावर अवलंबून असते जर काही पक्ष्यांना उष्ण भागामध्ये राहायला आवडत असेल ते उष्ण भागामध्ये आपली घरटी बनवतात तर काही पक्ष्यांना पाणी असणाऱ्या ठिकाणी राहायला आवडते तर ते नदी, ओढे, विहिरी, तळे असणाऱ्या ठिकाणी एका झाडावर आपले घरटे बनवतात. पक्ष्यांची घरटी हि एका झाडावर कायम स्वरूपासाठी नसतात ते फक्त पक्ष्यांचे संगोपन करण्यासाठी बनवलेली असतात वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी वेगवेगळ्या स्वरुपाची घरटी बनवतात म्हणजेच प्रत्येक जातीच्या पक्ष्याच्या घरट्यामध्ये वेगळेपणा असतो.

birds and their nest information in marathi
birds and their nest information in marathi

पक्षी आणि त्यांचे घरटे माहिती – Birds and Their Nest Information in Marathi

1.बगळा पक्षी ( egret bird )

बगळा हा पक्षी ‘बकाद्या’ कुळातील असून या पक्ष्याचे वैज्ञानिक नाव आरडीडाय असे आहे. बगळा हा पक्षी पांढऱ्या शुभ्र रंगाचा, पाय लांब आणि काळ्या रंगाचे आणि दिसायला काठीसारखे, चोच लांब आणि टोकदार, मान लांब आणि सडपातळ ( S आकाराची असते ) असे या पक्ष्याचे वर्णन आहे. हे पक्षी आशिया, युरोप, आफ्रिका आणि अमेरिका या देशांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळतात. या पक्ष्याच्या जगभरामध्ये जवळ जवळ ६४ प्रजाती आहेत तर भारतामध्ये यामधील २० ते २१ प्रजाती आढळतात. बगळ्याच्या काही प्रसिध्द प्रजाती म्हणजे लहान बगळा, मोठा बगळा, गाय बगळा, मध्यम बगळा इत्यादी. बगळे मासे, बेडूक, किडे अळ्या या प्रकारचे अन्न खातात.

बगळ्याचे घरटे ( nest )

बगळा हा पक्षी जलाशयाच्या ठिकाणी किवा दलदलीच्या ठिकाणी राहणे पसंत करतो. हे पक्षी आपले घरटे पाणी असलेल्या ठिकाणी एका झाडावर बनवतात. हे पक्षी आपले घरटे छोट्या किवा बारीक लाकडापासून, झाडाचे डहाळे किवा पाणे या पासून आपले घरटे बनवतात.

2.सुगरण पक्षी ( weaver bird ) 

सुगरण हा पक्षी खास करून घरटे बनवण्यासाठी ओळखला जातो आपल्या सर्वाना माहित आहेच कि हे पक्षी अगदी उत्तम प्रकारे आपल्या घरट्याचे विणकाम करतात आणि याच कलेसाठी हे पक्षी खूप लोकप्रिय आहेत. हे पक्षी सुबक घरटी बनवतात म्हणून या पक्ष्याला सुगरण हे नाव पडले आहे. या पक्ष्याचा रंग पिवळा रंग, थोडी लांब आणि सरळ चोच आणि चिमणीच्या आकाराचा असतो आणि लांबी १४ ते १५ सेंटी मीटर इतकी असते. सुगरण या पक्ष्याला विणकर या नावानेही ओळखले जाते आणि हा पक्षी ४ ते ५ वर्ष जगू शकतो. सुगरण हा पक्षी मुंग्या, अळ्या, बिया या प्रकारचे अन्न खातो.

सुगरण पक्ष्याचे घरटे – weaver bird nest information in marathi

सुगरण हा पक्षी बांधण्याच्या कलेसाठी लोकप्रिय आहे आणि हे पक्षी आपले घरटे मे पासून सप्टेंबर पर्यंत आपले घरटे विणतात. या पक्ष्याचे घरटे म्हणजे एक कारागिराचे उत्तम उदाहरण आहे. हे पक्षी आपले घरटे पाणी असलेल्या ठिकाणी विणतात जेथे उंच झाड आहे, तसेच घरटे बनवण्यासाठी लागणारी सामग्री अत्यंत सहजपणे मिळू शकते त्या ठिकाणी हे पक्षी घरटे बनवण्यासाठी जागा निवडतात. हे पक्षी आपले घरटे वाळलेले गवत, काटक्या, कापूस, दोऱ्याची गुंतवळ आणि पानांपासून आपले घरटे बनवतात. ह्या पक्ष्यांचे घरटे वरून अरुंद आणि खाली येई ल तसे गोलाकार असते खालचा भाग हा झाकलेला असतो आणि गोलाकार भागामध्ये एका बाजूला प्रवेश द्वार असते आणि या घरट्यामध्ये कप्पे देखील असतात.

3.खंड्या पक्षी ( kingfisher bird )

खंड्या हा पक्षी अल्सिडीनिडे कुळातील असून या पक्ष्याचे शास्त्रीय नाव हल्वयोन स्म्यर्नेन्सीस असे आहे. जगभरामध्ये आढळणाऱ्या खंड्या पक्ष्याच्या जवळ जवळ ९० जाती आहेत आणि भारतामध्ये या पक्ष्याच्या ५ ते ६ जाती आढळतात. हा पक्षी सुमारे २७ दशलक्ष वर्षापासून अस्तित्वात असणारा पक्षी आहे. या पक्ष्याचे वर्णन करायचे म्हंटले तर या पक्ष्याचे पंख आकाशी रंगाचे असतात, डोके आणि डोक्याचा दोन्ही बाजूचा रंग हा गडद निळा सातो तसेच पोटाचा भाग हा पूर्णपणे नारंगी असतो. हनुवटी आणि मान पांढऱ्या रंगाची असते, चोच लांब आणि धारधार असते, पाय आखूड आणि लाल रंगाचे असतात. हे पक्षी सरडे, बेडकांची पिल्ले, कीटक आणि अळ्या या प्रकारचे अन्न खातात.

खंड्या पक्ष्याचे घरटे ( nest )

खंड्या हे पक्षी उष्ण किवा समतोष्ण कटीबंधात राहणे पसंत करतात. हे पक्षी नदी, ओढे किवा तळ्याच्या ठिकाणी राहणे पसंत करतात त्याचबरोबर हे पक्षी आपली घरटी पाण्याच्या काठावर असणाऱ्या झाडावर किवा पाण्याच्या कथाजवळील जमिनीवर छिद्र पाडून बनवतात.

4.पोपट पक्षी ( parrot bird )

पोपट हा पक्षी जगातील सुंदर पक्षांपैकी एक आहे या पक्ष्याच्या हिरव्या रंग आणि लाल चोच लोकांना आकर्षित करते. पोपट या पक्ष्याच्या जगभरामध्ये वेगवेगळ्या जाती आहेत वेगवेगळ्या जातीचे पोपट आकाराने आणि रंगाने वेगवेगळे आहेत. या पक्ष्याचे वैज्ञानिक नाव लोरीक्यूलास व्हरनॅलिस असे आहे. पोपटाचे पेरू आणि मिरची हे आवडते अन्न आहे तसेच हे पक्षी इतर फळे, धान्य, कीटक, बिया या प्रकाचा आहारसुध्दा खातात. या पक्ष्याची लांबी १५ सेंटी मीटर असते आणि वजन ६४ ग्रॅम ते १ किलो इतके असते.

पोपट पक्ष्याचे घरटे ( nest )

पोपट हे पक्षी शक्यतो उष्ण कटिबंधात राहतात या पक्ष्यांना थंड हवा सोसत नाही. हे पक्षी समूहाने राहतात आणि हा पक्षी आपले घरटे उंच आणि दाट पाणे असलेल्या झाडावर किवा झाडामध्ये जर पोकळी असेल तर त्यामध्ये बनवतो त्याचा बरोबर या पक्ष्याची विशेषता म्हणजे या पक्ष्यांना माणसांजवळ राहायला खूप आवडते .

5.चिमणी पक्षी ( sparrow bird ) 

चिमणी हा पक्षी आपल्या सर्वांच्या रोज संपर्कात येणारा पक्षी आहे आणि पक्ष्याला देखील माणसांजवळ राहायला खूप आवडते. हे पक्षी आकाराने खूप छोटा असतो आणि हा पक्षी भारताच्या सर्व राज्यामध्ये पाहायला मिळतो. चिमणी हा पक्षी फक्त आशिया आणि युरोपमध्ये पाहायला मिळतो. चिमणीचा मुख्य आहार धान्य, बिया, ज्वारी किवा कोर्न या प्रकारचे अन्न खातात.

चिमणी पक्ष्याचे घरटे ( nest )

चिमणी हा पक्षी आकाराने लहान असल्यामुळे या पक्ष्यांचे घरटेहि लहानच असते. या पक्ष्यांचे घरटे वाटीच्या आकाराचे असते, आणि चिमण्या आपले घरटे वाळलेल्या गवताच्या काड्यांपासून बनवतात. शक्यतो चिमण्या आपले घरटे इमारतीच्या छिद्रांमध्ये, घरांच्या छप्परावर, विहिरींमध्ये, ट्रॅफिक लाइट्स, स्ट्रीट लाइट्स यामध्ये आपले घरटे बनवतात.

6.कोकीळ पक्षी ( finch bird )

कोकीळ या पक्ष्याला गाणारा पक्षी म्हणून ओळखले जाते. आकाराने लहान असणाऱ्या या पक्ष्याची चोच लहान आणि शंकूच्या आकाराची असते. भारतामध्ये आढळणाऱ्या या सामान्य पक्ष्याचा रंग काळा असते आणि डोळे लाल रंगाचे असतात. कोकीळ हा पक्षी धृवीय भाग आणि ऑस्ट्रोलीया सोडले तर सगळीकडे आढळतात आणि या पक्ष्याच्या जाती जगभरामध्ये सापडतात. कोकीळ हा पक्षी सर्वभक्षी आहे आणि हा किडे, अळ्या, फळे आणि बिया या प्रकारचे अन्न खातो. कोकीळ हा पक्षी फ्रींगीलिड या कुळातील आहे. हा पक्षी ४ ते ६ वर्ष जगू शकतो आणि या पक्ष्याची लांबी ३ ते ६ इंच असते आणि वजन १० ते ३० ग्रॅम इतके असते.

कोकीळ पक्ष्याचे घरटे ( nest )

कोकीळ हे पक्षी आपले घरटे आपण स्वतःच बनवतात आणि या पक्ष्यांच्या घरट्याला पिंजरा म्हणतात. हा पिंजरा एका वाटीच्या, कपच्या किवा टोपलीच्या आकाराचे असते. कोकीळ हे पक्षी आपले घरटे झाडावर किवा खडकावर बनवतात आणि हि घरटी वाळलेले गवत, डहाळे, पाणे किवा इतर पक्ष्यांचे पडलेले पंख गोळा करून आपले घरटे बनवतात.

वरील सर्व गोष्टी पाहून आपणास अंदाज लागला असेलच कि कोणते पक्षी कोणत्या घरट्यात राहतात birds and their nest information in marathi हा पक्षी कसा आहे त्याची रचना, त्याचे घरटे कसे आहे तसेच त्यांची वैशिट्ये कोणती आहेत. birds nest information in marathi हा लेख आपल्याला आवडल्यास आपल्या मित्र परिवारासोबत फेसबुक ओट्सअप्प सारख्या विविध सोशियल मेडिया वरून माहिती पोहचवा. तसेच information about birds nest in marathi हा लेख कसा वाटला व अजून काही पक्षी आणि त्यांच्या घरट्याविषयी राहिले असेल तर आपण comments द्वारे कळवू शकता धन्यवाद.

आम्ही दिलेल्या birds nest in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही birds and their nests information in marathi त्यामध्ये नक्की बदल करू.  अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

2 thoughts on “पक्षी आणि त्यांचे घरटे माहिती Birds and Their Nest Information in Marathi”

  1. पक्ष्यांना घरटे बनवायला कुठल्या झाडे आवडतात (जे पक्षी लोक वस्ती मध्ये राहतात)

    उत्तर

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!