व्हेनिस शहर माहिती मराठी Venice Description Essay in Marathi

Venice Description Essay in Marathi – Venice Information in Marathi व्हेनिस शहर माहिती मराठी आज आपण या लेखामध्ये व्हेनिस वर्णन या विषयावर निबंध लिहिणार आहोत. व्हेनिस हे एक शहर आहे ज्याला पाण्यावरील किंवा पाण्यावर तरंगणारे शहर म्हणून ओळखले जाते कारण हे शहर इटलीमध्ये १२० बेटांच्यावर वसले आहे आणि हे शहर पाचव्या शतकापासून स्थापन करण्यास सुरुवात होती आणि तेथील लहान लहान बेटांच्यावर हे शहर वसलेले आहे आणि हि बेटे वेगवेगळ्या पुलांच्या सहाय्याने जोडलेली आहे आणि येथील घरांच्या बाजूने आपल्याला पाणी पाहायला मिळते आणि म्हणून या इटली मध्ये बेटावर वसलेल्या शहराला एक सुंदर आणि मनमोहक शहर म्हणून ओळखले जाते.

व्हेनिस या शहराला द फ्लोटिंग सिटी किंवा सेरेनिसिमा म्हणून देखील ओळखले जाते आणि हे इटली मधील एक नयनरम्य किंवा मनमोहक शहर आहे आणि या ठिकाणी आकर्षक इमारती आणि वास्तुकला, वळणदार आणि सुंदर असे कालवे आणि सुंदर असे पूल आहेत ज्यामुळे हे प्रवाश्यांचे एक लोकप्रिय आणि आवडीचे ठिकाण बनले आहे.

venice description essay in marathi
venice description essay in marathi

व्हेनिस शहर माहिती मराठी – Venice Description Essay in Marathi

Venice Information in Marathi

आपल्याला माहित नसेल कि या शहरामध्ये २ ते २.५ लाख पेक्षा जास्त लोक राहतात आणि हे शहर जगातील पर्यटन स्थळांच्या मध्ये दुसऱ्या नंबरला आहे आणि पहिल्या नंबरला पॅरीस हे ठिकाण आहे. व्हेनिस हे शहर छोट्या छोट्या बेटावर वसलेले आहे आणि ह्या शहरामध्ये संपूर्ण ठिकाणी पाणी आहे आणि या ठिकाणाची वैशिष्ठ्याची बाब म्हणजे या शहरामध्ये कोणताही रस्ता नाही किंवा आपण याठिकाणी करा दुचाकी यासारखे वाहन वापरू शकत नाही कारण या सुंदर शहराला पाण्याने व्यापले आहे आणि आणि म्हणून या शहरामध्ये प्रवेश करताना आणि व्हेनिस या शहरामध्ये फिरताना देखील आपल्या बोटने फिरावे लागते.

या ठिकाणावरील हे बोटीने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात आणि आपल्याला जश्या रस्त्यावर गाड्या धावताना दिसतात तसेच या शहरामध्ये आपल्याला बोटी पाण्यातून येताना जाताना दिसतात. आपल्याला कायम वाटत असते कि आपण कोणत्यातरी चांगल्या पर्यटन क्षेत्राला भेट ध्यावे आणि काही प्रदेशातील काही लोकप्रिय पर्यटन क्षेत्रांना भेट देण्याचा निर्णय घेतात त्यावेळी अश्या लोकांना मी इटली येथे बेटावर असलेल्या शहराला भेट देण्यासाठी सुचवेन कारण हे एक खूप सुंदर शहर आहे जेथे आपल्याला अनेक सुंदर दृश्यांचा आणि मोठ मोठ्या इमारतींचा असा मनमोहक नजरा आपल्याला पाहायला मिळू शकतो.

व्हेनिस या शहराची आणखीन सुंदरता तेथे असणाऱ्या कालव्यांच्यामुळे आणि बेटांना एकमेकाला जोडणाऱ्या पुलांच्यामुळे खूप सुंदर दिसते आणि या शहराचे आणखीन एक वैशिष्ठ म्हणजे या शहरामध्ये एकूण ४०० पूल आहेत आणि १५० कालवे आहेत आणि व्हेनिस या शहरातील ग्रॅड कॅनाल हा सर्वात मोठा कालवा आहे. आपण जर व्हेनिस या शहरामध्ये पर्यटनासाठी गेलो तर अप या ठिकाणी बोटीमध्ये बसूनच या शहराचा आनंद आणि या शहराची सुंदरता अनभवू शकतो आणि जर आपण या शहराला भेट दिली तर आपल्याला एका चांगल्या, सुंदर आणि मनमोहक पर्यटन स्थळाला भेट दिल्याचे समाधान आपल्याला मिळेल.

मी वर सांगितल्याप्रमाणे व्हेनिस हे शहर त्या ठिकाणी असणाऱ्या पुलांच्यामुळे देखील सुंदर दिसते आणि येथील पुलांची संख्या हि ४०० हून अधिक आहे आणि यामधील ७० ते ७२ पूल हे खाजगी आहेत आणि राहिलेले सर्व पूल हे तेथील सरकारमध्ये समाविष्ट आहेत. आपण जर इतर ठिकाणी रस्ता शोधणार असू तर आपण त्या शहरामधील एका भागातील रस्त्याच्या पत्यावर आपण कोणाचाही घराचा पत्ता शोधू शकतो.

परंतु व्हेनिस या शहरामध्ये घरे रस्त्यावर नव्हे तर आपण तेथील कोणाचाही पत्ता हा जिल्ह्यानुसार शोधावा शोधावा लागतो त्यामुळे या ठिकाणाचा  कोणताही पत्ता शोधणे खूप कठीण आहे आणि त्यामुळे हे पत्ते कोणत्याही स्मारक किंवा दुकान अश्या लँडमार्क वरून शोधली जातात तसेच या ठीकानि कोणताही पत्ता शोधणे पोस्टमनला देखील अवघड आहे आणि येथे येणाऱ्या पर्यटकांना देखील अवघड आहे.

व्हेनिस या शहरामाद्गे १२ व्या शतकामध्ये सॅन मॉर्को बेल टॉवर बांधला होता ज्याला आपण कॅम्पॅनाइल टॉवर या नावाने देखील ओळखू शकतो परंतु हा टॉवर इ.स १९०२ मध्ये कोसळला आणि पण त्याची पुनर्बांधणी करण्यात आली आणि हा नंतर बांधलेला टॉवर देखील पूर्वी बांधलेल्या टॉवरसारखाच होता आणि या टॉवरची उंची हि ९८ मीटर आहे आणि हा बेल टॉवर इटलीतील पाचव्या क्रमांकावरील बेल टॉवर आहे.

त्याचबरोबर व्हेनिस या शहरामध्ये इ.स १६३८ मध्ये जगातील पहिले कॅसिनो उघडण्यात आले होते तसेच इ.स १६४६ मध्ये पदवीधर झालेल्या जगातील पहिल्या महिलेचा जन्म हा व्हेनिस या शहरामध्ये झाला होता. व्हेनिस या शहरामध्ये पूर्वी २ लाख या पेक्षा जास्त लोकसंख्या होती पण व्हेनिस हे शहर वर्षाला १.२ मिलीमीटर दराने बुडते त्यामुळे या शहरातील संख्या हि मधल्या काळामध्ये एक लाख २० हजार पर्यंत झाली आणि मग या शहराची संख्या एक लाख २० हजार वरून ६०००० हजार वर झाली आहे आणि याचे कारण म्हणजे या शहरामध्ये ग्लोबल वॉर्मिंगमुळे वर्षाला बुडते आणि त्यामुळे त्यामुळे लोकांना सर वर्षी त्रास होतो म्हणून येथील लोक आपली घरे सोडून जात आहेत.

या शहराबद्दल असे म्हंटले जाते कि २०३० पर्यंत या शहरामध्ये कोणीही लोक राहणारा नाहीत आणि व्हेनिस हे शहर फक्त आपण एक पर्यटन स्थळ म्हणून पाहायला जावू शकतो तेथे आपल्याला कोणीही रहिवासी लोक दिसणार नाहीत तर आपल्याला दिवसा या शहरामध्ये फक्त पर्यटक दिसतील.

अश्या प्रकारे व्हेनिस हे एक सुंदर पर्यटन स्थळ आहे ज्या ठिकाणी वेगवेगळ्या देशातील पर्यटक भेट देवू शकतात आणि मनमोहक दृश्यांचे सुंदर क्षण अनभवू शकतात. जर तुम्हाला अश्या सुंदर, मनमोहक आणि तुम्हाला जर नैसर्गिक सुखाचा नंद घ्यायचा सेल तर तुम्ही या शहराला नक्की भेट देवू शकता परंतु या शहरातील ठिकाणे पाहण्यासाठी किंवा शहराची सुंदरता हि पाण्यातून जाणाऱ्या बोटीतून आपल्याला पहावी लागते. असे हे व्हेनिस हे शहर सुंदर आणि मनाला एक समाधान देणारे शहर आहे.

आम्ही दिलेल्या venice description essay in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर व्हेनिस शहर माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या Venice Information in Marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि information of Venice in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!