ग्लोबल वॉर्मिंग निबंध मराठी Global Warming Essay in Marathi

Global Warming Essay in Marathi – Global Warming Che Dushparinam Essay in Marathi ग्लोबल वॉर्मिंग निबंध मराठी मित्रहो, आपणा सर्वांना तापमानवाढीच्या संदर्भात दूरदर्शनवर पाहून किंवा वर्तमानपत्रात अथवा मासिकांमध्ये वाचून माहिती झालं असेल की गेल्या शंभर वर्षांमध्ये यापूर्वी कधीही झालेली नाही, एवढ्या झपाट्यानं अनेक वेळा तापमानवाढ झालेली आहे. खरंतर, विषुववृत्तीय प्रदेशांमधील काही पर्वत शिखरे ही हिमाच्छादित आहेत. यांतील, किलिमांजारो हे पर्वत शिखर खूप प्रसिद्ध आहे. परंतू, या पर्वत शिखरावरील हिमाच्छादन इसवी सन १९०६ च्या तुलनेत केवळ २५ टक्के एवढेच उरले आहे.

शिवाय, आल्पस् आणि हिमालयातील बहुतांश हिमनद्या या मागे हटत चालल्या आहेत. त्यामुळे, हिमरेषा म्हणजे ज्या ऊंचीपर्यंत कायम हिमाच्छादन असते किंवा आजच्या भाषेत जिथे २४ गुणिले ७ इतके हिमाच्छादन असते, ती रेषा आज वरच्या दिशेने सरकत चालली आहे. एव्हरेस्टवर जाताना लागणारी खुंबू हिमनदी ही इसवी सन १९५३ ते इसवी सन २००३ या ५० वर्षांमध्ये जवळजवळ पाच किलोमीटर मागे सरकली आहे.

याखेरीज, इसवी सन १९७० च्या मध्यापासून नेपाळमधील सरासरी तापमान १० से. ने वाढले आहे, तर सैबेरियातील कायमस्वरूपी असलेल्या हिमाच्छादित प्रदेशात गेल्या ३० वर्षांत म्हणजे इसवी सन १९७५ ते ७६ पासून १.५ से. तापमानवाढ नोंदवण्यात आली आहे. शिवाय, येथील हिमाच्छादन दरवर्षी २० सें. मी. चा थर मागे टाकून देत आहे.

global warming essay in marathi
global warming essay in marathi

ग्लोबल वॉर्मिंग निबंध मराठी – Global Warming Essay in Marathi

Global Warming Che Dushparinam Essay in Marathi

मित्रांनो, अशी विविध प्रकारची जागतिक तापमानवाढीची उदाहरणे आपल्याला दिसून येतं आहेत. सागरपृष्ठावरील तापमानवाढ ही, या सागरी तुफानांना जबाबदार असतेच, परंतू अनेक वेळा  सागरांतर्गत होणारी तापमानवाढ देखील या तुफानांची तीव्रता आणि संहारक शक्ती वाढवत असते.

याचं उत्तम उदाहरण म्हणजे; रिटा आणि कॅटरिना या संहारक तुफानांनंतर जो अभ्यास करण्यात आला, त्यामध्ये  मेक्सिकोच्या आखातातील खोलवर असलेल्या उबदाफेलिक्स या सागरी तुफानाच्या वेळी त्या भागावरच्या आकाशात कार्बन डायऑक्साईडची पातळी साधारणतः १०० पटींनी वाढल्याचं दिसून आलं होतं.

तेंव्हापासून, लिहून ठेवलेल्या अनेक नोंदी या सागरी तुफानांची ही बाजू व्यवस्थितरीत्या स्पष्ट करण्यासाठी पुरेशा आहेत. असे असले तरीदेखील  मित्रांनो, सागरी तुफानांच्या तीव्रतेचा संबंध वाढत्या जागतिक तापमानाशी लावायला मात्र शास्त्रज्ञांचा एकही गट तयार नाही.

कारण, इसवी सन १९७० पूर्वी घेतलेली सागर तुफानांची ही मोजमापं, आताच्या उपग्रहांनी घेतलेल्या मोजमापांइतकी अचूक नाहीत असे म्हणणे या शास्त्रज्ञांच्या गटाचे आहे.

हरितगृह परिणाम

खरंतर, हरितगृह हे खास प्रकारच्या आणि बहुतांश प्रजातींच्या वनस्पती वाढवण्यासाठी बनवलेले काचेचे घर असते. वनस्पतींवर बाह्य हवामानाचा अथवा विपरित वातावरणाचा वाईट परिणाम होऊ नये, यांसाठी असे घर बांधण्यात येते. परंतू, सूर्यापासून निघणाऱ्या अवरक्त लहरी या हरितगृहातील विशिष्ठ वायूंमुळे पुन्हा पृथ्वीच्या वातावरणामध्ये परावर्तित होतात, त्यामुळे रात्रीच्या वेळीही पृथ्वीला ऊर्जा मिळते.

एकंदरीत, वातावरणात अडकून राहिलेल्या या अवरक्त लहरींच्या ऊर्जेमुळे पृथ्वीभोवतालचे वातावरण उबदार राहण्यास मदत होते. जर हे वायु वातावरणात अडकून राहिले नसते, तर पृथ्वीचे तापमान रात्रीच्या वेळी भारतासारख्या उबदार देशातही -१८ अंश सेल्सियस इतके असते.

मित्रहो, आता तुम्हीच सांगा जर आपल्या भारतासारख्या ठिकाणी अशी परिस्थिती उद्भवणार असेल, तर रशिया आणि कॅनडा यांसारख्या देशांमध्ये किती बिकट परिस्थिती उद्भवेल.

कारण, यांसारख्या देशांमध्ये आधीच कमी तापमान असते. परंतू मित्रांनो, हरितगृहातील वायूंमुळे रात्रीचे तापमान हे थोड्याशा प्रमाणामध्ये देखील कमी होत नाही. त्यामुळे, आपल्या पृथ्वीचे सरासरी तापमान -१८ पेक्षा ३३° जास्त म्हणजे १५° सेल्सियस इतके राहते. शिवाय, या परिणामामुळे मुख्यत्वे पृथ्वीवरील जीवसृष्टी ही विकसित झालेली आहे.

हरितगृह हे काचेचे घर असून, या घरामध्ये ऊन येण्यास व्यवस्था असते. परंतू दुसरीकडे, हे घर बंदिस्त असल्या कारणाने, हे घर उन्हाने तापल्यानंतर या घरातील आतील तापमान कमी होण्यास मज्जाव असतो.

अशा प्रकारे, घराच्या आतील भागातील तापमान उबदार राहण्याच्या संकल्पनेमुळे ही संज्ञा जागतिक तापमान वाढीच्या संदर्भात वापरली जाते. याखेरीज, काही वायूंच्या रेणूंची रचना अशा प्रकारची असते की ते उष्णतेच्या ऊर्जालहरी सहजपणे परावर्तित करू शकतात.

यामध्ये, कार्बन डायऑक्साइड, मिथेन, डायनायट्रोजन ऑक्साईड आणि पाण्याची वाफ असे जे प्रमुख वायु आहेत, हे वायू या उर्जालहरी सहजरीत्या परावर्तित करू शकतात. आपल्याला माहीत आहे की, सूर्यापासून पृथ्वीला मिळणाऱ्या ऊर्जेमध्ये अतिनील ते अवरक्त अशा प्रकारच्या ऊर्जालहरींचा समावेश असतो, उदाहरणार्थ; अवरक्त किंवा इन्फ्रारेड ऊर्जा लहरी म्हणजे उष्णतेच्या लहरी.

याखेरीज, पृथ्वीवर येणाऱ्या सूर्यप्रकाशातील सर्व ऊर्जालहरी या बऱ्यापैकी दिवसाच्या वेळेला भुपृष्ठावर शोषल्या जातात. त्यामुळे, पृथ्वीवर दिवसाच्या वेळी तापमान वाढलेले असते. तर दुसरीकडे, सूर्य मावळल्यानंतर ही शोषण प्रक्रिया थांबते व उत्सर्जन प्रक्रिया सूरु होते. अशा प्रकारे, शोषलेल्या लहरी या अंतराळात पुन्हा सोडल्या जातात.

तापमानवाढीची कारणे

जगाची वाढती लोकसंख्या

आजकाल, जगाच्या वाढत्या लोकसंख्येमुळे, कार्बन-डाय-ऑक्साइड या वायूच्या उत्सर्जनाचे प्रमाण भरपूर वाढत आहे.

प्राण्यांची वाढती संख्या

मित्रहो, कार्बन-डाय-ऑक्साइड या वायूचे  प्रमाण वाढण्याकरिता जबाबदार ठरलेले आणखी एक महत्वपूर्ण कारण म्हणजे जगात वाढणारी प्राण्यांची प्रचंड संख्या. त्यामुळे, जगातील अनेक देशांमध्ये प्राणी सांभाळण्याबाबत अनेक कडक नियम लागू केलेले  आहेत आणि याचे उत्तम उदाहरण म्हणजे; अमेरिकेमध्ये कडक नियम आणि कायदे टाळण्याकरिता तेथील वराहपालक मेक्सिकोमध्ये वराहपालन केंद्रे काढतात.

शिवाय, याठिकाणी एकेका केंद्रावर कितीतरी लाख प्राणी असतात. त्याचबरोबर, अमेरिकेतील कॅलिफोर्निया या राज्यामध्ये दशलक्षावधी गाई आहेत. न्यूझीलंडमध्ये तर देशाच्या लोकसंख्येच्या अनेकपट मेंढ्याच आहेत. याखेरीज, आपल्याला जगातील कोंबड्यांची तर गणतीच करता येणार नाही.

मित्रहो, आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की प्राण्यांचा तापमानवाढीशी काय संबंध? तर मित्रांनो, हे सर्व प्राणी श्वासावाटे ऑक्सिजन घेतात आणि कार्बन-डाय-ऑक्साइड बाहेर टाकतात.

शिवाय, या प्राण्यांच्या  मलमार्गावाटे मिथेन हा घातक हरितगृह परिणाम घडवून आणणारा वायू बाहेर टाकला जातो आणि आपणा सर्वांना माहीत आहे की मिथेन वायू हा कार्बन-डाय-ऑक्साइडपेक्षा अनेक पट घातक हरितगृह परिणाम घडवून आणणारा वायू आहे. त्यामुळे, प्राण्यांची संख्या आटोक्यात आणणे गरजेचे आहे.

सूर्याकिरणांची दाहकता

तापमानवाढीच्या संदर्भातील तिसरे महत्वाचे कारण म्हणजे सूर्यकिरणांची दाहकता. कारण, दाहकता वाढल्यास जागतिक तापमानात वाढ होण्याची भरपूर शक्यता असते. परंतू, सध्याच्या परिस्थितीत सूर्य किरणांचे उत्सर्जन हे नेहमीप्रमाणे होत आहे. अशा प्रकारे, किरणांची दाहकता कमी-जास्त झाल्यास, जागतिक तापमान देखील त्यानुसार  कमी-जास्त होते. 

तापमानवाढ रोखण्यासाठी उपाय

जागतिक तापमानवाढ रोखायची असेल, तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला वातावरणातील कार्बन डायऑक्साईड वायू कमी करण्यासाठी उपाय करावे लागतील. यासाठीचा एक उत्तम आणि सोपा उपाय म्हणजे झाडे वाढवणे. सध्याचे कार्बन डायऑक्साईड या वायूचे वातावरणातील प्रमाण थोपवायचे असेल, तर झाडांची संख्या वाढवणे खूप गरजेचे आहे.

कारण, जंगलांखालची भूमी ही सध्याच्या जंगलांखालच्या भूमिपेक्षा तीन ते पाच पटीने वाढवायला हवी. दुसरे म्हणजे कार्बन डायऑक्साईड निर्माण होताच, हा वायू पकडून समुद्रात सोडायची सुविधा करायला हवी अथवा याचे दुसऱ्या एखाद्या अविघटनशील संयुगात रूपांतर करायला हवे.

कारण, सागरात मोठ्या प्रमाणावर लोहसंयुगे ओतली, तर वानस प्लवकांची वाढ होते आणि त्यामुळे कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण कमी व्हायला मदत देखील होते, असे काही  शास्त्रज्ञांचे मत आहे.

खरंतर, सध्याच्या धावपळीच्या युगात कोणताही देश उर्जेचा वापर कमी करून आपली प्रगती खोळंबून घेणार नाही. त्यामुळे, अभ्यासातील पाहणीनुसार असे लक्षात येते की विकसित देशांचा उ‍र्जेचा वापर हा विकसनशील देशांपेक्षा कितीतरी पटीने अधिक आहे. परंतू, त्यांच्या वापराचे प्रमाण मात्र स्थिरावले आहे.

कारण, या देशांसमोर देखील हाच  मोठा प्रश्न उभा आहे की ऊर्जेचा वापर कमी कसा करायचा? जेणेकरुन, हरितवायूंचे प्रमाण कमी होईल आणि जागतिक तापमानात घट होईल. शेवटी मित्रांनो, झाडांची लागवड करणे आणि त्यांची जोपासना करणे, हेच आपल्यासाठी जास्त सोपे व सोयीस्कर आहे. त्यामुळे, याबाबत सगळ्यांनी गंभीरतेने विचार करून, झाडांची लागवड केली पाहिजे. कारण, तेंव्हाच कुठंतरी आपणा सर्वांना भविष्यामध्ये तापमानवाढीला आटोक्यात आणता येईल.

                      तेजल तानाजी पाटील

                         बागीलगे, चंदगड.

आम्ही दिलेल्या global warming essay in marathi language माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर ग्लोबल वॉर्मिंग निबंध मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या global warming che dushparinam essay in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि global warming essay in marathi pdf माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये global warming in marathi essay Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!