ई जीवनसत्व पदार्थ व माहिती Vitamin E foods in Marathi

Vitamin E foods in Marathi – Vitamin E Information in Marathi ई जीवनसत्व पदार्थ ई जीवनसत्व माहिती मराठी जीवनसत्व ई जीवनसत्व ई हे मुलींच्या अत्यंत जिव्हाळ्याचे जीवनसत्व कारण केसांना चमकदार बनवण्यासाठी चेहऱ्यावर तेज आणण्यासाठी जीवनसत्वही ई हे खूप महत्त्वाचे. जीवनसत्त्व ई ची कॅप्सूले सर्वांच्याच परिचयाची जी आपल्याला सहज उपलब्ध होते. तर चला मग आपण जीवनसत्वही बद्दल जाणून घेऊया. आधी आपण जाणून घेऊ जीवनसत्व म्हणजे काय ? शरीराची वाढ व विकास तसेच नियमनासाठी मर्यादित स्वरुपात आवश्यक असलेल्या सेंद्रिय संयुगांच्या समूहाला जीवनसत्त्वे असे म्हणतात.

vitamin e foods in marathi
vitamin e foods in marathi

ई जीवनसत्व पदार्थ व माहिती – Vitamin E foods in Marathi

ई जीवनसत्व माहिती मराठी – Vitamin E Information in Marathi

जीवनसत्त्वांचा शोध फंक या शास्त्रज्ञाने 1922 मध्ये लावला. त्याने जीवनसत्वं ना विटामिन असे नाव दिले ज्याचा अर्थ वाईटल अमिने म्हणजे मुख्य किंवा प्रमुख अमेनो समूह. वनस्पती शरीरात सर्व जीवनसत्त्वे तयार करू शकतात परंतु प्राण्यांना त्यांच्या आहारातूनच जीवनसत्वे प्राप्त होत असतात. आपल्याला जीवनसत्वाचे नियमित सेवन करणे गरजेचे असते कारण आपले शरीर त्यांची निर्मिती करू शकत नाही.

जीवनसत्वांचे कार्य

आपल्या शरीरातील कार्बोदके, प्रथिने आणि मेद यांचा शरीरासाठी योग्य वापर होण्यासाठी जीवनसत्वांची आवश्यकता असते.
आपल्या शरीरासाठी आहारातून एकूण सहा मुख्य जीवनसत्त्वाची आवश्यकता असते ते पुढील प्रमाणे-

जीवनसत्व अ
जीवनसत्व ब
जीवनसत्व क
जीवनसत्व ड
जीवनसत्व ई

जीवनसत्व ई – जीवनसत्व ई म्हणजेच टोकोफेरोल

या क्रियाशील गट असलेल्या जीवनसत्वांचा समूह होय. जीवनसत्व ई  चे रासायनिक नाव टोकोफेरोल टोकोट्राइनॉल्स. जीवनसत्व ई चा शोध 1922 सालि लागला. जीवनसत्व ई हे मेदात विरघळणारे आहे. म्हणजे पाण्यात विरघळत नाही.

ई जीवनसत्व पदार्थ – vitamin e foods list in marathi

 • व्हिटॅमिन ई वनस्पती – आधारित तेले, शेंगदाणे, बियाणे, फळे आणि भाज्यांमध्ये आढळतात.
 • गहू, जंतू तेल
 • सूर्यफूल, केशर आणि सोयाबीन तेल
 • सूर्यफूल बियाणे
 • बदाम
 • शेंगदाणे, शेंगदाणा लोणी
 • बीट हिरव्या भाज्या, कोलार्ड हिरव्या भाज्या, पालक
 • भोपळा
 • लाल मिरची
 • शतावरी
 • आंबा
 • अ‍वोकॅडो

जीवनसत्व ई चे स्त्रोत

ई जीवनसत्व सर्व प्रकारच्या अन्नपदार्थात आढळते.

 • करडई, मका,सरकी यांच्या तेलात, कडधान्य, डाळी मध्ये तसेच गाजरात, बदाम व शेंगदाण्यात सर्वाधिक ई जीवनसत्व आढळते.
 • तसेच सूर्यफूल तेल, सी फूड, कॉर्न इत्यादी मध्ये सुद्धा जीवनसत्व ई आढळते.
 • हिरव्या पालेभाज्या उदाहरणार्थ पालक, बिन, पात कोबी, विविध फळे सर्व वनस्पती तेल मांस व अंडी कॉड लिव्हर तेल इत्यादी
 • हे जीवनसत्व अल्फा, बीटा, गामा व डेल्टा टोकोफेरोल म्हणून नैसर्गिक रित्या वनस्पती तेलामध्ये असते.
 • नेहमीच्या अन्न शिजवन्याने या जीवनसत्त्वांचा नाश होत नाही,
 • परंतु खरपुस तळल्याने या जीवनसत्त्वांचा नाश होतो. लसूनघास या गवतात जास्त प्रमाणात जीवनसत्त्व ई असते तसेच गव्हाच्या अंकुरा पासून काढलेल्या तेलात ई जीवनसत्व सर्वाधिक असते लोणी अंड्यातील पिवळा बलक यकृत यामध्येसुद्धा जीवनसत्व आढळते.
 • नक्की वाचा: व्हिटामिन C पदार्थ व माहिती 

प्रमाण

प्रौढ व्यक्तीला दररोज सुमारे 15 मिलिग्रॅम ई जीवनसत्त्व लागते.

विटामिन ई चे फायदे – vitamin e benefits in marathi

आपल्या शरीरात जीवनसत्त्व ई ऑक्सीडन विरोधक म्हणून कार्य करते. म्हणजेच यामुळे शरीरातील पेशींचे ऊर्जा निर्मितीच्या वेळेस तयार झालेल्या मुक्त मुलकांपासून संरक्षण केले जाते. जीवनसत्व ई प्रजनन संस्थेच्या आरोग्यासाठी उपयुक्ततअसते.जीवनसत्व ई केसांची वाढ आणि विकासासाठी मदत करते. रोगप्रतिकारक्षमता तसेच डी एन ए मधील दुरुस्तीसाठी यांचा उपयोग होतो.

ई जीवनसत्व निरनिराळ्या पेशीत प्रति ऑक्सिडीकारक आणि सह विकार म्हणून कार्य करते. शरीरातील मेदाम्ले अ तसेच क जीवनसत्वांचे ऑक्सिडीकरणापासून बचाव करते. तांबड्या रक्तपेशी बनण्यास मदत होते. जीवनसत्व ई म्हणजे नितळ त्वचेसाठी संजीवनी किंवा वरदान म्हणता येईल. जीवनसत्व ई पुरळाचा धोका कमी करते तसेच त्वचेचे वय वाद प्रतिबंध करते.

जीवनसत्व ई मुळे केस निरोगी राहतात केसांची नैसर्गिक वाढ होते व केस चमकदार होण्यास मदत होते. केसांची गळती कमी होणे निरोगी केस व डोक्याच्या त्वचेसाठी जीवनसत्व इ महत्त्वाचे आहे. आपल्या रोजच्या वापरात असलेल्या तेलाच्या माध्यमातून त्याचा वापर करू शकता तसेच प्रथम केस धुण्याच्या आधी एक दिवस आधी नारळाच्या तेलात मिसळून त्याचा केसासाठी वापर करू शकता त्यानंतर सकाळी केस धुवा.

डोळ्यांची दृष्टी सुधारते, नेत्र विकार कमी होण्यास मदत होते म्हणून नेत्ररोगतज्ञ आहारामध्ये जीवनसत्व ई चा वापर करण्यास सुचवतात. वयासोबत अक्सिडेटिव्ह तणाव वाढत जाते. जीवनसत्व ई  हे ऑक्सीडेटिव्ह तणावाला प्रतिसक्रिय असल्याचे समजले जाते. अलझाम्स रोग आणि डिमेन्शिया च्या लक्षणा मधील वाढ टाळण्यासाठी जीवनसत्व ई चा वापर करण्याचा सल्ला दिला जातो.

जीवनसत्व ई  मध्ये ऑक्सीडेटिव्ह तणाव कमी करण्याच्या क्षमतेमुळे ते हृदय सुरक्षात्मक कार्य करते. हृदयघाताचा आणि स्ट्रोकचा धोका कमी करण्यासाठी हे सहाय्यक ठरते.

जीवनसत्व ई च्या अभावामुळे होणारे परिणाम

 • स्त्रियांमध्ये वांझपणा तसेच मृत बालक जन्माला येणे हा परिणाम दिसून येतो.
 • तर पुरुषांमध्ये प्रजनन क्षमता नष्ट होण्याचा धोका संभवतो.
 • नवजात बालकांमध्ये तांबड्या रक्तपेशीत बिघाड निर्माण होऊन हिमोलिसेस हा एक प्रकारचा रक्तक्षय रोगाचा प्रकार आढळतो.
 • ई जीवनसत्वाच्या त्रुटीमुळे लिपिड पेरॉक्साइड रक्तपेशीत साठली जातात त्यामुळे पेशीपाटलात विकृती निर्माण होऊन त्या पेशी लवक नाश पावतात.
 • केशवाहिन्यांमधील रक्ताच्या पारगम्यतेवर विपरीत परिणाम होऊन द्रवयुक्त सूज येते आणि पंडुरोग होतो.
 • जीवनसत्व ई  च्या अभावामुळे स्नायूंची वाढ खुंटते.
 • प्रजनन क्षमतेवर परिणाम होतो. ई जीवनसत्वाच्या अभावामुळे प्रतिकार क्षमतेवर परिणाम होतो. प्रतिकारक्षमता कमी होते.

ई जीवनसत्वाच्याअतिसेवनामुळे होणारे परिणाम

 • हृदयविकाराचे प्रमाण वाढते.
 • मळमळ, थकवा, अतिसार, डोकेदुखी, रक्तस्त्राव, चट्टे, अशक्त हाडे, पोटात कळा. मधुमेह असल्यास ई जीवनसत्व घेणे टाळले पाहिजे कारण त्याने स्ट्रोकचा धोका वाढू शकतो.
 • ह्रदयघात असलेल्या व्यक्तीने घातक परिणाम टाळण्यासाठी ई जीवनसत्व घेणे टाळले पाहिजे.
 • रक्तस्त्राव विकार असलेल्या व्यक्तीने जीवनसत्व ई घेणे टाळले पाहिजे कारण याने मेंदूत रक्तस्त्राव होण्याची शक्यता वाढतील त्यांच्या प्रभावामुळे महत्त्वपूर्ण अंगांमध्ये आंतरिक रक्तस्राव होण्याची शक्यता वाढते.
 • तर जीवनसत्व ई च्या अभावामुळे आणि अतिसेवनामुळे दुष्परिणाम होतात त्यामुळे याचा वापर मर्यादित आणि गरजेनुसार केला पाहिजे.

evion 400 tablet uses in marathi

आम्ही दिलेल्या vitamin e foods in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर ई जीवनसत्व पदार्थ व माहिती यांच्याबद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या vitamin e in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि vitamin e rich foods in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!