व्यसनमुक्ती काळाची गरज मराठी निबंध Vyasan Mukti Nibandh in Marathi

Vyasan Mukti Nibandh in Marathi – Vyasan Mukti Essay in Marathi Wikipedia व्यसनमुक्ती काळाची गरज मराठी निबंध आज आपण या लेखामध्ये व्यसन मुक्ती या विषयावर निबंध लिहिणार आहोत. आपल्या भारत देशाची लोकसंख्या हि मोठ्या प्रमाणात आहे म्हणजेच आपला भारत देश लोकसंखे दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि भारतामध्ये तरुण पिढी जास्त आहे आणि ह्या मधील काही तरुण पिढीतील मुले सध्या आपल्या भारताची संस्कृती विसरून फॅशन म्हणून वेगवेगळ्या प्रकारची व्यसन करत आहेत तसेच काही मुले किंवा लोक आयुष्यामध्ये असणारे टेन्शनचा ताण घालवण्यासाठी किंवा नातेसंबधतील ताण घालवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची व्यसन करतात तसेच तरुण पिढीच नाही तर इतर वय वर्गातील देखील लोक अनेक प्रकारचे आपले तान तणाव घालवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे व्यसन करतात.

व्यसन म्हणजे एकाद्या व्यक्तीला एक अशी सवय लागते आणि त्यातून बाहेर येण्यासाठी त्याला प्रयत्न करावे लागतात किंवा काही वेळेला काही लोक त्यामधून बाहेर देखील येवू शकत नाही आणि कोणत्याही व्यसनामुळे व्यसन करणारी संबधित व्यकती आपले शारीरिक, मानसिक आणि सामाजिक स्वास्थ बिघडून बसते किंवा हरवून बसते.

vyasan mukti nibandh in marathi
vyasan mukti nibandh in marathi

व्यसनमुक्ती काळाची गरज मराठी निबंध – Vyasan Mukti Nibandh in Marathi

व्यसनमुक्ती निबंध  – Vyasan Mukti Essay in Marathi Wikipedia

व्यसन म्हणजे एक वाईट सवय ज्यामुळे मनुष्य आपले शारीरिक नुकसान किंवा त्याची मनस्थिती बिघडून घेतो आणि ते कोणत्याही प्रकारचे व्यसन असतो जसे कि दारूचे व्यसन, सिगारेटचे व्यसन, गुटख्याचे व्यसन या सारख्या अनेक व्यसनाच्या अधीन लोक जातात आणि त्यांना त्याची सवय लागते ते त्यातून बाहेर पडणे त्यांना खूप अवघड असते आणि त्यांना ते केले नाही तर त्यांनी चिडचिड होते तसेच ते खुळ्यासारखे वागतात म्हणजेच ते व्यसनाच्या आहारी गेलेले असते आणि आपण जर पहिले तर सध्या भारतामध्ये व्यसन करणारे बहुतेक हे तरुण आहेत.

जे मोठ्या प्रमाणात व्यसन करतात आणि देशातील तरुण पिढी हि देशाचे भवितव्य आहे म्हणजेच तरुण पिढीच जर असे वागत असेल किंवा व्यसन करत असेल तर देशाचे भविष्य खूप धोक्यात आहे आणि आणि यामुळे देशाची प्रगती देखील देशाच्या तरुणांच्यावर आधारित आहे त्यामुळे तरुणांना व्यसनाच्या आहारी जाण्यापासून वाचवले पाहिजे तसेच आणि व्यसन करणाऱ्या लोकांना पटवून दिले पाहिजे कि व्यसन केल्यामुळे आपल्या शरीरातील अनेक भागांना इजा होते तसेच वेगवेगळ्या प्रकारचे रोग होतात.

तसेच वेगवेगळ्या प्रकारचे व्यसन केल्यामुळे अनेकांना आपला अनमोल असा जीव देखील गमवावा लागतो. तसेच काही लोक व्यसन केल्यामुळे सतत दुखी असतात म्हणजेच त्यांचे मन सतत अस्वस्थ असते तसेच काही लोकांची व्यसनामुळे मानसिक आणि सामाजिक स्थिती देखील बिघडते.

व्यसन करणाऱ्या व्यक्तीचा सामाजिक आदर देखील कमी होतो म्हणजेच लोक त्या व्यक्ती बद्दल अनेक वाईट गोष्टी बोलतात. दारू, सिगारेट आणि गुटखा यासारखी व्यसन केल्यामुळे त्या व्यसन करणाऱ्या संबधित व्यक्तीला फुफुसाचे रोग, कॅन्सर, श्वसनाचे विकार, मूत्रपिंडाचे रोग, घसा रोग यासारखे अनेक रोग होतात जे सहजासहजी कमी होऊ शकत नाहीत.

तरुण पिढी हि व्यसनाचे आहारी खूप जात आहे आणि सध्याची तरुण पिढी हि अमली पदार्थांच्या नशेच्या आहारी जात आहेत आणि जास्तीत तरुण पिढी हि व्यसनाच्या आहारी जाण्याचे कारण म्हणजेच त्यांचे मित्र किंवा मित्रांचा गट जो जर आधी पासून व्यसन करत असतील तर ते आपल्या गटातील व्यसन न करणाऱ्या व्यक्तींना देखील व्यसन करण्यास भाग पडतात. त्याचा बरोबर मुले हि व्यसनाच्या आहारी जाताच आहेत परंतु आश्चर्याची गोष्ट सांगायची म्हटली तर सध्या मुली देखील अनेक प्रकारचे व्यसन करतात.

हि दुखाची गोष्ट आहे कि भारतामध्ये अमली पदार्थाचे सेवन हे खूप झपाट्याने म्हणजेच वाऱ्यासारखे पसरत आहे आणि आणि हे आमली पदार्थाचे व्यसन तरुण मुले पण करत आहेत आणि मुली देखील करत आहेत आणि हे त्या संबधित कुटुंबाच्या आणि एकूणच भारताच्या भवितव्यासाठी खूपच भयानक आहे. आमली पदार्थाचे सेवन हे खूप भयानक आहे कारण या व्यसनाबद्दल असे म्हनातले जाते कि हे आमली पदार्थाचे व्यसन जे लोक करतात ते त्या व्यसनातून बाहेर येणे खूप कठीण असते आणि या व्यसनामुळे अनेक व्यक्तींची घरे उद्वस्त झाली तसेच त्यांचे आयुष्य देखील उद्वस्त झाले.

तसेच दारूचे व्यसन करणारे लोक हे दारू पिऊन जिथे आहेत त्या ठिकाणी दगा करतात तसेच लोकांच्यावर दादागिरी करतात आणि घरी गेल्यानंतर भांडण करतात तसेच घरातील लोकांना मारहाण करतात कारण व्यसन केल्यामुळे त्यांच्या मनावरील ताबा सुटलेला असतो. अश्या प्रकारे व्यसन करणाऱ्या व्यक्तीला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते तसेच व्यासणारे अनेक दुष्परिणाम देखील दिसून येतात म्हणून कोणत्याही व्यक्तीने व्यसन करण्याअगोदर त्याचे दुष्परिणाम काय होतील तसेच आपल्या कुटुंबाचे आणि प्रियजनांचे काय होईल किंवा त्यांना काय वाटेल याचा विचार केला पाहिजे.

सध्या भारतामध्ये अपघाताचे प्रमाण हे खूप वाढले आहे म्हणजेच आपल्या रोज कोठे ना कोठे तरी अपघात झाला असे समजते आणि जास्तीत जास्त अपघात हे नाश केलेल्या व्यक्तीच्या हातून होतात कारण नाश केलेल्या व्यक्तीला काही समजत नाही कि आपण काय करत आहोत आणि जर त्या व्यक्तीने नशा करून जर गाडी चालवली आणि जर अपघात झाला तर त्या व्यक्तीला व्यसन करणे हे खूप महागात पडते कारण अपघातामुळे त्या संबधित व्यक्तीचा जीव जाण्याचा धोका असतो.

अश्या प्रकारे व्यसन करणाऱ्या व्यक्तीला अनेक संकटांना, समस्यांना आणि अनेक त्रासांना सामोरे जावे लागते पण हे सर्व व्यसन करताना समजत नाही उलट व्यसन चांगले वाटते पण ज्यावेळी याचा त्रास होतो किंवा व्यसनाचे दुष्परिणाम दिसून येतात त्यावेळी व्यसन का केले याचा पश्चाताप होतो म्हणून कोणत्याही व्यक्तीने आपल्याला कितीही टेन्शन किंवा काळजी असो त्यापासून दूरच राहिले पाहिजे. आपल्या देशातील सरकारने व्यसन मुक्ती साठी अनेक कार्यक्रम राबवले जातात तसेच अनेक लोकांच्या मनामध्ये व्यसनाच्या दुष्परिणामाची जागृकता निर्माण केली जाते जेणेकरून जे लोक आपला जीव गमावण्यासाठी घाबरतात ते लोक त्यातून बाहेर येतात.

तसेच भारतामध्ये व्यसन मुक्तीसाठी अनेक समुपदेशन केंद्रे देखील आहेत. अश्या प्रकारे सरकार व्यसन मुक्तीसाठी काम करत आहेच पण आपण देखील आपल्या मुलांच्याकडे चांगल्या पध्दतीने लक्ष देवून त्यांना व्यसनाच्या आहारी जाण्यापासून रोखले पाहिजे जेणेकरून तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जाणार नाही.

आम्ही दिलेल्या vyasan mukti nibandh in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर व्यसनमुक्ती काळाची गरज मराठी निबंध बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या vyasan mukti essay in marathi pdf या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि vyasan mukti essay in marathi wikipedia माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!