पाणी व्यवस्थापन काळाची गरज निबंध Water Management Essay in Marathi

Water Management Essay in Marathi पाणी व्यवस्थापन काळाची गरज निबंध आज आपण या लेखामध्ये water management म्हणजेच पाण्याचे नियोजन कसे करायचे ते पाहणारा आहोत. जगामध्ये लोकांना जगण्यासाठी पाणी हे महत्वाचे संसाधन आहे तसेच पाण्याचा महत्वाचा वापर म्हणजे पिण्याचे पाणी आणि जर आपण पाणीच पिले नाही तर आपण जगूच शकत नाही तसेच पाण्याचा वापर इतर अनेक कारणांच्यासाठी केला जातो त्यामुळे पाणी व्यवस्थापन हि काळाची गरज आहे. चला तर मग आता आपण खाली पाणी व्यवस्थापन या विषयावर निबंध लिहूया.

 water management essay in marathi
water management essay in marathi

पाणी व्यवस्थापन काळाची गरज निबंध – Water Management Essay in Marathi

पाणी व्यवस्थापन म्हणजे काय ?

जल किंवा पाणी व्यवस्थापन म्हणजे जल स्तोत्राच्या वापराचे नियोजन, वितरण, विकन आणि व्यवस्थापन करणे. किंवा जल व्यवस्थापन म्हणजे मालमत्ता आणि जीवनाचे नुकसान कमी करण्यासाठी नैसर्गिक तसेच कृत्रिम जलस्तोत्रांचे नियोजन करणे.

जल किंवा पाणी व्यवस्थापन करण्यासाठी वापरले जाणारे मार्ग ?

जर आपण पाण्याचे महत्व समजून घेवून जर आपण आत्ताच पाणी व्यवस्थापन करण्यासाठी सुरुवात केली तर भविष्यामध्ये आपण चांगले जीवन जगू शकतो कारण पाणी म्हणजे आपले जीवन आहे.

  • घरगुती सांडपाणी आणि औद्योगिक सांडपाण्याचा पुनर्वापर करणे.
  • पाणलोट विकास आणि रेनवॉटर हार्वेस्टिंग यासारख्या संकल्पनांना चालना देणे.
  • शेतकऱ्यांनी पिकांना पाणी देण्यासाठी सिंचन किंवा ठीबकचा वापर केला पाहिजे त्यामुळे पाण्याची बचत होईल.
  • तसेच तलाव, नद्या, समुद्र,ओढे, नाले, विहिरी आणि इतर यासारख्या नैसर्गिक पाणी पुरवठ्याची काळजी घेतली पाहिजे.

जल व्यवस्थापन निबंध

जल किंवा पाणी व्यवस्थापन म्हणजे जल स्तोत्राच्या वापराचे नियोजन, वितरण, विकन आणि व्यवस्थापन करणे. पाण्याचे व्यवस्थापन हे प्रत्येकजन करतात ते घरामध्ये असो किंवा मग पाणी पुरवठा करणारे अधिकारी असो सर्वांनी पाण्याचे व्यवस्थापन केलेच पाहिजे त्यामुळे प्रत्येकाला चांगले पाणी मिळू शकेल तसेच कोणालाही पाण्याचा तुटवडा भासणार नाही.

पाणी व्यवस्थापनामुळे आपल्या जीवनामध्ये अनेक गोष्टींच्यावर परिणाम होतो त्यामुळे पाणी नोयोजन करणे गरजेचे असते आणि जर तुम्ही जर पाण्यामुळे अनेक नुकसान झालेल्या किंवा ज्यांना पाण्याची कमतरता भासते त्यांना जर आपण विचारले तर ते पाण्याचे महत्व चांगल्या प्रकारे सांगू शकतील. पाण्याचे महत्व सांगायचे म्हंटले तर नैसर्गिक संसाधनामधील एक महत्वाचे आणि मौल्यवान घटकामधील एक आहे.

पृथ्वीवरील असणाऱ्या जलसृष्टीसाठी पाणी हे महत्वाचे आणि आवश्यक घटक आहे आणि त्यामधील काही पाणी आहे आणि काही हिमनद्या किंवा बर्फ आहे आणि काही प्रमाणात गोडे पाणी आहे. पृथ्वीवर ताज्यापाण्यापैकी ०.०८ टक्के पाणी हे मानव स्वचातेसाठी, पिण्यासाठी, शेतीच्या उत्पादनासाठी आणि इतर उत्पादनासाठी आणि इतर काही वापरासाठी वापरले जाते त्यामुळे पाणी व्यवस्थापन हे गरजेचे आहे.

आणि पृथ्वीवरील प्रत्येक मनुष्याने पाणी हे खूप काळजी पूर्वक वापरले पाहिजे तसेच जितक्या पाण्याच्या वापराची गरज आहे तितकेच वापरले पाहिजे. जगामध्ये बघायला गेले तर ७० टक्के गोड्या पाण्याचा वापर हा शेती करण्यासाठी केला जातो आणि हे खरे देखील आहे कारण शेतीतून चांगले पिक आणण्यासाठी शेतीला पुरेसा पाणी पुरवठा करणे खूप गरजेचे असते कारण जर शेतीला चांगला पाणी पुरवठा झाला नाही तर पिक चांगले येत नाही.

जसजशी लोकसंख्या वाढत आहे तसतशा अन्नाचा खूप वापर होत आहे आणि शेतामध्ये कमी वेळेमध्ये जास्त पिके घेतली जात आहेत तसेच एका वेळी २ अशी पिके घेतली आहेत आणि हि पिके येण्यासाठी पाण्याची गरज भासत आहे आणि आता शेतीला देखील पाणी पुरवठा कमी पडत आहे आणि जमीनि कोरड्या पडत आहेत आणि पिक देखील पाण्याच्या कमतरतेमुळे वाळत आहेत त्यामुळे आपल्या हातातून अजून वेळ निघून गेली नाही आहे आणि त्यामुळे आपण पाण्याची चांगली साठवण करून शकतो.

तसेच पाणी काळजीपूर्वक वापरू शकतो त्यामुळे आपल्या भविष्यामध्ये पाण्याची कमतरता भासणारा नाही. जगामध्ये १.६ अब्ज लोक हे पाणी टंचाई असलेल्या भागामध्ये राहतात. भविष्यामध्ये जल आधारित संसाधानांसाठी सर्वात मोठी चिंता म्हणजे वर्तमान आणि भविष्यातील जलसंसाधन वाटपाची शास्वतता. जस जशी पाण्याची कमतरता भासते तसतसे आपल्याला पाणी व्यवस्थापनाचे महत्व समजते.

दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रोलीया या देशांमध्ये भविष्यासाठी गोड्या पाण्याची व्यवस्था करण्याचे प्रयत्न हे राष्ट्रीय स्तरावर चालू आहेत त्यामुळे इतर देशांनी देखील त्यांच्याकडून प्रेरणा घेवून पाण्याचे व्यवस्थापन करण्यासाठी सुरुवात केली पाहिजे कारण एकात्मिक दृष्टीने हि एक काळाची गरज आहे. पाणलोट विकास आणि रेन वॉटर हार्वेस्टिंग गळती थांबवून गोड्या पाण्याचे संवर्धन करणे हे महत्वाचे आहे आणि लोकांनी त्यालाच प्राधान्य दिले पाहिजे.

जर आपण घरगुती सांडपाणी आणि औद्योगिक सांडपाण्याचा पुनर्वापर करून म्हणजेच त्याच्यावर प्रक्रिया करून जर ते पाणी आपण घरगुती स्वच्छतेसाठी वापरले तर ते खूप चांगले होईल आणि त्यामुळे पाण्याचा वापर हा ५० टक्क्यांनी कमी होतो. त्याचबरोबर सांडपाणी आपण कपडे धुण्यासाठी, घरातील स्वच्छतेसाठी वापरू शकतो आणि औद्योगीकरनामध्ये वापरले जाणारे पाणी हे प्रक्रिया करून त्याचा देखील औद्योगीकरनामध्ये पुनर्वापर करू शकतो.

आपण पाहीले तर जगामध्ये गोड्या पाण्याचा वापर हा शेतीसाठी मोठ्या प्रमाणात केला जातो आणि त्यामुळे पाण्याचा तुटवडा भासतो. काही ठिकाणी पिकांना पाणी देण्याची पध्दत अशी असते कि पिकला गरजेपेक्षा जास्त पाणी मिळते ( उदाहरणार्थ : शेतामध्ये असणाऱ्या पाठातून पाणी सोडले तर ते पिकला गरजेपेक्षा जास्त होऊ शकते ) त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकांना पाणी देण्यासाठी सिंचन किंवा ठीबकचा वापर केला तर पाणी वाया जाणार नाही आणि पिकला जितके पाणी पाहिजे आहे तितके पाणी मिळेल आणि शेतीमधील पाणी वापराचे प्रमाण देखील थोड्या प्रमाणत कमी होईल.

तसेच आपण पाण्याचे व्यवस्थापन पाणलोट विकास आणि रेनवॉटर हार्वेस्टिंग यासारख्या संकल्पनांना जर आपण चालना दिली तर मोठ्या प्रमाणात पाण्यचे नियोजन आणि व्यवस्थापन होऊ शकते. मोठ मोठे उद्योग असो किंवा आपले लहान घर सर्वांनी पाण्याच्या वापर हा जपून केला पाहिजे तसेच तलाव, नद्या, समुद्र,ओढे, नाले, विहिरी आणि इतर यासारख्या नैसर्गिक पाणी पुरवठ्याची काळजी घेतली पाहिजे.

जगामध्ये प्रत्येकाला पुरेसे पाणी मिळेल याची खात्री करणे खूप गरजेचे आणि महत्वाचे आहे तसेच आपण पहिले तर जगातील काही भाग हा स्वच्छ पाण्यापासून पूर्णपणे वंचित आहे तर जगाच्या काही भागामध्ये मुबलक प्रमाणात पाणी आहे आणि तेथील लोकांना पाण्याची कमतरता भासत नाही त्यामुळे त्यांना पाण्याचे महत्व देखील माहित नाही.

आम्ही दिलेल्या water management essay in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर पाणी व्यवस्थापन काळाची गरज निबंध बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या  या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि  माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये  Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!