पांढरा डहलीया फुलाची माहिती White Dahlia Flower Information in Marathi

white dahlia flower information in marathi पांढरा डहलीया फुलाची माहिती, फुले हि एक असा प्रकार आहे जे मनुष्यांचे मन एकदम प्रसन्ना करून टाकतात कारण या फुलांची रचणा तितकी सुंदर असते आणि फुलांचे अनेक वेगवेगळे प्रकार, आकार आणि रंग असतात आणि त्यामध्ये काही फुले नाजूक असतात तर काही मोठी टपोरी फुले असतात आणि अश्या एका पांढऱ्या डहलीयाच्या फुलांच्या विषयी आज आपण या लेखामध्ये माहिती घेणार आहोत.

पांढरा डहलीयाच्या हा एक फुलाचा प्रकार असून हा प्रकार सर्वात लोकप्रिय जातींच्यापैकी आहे, असून या फुलाची लोकप्रियता हि जास्त करून गार्डनर्स आणि फ्लोरीस्टमध्ये जास्त प्रमाणात आहे आणि या प्रकारच्या पांढऱ्या फुलांचा वापर हा जास्त करून सजावटीसाठी केला जातो.

white dahlia flower information in marathi
white dahlia flower information in marathi

पांढरा डहलीया फुलाची माहिती – White Dahlia Flower Information in Marathi

प्रकारफुल
फुलाचे मूळ नावपांढरा डहलीया
बहरण्याची वेळउन्हाळा
शास्त्रीय नावडहलीया एसपीपी
कुटुंबअॅस्ट्रेसीए (Asteraceae)
आकार५ इंच ते ९ इंच

पांढरा डहलीयाविषयी महत्वाची माहिती – information about white dahlia flower in marathi

पांढरा डहलीया या फुलांचा वापर हा सजावटीसाठी मोठ्या प्रमाणात केला जातो कारण ह्या फुलांचा आकार हा मोठ्या म्हणजेच ५ इंच ते ९ इंच पर्यंत वाढू शकतो आणि त्यामुळे हि फुले सजावटीसाठी वापरली तर ती उठून दिसतात. या प्रकारची फुले पूर्ण सूर्य प्रकाशामध्ये चांगल्या प्रकारे येतात.

त्यामुळे या फुलांना चांगला बहार देखील उन्हाळ्यामध्येच येतो. या फुलांचा आकार हा लॉलीपॉप च्या आकारापासून ते जेवणाच्या प्लेट इतका मोठा आकार असू शकतो आणि हा फुलांचा प्रकार ४ ते ५ फुट उंच वाढू शकतो.

डहलीया या फुलाचे शास्त्रीय नाव डहलीया एसपीपी (dahlia spp) असे आहेत, तर हे फुल अॅस्ट्रेसीए (Asteraceae) या कुटुंबातील असून हि कंदयुक्त वनस्पतीची एक प्रजाती आहे.

पांढरा डहलीया केंव्हा लावला जातो आणि तो कोणासाठी योग्य आहे ?

पांढरा डहलीया हा वर दिलेल्या माहितीनुसार कंदयुक्त वनस्पती आहे त्यामुळे या फुलांची लावण करताना त्याचे कंद वापरले जातात आणि हे कंद जमिनीमध्ये लावले जातात आणि या फुलांची लावण करण्याची उत्तम वेळ म्हणजे वसंत ऋतूचा उत्तरार्ध म्हणजेच मी महिन्यामध्ये लावली जातात आणि लावणीनंतर हि फुले जुलै महिन्याच्या शेवटी फुलण्यास सुरवात होते.

डहलीया फुलांची लागवड कशी केली जाते – How to plant

  • ज्यावेळी तुम्ही डहलीया या फुलाची लागवड करतात त्यावेळी जे कंद लावणार आहे ते कंद चांगले हिरवी वाढ असलेले किंवा डोळे आलेले कंद असावे.
  • जर तुम्ही मोठ्या प्रमाणात फुलांची लावणी शेतामध्ये करणार असाल तर शेतामध्ये ३ फुट अंतरावर असलेल्या ओळीमध्ये कंद लावा.
  • जर तुम्ही डहलीयाची लावण करताना ते १ फुट अंतरावर लावले तर त्यामुळे फुलांचे हेज चांगल्या प्रकारे बनतात आणि वाढीनंतर फुलांना एकमेकांना आधार मिळण्यास मदत होते.
  • पुढे डहलीया वनस्पती मध्यम किंवा कमी उंचीची झाल्यानंतर डहलीयाची लागवड करा.

पांढऱ्याचे डहलीया प्रकार – types

पांढऱ्या डहलीयाचे वेगवेगळे प्रकार आहेत म्हणजेच त्यांचा रंग पांढरा असला तरी ते आकाराने आणि दिसण्यामध्ये वेगळे असतात आणि ते कोणकोणते प्रकार आहेत ते खाली आपण पाहणार आहोत.

बूम बूम व्हाईट

बूम बूम व्हाईट हा पांढऱ्या डहलीयाची सर्वात लोकप्रिय जात आहे आणि या फुलाचे मूळ हे मेक्सिको हा देश आहे. या फुलाचा आकार आपल्या हातापेक्षा मोठा असतो त्यामुळे हे फुल दिसण्यास आकर्षक दिसते. हे फुला बारमाही कधीही येवू शकते आणि या फुलाच्या वाढीसाठी पूर्ण सूर्यप्रकाशाची गरज असते.

क्रेझी लव्ह

क्रेझी लव्ह हे फुल अत्यंत नाजूक असते आणि या फुलाचा रंग पांढऱ्या आणि हलक्या जांभळ्या रंगत असतो आणि हि फुले बारमाही उपलब्ध होऊ शकतात आणि फुलाच्या वनस्पतीचा आकार २ इंच ते २.५ इंच. या फुलाला पूर्ण सूर्यप्रकाश आणि अंशिक सावलीची गरज असते.

फ्ल्युरेल

फ्ल्युरेल हा पांढऱ्या डहलीयाचा प्रकार आहे या फुलाच्या पाकळ्या कपड आणि पातळ असतात आणि ह्या फुलांच्या वनस्पतीची उंची ३ ते ४ इंच इतकी असते. ह्या फुलांची लावण बारमाही करू शकता आणि हि फुले पूर्ण सूर्यप्रकाशात चांगल्या प्रकारे वाढतात.

लेडी लिबर्टी

लेडी लिबर्टी या वनस्पतीचा आकार हा ६ ते १२ इंच इतका असतो आणि या फुलाचे मुल हे युनायटेड किंग्डम आहे. हे देखील बारमाही वनस्पती असून पूर्ण सूर्यप्रकाश आणि अंशिक सावलीची गरज असते. या फुलाच्या पाकळ्या इतर जातीपेक्षा थोड्या वेगळ्या असतात म्हणजेच या फुलांच्या पाकळ्या देठाकडे खाली वळलेल्या असतात.

रस्किन ब्राईड

या फुलांचा रंग हा पूर्णपणे सफेद असतो आणि या फुलांच्या पाकळ्या थोड्या लांब आणि टोकदार असतात. या फुलांची लावणी बारमहिने जरी केली तरी हि फुले कोरड्या आणि उष्ण वातावरणामध्ये चांगली येऊ शकतात.

पेट्रा वेड्डींग

पेट्रा वेड्डींग हा फुलाचे भौगोलिक मूळ हे दक्षिण अमेरिका आहे आणि हे फुल काळजी घेण्यास खूप सोपे आहे, त्यामुळे अनेक गार्डनर्स या फुलाची लागवड करतात. हे फुल जरी बारमाही घेतले जात असले तरी ह्या फुलाची वाढ हि चांगल्या प्रकारे थंड हवामानामध्ये होऊ शकते.

स्मॉल वर्ल्ड

स्मॉल वर्ल्ड हा पांढऱ्या डहलीयाचा एक प्रकार आहे आणि या फुलाचा आकार खूप लहान असतो त्यामुळे या फुलाला पॉम पॉम डहलीया या नावाने देखील ओळखले जाते. स्मॉल वर्ल्ड या फुलांचे भौगोलिक मूळ हे मध्य अमेरिका आणि मेक्सिको आहे आणि या फुलांची लागवड बागेमध्ये करू शकतो कारण हि मोहक फुले बागेची शोभा वाढवतात.

फिओना स्टीवर्ट

फिओना स्टीवर्ट हि फुले मध्य आकाराची असून या फुलांचा रंग पांढरा असतो आणि मध्यभागी थोडे किंवा हलके पांढरे शेड असते. या फुलाचे भौगोलिक मूळ युनायटेड किंग्डम आहे आणि हे बारमाही लागवड करता येणारे फुल आहे.

पांढऱ्या डहलीया फुलाविषयी काही विशेष आणि मनोरंजक तथ्ये – facts

  • डहलीया हे नाव युरोपियन भाषेतून आले आहे आणि याला १९ व्या शतकामध्ये डहलीया असे नाव देण्यात आले होते.
  • पांढऱ्या डहलीया किंवा डहलीया वनस्पतींच्या देठामध्ये पाण्याचे प्रमाणात असते त्यामुळे फुलांना कोरड्या हवामानामध्ये देखील चांगल्या पप्रकारे टिकून राहण्यासाठी मदत होते.
  • डहलीया या फुलाचे कंद हे मध्य अमेरिका आणि मेक्सिको या देशांच्या काही भागांमध्ये हजारो वर्षापासून हे पौष्टिक आणि हायड्रेटिंग अन्नाचे स्त्रोत म्हणून वापरले जाते.
  • पांढऱ्या डहलीया या फुलाचे देखी वेगवेगळे प्रकार आहेत, त्यामध्ये आकार आणि रचना वेगळ्या असू शकतात परंतु रंग पांढरा असतो.

आम्ही दिलेल्या white dahlia flower information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर पांढरा डहलीया फुलाची माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या White dahlia flower information in marathi pdf या White dahlia flower information in marathi wikipedia article मध्ये update करू, मित्रांनो हि information about white dahlia flower in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!