आमरस रेसिपी मराठी Aamras Recipe in Marathi

Aamras Recipe in Marathi आमरस रेसिपी मराठी फळांचा राजा आणि देशाचे राष्ट्रीय फळ असणाऱ्या आंबा या फळापासून वेगवेगळे खायचे पदार्थ बनवले जातात ते कच्च्या आंब्यापासून असो किंवा मग पिकलेल्या आंब्यापासून असो. कच्च्या आंब्यापासून आपण आंब्याचे लोणचे, आंब्याचा करम, आंब्याची कोशिंबीर, आंबा पन्ह या सारखे अनेक पदार्थ बनवले जातात तसेच पिकलेल्या हापूस आंब्यापासून आंबा आईस्क्रीम, आंबा शिरा, आंबा बर्फी, आंबा ज्यूस यासारखे पदार्थ बनवले जातात आणि त्यामधील एक लोकप्रिय आणि आंब्याच्या सिजनमध्ये हमखास बनवून खाल्ला जाणारा पदार्थ म्हणजे आमरस. आमरस हा एक गोड पदार्थ आहे जो उन्हाळ्यामध्ये म्हणजेच हापूस आंब्याच्या सिजनमध्ये आंब्यापासून बनवला जातो आणि हा एक पारंपारिक पदार्थ आहे जो खूप पूर्वीपासून बनवला जातो.

आमरस हि रेसिपी आपण कोणत्याही उन्हाळ्यामध्ये असलेल्या सणाला किंवा खास क्षणांचा आनंद वाढवण्यासाठी आपण आमरस हि रेसिपी बनवू शकतो म्हणजेच हा पदार्थ आपण लग्न समारंभामध्ये किंवा कोणत्याही मोठ्या कार्यक्रमामध्ये जेवणातील एक गोड पदार्थ म्हणून बनवू शकतो तसेच हा पदार्थ आपण चपाती किंवा पुरी सोबत सर्व्ह करू शकतो.

आमरस बनवताना चांगले पिकलेले हापूस आंबे घ्यावे आणि त्याची साल काढून त्याचा सर्व गाभा काढून तो मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यावा आणि त्यामध्ये साखर, वेलची पावडर आणि थोडेसे दूध घालून ते मिक्सरवर फिरवून घ्यायचे. आमरस हि रेसिपी घरी बनवण्यासाठी खूप सोपी आहे आणि खूप कमी वेळेमध्ये आणि मोजक्याच साहित्यामध्ये बनते.

आमरस हि रेसिपी इतकी लोकप्रिय आहे कि हि रेसिपी लहानांच्या पासून मोठ्यांच्यापर्यंत सर्वांना आवडते. चला तर आता आपण या लेखामध्ये आमरस रेसिपी कशी बनवायची ते पाहूयात.

aamras recipe in marathi
aamras recipe in marathi

आमरस रेसिपी मराठी – Aamras Recipe in Marathi

तयारीसाठी लागणारा वेळ५ मिनिटे
बनवण्यासाठी लागणारा वेळ१० ते १५ मिनिटे
एकूण लागणारा वेळ१५ ते २० मिनिटे
पाककलामहाराष्ट्रीयन
बनवण्याची पध्दतखूप सोपी
वाढणी२ ते ३ व्यक्ती

आमरस म्हणजे काय ?

आमरस बनवताना चांगले पिकलेले हापूस आंबे घ्यावे आणि त्याची साल काढून त्याचा सर्व गाभा काढून तो मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यावा आणि त्यामध्ये साखर, वेलची पावडर आणि थोडेसे दूध घालून ते मिक्सरवर फिरवून घ्यायचे.

आमरस बनवण्यासाठी लागणारे मुख्य साहित्य – key ingredients 

  • आंबा : आंबा हे आमरस बनवण्यासाठी लागणारे मुख्य साहित्य आहे. आमरस बनवताना पिकलेला हापूस आंबा वापरला तर आपला आमरस खूप स्वादिष्ट बनतो.
  • साखर : आंबा हा गोडच असतो परंतु आमरसला आणखीन थोडीशी चव येते त्यामुळे अमरस मध्ये थोडीशी साखर घातली तर चांगल.
  • वेलची पावडर : आमरस मध्ये वेलची पावडर घातल्यामुळे आमरसला खमंग वास येतो.

आमरस रेसिपी – how to make aamras

आमरस रेसिपी हि एक भारतीय रेसिपी असून हि रेसिपी आंब्याच्या सिजनमध्ये हापूस आंब्यापासून भारतातील बहुतेक भागामध्ये बनवला जातो आणि आवडीने खाल्ला देखील जातो. आमरस हि महाराष्ट्रामध्ये जरो मोठ्या प्रमाणात बनत असली तरी हि भारतामध्ये इतर ठिकाणी देखील बनते.

आमरस हा महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात बनण्याचे कारण हापूस आंब्यांचे उत्पादन हे महाराष्ट्रातील देवगड आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये होते. आमरस हि रेसिपी बनवण्यासाठी खूप सोपी आहे आणि खूप कमी वेळेमध्ये म्हणजेच १५ ते २० मिनिटामध्ये बनते आणि मोजक्या साहित्यामध्ये बनते. चला तर आता आपण आमरस कसा बनवायचा आणि त्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूयात.

तयारीसाठी लागणारा वेळ५ मिनिटे
बनवण्यासाठी लागणारा वेळ१० ते १५ मिनिटे
एकूण लागणारा वेळ१५ ते २० मिनिटे
पाककलामहाराष्ट्रीयन
बनवण्याची पध्दतखूप सोपी
वाढणी२ ते ३ व्यक्ती

आमरस बनवण्यासाठी लागणारे साहित्य  ingredients needed to make aamras recipe 

आमरस बनवण्यासाठी हापूस आंबा हा महत्वाचा घटक आहे जो आपण उन्हाळ्यामध्ये बाजारामाधुप उपलब्ध करू शकतो. तसेच हा पदार्थ बनवण्यासाठी जे इतर साहित्य लागते ते आपल्या घरामध्ये आधीपासून उपलब्ध असते ते आपल्याला बाजारातून आणावे लागत नाही. चाल तर आता आपण आमरस बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी पाहूयात.

  • ४ ते ५ हापूस आंबे ( चांगले पिकलेले ).
  • १/२ चमचा वेलची पावडर.
  • ४ ते ५ चमचे साखर.
  • अर्धी वाटी दुध.

आमरस बनवण्यासाठी केली जाणारी कृती – process to make aamras recipe 

आमरस हि रेसिपी घरी बनवण्यासाठी खूप सोपी आहे आणि हि झटपट म्हणजेच १५ ते २० मिनिटामध्ये बनते. चला तर आता आपण वर दिलेले साहित्य वापरून आमरस रेसिपी कशी बनवायची ते पाहूयात.

  • आमरस रेसिपी बनवताना सर्वप्रथम आंबे स्वच्छ धुवून घ्या आणि मग त्याच्या साली काढून आतील सर्व घाभा काढून घ्या.
  • हा गाभा मिक्सरच्या भांड्यामध्ये घेवून त्यामध्ये दुध घाला आणि ते मिक्सरला फिरवून घ्या.
  • ४ ते ५ आंब्याचा गाभा एका वेळी मिक्सरच्या भांड्यामध्ये मावणार नाही त्यामुळे आपल्याला दोन किंवा तीन वेळा गाभा फिरविण घ्यावा लागेल.
  • आता हा फिरवलेला रस एका भांड्यामध्ये काढून घ्या आणि त्यामध्ये ४ ते ५ चमचे किंवा तुम्हाला जितके जास्त गोड किंवा कमी गोड आवडते त्यानुसार साखर आणि वेलची पावडर घाला आणि ते चांगले मिक्स करा आणि ५ मिनिटे साखर विरघळू द्या.
  • आमरस सर्व्ह करण्यासाठी तयार झाला. आपण हा पुरी सोबत सर्व्ह करू शकतो.

आमरस कश्यासोबत खातात – serving suggestions 

आमरस हि गोड आणि स्वादिष्ट रेसिपी आपण पुरी, चपाती किंवा पुरण पोळी सोबत देखील कावू शकतो त्याचबरोबर आमरस हि रेसिपी आपण तशीच देखील खावू शकतो.

टिप्स (Tips) 

  • आमरस आपण फ्रीजमध्ये गार करून देखील सर्व्ह करू शकतो.
  • आमरस आपण मिक्सरमध्ये फिरवण्यापेक्षा हाताने पिळून देखील बनवू शकतो आणि हि आमरस बनवण्याची पारंपारिक पध्दत आहे.
  • आमरस मध्ये दुध घातले नाही तरी चालते कारण दुध घातले कि आंब्याची चव थोडी बदलते.
  • आमरस हा थोडा घट्ट असावा ज्यूस सारखा पातळ बनवू नये.
  • आमरस मध्ये वेलची पावडर घातल्यामुळे आमरसला एक वेगळीच चव आणि खमंगपणा येतो.

आम्ही दिलेल्या aamras recipe in marathi language माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर आमरस रेसिपी मराठी माहिती बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या aamras puri recipe in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि aamras recipe in marathi by archana माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये aamras recipe in marathi chakali Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!