आदर्श शिंदे माहिती Adarsh Shinde Information in Marathi

adarsh shinde information in marathi आदर्श शिंदे माहिती, सिनेमासृष्टीमध्ये प्रत्येक काळामध्ये अनेक चांगले गायक होऊन गेले आहेत आणि सध्याच्या सिनेमासृष्टीमध्ये एक सुप्रसिध्द आणि लोकांच्या मनामध्ये राज्य करणार गायक आणि संगीतकार म्हणजे आदर्श शिंदे आणि आज आपण या लेखामध्ये आदर्श शिंदे विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. आदर्श शिंदे हा एक गायक आहे आणि हा गायक बहुतेकदा मराठी चित्रपटातील गाणी किंवा मराठी गाण्यांच्या अल्बमसाठी ओळखला जातो.

आदर्श शिंदे यांच्या घरातील पार्श्वभूमी हि संगीताची आणि गायनाची होती, म्हणजेच आजोब त्याचे प्रल्हाद शिंदे हे देखील गायक होते आणि त्याचे वडील आनंद शिंदे देखील गायक आहेत ज्यांनी कोंबडी पळाली, आमचा नेता लई पॉवरफुल, जवा नवीन पोपट हा, अवाज वाढव डीजे अशी अनेक हिट गाणी गायली आहेत.

आदर्श शिंदे याचा जन्म ७ मार्च १९८८ मध्ये महाराष्ट्रातील मुंबई या शहरामध्ये झाला आणि त्यांने त्याचे शालेय शिक्षण देखील मुंबई या शहरामध्ये केले. त्याने भवन्स कॉलेजमधून त्याचे ग्रॅज्यूएशन पूर्ण केले आणि मग त्याने शास्त्रीय संगीत त्याच्या आजोबांच्याकडून आणि त्यांच्या वडिलांच्याकडून शिक्षण घेण्यास सुरुवात केली तसेच त्याने प्रसिध्द गायक सुरेश वाडकर यांच्याकडून देखील शास्त्रीय संगीताचे धडे घेतले.

adarsh shinde information in marathi
adarsh shinde information in marathi

आदर्श शिंदे माहिती – Adarsh Shinde Information in Marathi

नावआदर्श शिंदे
ओळखगायक, संगीतकार आणि अभिनेता
जन्म७ मार्च १९८८
जन्मठिकाणमुंबई (महाराष्ट्र)
पालकआनंद शिंदे आणि विजया शिंदे
पत्नीचे नावनेहा लेले
मुलगीअंतरा

आदर्श शिंदे याची कौटुंबिक माहिती

आदर्श शिंदे हे एक प्रसिध्द गायक होते आणि त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी हि गायनाची असल्यामुळे त्यांना खूप मदत मिळाली. आदर्श शिंदे यांच्या वडिलांचे नाव आनंद शिंदे ( गायक ) असे आहे आणि आईचे नाव विजया शिंदे असे आहे आणि त्यांचे आजोबा प्रल्हाद शिंदे हे देखील गायक होते. आदर्श शिंदे याची नेहा लेले हि मैत्रीण होती आणि त्याने नेहा लेले हिच्या सोबत २७ मी २०१५ मध्ये बौद्ध पध्दतीने लग्न केले आणि त्यांना एक अंतरा नावाची मुलगी देखील आहे.

आदर्श शिंदे याची संगीतातील कामगिरी आणि गाणी

आदर्श शिंदे यांची पार्श्भूमी हि गायनाची असल्यामुळे त्यांला त्याचे करीअर गायन क्षेत्रामध्ये करण्यासाठी मदत झाली कारण त्याचे आजोबा, काका आणि वडील हे सिनेमासृष्टीतील एक प्रसिध्द गायक होते आणि त्याने गायनाचे प्रशिक्षण हे त्याचे वडील, आजोबा आणि प्रसिध्द गायक सुरेश वाडकर यांच्याकडून घेतले.

त्यांनी खूप लहान वयामधेच रेकॉर्डिंगला सुरुवात केली होती आणि त्यांनी सातवीमध्ये असताना पहिले रेकॉर्डिंग केले होते आणि त्यांनी सपना या अल्बमसाठी पहिले गाणी म्हटले होते. त्याचबरोबर त्यांनी त्यांच्या करीअरच्या सुरुवातीच्या काळामध्ये लेट इट गो या रियालिटी शो मध्ये सहभाग घेतला नंतर त्यांच्या घराण्यातील तीन पिढ्या ज्यामध्ये आदर्श शिंदे देखील होते.

त्यांनी २०१४ मध्ये प्रियतमा या अल्बमसाठी गाणी गाईली तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर देखील गाणी लिहिली आणि गाई आणि त्याचबरोबर त्यांनी इतर अनेक प्रसिध्द गाणी गायिली जी हिट झाली. अश्याच प्रकारे आदर्श शिंदे याने मराठी आणि हिंदी भाषेतील १५०० हून अधिक गाणी गाईली आहेत.

आदर्श शिंदे याची गाणी – songs

आदर्श शिंदे याने अनेक वेगवेगळ्या प्रकारची गाणी गायिली आहेत आणि खाली आपण त्यामधील काही लोकप्रिय गाणी पाहणार आहोत.

  • मोरया मोरया ( दगडी चाळ ).
  • देवा तुझ्या गाभाऱ्याला उंबराच नाही ( दुनियादारी ).
  • आपली यारी.
  • आपलीच हवा.
  • आली ठुमकत नार ( मुंबई पुणे मुंबई ३ ).
  • गुरुचरित्राचे कर पारायण.
  • अरारा ( मुळशी पॅटर्ण ).
  • अवाज वाढव डीजे ( पोस्टर गर्ल ).
  • नमो गजवंदना.
  • ती तलवार.
  • चिमणी ( लाल इश्क ).
  • माझ्या राजा रं ( बघतोयस काय मुजरा कर ).
  • उधळ हो ( मलाल ).
  • धिंगाणा धिंगाणा आता होऊ दे धिंगाणा ( मी येतोय छोटा पुढारी ).
  • आंबे कृपा करी ( वंशवेल ).

आदर्श शिंदे यांना मिळालेले पुरस्कार – awards

  • आदर्श शिंदे यांनी अनेक मराठी गाणी गाईली जी लोकांना खूप आवडली आणि अश्या या चांगल्या कामगिरीसाठी त्यांना सिंगर ऑफ द इयर ( singer of the year ) हा पुरस्कार स्टार प्रवाह कडून मिळाला आहे.
  • त्याने देवा तुझ्या गाभाऱ्याला उंबराच नाही हे गाणे दुनियादारी चित्रपटासाठी गायीले होते आणि या गाण्यासाठी त्याला दादासाहेब फाळके हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते.

आदर्श शिंदे विषयी मात्वाची माहिती – information about adarsh shinde in marathi

  • आदर्श शिंदे याने मराठी आणि हिंदी भाषेतील मिळून एकूण १५०० पेक्षा अधिक गाणी गायिली आहेत.
  • आदर्श शिंदे यांची आपलीच हवा, देवा तुझ्या गाभाऱ्याला, आवाज वाढव डीजे, आपली यारी, आली ठुमकत नार आणि इतर काही लोकप्रिय गाणी आहेत.
  • आदर्श शिंदे यांचा जन्म ७ मार्च १९८८ मध्ये महाराष्ट्रातील मुंबई या शहरामध्ये झाला.
  • त्यांनी त्यांचे गायनाचे प्रशिक्षण हे त्यांचे वडील आणि आजोबा त्याचबरोबर प्रसिध्द गायक सुरेश वाडकर यांच्याकडे घेतले.
  • आदर्श शिंदे याचे लग्न २०१५ मध्ये नेहा लेले हिच्याशी झाले.
  • आदर्श शिंदे याने प्रथम रेकॉर्डिंग हे सातवी मध्ये असताना केले होते आणि त्याचा भाऊ उत्कर्ष शिंदे आणि त्याने मिळून प्रथम रेकॉर्डिंग केले होते.

आम्ही दिलेल्या adarsh shinde information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर आदर्श शिंदे माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या adarsh shinde wiki in marathi या adarsh shinde judge in marathi reality ahow article मध्ये update करू, मित्रांनो हि information about adarsh shinde in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!