मुंबई शहर जिल्हा माहिती व इतिहास Mumbai Information in Marathi

mumbai information in marathi – mumbai history in marathi मुंबई शहर जिल्हा माहिती व इतिहास स्वप्नांचं शहर म्हणून ओळख असणारी मुंबई हे सर्वांचेच आवडते शहर आहे. आजच्या लेखामध्ये आपण मुंबई शहरा विषयी अधिक माहिती व या शहराचा इतिहास जाणून घेणार आहोत. मुंबईची दुसरी ओळख म्हणजे भारतातील सर्वात जास्त लोकसंख्या असणारे शहर व महाराष्ट्राची राजधानी. सुमारे तीन कोटी २९ लाख लोकांना राहण्यासाठी आसरा देणार मुंबई शहर महाराष्ट्राच्या पश्चिम किनार्‍यावर वसलेलं आहे. मुंबईला विशाल सागरी किनारा लाभलेले आहेत. मुंबईला आयलँड सिटी, दक्षिण मुंबई भारताची आर्थिक राजधानी अशी ओळख आहे.

मुंबई लाखो लोकांना उपजीविकेचे साधन पुरवते. मुंबईमध्ये  वेगवेगळ्या संस्कृतीची, धर्माची, जातीची लोक खूप आढळतात. परंतु मुंबईचे मूळ रहिवासी हे कोळी बांधव आहेत. कोळी बांधव यांची आराध्यदेवता मुंबादेवी या नावावरूनच या शहराला मुंबई असे नाव पडले असा समज आहे. पोर्तुगीजांनी मुंबईला बोम बाहीया असे नाव दिले होते. इंग्रजांनी त्याचे बॉम्बे केले आणि पुढे मुंबईची मुंबई, बंबई, बॉम्बे, मुंबापुरी अशी नावे पडली. अखेरीस १९९५ मध्ये मुंबई असं या शहराला अधिकृत नाव देण्यात आलं.

mumbai information in marathi
mumbai information in marathi

मुंबई शहर जिल्हा माहिती व इतिहास – Mumbai Information in Marathi

मुंबई शहराचा इतिहास – mumbai history in marathi

इतिहासामध्ये मुंबईची नोंद अगदी पाषाणयुगापासून केली गेली आहे. त्या काळी मुंबईत हा सात बेटांचा समूह होता आणि तिथे वस्ती देखील आढळून आली होती. इसवी सन पूर्व ३ मध्ये हा भाग सम्राट अशोकाच्या मौर्य साम्राज्य मध्ये होता. १३४३ पर्यंत या भागावर शिलाहार या हिंदू साम्राज्याने राज्य केले. हा भाग गुजरातच्या मुस्लिम साम्राज्याच्या अधिपत्याखाली देखील गेला होता. या काळातील एक उत्तम उदाहरण म्हणजे एलिफंटा गुहा व वाळकेश्वर मंदिर.

१५३४ मध्ये पोर्तुगीजांनी मुंबईवर राज्य केलं त्यावेळी त्यांनी मुंबईला बॉम बाहिया असे नाव दिले. सुरुवातीस मुंबई सात बेटांचा समूह होता आणि तेव्हा या बेटांवर कोळी समाजातील लोकांची वस्ती होती म्हणूनच मुंबई ही मूळ कोळी लोकांची आहे. मुंबईमध्ये माहीम,शिव, धारावी, कुलाबा, वडाळा, शिवडी, वरळी, विसावे, कफपरेड, मांडवी, चारकोप, बंदर पाखाडी, खार, गोराई, मालाड, मढ असे कोळीवाडे अस्तित्वात आहेत.

अठराव्या शतकामध्ये कुलाबा, लहान कुलाबा, माहीम, माझगाव, परळ, वरळी, मलबार हिल या सात बेटांचा समूह करून ब्रिटिशांनी त्याची मुंबई बनवली. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही मुंबई शहर हे ब्रिटिशांनी बनवलेल्या मुंबई इलाख्यातच राहिले परंतु १९६० साली संयुक्त महाराष्ट्र चळवळ नंतर मराठी भाषिक महाराष्ट्र राज्याची स्थापना करण्यात आली. व मुंबई शहर हे महाराष्ट्राची राजधानी बनली मुंबई ही भारताची आर्थिक व मनोरंजनाची राजधानी आहे.

एकोणिसाव्या शतकामध्ये मुंबईच्या आर्थिक शैक्षणिक प्रगतीची सुरुवात झाली. मुंबई शहरामध्ये गरीब, श्रीमंत, मध्यमवर्गीय असे वर्ग दिसून येतात. तसेच मुंबईमधील रहिवासी महाराष्ट्र राज्याची राजभाषा मराठी ही भाषा बोलतात परंतु मुंबईमध्ये कोकणी, हिंदी, इंग्रजी, इत्यादी भाषादेखील बोलल्या जातात. मुंबई हे खूप मोठे शहर असून ते आता एक आंतरराष्ट्रीय शहर बनले आहे. मुंबई शहरामध्ये १००० पुरुषांमागे ८११ स्त्रिया आहेत. स्त्रियांचे प्रमाण कमी असण्याचे प्रमुख कारण म्हणजे मुंबई हे शहर लाखो लोकांना रोजगार पुरवते गावातून खेड्यापाड्यातून पुरुष मुंबईमध्ये कामासाठी स्थलांतर होतात.

मुंबई शहरामध्ये मोठ्या महत्त्वाच्या आर्थिक संस्था आहेत जसं की रिझर्व बँक, मुंबई शेअर बाजार, राष्ट्रीय शेअर बाजार. मुंबईमध्ये अनेक कार्यालय आहेत अनेक कारखाने आहेत आणि म्हणूनच येथे व्यवसाय व नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. भारताच्या कानाकोप-यातून लोक मुंबईमध्ये आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी येतात.

आशियातील पहिला लोहमार्ग १८५३ रोजी मुंबई पासून सुरू झाला. एकोणिसाव्या शतकापर्यंत मुंबईची भरभराट झाली. मुंबईला अरबी समुद्रातील प्रमुख बंदर मानले जाते सोबतच संपूर्ण जगातील प्रमुख कापूस बाजारपेठ मुंबई मध्येच आहे. मुंबई मध्ये बघण्यासाठी अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत. जगभरातून अनेक पर्यटक मुंबईला भेट देण्यासाठी येतात. मुंबईमध्ये बॉलिवूड आणि मराठी सिनेमा केंद्रे आहेत. येथूनच मोठमोठे कलाकार निर्माण झाले.

मुंबईने अनेक महान कलाकार, साहित्यकार, क्रिकेटपटू, पराक्रमी नेते घडवले आहेत. अशा अनेक ख्यातनाम नामवंत कलाकारांचे मोठमोठे बंगले मुंबईमध्ये आहेत. मुंबई जिल्ह्यामध्ये अंधेरी, बोरिवली आणि कुर्ला ही मुख्य तीन तालुके आहेत. मुंबईमध्ये साक्षरतेचे प्रमाण ८६ टक्के आहे. मुंबईतून मुंबई पुणे एक्सप्रेस वे, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८ सुरू होतात.

मुंबई हे जगातील पाचवे सर्वात विशाल शहर आहे. १९४२ मध्ये महात्मा गांधीजींनी चलेजाव चळवळ मुंबईमध्ये सुरू केली त्यामुळे मुंबई ही ऐतिहासिक घटनांची साक्षीदार आहे. मुंबईतील लोकल मुंबईतील लोकांचा जीव असून मुंबईचा एक अविभाज्य भाग आहे. लाखो चाकरमानी रोजच्या लोकलमधून प्रवास करतात.

मुंबईमध्ये अनेक महत्त्वपूर्ण ठिकाणे आहेत. जसे की छत्रपती शिवाजी टर्मिनस, छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानसेवा, गेटवे ऑफ इंडिया, सिद्धिविनायक मंदिर, हाजी अली दर्गा, हॉटेल ताज, मुंबई उच्च न्यायालय, मुंबई विद्यापीठ राजाबाई टॉवर, छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय, रिझर्व्ह बँक नाणी नोटा संग्रहालय, नेहरू तारांगण, शिवाजी पार्क, महालक्ष्मी मंदिर, मुंबादेवी मंदिर, चोर बाजार, जिजामाता उद्यान, मलबार हिल, वाळकेश्वर, हँगिंग गार्डन, पवई तलाव, जुहू, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान इत्यादी.

सोबतच मुंबईमधील बांद्रा वरळी सी लिंक हा मुंबईतील प्रमुख व महत्त्वाचा रस्ता असून तो संपूर्ण समुद्रावर बांधलेला आहे. या रस्त्याचे बांधकाम पूर्ण होण्यामध्ये दहा वर्ष लागले सोबतच हा रस्ता बांधण्यासाठी सोळाशे कोटी खर्च केले गेले. मुंबई हे पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे आणि मुंबई हे शहर मोठे असल्यामुळे मुंबईतील प्रत्येक प्रेक्षणीय स्थळांना भेट देण्यासाठी मुंबईमध्ये मुंबई दर्शन बस तयार करण्यात आली आहे ही बस संपूर्ण मुंबईतील पर्यटन स्थळे दाखवते.

मुंबई हे भारताचे प्रवेशद्वार म्हणून ओळखली जाते कारण जलमार्गाने किंवा वायू मार्गाने येणारे युरोप, अमेरिकन, आफ्रिकन अशा विविध देशातील नागरिक सर्वात आधी मुंबईमध्ये पाऊल ठेवतात. मुंबई बंदर येथून भारताची सागरी मार्गाने ५० टक्के मालवाहतूक होते. जगातील सर्वोत्कृष्ट नैसर्गिक बंद्रांपैकी मुंबई बंदर हे एक आहे. जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट व मुंबई पोर्ट ट्रस्ट या संस्थांच्या माध्यमातून मुंबईतील सागरी बंदरांचा कारभार हाताळला जातो.

मुंबईमध्ये उत्तम वाहतूक व्यवस्था करण्यात आली आहे. मुंबईतील रेल्वे मार्ग, विमान मार्ग, जहाज मार्ग व रस्ते प्रत्येक शहरांशी, जिल्ह्यांशी व देशांशी जोडले गेले आहेत त्यामुळे मुंबईत ये-जा करणे अत्यंत सोपे आहे. मुंबईमधील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ हे सर्वात व्यस्त विमानतळ आहे रिपोर्टनुसार जवळपास वर्षाला चार कोटी प्रवासी या विमानतळावरून प्रवास करतात.‌ युनिस्को या संस्थेने मुंबईतील दोन स्थळांची निवड करुन त्यांना आपल्या यादीमध्ये मानाचे स्थान दिले आहे.

ती दोन स्थळ म्हणजे छत्रपती शिवाजी टर्मिनस आणि एलिफंटा येथील गुहा आहेत. मुंबईमध्ये विविधता पाहायला मिळते अनेक जाती धर्माचे लोक येथे गुण्यागोविंदाने राहतात मुंबईमध्ये प्रत्येक सणाला फार महत्त्व आहे. येथे प्रत्येक सण उत्साहाने व आनंदात साजरा केला जातो. मुंबई मधील प्रमुख सण म्हणजे गणेश चतुर्थी, दीपावली, दसरा, नवरात्री, दहीहंडी त्यादी आहेत. गणेश उत्सवामध्ये गणेशाच्या गगनाला भिडणार्‍या मूर्तींचे दर्शन मुंबईमध्ये पाहायला मिळते‌.

सोबतच मुंबईमध्ये साजरा केला जाणारा दहीहंडी उत्सव जगभर प्रसिद्ध आहे. मुंबईमध्ये असणारी धारावी झोपडपट्टी आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळखली जाते. मुंबई मधील हवामान बाराही महिने आद्रक आणि शुष्क अनुभवायला मिळतं. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये मुंबईमध्ये प्रचंड उकाडा असतो. मुंबईमध्ये वर्षाला दोन हजार मि.मी इतका पाऊस पडतो.

मुंबई शहरामध्ये अनेक सोयी सुविधा उपलब्ध आहेत सोबतच अनेक रोजगारांच्या संधी देखील उपलब्ध आहेत त्यामुळे खेड्यापाड्यातून दरवर्षी मोठ्या प्रमाणावर लोक मुंबईमध्ये स्थलांतर करतात ज्यामुळे मुंबईची लोकसंख्या वाढत चालली आहे आणि वाढत्या लोकसंख्या मुळे मुंबई मध्ये मूलभूत सोयी-सुविधांवर ताण पडू लागला आहे. मुंबई शहर प्रामुख्याने मोठे विशाल सागरी किनारे, तेथील वस्ती, मुंबईतील रेल्वे वाहतूक, गणेशोस्तव, दहीहंडी, मुंबईतील खाद्यपदार्थ वडापाव इत्यादी साठी प्रसिद्ध आहे.

आम्ही दिलेल्या mumbai history in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर मुंबई शहर जिल्हा माहिती व इतिहास मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या mumbai wikipedia in marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि mumbai information in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!