अफजलखान माहिती Afzal Khan Information in Marathi

afzal khan information in marathi अफजलखान माहिती, अफझल खान याच्याविषयी कोणाला माहित नाही असे नाही कारण छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्याचा वध केला याच गोष्टीमुळे त्याच्या नावाला प्रचीत मिळाली होती आणि आज आपण या लेखामध्ये अफझल खान विषयी माहिती पाहणार आहोत. अफझल खान हा एक मध्ययुगीन भारतातील आदिलशाही घराण्यातील सेनापती होता आणि त्याने आदिल शाही घराण्यामध्ये सेवा केली होती. अफझल खान हा आदिल शाह दुसरा यांच्या काळामध्ये त्यांच्या दरबारातील एक प्रमुख सेनापती होता.

आणि त्याच्या युध्दामध्ये दाखवलेल्या शौर्य आणि धाडसामुळे त्याला आदिल शाही दरबारामध्ये चांगला मान होता आणि म्हणून त्याला ढल गज नावाचा एक हत्ती आणि आदिल नावाची हिऱ्यांनी जडलेली एक तलवार दिली होती. तसेच अफझल खान याच्या नेतृत्वाखाली एकूण दहा हजार सैनिक होते.

हा अफगाणी वंशाचा एक शक्तीशाली व्यक्ती तसेच हा एक अनुभवी योध्दा देखील आणि हा छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापेक्षा शरीराने मजबूत आणि उंच होता आणि त्याला त्याच्या शारीरक ताकदीमुळे ओळखले जात होते.

afzal khan information in marathi
afzal khan information in marathi

अफजलखान माहिती – Afzal Khan Information in Marathi

अफझल खानाचा वध कसा झाला – afzal khan vadh date in marathi

अफझल खान विषयी कोणाला माहिती नाही असे नाही कारण अफझल खानाचा वाढ छत्रपती शिवाजी महाराज यांनी केला होता आणि त्यामुळे इतिहासातील हि घडामोड त्या काळी देखील  प्रसिध्द झाली होती आणि आज देखील ती प्रसिध्द आहे.

प्रतापगडावरील छत्रपती शिवाजी महाराज आणि अफझल खाणामधील लढाई हि एक शिवाजी महाराजांच्या इतिहासातील महत्वाची लढाई होती. छत्रपती शिवाजी महाराजांना टक्कर देण्यासाठी कोणाला पाठवावे याचा विचार बडी बेगम करत होती.

आणि तिने असा विचार केला कि शिवाजी राजांचा समाचार सरदार अफझल खान चांगल्या प्रकारे घेवू शकेल कारण अफझल खान कारण हा १६४९ मध्ये वाई प्रांताचा सुबेदार होता त्यामुळे त्याला शिवाजी महाराजांच्या राज्याला लागून आणि जावळी जवळ होता.

त्यामुळे अफझल खानाला जावळीच्या सर्व राजकारणाचा अंदाज होता तसेच या प्रांतातील सर्व वतन दाराशी त्याची चांगली ओळख होती. अफझल खान छत्रपती शिवाजी महाराज्यांना मारण्यासाठी सैन्याची मोठी फौज घेवून प्रतापगडच्या पायथ्याशी आला त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला एक दूत पाठवून देवून आपण त्याला घाबरलो आहोत.

असे दाखवले आणि युध्द करण्याऐवजी आपण समझोत्याने आपले प्रश्न सोडवावे असे छ. शिवाजी महाराजांनी अफझल खानाला सांगितले. त्यांनी दोघांनी एकमेकांशी भेटण्याचे ठरवले परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी एक आत घातली कि भेट शामियानात होईल आणि सोबत १० अंगरक्षक असतील त्यावेळी अफझल खानाने हि अट मान्य केली.

भेटीच्या दिवशी शामियान्यात अफझल खाण शिवाजी महाराजांच्या अगोदर आला होता. शिवाजी महाराजांना माहित होते कि अफझल खान आपल्यासोबत घातपात करणार म्हणून त्यांनी अंगरख्याच्या आत चिलखत घातले होते.

ते शामियान्यात येताच खानाने छत्रपती शिवाजी महाराजांना आलिंगन दिले आणि दगा केला. अफझल खान शिवाजी महाराजांची माण धरून त्याच्या पाठीमध्ये बिचव्याने वार करत होता पण शिवाजी महाराजांनी चिलखत घातल्यामुळे शिवाजी महाराजांना काही झाले नाही.

आणि खानाचा तो वर फुकट गेला आणि तो गोंधळला तितक्यातच छत्रपती शिवाजी महाराजांनी लपवलेली वाघनखे खानच्या पोटात घुसवली आणि खानाचा कोतळा बाहेर काढला त्यावेळी खानाने दगा दगा म्हणून सर्व अंगरक्षकांना जागे केले त्याचबरोबर शामियान्यात हजर असणाऱ्या सय्यद बंडाने शिवाजी महाराजांवर वर केला.

पण तेथे असणारा शिवाजी महाराजांचा अंगरक्षक जीव महालाने आपल्यावर घेतला त्याच गडबडीत खानाने तेथून पळ काढून पालखीत स्वार झाला पण पालखी उचलणाऱ्या भोईचे पाय संभाजी कावजीने कापले. जखमी असलेल्या अफझल खानाला मारून त्याचे शीर धडापासून वेगळे केले अश्या प्रकारे अफझल खानाचा वध केला.

अफझल खान विषयी काही विशेष तथ्ये – facts

  • अफझल खानाचा मृत्यू १० नोव्हेंबर १६५९ मध्ये प्रतापगडाच्या पायाथ्याशी झाला.
  • छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझल खानाचा वध केला होता आणि त्यावेळी त्यांनी वाघनख्या पोटामध्ये खुपसून त्याचा कोतळा बाहेर काढला होता त्याचबरोबर त्याचे धड शरीरापासून वेगळे केले होते .
  • अफझल खान हा आदिल शाही घराण्यातील १६ व्या शतकातील सेनापती होता.
  • अफझल खानाचा वाढ हा प्रतापगडाच्या पायथ्याशी झाला असल्यामुळे त्याची समाधी प्रतापगडाच्या पायथ्याशी बांधलेली आपल्याला पहायला मिळते.
  • अफझल खान याची ओळख हि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विरुध्द दिलेल्या लढ्यामुळे झाली आहे.
  • १६३१ मध्ये अफझल खानने राजा कस्तुरी रंगाला एक बैठकीसाठी बोलावले होते आणि त्याचा त्या बैठकीच्या दिवशी दगा देऊन त्याचा खून केला होता.
  • अफझल खान आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भेटीच्या वेळी अफझल खानाचा असा आग्रह होता कि त्याची आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची भेट हि वाई मध्ये व्हावी परंतु छत्रपती शिवाजी महाराज यांनी हा आग्रह नाकारला आणि प्रतापगडाच्या पायथ्याशीच हि भेट होईल अशी विनंती त्यांनी अफझल खानकडे केली.
  • अफझल खानच्या सेवेमध्ये त्याचा मुलगा फजल खान, मुसा खान, सरदार पांढरे, अंबर खान, मनोजी जगदाळे हे व्यक्ती होते.
  • अफझल खानला बडीबेगमसाहिबा (आदिल शाही घराणे) ने शस्त्र वापरून आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी गोड बोलून त्यांना मारण्याचा आदेश दिला होता.
  • अफझल खान ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांना मारण्यासाठी सैन्य घेऊन येत होता त्यावेळी त्याने त्याच्या युद्धाची सुरुवात तुळजापूर या ठिकाणी असणारे भवानी मंदिराचा नाश करून केले होते आणि पुढे तो पंढरपुरातील विठ्ठल मंदिराकडे देखील गेला होता.

आम्ही दिलेल्या afzal khan information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर अफजलखान माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या shivaji maharaj and afzal khan story in marathi या afzal khan history in marathi article मध्ये update करू, मित्रांनो हि afzal khan history in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये afzal khan vadh powada lyrics in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!