पंढरीची वारी माहिती Pandharpur Wari Information in Marathi

Pandharpur Wari Information in Marathi – Pandharichi Vari Information in Marathi पंढरीची वारी माहिती पंढरपूर वारी विषयी माहिती ‘पंढरीची वारी करी वारकरी उन्ह पावसाची चिंता कोण करी’ असे म्हणत लाखो विठ्ठल भक्त वारकरी किंवा लोक पंढरपूरला भेट देतात. वारी म्हणजे वारकरी विठ्ठलाच्या भेटीसाठी पंढरपूरला पायी चालत जातात आणि जो वारकऱ्यांचा समूह मिळून वारीला जातो त्याला दिंडी या नावाने ओळखले जाते. या वारीमध्ये लोक पंढरपूर पर्यंत चालत जात असताना विठ्ठलाची भक्ती गीते, नृत्य आणि टाळ नाद यासारख्या गोष्टी केल्या जातात आणि वारीचा आनंद घेतला जातो.

मराठी महिन्यात आषाढ शुक्ल एकादशीमध्ये अशा अनेक दिंड्या महाराष्ट्रातील जवळपास प्रत्येक गाव, शहर आणि शहरातून पंढरपूरला भगवान पांडुरंगाच्या दर्शनासाठी येतात आणि त्यांची भक्ती व्यक्त करतात. पंढरपूर वारीची हि परंपरा खूप जुनी असावी कारण ज्ञानेश्वर महाराज यांचे वडील देखील वारीला जात होते.

पायी चालत जाण्याची हि परंपरा जुनी असल्याचे कारण पूर्वीच्या वाहतूक व्यवस्था नव्हती त्यामुळे लोक वारीला पायीच जात होते आणि तेंव्हा पासून आजहि विठ्ठल भक्त किंवा वारकरी वारीला पायी जाने पसंत करतात.

 pandharpur wari information in marathi

pandharpur wari information in marathi

पंढरीची वारी माहिती – Pandharpur Wari Information in Marathi

पंढरपूर वारी – Pandharichi Vari Information in Marathi

पंढरपूर वारी म्हणजे विठ्ठल भक्त किंवा वारकरी चैत्र यात्रा, कार्तिकी यात्रा, आषाढी यात्रा, माघी यात्रा या पैकी कोणत्याही यात्रेला पंढरपूरला भेट देतात आणि यालाच पंढरपूर वारी म्हणतात. या वारीमध्ये वारकरी विठ्ठलाच्या भेटीसाठी पंढरपूरला पायी चालत जातात आणि जो वारकऱ्यांचा समूह मिळून वारीला जातो त्याला दिंडी या नावाने ओळखले जाते.

या वारीमध्ये लोक पंढरपूर पर्यंत चालत जात असताना विठ्ठलाची भक्ती गीते, नृत्य आणि टाळ नाद यासारख्या गोष्टी केल्या जातात आणि वारीचा आनंद घेतला जातो. संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांची दिंडी हजारो दिंड्यांसह पंढरपूरला येतात आणि संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व दिंड्या वाखरी गावातील संतनगरी या ठिकाणी एकत्र येतात.

या सर्व दिंड्या आषाढ शुध्द दशमीच्या दिवशी एकमेकांना भेटतात, त्याच दिवशी संध्याकाळी सर्व भक्त आणि आपापल्या दिंड्या हळूहळू पंढरपूरकडे निघतात. तेथे पोहोचल्यानंतर ते चंद्रभागा नदीत पवित्र स्नान करतात आणि प्रदक्षिणा पूर्ण करतात. पुंडलिका वरदा हरिविठ्ठल आणि जय जय रामकृष्ण हरी चा जयघोष संपूर्ण पंढरपूरमध्ये घुमतो. एकादशीच्या दिवशी दुपारी विठ्ठल आणि रुक्मिणीच्या मूर्तींची श्री राधारानीसह मिरवणूक खास तयार केलेल्या रथातून निघते.

पंढरपूर वारी इतिहास – History of Pandharpur Wari in Marathi 

पंढरपूर वारी हि खूप पूर्वीच्या काळापासून चालत आलेली एक परंपरा आहे ज्यामध्ये वारकरी संप्रदाय पायी चालत जातात आणि विठ्ठलाची भक्ती गीते, नृत्य आणि टाळ नाद यासारख्या गोष्टी केल्या जातात आणि वारीचा आनंद घेतला जातो. इ. स १६८५ मध्ये तुकारामांचे धाकटे सुपुत्र नारायण बाबा हे नाविन्यपूर्ण मनाने पालखीची ओळख करून दिंडी – वारीच्या परंपरेत बदल घडवून आणण्याचे ठरविले.

संत तुकारामांच्या चांदीच्या पादुका त्यांनी पालखीत ठेवल्या आणि ते दिंडी घेऊन आळंदी या ठिकाणी निघाले, तेथे त्यांनी त्याच पालखीत संत ज्ञानेश्वरांच्या पादुका ठेवल्या आणि तेव्हापासून इ. स १८३० पर्यंत ही परंपरा दरवर्षी पाळली जात होती पण त्यानंतर अनेक अधिकारांमुळे तुकाराम कुटुंबात वाद होत होते.

या कारणास्तव लोकांनी जुळ्या पालख्यांची ही परंपरा खंडित करून आळंदीहून ज्ञानेश्वर पालखी आणि देहूहून तुकाराम पालखी अशा वेगळ्या पालखींचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला. हि जुनी परंपरा आजही चांगल्या प्रकारे चालवली जाते आणि सध्या दरवर्षी सुमारे ४३ पालखी पंढरपूरला येतात.

वारीचे तीर्थयात्रेचे मुख्य चार प्रकार

पंढरपूरला वारकरी विठ्ठलाच्या भेटीसाठी वर्षातून एकदा जातात आणि पंढरपूरला वारीतून जाण्यासाठी चार तीर्थ यात्रा असतात. वारकरी वर्षातील चैत्र वारी / यात्रा, कार्तिकी वारी / यात्रा, आषाढी वारी / यात्रा, माघी यात्रा या पैकी कोणत्याही एका वारीतून पंढरपूरला जातात.

चैत्र वारी 

चैत्र महिना हा हिंदू संस्कृतीतील आणि हिंदू दिनदर्शिकेनुसार पहिला महिना आहे. चैत्र शुद्ध एकादशीला म्हणजेच महिन्यातील अकराव्या दिवशी पंढरपूर येथे वर्षातील पहिली यात्रा भरते ज्याला कामदा एकादशी म्हणून देखील ओळखले जाते आणि एकादशी दिवशी देखील विठ्ठल भक्त, वारकरी आणि भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात आणि विठ्ठलाचे दर्शन घेतात.

कार्तिकी वारी 

पंढरपूर मध्ये कार्तिक महिन्यातील शुध्द एकादशीला कार्तिक यात्रा साजरी केली जाते आणि या दिवशी भगवान विठ्ठल झोपेतून उठतात अशी श्रद्धा आहे आणि म्हणूनच विठ्ठल भक्त, वारकरी पंढरपूरला विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी जातात. यामध्ये उत्सवाचा एक भाग म्हणून चंद्रभागा नदीच्या काठावर सर्व भाविक एका ठिकाणी येवून कीर्तन आणि भजन साजरे करतात आणि बहुतेक आदल्या दिवशी भाविकांची गर्दी असते आणि रात्रभर जागरण केले जाते.

माघी यात्रा 

हिंदू मराठी महिन्याप्रमाणे माघ हा एक हिंदू संस्कृतीतील महिना आहे आणि माघी यात्रा हि माघ महिन्यातील शुध्द एकादशीला भरते आणि या एकादशीला जया एकादशी म्हणून ओळखले जाते. इतर दिवसांप्रमाणे या दिवशीही पंढरपूरचे संपूर्ण वातावरण भक्तिमय असते आणि या दिवशी देखील पंढरपूर मध्ये वारकऱ्यांची गर्दी पाहायला मिळते.

आषाढी यात्रा 

वर्षातील सर्वात मोठी आणि पंढरपूरमध्ये मोठ्या प्रमाणात जमणारे विठ्ठल भक्त या यात्रेमध्ये पाहायला मिळतात. तीर्थयात्रेचा आणखी एक हंगाम आषाढी एकादशी म्हणून ओळखला जातो. भाविकांसाठी या तीर्थक्षेत्राला अनन्यसाधारण महत्त्व आहे. यावेळी पंढरपुरात वारकरी मोठ्या संख्येने जमतात आणि या एकादशीला देवशयनी एकादशी म्हणून ओळखली जाते.

असे म्हंटले जाते कि या आषाढी एकादशी दिवशी विठ्ठलाची निद्रा सुरू होते तसेच दिवसापासून चातुर्मासाचा पवित्र काळ सुरू होतो. या काळात भक्त विठ्ठलाच्या पूजेसाठी शक्य तेवढा वेळ घालवतात. आषाढी एकादशी काळात मंदिर दिवसाचे चोवीस तास सर्व भाविकांसाठी खुले असते.

संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांची दिंडी हजारो दिंड्यांसह पंढरपूरला येतात आणि संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व दिंड्या वाखरी गावातील संतनगरी या ठिकाणी एकत्र येतात. या सर्व दिंड्या आषाढ शुध्द दशमीच्या दिवशी एकमेकांना भेटतात, त्याच दिवशी संध्याकाळी सर्व भक्त आणि आपापल्या दिंड्या हळूहळू पंढरपूरकडे निघतात.

तेथे पोहोचल्यानंतर ते चंद्रभागा नदीत पवित्र स्नान करतात आणि प्रदक्षिणा पूर्ण करतात. पुंडलिका वरदा हरिविठ्ठल आणि जय जय रामकृष्ण हरी चा जयघोष संपूर्ण पंढरपूरमध्ये घुमतो. एकादशीच्या दिवशी दुपारी विठ्ठल आणि रुक्मिणीच्या मूर्तींची श्री राधारानीसह मिरवणूक खास तयार केलेल्या रथातून निघते. ही मिरवणूक प्रदक्षिणा मार्गाने जाते, हा संपूर्ण उत्सव आषाढ शुध्द पौर्णिमेच्या दिवशी संपतो ज्याला गोपालकाला असेही म्हणतात.

पंढरपूर पालखी विषयी महत्वाची माहिती

पालखी कोणी सुरू केली?

इ.स १६८५ मध्ये संत तुकारामांचे धाकटे पुत्र ‘नारायण बाबा’ यांनी पालखीची ओळख करून दिली कारण त्यांना वारी परंपरेत बदल घडवायचा होता. त्यांनी तुकारामांच्या चांदीच्या पादुका ठेवल्या आणि दिंडीसह आळंदीला गेले आणि त्याच पालखीत संत ज्ञानेश्वरांच्या पादुका ठेवल्या.

पालखी सोहळा म्हणजे काय?

पालखी ही १००० वर्ष जुनी परंपरा आहे ज्याचे पालन करणारे वारकरी, लोक वारी नावाच्या प्रथेचे पालन करतात. दिंड्यांमध्ये (वारकऱ्यांचा समूह) एकत्र येऊन, गाणे, नृत्य आणि ज्ञानबा-तुकारामाचा जयघोष करून लोक हा उत्सव साजरा करतात.

आम्ही दिलेल्या pandharpur wari information in marathi language माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर पंढरीची वारी माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या Pandharichi Vari Information in Marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि information about pandharpur wari in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये pandharpur wari information in marathi wikipedia Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!