प्रतापगड किल्ल्याची माहिती Pratapgad Fort Information in Marathi

Pratapgad Fort Information in Marathi प्रतापगडाची माहिती प्रतापगड हा किल्ला महाराष्ट्रमध्ये सातारा जिल्ह्यामध्ये आहे या किल्ल्याला साहसी किल्ला म्हणून देखील ओळखले जाते कारण या किल्ल्याशी छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास जोडला आहे. प्रतापगड हा किल्ला मराठा साम्राज्याचे संस्थापक आणि भारतातील वीर योध्दा छत्रपती शिवाजी महाराजांनी इ. स. १६५६ मध्ये बांधला. प्रतापगड हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या बहादुरीचा आणि त्यांनी केलेल्या पराक्रमांचा साक्षीदार आहे. याच किल्ल्यावर शिवाजी महारांजाच्या मध्ये आणि अफझल खानमध्ये लढाई झाली होती आणि हा किल्ला समुद्र सपाटी पासून १००० मीटर उंच बांधला आहे.

या किल्ल्याची उंची ३५५६ फुट इतकी आहे. हा किल्ला आंबेनळी घाटाजवळील महाबळेश्वर गावाजवळ आहे. १६५६ ते १८१८ मधील काही महिने वगळता हा किल्ला कोणीही जिंकू शकला नाही तर हा किल्ला शत्रू पासून अभेद्य आणि अजिंक्य राहिला.

pratapgad fort information in marathi
pratapgad fort information in marathi

प्रतापगड किल्ल्याची माहिती – Pratapgad Fort Information in Marathi

किल्ल्याचे नावप्रतापगड किल्ला
संस्थापकछत्रपती शिवाजी महाराज
स्थापनाइ. स. १६५६
प्रकारगिरिदुर्ग
डोंगर रांगासह्याद्री
ठिकाणसातारा जिल्हा ( महाराष्ट्र )
गड चढण्याची श्रेणीसोपी
उंची३५५६ फुट
किल्ल्याचे दोन भागमुख्य किल्ला आणि बालेकिल्ला
किल्ल्यावरील ठिकाणेशिव मंदिर, तुळजा भवानी मंदिर, राजमाता जिजाऊ वाडा, नागररखाना, बुरुज आणि अफझल खानची कबर.

प्रतापगडाची माहिती

प्रतापगड हा महाराष्ट्रमधील सातारा जिल्ह्यामध्ये आहे आणि हा किल्ला महाबळेश्वर या गावाजवळ सह्याद्रीच्या पर्वत रंगामध्ये जावळीच्या खोऱ्यात असणाऱ्या घनदाट जंगलामध्ये प्रतापगड हा किल्ला निसर्गरम्य वातावरणामध्ये वसलेला आहे. महाबळेश्वर हे गाव किल्ल्यापासून २२ किलोमीटर लांब आहे. हा किल्ला समुद्रसपाटी पासून १००० मीटर उंचीवर आहे आणि या किल्ल्याची उंची ३५५६ फुट आहे आणि हा किल्ला गिरिदुर्ग प्रकारातील आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळीचे खोरे मराठा साम्राज्यामध्ये आल्या नंतर इ. स. १६५६ मध्ये मोरो त्र्यंबक पिंगळे यांना गड बांधून घेण्यासाठी सांगितले. या गडाच्या भोवतीने भक्कम अशी तटबंदी आहे जी किल्ल्याच्या संरक्षणासाठी बांधली आहे. या किल्ला त्या काळी मुख्यता २ भागामध्ये बांधला गेला आहे मुख्य किल्ला आणि बाले किल्ला. बाले किल्ल्याचे एकूण क्षेत्रफळ ३६६० चौ. मी. आहे आणि मुख्य किल्ल्याचे क्षेत्रफळ ३८८५ चौ. मी. इतके आहे म्हणजे या संपूर्ण किल्ल्याचे क्षेत्रफळ ७५४५ चौ. मी. आहे.

प्रतापगडाचा इतिहास – Pratapgad Fort History in Marathi

या ऐतिहासिक किल्ल्याची स्थापना भारतातील महान योध्दा छत्रपती शिवाजी महाराजांनी इ. स. १६५६ केली. हा किल्ला शिवाजी महाराजांच्या पराक्रमांचा साक्षीदार आहे. शिवाजी महाराज आणि अफझल खान यांचा इतिहास आपल्या आपल्या सर्वांना माहित आहे. त्यामध्ये कशी लढाई झाली छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझल खानाला कसे मारले. १० नोव्हेंबर १६५९ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि अफझल खानमध्ये युध्द झाले होते आणि या किल्ल्यावरच शिवाजी महाराजांनी अफझल खानाला मारले होते.

त्याच बरोबर इ. स. १८१८ मध्ये इंग्रजांबरोबर झालेल्या तिसऱ्या मराठा युध्दामध्ये मराठ्यांचे खूप नुकसान झाले होते आणि त्यांना हा किल्ला देखील गमवावा लागला होता.

प्रतापगडावरील अफझल खान वध

प्रतापगडावरील छत्रपती शिवाजी महाराज आणि अफझल खाणामधील लढाई हि एक शिवाजी महाराजांच्या इतिहासातील महत्वाची लढाई होती. छत्रपती शिवाजी महाराजांना टक्कर देण्यासाठी कोणाला पाठवावे याचा विचार बडी बेगम करत होती आणि तिने असा विचार केला कि शिवाजी राजांचा समाचार सरदार अफझल खान चांगल्या प्रकारे घेवू शकेल कारण अफझल खान कारण हा १६४९ मध्ये वाई प्रांताचा सुबेदार होता.

त्यामुळे त्याला शिवाजी महाराजांच्या राज्याला लागून आणि जावळी जवळ होता त्यामुळे अफझल खानाला जावळीच्या सर्व राजकारणाचा अंदाज होता तसेच या प्रांतातील सर्व वतन दाराशी त्याची चांगली ओळख होती.

शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्याची मोहीम त्याच्याकडे देण्यात आल्या नंतर त्याला आपल्या सोबत काही निवडक सैनिक घेतले त्यामध्ये सय्यद बंडा, याकूतखान, फजल खान आणि अंबर खान हे प्रमुक होते आणि मराठे सरदार प्रतापराव मोरे आणि पिलाजी मोहिते देखील होते.

आणि तो प्रतापगडापर्यंत येणाऱ्या सर्व गावांची तसेच मंदिरे उद्वस्त करत तो प्रतापगडाच्या पायथ्याशी आला त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला एक दूत पाठवून देवून आपण त्याला घाबरलो आहोत असे दाखवले आणि युध्द करण्याऐवजी आपण समझोत्याने आपले प्रश्न सोडवावे असे छ. शिवाजी महाराजांनी अफझल खानाला सांगितले.

त्यानंतर त्यांची प्रतापगडाच्या पायथ्याशी भेट निश्चित झाली पण शिवाजी महाराजांनी एक अट घातली भेटीच्या वेळी तिथे फक्त १० अंगरक्षक असतील आणि त्यामधील एक शामियान्यात असेल (शिवाजी महाराजांनी अफझल खानच्या भेटीसाठी एक शामियाना उभारला होता). भेटीच्या दिवशी शामियान्यात अफझल खाण शिवाजी महाराजांच्या अगोदर आला होता. शिवाजी महाराजांना माहित होते कि अफझल खान आपल्यासोबत घातपात करणार म्हणून त्यांनी अंगरख्याच्या आत चिलखत घातले होते.

ते शामियान्यात येताच खानाने छत्रपती शिवाजी महाराजांना आलिंगन दिले आणि दगा केला. अफझल खान शिवाजी महाराजांची माण धरून त्याच्या पाठीमध्ये बिचव्याने वर करत होता पण शिवाजी महाराजांनी चिलखत घातल्यामुळे शिवाजी महाराजांना काही झाले नाही आणि खानाचा तो वर फुकट गेला.

तो गोंधळला तितक्यातच छत्रपती शिवाजी महाराजांनी लपवलेली वाघनखे खानच्या पोटात घुसवली आणि खानाचा कोतळा बाहेर काढला त्यावेळी खानाने दगा दगा म्हणून सर्व अंगरक्षकांना जागे केले त्याचबरोबर शामियान्यात हजर असणाऱ्या सय्यद बंडाने शिवाजी महाराजांवर वर केला.

पण तेथे असणारा शिवाजी महाराजांचा अंगरक्षक जीव महालाने आपल्यावर घेतला त्याच गडबडीत खानाने तेथून पळ काढून पालखीत स्वार झाला पण पालखी उचलणाऱ्या भोईचे पाय संभाजी कावजीने कापले. जखमी असलेल्या अफझल खानाला मारून त्याचे शीर धडापासून वेगळे केले अश्या प्रकारे अफझल खानाचा वध केला.

प्रतापगड किल्ला फोटो:

pratapgad fort information in marathi
pratapgad fort information in marathi

प्रतापगडावर काय पहाल (गडावरील पाहण्यासाठीची ठिकाणे) 

 • शिव मंदिर 

प्रतापगडावर शिवाजी महाराजांनी बांधलेले शिव मंदिर पाहायला मिळते. ज्यावेळी किल्ल्याचे खोदकाम चालू होते त्यावेळी एक शिवलिंग सापडले होते असे म्हंटले जाते. बालेकिल्ल्याचे प्रवेशद्वार ओलांडल्यानंतर हे मंदिर लागते.

 • तुळजा भवानी मंदिर 

तुलाजा भवानी मंदिर हे १६६१ मध्ये बांधले आहे आणि हे मंदिर दगडी दगडी गाभाऱ्याचे आहे आणि मंदिरासमोर २ उंच दीपमाळा देखील आहेत ज्या दगडापासून बनल्या आहेत.

 • बुरुज 

बुरुज हा शत्रूवर नजर ठेवण्यासाठी बांधलेला असतो आणि प्रतापगडाव देखील असे बुरुज होते. या बुरुजांची उंची १० ते १५ मीटर इतकी होती. केदार, अफझल, यशवंत बुरुज, रेडका, सूर्य बुरुज आणि राजपहारा या बुरुजांचे अवशेष आपल्याला आज्ज देखील पाहायला मिळतात.

 • वाडा 

शिव मंदिराच्या मागील बाजूस आपल्याला राजमाता जिजाऊ जेथे राहत होत्या त्या वाड्याचे अवशेष आपल्याला पहिले आहेत.

 • अफझल खानची कबर 

आपल्याला गडाच्या पायथ्याशी अफझल खानची कबर देखील पाहायला मिळते.

 • बालेकिल्ला 

बालेकिल्ला हा गडाचा दुसरा भाग आहे आणि बालेकिल्ल्याचे एकूण क्षेत्रफळ ३६६० चौ. मी. आहे.

 • नागररखाना 

नागरखाण्याची इमारत हि पूर्वीच्या काळातील आहे आणि हि देखील आपल्याला गडावर पाहायला मिळते. या इमारतीचा जीर्नोधार १९३५ मध्ये करण्यात आला होता.

प्रतापगडा विषयी काही मनोरंजक तथ्ये – interesting facts about pratapgad fort 

 • प्रतापगडावर शिवकालीन रीतीनुसार आजही गडाचा दरवाजा सूर्योदय होण्याच्या अगोदर उघडले जातात आणि आणि सूर्यास्तानंतर बंद केले जातात.
 • नाना फडणवीस यांनी १७७८ मध्ये सखाराम बापू यांना काही दिवसासाठी या गडावर नजरकैदेत ठेवले होते.
 • असे म्हणतात कि शिवाजी महाराजांनी अफझल खानाला मारल्यानंतर संभाजी कावीज या शिवाजी महाराजांच्या मवाल्याने अफझल खानाचे शीर बुरुजामध्ये पुरले.
 • जर वरून प्रतापगडाची सुंदरता बघितली तर प्रतापगड फुल पांखराच्या आकाराचा दिसतो.
 • प्रतापगड हा चढण्यासाठी खूप सोपा आहे.
 • प्रतापगड ह्या किल्ल्याचे बांधकाम २ वर्षामध्ये पूर्ण केले आहे.
 • या किल्ल्याच्या दोन्ही बाजूला २०० ते २५० मीटर खोल दऱ्या आहेत.

प्रतापगडावर कसे जायचे ?

 • जर तुम्ही रेल्वेने येत असाल तर सातारा हे प्रतापगडाचे जवळचे रेल्वे स्थानक आहे आणि साताऱ्यातून प्रतापगड ७५ किलो मीटर आहे. साताऱ्यातून गडा जवळ जाण्यासाठी बस किवा टॅक्सीने जावू शकता.
 • जर तुम्ही विमानाने येत असाल तर पुणे विमानतळ हे सर्वात जवळचे विमानतळ आहे आणि हे प्रतापगडापासून १४८ किलो मीटर आहे. पुण्यातून बसने येवू शकतो.
 • या किल्ल्याचे साताऱ्यापासूनचे अंतर ७५ किलो मीटर आहे आणि पुण्यापासून १४० किलो मीटर आहे त्यामुळे तुम्ही पुण्याहून किवा साताऱ्याहून बसने, टॅक्सीने किवा स्वताच्या कारणे जावू शकता.

वरील सर्व गोष्टी पाहून आपणास अंदाज लागला असेलच, प्रतापगड किल्ल्याची माहिती pratapgad fort information in marathi language हा कसा आहे? कोठे आहे? त्याचा इतिहास काय आहे? तिथे पाहण्यासारखी ठिकाणे आणि तसेच त्यांची वैशिट्ये कोणती आहेत. pratapgad information in marathi हा लेख आपल्याला आवडल्यास आपल्या मित्र परिवारासोबत फेसबुक ओट्सअप्प सारख्या विविध सोशियल मेडिया वरून माहिती पोहचवा. तसेच information of pratapgad fort in marathi हा लेख कसा वाटला व अजून काही प्रतापगड किल्ला विषयी राहिले असेल तर आपण comments द्वारे कळवू शकता धन्यवाद.

आम्ही दिलेल्या pratapgad chi mahiti माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही pratapgad in marathi त्यामध्ये नक्की बदल करू.  अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!