आग्रा किल्ला माहिती Agra Fort Information In Marathi

Agra Fort Information In Marathi आग्रा किल्ल्याची माहिती आपल्या भारतामध्ये कित्येक ऐतिहासिक किल्ले आहेत त्यामधील एक म्हणजे आग्र्याचा किल्ला. ज्यावेळी मुगलांची सत्ता आग्रा या भागामध्ये होती त्यावेळी हा अत्यंत सुंदर किल्ला मोगलांनी बांधला. हा किल्ला अनेक आक्रमणांना तोंड देवून देखील आजही दिमाखात उभा आहे. १५ व्या शतकामध्ये हा किल्ला बादलगड या नावाने ओळखला जात होता. भारतामधील मुगल सम्राट बाबर, हुमायु, अकबर, जहांगीर आणि औरंगजेबाने या किल्ल्यावर राज्य केले. हा किल्ला अतिशय सुंदर, भव्य आणि मोठा आहे आणि त्यावरील नक्षीकाम पर्यटकांना आकर्षित करते. 

agra fort information in marathi
agra fort information in marathi

आग्रा किल्ला माहिती – Agra Fort Information In Marathi

किल्ल्याचे नावआग्रा किल्ला किवा लाल किल्ला -agra kila
स्थापनाइ. स. १५७३
संस्थापकअकबर
ठिकाणआग्रा
बांधकाम शैलीमुगल शैली
क्षेत्रफळ९४ एकर
प्रकारभू किल्ला किवा भूयीकोट
किल्ल्यावरील पाहण्यासारखी ठिकाणेशीश महल, अमर सिंह दरवाजा, दिवान आय खास, दिवान आय आम, जहांगीर महल, मुसम्मन बुरुज आणि खास महाल

आज आपण जो किल्ला पाहतो तो अकबराने लाल दगड घडवून घेतलेला पाहतो आणि मग त्यानंतर शहाजहानला संगमरवराची आवड असल्यामुळे त्याने आपला पूर्ण महाल संगमरवराचा बनवून घेतला आहे.

आग्रा किल्ल्याबद्दल माहिती 

आग्रा हा किल्ला भारतातील प्रसिध्द ताजमहाल पासून फक्त ३ किलो मीटर आहे. आग्रा येथील हा किल्ला मोगलांच्या काळामध्ये ९४ एकर क्षेत्रफळा मध्ये बांधला आहे. हा किल्ला यमुना नदीच्या काठी वसलेला आहे. आज जो आपण लाल दगडांचा किल्ला पाहतो तो इ. स १५७३ मध्ये राजा अकबर यांनी बांधला आहे.

आग्र्याचा हा किल्ला भू किल्ला असून या किल्ल्याला लाल किल्ला म्हणून देखील ओळखले जाते. १००० वर्षापूवी बनवलेला हा किल्ला आता जागतिक वारसा असणाऱ्या किल्ल्यामध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. या किल्ल्यामध्ये आपण एकाच प्रवेश दाराने आत जावू शकतो आणि दाराचे नाव अमर सिंघ गेट असे आहे. या किल्ल्यामध्ये जेवढे बांधकाम आहेत ती लाल दगडांनी आणि संगमरवर याने बांधलेली आहेत.

आग्रा किल्ल्याचा इतिहास – Agra fort history in Marathi

हा किल्ला मोगलांनी बांधला त्यानंतर इ. स. १५२६ मध्ये पानिपतच्या पहिल्या लढाई नंतर इब्राहिम लोधी येथे आला आणि त्याने मुगलांचा पहिला शासक बाबर याच्यावर हल्ला करून हा किल्ला आपल्यला ताब्यात घेतला आणि त्यामध्ये बांधकाम देखील केले. यानंतर हा किल्ला ज्यावेळी अकबराच्या ताब्यात गेला त्यावेळी त्याने आग्रा हि आपली राजधानी केली पण किल्ल्याचे काही भागा मिदाकालीस आले होते म्हणून त्याने लाल दगड वापरून किल्ल्याचे बांधकाम करण्याचे ठरवले आणि हा किल्ला बांधण्यासाठी त्याने १४४४००० कामगार घेतले आणि या किल्ल्याचे बांधकाम ८ वर्ष चालले शेवटी ह्या किल्ल्याचे बांधकाम इ. स. १५७३ मध्ये पूर्ण झाले.

जे आज आपण किल्ल्याचे बांधकाम पाहतो ते अकबर राजाने केलेले बांधकाम पाहतो. इ. स १६५८ मध्ये आग्र्याचा हा किल्ला शहाजहां मुलगा औरंगजेब याच्या ताब्यात गेला व औरंगजेबाने आपल्या वडिलांना ८ वर्ष कैदेत याच किल्ल्यामध्ये ठेवले. शहाजहांनच्या मृत्यूनंतर हा किल्ला अनेक साम्राटांनी आणि राजकर्त्यांनी हा किल्ला ताब्यात घेवून लुटला. इ. स. १८०३ मध्ये दुसऱ्या अंग्लो मराठा युध्दामध्ये हा किल्ला इंग्रजांकडे गेला आणि त्यानंतर भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हा किल्ला भारत सरकारकडे सोपवण्यात आला.

किल्ल्यावर पाहण्यासारखी ठिकाणे 

  • आग्रा किल्ल्याचा मुख्य दरवाजा :

आग्रा किल्ल्याचा मुख्य दरवाज्याला अमर सिंह दरवाजा या नावाने ओळखला जातो या किल्ल्याला एकच प्रवेश दार आहे. या दरवाज्यामध्ये जाताना आपल्याला दोन उंच भिंतींच्या मधून जावे लागते.

  • खास महल :

खास महाल हा बादशाहचा राजवाडा होता आणि या खास महलावर सुंदर आणि आकर्षक फुलांचे भरीव नक्षीकाम केलेले पाहायला मिळते त्याच बरोबर या महालामध्ये सुंदर झुंबर आणि जाळीदार खिडक्या पाहायला मिळतात.

  • मुसम्मन बुरुज :

मुसम्मन बुरुज म्हणजे हा एक अष्टकोनी मंडप किल्ल्याच्या पूर्वेकडील भागात आहे आणि यावर चढून आपल्यला यमुना नदी आणि ताजमहाल पाहता येतो. या अष्टकोनी मंडपाच्या आतल्या भागामध्ये संगमरवरीच्या रंगीबिरंगी दगडांनी सजावट केली आहे वरती सुंदर आहे घुमत आहे.

  • दिवान आय खास :

दिवान आय खास या इमारतीमध्ये पूर्वीच्या काळी सम्राट सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जात होते. हि इमारत इ. स. १६३६-३७ मध्ये शाहजहांने बांधले आहे.

  • दिवान आय आम :

हि इमारत पूर्वीच्या काळी सार्वजनिक प्रेक्षकांचे सभागृह होते. या सभागृहाचा उपयोग औपाचारिक स्वागतासाठी केला जात होता. जेथे सम्राट सिंहासनावर अधिकृत राज्य व्यवसाय करत होते.

  • जहांगीर महल :

आपल्याला किल्ल्याच्या आतल्या भागामध्ये जहांगीर महल देखील पाहायला मिळतो.

  • शीश महल :

शीश महल हि किल्ल्यावरील एक सुंदर वास्तू आहे. हि इमारत आरष्यांनी सजवली आहे.

आग्रा किल्ला फोटो:

agra kila
agra kila

आग्रा किल्ल्यावर कसे जायचे ?

मंटोला मध्ये असणारे आग्रा रेल्वे स्थानक हे आग्रा किल्ल्याचे सर्वात जवळचे रेल्वे स्थानक आहे त्यामुळे आपण पुणे, मुंबई, बेंगळूर, चेन्नई आणि कोलकत्ता या मुख्य शहरातून या स्थानकावर येवू शकतो आणि तेथून टॅक्सी पकडून किल्ल्यावर जावू शकतो. रेल्वे स्थानका पासून किल्ल्याचे अंतर २ किलो मीटर आहे.

टीप

  • आग्रा दिल्ली पासून २०० किलो मीटर अंतरावर आहे.
  • आग्रा किल्ला सूर्योदय झाल्यानंतर उघडला जातो आणि सूर्यास्तानंतर बंद केला जातो.
  • हा किल्ला पाहण्यासाठी भारतातील पर्यटकांच्या कडून ४० रुपये प्रवेश शुल्क घेतला जातो आणि विदेशी पर्यटकांच्या कडून ६५० रुपये प्रवेश शुल्क घेतला जातो.
  • १५ वर्षाच्या खालील मुलांच्यासाठी कोणताही प्रवेश शुल्क घेतला जात नाही.

वरील सर्व गोष्टी पाहून आपणास अंदाज लागला असेलच, आग्रा किल्ला agra fort information in marathi language हा कसा आहे? कोठे आहे? त्याचा इतिहास काय आहे? तिथे पाहण्यासारखी ठिकाणे आणि तसेच त्यांची वैशिट्ये कोणती आहेत. agra fort information in marathi wikipedia हा लेख आपल्याला आवडल्यास आपल्या मित्र परिवारासोबत फेसबुक ओट्सअप्प सारख्या विविध सोशियल मेडिया वरून माहिती पोहचवा. तसेच information about agra fort in marathi हा लेख कसा वाटला व अजून काही आग्रा किल्ला विषयी राहिले असेल तर आपण comments द्वारे कळवू शकता धन्यवाद.

आम्ही दिलेल्या agra killa chi mahiti माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही agra fort in marathi language information त्यामध्ये नक्की बदल करू. अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!