जंजिरा किल्ल्याची माहिती Janjira Fort Information in Marathi

Murud Janjira Fort Information in Marathi मुरुड जंजिरा किल्ला मराठी माहिती महाराष्ट्राच्या पश्चिम किनाऱ्यावर गेले ५०० वर्षापासून अरबी समुद्राच्या लाठा झेलत असलेला एक आकर्षक आणि अजेय असा किल्ला म्हणजे जंजिरा किल्ला. हा किल्ला रायगड जिल्ह्यातील मुरुड तालूक्यामधील राजपुरी गावाजवळून ३ ते ४ किलोमीटरच्या अंतरावर हा किल्ला आहे. या किल्ल्याच्या थोड्याच अंतरावर अजून एक किल्ला आहे तो म्हणजे पद्मदुर्ग जलदुर्ग किल्ला जो छत्रपती संभाजी राजांनी जंजिरा किल्ला जिंकण्यासाठी बांधला होता.

जंजिरा हे किल्ल्याचे नाव जझीरा या अरबी शब्दावरून पडले आहे जझीरा म्हणजे एक बेट म्हणजेच हा किल्ला अरबी समुद्रामध्ये मध्यभागी आहे आणि या किल्ल्याच्या चारही बाजूंनी पाणी आहे आणि या किल्ल्याचा आकार अंडाकृती असून या किल्ल्याचे प्रवेशद्वार हे राजपुरी गावाकडे तोंड करू आहे.

महाराष्ट्रातल्या अनेक किल्ल्यावर जशी शिप आहेत तसेच या किल्ल्यावर देखील आहेत आणि या शिल्पांना शाराबाची शिल्प म्हणतात. हि शिल्प अशी होती कि वाघाच्या तोंडामध्ये आणि पायामध्ये हत्ती पकडले आहेत आणि शिल्पे अमर्याद सागरी सत्तेचे प्रतिक दर्शवितात.

janjira fort information in marathi
janjira fort information in marathi

जंजिरा किल्ल्याची माहिती – Janjira Fort Information in Marathi

किल्ल्याचे नावजंजिरा किल्ला
जिल्हारायगड
तालुकामुरुड
गावराजपुरी ( राजपुरी गावापासून समुद्रामध्ये ५ ते ६ किलो मीटर अंतरावर )
किल्ल्याचे एकूण क्षेत्रफळ२२ एकर
बुरुजांची संख्या१९ बुरुज
तठांची उंची४० फुट
किल्ल्याचे मूळ संस्थानअंबर सिद्दी

जंजिरा किल्याचा इतिहास – janjira fort history in Marathi

१२०० च्या उतरार्धात राजपुरी गावातील कोळी किवा मच्छीमार यांची या बेटावर वस्ती होती पण ह्या लोकांना समुद्री लुटारूंचा खूप त्रास होऊ लागल्यामुळे कोळी प्रमुख रामभाऊ पाटील यांनी लुटारुंच्या पासून संरक्षण मिळवण्यासाठी निजामांच्या ठाणेदाराची परवानगी घेवून मेढेकोट किल्ल्याची बांधकाम करण्यास सुरुवात केली त्यांनी निजामांच्या ठाणेदाराची परवानगी घेण्याचे कारण त्या काळी तो परिसर निजामांच्या हद्दीमध्ये होता.

मच्छीमार लोकांनी हा किल्ला लाकडाच्या ओंढक्यांनी बनवला होता. त्यामुळे कोळी लोकांचे समुद्री लुटारुंपासून संरक्षण झाले. हा किल्ला १४९० पर्यंत तसा स्वतंत्र्यच होता म्हणजेच या किल्ल्यावर कोणाचेही राज्य नव्हते. पण १४८५ मध्ये मलिक अहमद याने हा किल्ला जिंकण्यासाठी खूप प्रयत्न केले पण शूर आणि पराक्रमी रामभाऊ पाटील जे कोळी लोकांचे प्रमुख होते त्यांच्या पुढे मलिक अहमदला हात टेकावे लागले आणि किल्ला न मिळवताच मागे फिरावे लागले.

रामभाऊ पाटील याचे हे वर्चस्व निजामांना खटकले त्यामुळे त्यांनी किल्ला मिळवण्यासाठी पिरमल खान यांची नेमणूक केली. पिरमल खानाने किल्ला मिळवण्यासाठी एक योजना आखली याने रामभाऊ पाटलांसोबत मैत्रीचे संबध प्रस्तापित करून किल्ल्यामध्ये परवश करून विश्वास घाताने १५११ मध्ये किल्ला आपल्या ताब्यात मिळवला.

पिरमल खानच्या मृत्यू झाल्यानंतर बुऱ्हा खानला नेमण्यात आले. बुऱ्हा खानाने निजामांकडून परवानगी घेवून जुना बांधलेला किल्ला पाडून या किल्ल्याचे दगडी बांधकाम करण्यात आले पण समुद्री किल्ल्याची जहागीरदारी अंबर सिद्दी याने १६१७ मध्ये बादशाहकडून मिळवली.

अंबर सिद्दी याला जंजिरा संस्थानाचा मुल पुरुष मानला जातो कारण याने आपले प्राण पन्नाला लावून जंजिरा हा किल्ला आपल्या ताब्यात राखाल. या किल्ल्याचे स्वामित्व मिळवण्याचा खूप जनांनी प्रयत्न केला पण हा किल्ला मिळवणे कोणालाच शक्य झाले नाही.

छत्रपती शिवाजी महाराजांचे देखील स्वप्न होते आणि जंजिरा किल्ला आपल्या स्वराज्यामध्ये समाविष्ट करावा आणि स्वामित्व मिळवण्यासाठी शिवाजी महाराजांनी आणि संभाजी महाराजांनी खूप प्रयत्न केले किल्यापर्यंत जाण्यासाठी आणि किल्ल्यामध्ये प्रवेश करण्यासाठी (वाट बनवली तसेच समुद्रामध्ये किल्ला बांधला ज्याला पद्मदुर्ग जलदुर्ग किल्ला म्हणतात)

खूप प्रयत्न केले पण हे शिवाजी महाराजांना देखील शक्य झाले नाही या किल्ल्याला कोंडाजी बाबा फर्जंद यांच्या पराक्रमाची साक्ष देणारा किल्ला म्हणून देखील ओळखले जाते. जंजिरा हा किल्ला ३३० वर्ष अजिंक्य राहिला आणि १९४७ पर्यंत हा किल्ला त्यांच्याच ताब्यात राहिला. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हे संस्थान भारतीय स्वातंत्र्यामध्ये विलीन झाले.

जंजिरा किल्ला मराठी माहिती – information about janjira fort in Marathi

हा किल्ला रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यामधील राजपुरी गावाजवळून ३ ते ४ किलोमीटरच्या अंतरावर हा किल्ला आहे. जंजिरा हा किल्ला अरबी समुद्रातील एक बेटावर बांधलेलाल किल्ला आहे. कोळी लोक तेथे वस्ती करत असल्यामुळे त्यांनी समुद्री लुटारू पासून संरक्षण करण्यासाठी बेटाभोवती एक लाकडी ओंडक्यानी बेटाभोवती एक तठ बांधली होती आणि त्यांनी त्याला मेढेकोट असे नाव दिले होते. पिरमल खानाने तेथील सर्व लोकांची कत्तल करून हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला त्याच्या मृत्यू नंतर बुऱ्हा खानने या किल्याचे दगडी बांधकाम केले.

जे आत्ताचे किल्ल्याचे बांधकाम आपण पाहतो ते बुऱ्हा खानाने बांधलेले आहे. समुद्री किल्ल्याची जहागीरदारी अंबर सिद्दी याने १६१७ मध्ये बादशाहकडून मिळवली. जंजिरा हा किल्ला अरबी समुद्रामध्ये आहे आणि या किल्ल्याच्या चारही बाजूला पाणी आहे त्याचबरोबर या किल्ल्याचा मुख्य दरवाजा राजपुरी गावाकडे तोंड करून आहे आणि हा किल्ला या गावापासून ५ ते ६ किलोमीटर अंतरावर आहे. हा किल्ला ४० फुट उंच भिंतीनी वेढलेला आहे आणि २२ एकर जागेमध्ये हा बांधला आहे.

किल्ल्याच्या मध्यभागी सुरूलखानाचा वाडा आहे जो आज आपल्याला पडक्या अवस्थेत पाहायला मिळतो. या किल्ल्याला १९ बुरुज आहेत आणि बुरुजामधील अंतर १० ते ११ फुट पेक्षा अधिक आहे. तसेच या किल्ल्याच्या तट बंदीच्या कमानीवर तोफा ठेवल्या होत्या त्या आजही आपल्याला पाहायला मिळतात.

गडावर पश्चिमेला तटाखाली एक दरवाजा आहे. जो समृद्रामध्ये निघतो त्याला दर्या दरवाजा म्हंटले जाते आणि याचा वापर संकट काळी बाहेर पाडण्यासाठी केला जात होता. या किल्ल्यावर एक भुयारी मार्ग आहे आणि हा मार्ग ५० ते ६० फुट खोल असलेल्या समुद्राखालून तो राजपुरी गावापर्यंत आहे.

जंजिरा किल्ला जिंकण्यासाठी शिवाजी महाराजांनी आणि संभाजी महाराजांनी केलेले प्रयत्न

शिवाजी महाराजांनी जंजिरा किल्ला जिकण्यासाठी या किल्ल्यावर ८ वेळा आक्रमण केले. शिवाजी महाराजांनी या किल्ल्याचे स्वामित्व मिळवण्यासाठी १६५७ मध्ये रघुनाथ बल्लाळ सबनीस आणि काळोख पंथ यांच्यावर जजिरा किल्ल्याची मोहिमेची कामगिरी सोपवली आणि त्यावेळी त्यांनी दंडा राजपुरी पर्यंतचा मुलुख आपल्या ताब्यात घेतला.

पण रघुनाथ बल्लाळ सबनीस आणि काळोख पंथ यांना जंजिरा किल्ल्यावर हल्ला करणे शक्य झाले नाही त्यानंतर शिवाजी महाराज शांत बसले नाहीत त्यांनी जजिरा किल्ल्याची पुन्हा मोहीम रचली आणि या मोहिमेची कामगिरी शामराव नीलकंठ यांच्यावर सोपण्यात आली. पण सिद्धिने आपल्या धूर्तपणाने आणि विश्वासघाताने पेशवे शामराव नीलकंठ यांना बंदिस्थ केले. पण त्यावेळी देखील शिवाजी महाराज्यांनी एक युक्ती लढवून बंदिस्त पेशव्यांना सोडवले त्यांनी असे सांगितले कि आम्ही पुन्हा जंजिरा किल्ल्यावर हल्ला करणार नाही.

१६६९ मध्ये पुन्हा एकदा जंजिरा किल्ल्यावर हल्ला करण्यासाठी शिवाजी महाराज्यांनी पेशवे मोरोपंत पिंगळे यांची नेमणूक केली. त्यावेळी तळे गड घोसाळगड त्यांनी आपल्या ताब्यात घेतला तसेच त्यांनी लगेच जंजिरा किल्ल्यापासून ३ किलो मीटर अंतरावर एक किल्ला बांधला त्याला पद्मदुर्ग किल्ला या नावाने ओळखले जाते.

हा किल्ला बांधल्यामुळे सिद्दी ची सर्व बाजूंनी कोंडी झाली पण त्यांनी हार मानली नाही त्यांनी औरंगजेबाकडे मदत मागितली आणि मोरोपंत पिंगळे यांचा हा प्रयत्न देखील अपयशी ठरला.

१६६७ मध्ये मार्च महिन्यामध्ये पद्मदुर्ग किल्ल्यावरील शिवाजी महाराजांचे सैनिक होळीचा सन साजरा करण्यामध्ये मग्न असताना सिद्धिने सैनिकांना गाफील ठेवून त्याने पद्मदुर्ग किल्ल्यावर हल्ला करून सर्व सैनिकांची कत्तल केली आणि हा किल्ला देखील आपल्या ताब्यात घेतला. १६७५ मध्ये देखील शिवाजी महाराजांनी जंजिरा किल्ल्यावर हल्ला केला आणि त्यावेळी हा किल्ला शिवाजी महाराजांच्या हाती येता येता राहिला.

तसेच स्वराज्यातील एक बहादूर व्यक्ती लाय पाटील याने रात्री तठाला शिडी लावून तो वरती चढला आणि मावळ्यांची वाट पाहत तो पहाटे पर्यंत तो तिथेच थांबला पण मोरोपंतांना मावळ्यांना घेवून येण्यासाठी वेळ झाल्यामुळे तो तेथील शिढ्या काढून माघारी परत आला.

शिवाजी महाराजांना हे समजताच त्यांनी लाय पाटलाचे कौतुक केले आणि त्याला पालखीच मान देखील देण्यात आला या अपयशानंतर १६७८ मध्ये २ वेळा जंजिरा जिंकण्यासाठी हल्ला करण्यात आला पण त्यावेळी देखील त्यांचे प्रयत्न व्यर्थ गेले.

त्यानंतर १६८२ मध्ये संभाजी महाराजांनी दादाजी रघुनाथ यांना जंजिरेच्या मोहिमेवर पाठवले त्यांनी हा किल्ला घेण्यासाठी महिनाभर प्रयत्न केले पण सिद्दी हार मनातच न्हवता त्यावेळी संभाजी महाराजांनी डोंगर फोडून खाडी बुजवण्याचा आदेश दिला.

त्यामुळे किल्ला स्वराज्यात येण्याची चिन्हे संभाजी महाराजांना दिसत होते पण सिद्धीला पुन्हा एकदा औरंगजेबाने मदत केली आणि हा किल्ला शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात येता येता राहिला.

या प्रकारे शिवाजी महाराजांनी आणि संभाजी महाराजांनी किल्ला मिळवण्यासाठी प्रयत्न केले पण किल्ला काही हाती आला नाही. जंजिरा किल्ला कोणालाही मिळवता आला नाही. जंजिरा हा किल्ला ३३० वर्ष अजिंक्य राहिला आणि १९४७ पर्यंत हा किल्ला त्यांच्याच ताब्यात राहिला. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हे संस्थान भारतीय स्वातंत्र्यामध्ये विलीन झाले.

शिवबाने शर्थ केली | शंभूने प्राण लावला ||

मुघलांच्यामुळे सिद्ध्या | तुझा जंजिरा अजिक्य राहिला ||

मुरुड जंजिरा किल्ला फोटो:

murud janjira fort information in marathi
murud janjira fort information in marathi

या किल्ल्यावर काय पाहाल 

  • कलाल बांगडी तोफा :

किल्ल्यावर उंच अशी तठ बंदी आहे आणि त्यावर कमानी आहे त्या कमानींवर तोफा ठेवल्या आहेत. या किल्ल्यावर एकूण ५७२ तोफा आहेत असे म्हटले जाते त्यामधील एक कलाल बांगडी तोफ म्हणजे आगीचा कल्लोळ आणि धातूच्या बांगड्यानि हि तोफ बनली असून या तोफेची विशेषता म्हणजे हि तोफ उन्हामध्ये देखील गरम होत नाही. ह्या तोफांचे वजन साधारण २१ ते २२ टनाची आहे.

  • गायमुख तोफ :

कलाल बांगडी तोफेच्या लगेच बाजूला असणारी तोफ म्हणजे गायमुख तोफ या तोफेची पुढची बाजू गायीच्या तोंडासारखी बनवली आहे म्हणून या तोफेला गायमुख तोफ म्हणतात. या तोफेला लांडा कासम या नावाने देखील ओळखले जाते आणि या तोफेचे वजन ८ तन इतके आहे.

  • दर्या दरवाजा :

या दरवाजाला चोर दरवाजा देखील म्हणतात. गडावर पश्चिमेला तटाखाली एक दरवाजा आहे जो समृद्रामध्ये निघतो त्याला दर्या दरवाजा म्हंटले जाते आणि याचा वापर संकट काळी बाहेर पाडण्यासाठी केला जात होता.

  • भुयारी मार्ग ( सुरंग ) :

या किल्ल्यावर एक भुयारी मार्ग आहे आणि हा मार्ग ५० ते ६० फुट खोल असलेल्या समुद्राखालून तो राजपुरी गावापर्यंत आहे. पूर्वी या मार्गाचा वापर गुप्त मार्ग म्हणून केला जात होता.

  • सुरूलखानाचा वाडा :

किल्ल्याच्या मध्यभागी सुरूलखानाचा वाडा आहे आत्ता तो आपल्याला पडलेल्या अवस्थेत पाहायला मिळतो. याला ७ माजील महाल म्हणून ओळखले जायचे.

  • गोड्या पाण्याचा तलाव :

गोड्या पाण्याचा तलाव हा ६० फुट खोल असून या तलावाला शाही तलाव म्हणून देखील ओळखले जाते. या किल्ला समुद्रामध्ये असल्यामुळे किल्ल्याच्या सर्व बाजूला खरे पाणी आहे परंतु या तलावामध्ये गोडे पाणी आहे.

  • बाले किल्ला :

तलावाच्या बाजूने ज्या पायऱ्या आहेत त्याच्यावरून गेल्यानंतर बाले किल्ला आहे तेथे आता भारताचा झेंडा फडकतो.

  • किल्ल्यावरील शिल्प :

हि शिल्प अशी आहेत कि वाघाच्या तोंडामध्ये आणि पायामध्ये हत्ती पकडले आहेत आणि हि शिल्पे अमर्याद सागरी सत्तेचे प्रतिक दर्शवितात.

जंजिरा किल्ल्यावर कसे जायचे ?

या किल्ल्याला भेट देण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा मुंबई किवा पुण्याला जावे लागते किवा आपण विमान, रेल्वे किवा स्वताच्या गाडीने देखील जावू शकतो. मुंबई मधून जंजिरा किल्ल्याचे अंतर १६५ किलो मीटर आहे. मुंबई किवा पुण्यामधून आपल्याला अलिबाग किवा रोहा पर्यंत जावे लागेल.

अलिबाग मधून जंजिरा किल्ला ५४ किलो मीटर आहे. जंजिरा किल्ल्यावर जाण्यासाठी आपल्याला बोटीने जावे लागते आणि ह्या बोटी आपल्याला मांजरी, श्रीवर्धनम, दिघी, दिव्यागर आणि राजपुरी गाव बेट ह्या पाच ठीकांनावरून आपण बोटीने जंजिरा किल्ल्यावर जावू शकतो. राजपूर गावापासून जंजिरा किल्ल्याचे अंतर फक्त ५ ते ६ किलो मीटर असल्यामुळे तेथून जर बोट पकडली तर आपण जंजिरा किल्ल्यावर लवकर पोहचू शकतो.

जंजिरा किल्ल्यावर जाण्यासाठी पहिली बोट सकाळी ८.३० वाजता असते. तसेच मुरुडचे सर्वात जवळचे मुख्य शहर म्हणजे मुंबई जी अलिबाग मधून १६५ किलो मीटर अंतरावर आहे. येथून पण अलिबागची बस पकडून जावू शकतो कारण मुंबई बस स्थानकामधून मधून आपल्याला कोणतीही राज्य परिवहन बस आपल्याला सहज मिळू शकते.

किल्ला बघण्यासाठी मिळणारा वेळ

किल्ला बघण्यासाठी दिलेला वेळ४५ मिनिटे
किल्ल्यावर जाण्यसाठी पहिली बोट ८.३० वाजता

या किल्ल्यावर जाण्यासाठी सकाळी पहिली बोट ८.३० वाजता असते आणि या किल्ल्याला भेट देण्यासाठी आपल्याला फक्त ४५ मिनिटे मिळतात त्यामुळे जर आपण पूर्वीपासूनचा या किल्ल्याचा आणि किल्ल्याबद्दलच्या इतिहाचा अभ्यास करून गेलो तर ते आपल्या खूप फायद्याचे आणि सोयीस्कर ठरेल आणि आपल्याला पूर्ण पणे किल्ला पाहता येईल. जर आपल्याला किल्ला बघण्यासाठी गाईड हवा असेल तर तो देखील मिळू शकतो.

जंजिरा किल्ल्याबद्दल काही अनोखी तथ्ये – facts about janjira fort 

  • सिद्धींनी या किल्ल्याचे नाव जंजिरा महारूब असे ठेवले.
  • या किल्ल्यावर ५७२ तोफा आहे आणि या किल्ल्याला १९ बुरुज आहेत.
  • या किल्ल्याला ३३० वर्ष कोणीही जिंकू शकले नाही म्हणू या किल्ल्याला अभेद्य किल्ला म्हणून देखील ओळखले जाते.
  • या किल्ल्यावरील शेवटचा सिद्दी मोहमद खान होता .
  • १९४८ मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हा किल्ला स्वातंत्र्य भारतामध्ये विलीन करण्यात आला.
  • गोड्या पाण्याच्या तलावाला लागुनच राणीचा शिश महाल होता त्या महालाला ७ रंगाच्या काचा होत्या आणि त्या काचांचे प्रतिबिंब तलावातील पाण्यामध्ये पडून ते इंद्रधनुष्यासारखे दिसायचे असे म्हंटले जाते.
  • जंजिरा हा किल्ला बांधण्यासाठी २२ वर्ष लागली होती.
  • प्रवेश दारा जवळील शिल्पामध्ये एकाच वाघाच्या जाळ्यात ६ हत्ती सापडले आहेत.
  • हा किल्ला सुपारीच्या आणि नारळाच्या झाडांनी वेढलेल्या बेटावर आहे.
  • जंजिरा हा किल्ला भारतातील सर्वात नामांकित किल्ल्यांपैकी एक आहे.
  • जंजिरा किल्ल्याजवळील आकर्षणे सिद्दी पॅलेस मुरुड जंजिरा, कुडे लेणी, ईदगाह आणि खोकारी थडगे.

वरील सर्व गोष्टी पाहून आपणास अंदाज लागला असेलच, मुरुड जंजिरा किल्ला murud janjira fort information in marathi language हा कसा आहे? कोठे आहे? त्याचा इतिहास काय आहे? तिथे पाहण्यासारखी ठिकाणे आणि तसेच त्यांची वैशिट्ये कोणती आहेत.
janjira fort information in marathi हा लेख आपल्याला आवडल्यास आपल्या मित्र परिवारासोबत फेसबुक ओट्सअप्प सारख्या विविध सोशियल मेडिया वरून माहिती पोहचवा. तसेच information of janjira fort in marathi हा लेख कसा वाटला व अजून काही मुरुड जंजिरा किल्ला विषयी राहिले असेल तर आपण comments द्वारे कळवू शकता धन्यवाद.

आम्ही दिलेल्या janjira killa chi mahiti माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही janjira fort history in marathi त्यामध्ये नक्की बदल करू.  अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

2 thoughts on “जंजिरा किल्ल्याची माहिती Janjira Fort Information in Marathi”

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!