अलेक्झांडर फ्लेमिंग माहिती Alexander Fleming Information in Marathi

alexander fleming information in marathi अलेक्झांडर फ्लेमिंग माहिती, आज आपण या लेखामध्ये एक प्रसिध्द बिटनचे औषधतज्ञ आणि जीवशास्त्रज्ञ म्हणून ओळखले जाणारे अलेक्झांडर फ्लेमिंग यांच्या विषयी माहिती घेणार आहोत. अलेक्झांडर फ्लेमिंग यांचा जन्म हा युके मधील स्कॉटलंड मधील डार्व्हेल या छोट्या शहरामध्ये ६ ऑगस्ट १८८१ मध्ये झाला आणि हे एका मध्यम आणि शेतकरी कुटुंबातील होते. त्यांच्या वडिलांचे नाव ह्यु फ्लेमिंग असे होते आणि त्यांच्या आईचे नाव ग्रेस स्टर्लिंग मॉर्टन असे आहे आणि अलेक्झांडर फ्लेमिंग हे फक्त सात वर्षाचे असताना त्यांचे वडील मरण पावले होते.

अलेक्झांडर फ्लेमिंग यांचे शालेय शिक्षण हे ५ ते ८ वयोगटातील एक लहान मूरलँड शाळेमध्ये प्रवेश घेतला ज्यामध्ये १२ विद्यार्थ्यांना एकत्र शिकवले जात होते. मग त्यांनी डार्व्हेल या शाळेमध्ये प्रवेश घेतला आणि त्यांना वयाच्या ११ व्या वर्षी शैक्षणिक क्षमता ओळखून शिष्यवृत्ती मिळाली आणि त्यांना किल्मार्नोक अकादमीची शिष्यवृत्ती देण्यात आली. चला तर खाली आपण अलेक्झांडर फ्लेमिंग यांच्याविषयी आणखीन माहिती जाणून घेवूया.

alexander fleming information in marathi
alexander fleming information in marathi

अलेक्झांडर फ्लेमिंग माहिती – Alexander Fleming Information in Marathi

नावअलेक्झांडर फ्लेमिंग
जन्म६ ऑगस्ट १८८१
जन्म ठिकाणयुके मधील स्कॉटलंड मधील डार्व्हेल या छोट्या शहरामध्ये झाला
शिक्षणडार्व्हेल या शाळेमध्ये शिक्षण घेतले
ओळखबिटनचे औषधतज्ञ आणि जीवशास्त्रज्ञ
मृत्यू१९५५ मध्ये

अलेक्झांडर फ्लेमिंग यांची सुरुवात आणि कारकीर्द

  • १९०१ मध्ये म्हणजेच वयाच्या विसाव्या वर्षी अलेक्झांडर फ्लेमिंग यांना त्यांच्या काकांच्याकडून काही पैसे मिळाले होते आणि त्यांनी त्या पैश्याचा वापर हा एक वैद्यकीय शाळेमध्ये जाण्यासाठी वापरला कारण त्यांना एक चांगला डॉक्टर बनायचे होते.
  • त्यांनी १९०३ मध्ये वयाच्या २२ व्या वर्षी अलेक्झांडरने लंडनच्या सेंट मेरी हॉस्पिटलमध्ये प्रवेश घेतला आणि तीन वर्षाचे बॅचलर ऑफ मेडिसिन आणि बॅचलर ऑफ सर्जरी हि पदवी प्राप्त केली.
  • मग त्यांनी सेंट मेरी हॉस्पिटल मेडिकल स्कूलमध्ये त्यांच्या बॅक्टेरिओलॉजी गटामध्ये ते संशोधक झाले आणि आणि त्यांनी त्या गटामध्ये संशोधन सुरु केली आणि हे संशोधन करत असतानाच त्यांना १९०८ मध्ये बॅक्टेरिओलॉजीमध्ये पदवी मिळाली. आणि यामध्ये त्यांनी अव्वल म्हणून सुवर्णपदक देखील मिळवले.
  • मग त्यानंतर त्यांना पदवी मिळाल्यानंतर ते सेंट मेरी हॉस्पिटल मेडिकल स्कूलमध्ये बॅक्टेरिओलॉजीचे लेक्चरर म्हणून काम करू लागले.
  • १९१४ मध्ये एक महायुध्द झाले आणि आणि त्यावेळी ते सैन्यामध्ये सामील झाले होते आणि ते फ्रान्समधील फिल्ड हॉस्पिटल मध्ये असणाऱ्या रॉयल आर्मी मेडिकल कॉर्प्समध्ये ते कॅप्टन बनले.
  • ज्यावेळी युध्दामध्ये सैनिकांना जखमा होत होत्या त्यावेळी त्यांना अँटीसेप्टिक लावले जात होते परंतु यामुळे आणखीनच खोलवर होत होत्या आणि यावेळी अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी असे सिध्द केले कि खोलवर असलेल्या जखमांना अँटीसेप्टिक वापरले तर ते हानिकारक ठरू शकते कारण ते फक्त वरच्या जखमांच्यावर काम करते, खोल जखमांच्यावर नाही.

अलेक्झांडर फ्लेमिंग शोध – पेनिसिलिनचा शोध

बिटनचे औषधतज्ञ आणि जीवशास्त्रज्ञ म्हणून ओळखले जाणारे अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी १९२९ मध्ये एक महत्व पूर्ण कामगिरी केली ती म्हणजे पेनिसिलीनचा शोध. ज्यावेळी ते प्रयोगशाळेमध्ये काही दिवसांच्या सुट्टीनंतर परतले त्यावेळी त्यांच्या बेंचवर ठेवलेल्या पेट्री डीशचा ढीग पहिला आणि डिशेसमध्ये स्टॅफीलोकोकस बॅक्टेरियाच्या वसाहती होत्या. त्याच्या एका सहाय्यकाने खिडकी उघडली.

त्यामुळे त्या ठिकाणी असणारी भांडी हि वेगवेगळ्या सूक्ष्मजंतूंच्यामुळे दुषित झाली आणि त्यावेळी त्या दुषित झालेल्या डीशेस आणि भांडी पहिली आणि त्यामधील एकमध्ये काही उल्लेखनीय घडल्याचे दिसून आले कि बुरशी वाढत होती आणि त्याच्या सभोतालच्या बॅक्टेरिया वसाहती नष्ट होत होत्या आणि त्यावेळी फ्लेमिंग यांनी त्यांच्या सहाय्यकाला ती डिश दाखवली.

ज्याने फ्लेमिंगो लाईसोझाइमच्या प्रसिध्द शोधाशी हे किती साम्य आहे यावर भाष्य केले आणि यामुळे त्यांना लाईसोझाइमपेक्षा चांगले नैसर्गिक प्रतिजैविक सापडले. त्यांनी ७ मार्च १९२९ मध्ये त्या प्रतीजैविकाला पेनिसिलीन असे औपचारिक नाव दिले. त्यांनी शोधून काढलेल्या पेनिसिलीनने न्युमोनिया, लाल रंगाचा ताप, डीप्थीरियासाठी जबाबदारी असलेल्या असलेल्या बॅक्टेरीयांच्या विविध प्रजातींचा नाश केला हे दाखवून दिले.

अलेक्झांडर फ्लेमिंग यांच्याविषयी काही विशेष आणि मनोरंजक तथ्ये – facts

  • ज्यावेळी अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी पेनिसिलीनचा शोध लावला त्यावेळी पेनिसिलीन तयार करणाऱ्या बुरशीपासून वेगळे करणे कठीण होते आणि त्याचबरोबर पेनिसिलीन हे मंद गतीने काम करत होते.
  • १९४५ मध्ये अलेक्झांडर फ्लेमिंग यांना त्यांच्या पेनिसिलीन या कार्यासाठी त्यांना नोबेल पारितोषिक देण्यात आले होते.
  • फ्लेमिंग यांच्या पत्नीचे नाव सारा असे होते आणि ती १९४९ मध्ये मरण पावली होती आणि त्यांना एक रॉबर्ट नावाचा मुलगा देखील होता.
  • १९५३ मध्ये फ्लेमिंग यांनी ग्रीक संशोधक अमालीया विरेका कौटसोरीसशी दुसरे लग्न केले होते.
  • अलेक्झांडर फ्लेमिंग हे फक्त सात वर्षाचे असताना त्यांचे वडील मरण पावले होते.
  • अलेक्झांडर फ्लेमिंग यांचा मृत्यू हा वयाच्या ७४ व्या वर्षी हृदय विकाराच्या झटक्याने झाला होता.
  • अलेक्झांडर फ्लेमिंग यांचा जन्म हा युके मधील स्कॉटलंड मधील डार्व्हेल या छोट्या शहरामध्ये एका मध्यम आणि शेतकरी कुटुंबामध्ये झाला.
  • असे म्हटले जाते कि अलेक्झांडर फ्लेमिंग यांचे शोध हे खूप गांभीर्याने घेतले नाहीत.
  • पहिल्या महायुध्दामध्ये अलेक्झांडर फ्लेमिंगला अँटीसेप्टिककिती घातक असतात याची जाणीव झाली आणि त्यांनी इतरांना देखील त्याची जाणीव करून दिली.
  • त्यांचे पालनपोषण हे प्रेस्बीटेरियन कुटुंबामध्ये झाले.

आम्ही दिलेल्या alexander fleming information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर अलेक्झांडर फ्लेमिंग माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या scientist alexander fleming information in marathi या all information about alexander fleming in marathi article मध्ये update करू, मित्रांनो हि information about alexander fleming in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!