Amba Ghat Information in Marathi Language आंबा घाट हा प्रसिद्ध निसर्गरम्य घाट हा पश्चिम महाराष्ट्रात रत्नागिरी जिल्ह्यात येतो. सुरवातीच्या काळात आंबा घाटामध्ये जायला पक्का रस्ता नव्हता त्या वेळी लोक पायी चालत जात असत तेव्हा एका गुराख्याने आंबा घाटात जाण्यासाठी रस्ता शोधून काढला. समुद्रसपाटीपासून आंबा घाट दोन हजार किलोमीटर अंतरावर आहे. नैसर्गिक आंबा घाट हा महाराष्ट्राला लाभलेली एक नैसर्गिक देणगी आहे. हा घाट रत्नागिरी व कोल्हापूर जिल्हा यांना जोडला गेला. हा घाट दोन्ही जिल्ह्यांना जोडणारा दुवा आहे. असा हा घाट वळणा वळणानाचा व धोकादायक वळणे असणारे आहे. आपण बघितला असाल या घाटात बरेचसे अपघात झाले आहेत. पण हा घाट त्याच्या निसर्ग सौंदर्यासाठी आणि पर्यटनसाठी प्रसिद्ध आहे.
आंबा घाट माहिती – Amba Ghat Information in Marathi
आंबा घाट | माहिती |
श्रेणी | पश्चिम घाट |
लांबी | आंबा घाटातून विशालगड 76 किलोमीटर अंतरावर आहे |
कोठे आहे | महाराष्ट्रात रत्नागिरी जिल्ह्यात येतो |
पाहण्यासारखी ठिकाणे | विशाल गड, पन्हाळा पावनखिंड, मार्लेश्वर धबधबा, मानोली धबधबा |
रस्ता | हा घाट रत्नागिरी व कोल्हापूर जिल्हा यांना जोडता |
आंबा घाटाचं सौंदर्य पाहून पर्यटक त्याच्या प्रेमात पडण्यापासून स्वतःला आवरू शकत नाही. घाटात गाईमुख हे तीर्थक्षेत्र आहे. घाटात हॉटेल सुरुवातीला आहेत पण नंतर नाही पण आपण आधी हॉटेलमध्ये जाऊन जेवण करू शकता. साखरपा गाव हे घाटाच्या आधीचे रत्नागिरी जिल्ह्यातील शेवटचे गाव आहे. त्यामार्गे मुंबईकडून येणाऱ्यांना घाटात पोहोचता येते. या घाटात बरेच पॉइंट आहेत तिथून पर्यटकांना निसर्ग सौंदर्य पाहता येते तो आनंद खूप लाभदायक असेल. आंबा घाटातील रस्ता हा भारतातील सर्वात सुंदर नैसर्गिक घाट रस्ता आहे.
आंबा घाटात सकाळच्या वेळी भरपूर धुके असतात. समोरून येणारी गाडी आपल्याला सरळ दिसत नाही. वातावरण एकदम थंड असते. हा घाट तेथील थंडगार वातावरण आणि त्याचे सौंदर्य यासाठी ओळखला जातो. हा घाट वर्षभर पाहण्यासारखा असतो पावसाळा, उन्हाळा आणि हिवाळा. पण पावसाळ्यात याचे सौंदर्य डोळ्या टिपून ठेवावे असे असते. आंबा घाटात एतिहासिक दोन पाहण्यासारखी महत्त्वाची ठिकाणे म्हणजे विशाल गड आणि पावनखिंड. आंबा घाटातून विशालगड 76 किलोमीटर अंतरावर आहे. तसेच आंबा घाटातील धबधबे, निसर्ग, येथील धुके, जैवविविधता पाहण्यासारखे आहेत.
- नक्की वाचा: माळशेज घाटाची माहिती
विशाल गड :
विशाल गड हा नावाप्रमाणेच विशाल आहे. कातळ खडकाचा बनलेला हा गड. गडावर जायला एकमेव वाट. गडाच्या मुख्य दरवाज्याच्या समोरच मोठी खोल दरी आहे. तिथे दोन नद्या उगम पावतात. एक उजवीकडे कोकणात जाते तर दुसरी डावीकडे पश्चिम महाराष्ट्र कोल्हापूर कडे जाते. ही दरी ओलांडल्यानंतर आपल्याला एक मंदिर आकर्षिले जाते. हे मंदिर म्हणजे खोकलाई देवीचे मंदिर. पुढे गेल्यानंतर सरळ आपल्याला दर्गा चौक पाहायला मिळतो. हा दर्गा म्हणजे’ हजरत मलिक रिहान ‘सुफी संतांचे अतिशय सुंदर स्थान आहे.
या दर्ग्यात मुस्लिम बांधवा बरोबरच हिंदू भाविक मोठ्या प्रमाणात येताना दिसतात. दर्ग्याचे वातावरण स्वच्छ, सुंदर व अप्रतिम बांधकाम आहे. दर्ग्याच्या आत नवा साज चढवलेला विशेषता मीनाकाम, अप्रतिम केलेले कुराणाचे काही आहे ते करून संगमरवरावर लिहिलेले आहे. त्यामुळे या भव्य सभेत आणि धार्मिकतेत आणखी वाढ होते. राजाराम महाराजांच्या तिसऱ्या पत्नीची समाधी व बाजीप्रभू देशपांडे यांचे भाऊ फुलाची देशपांडे यांचीही समाधी या गडावर आहे. मुंडा दरवाजेच्या पलीकडे एक उंचवट्यावर तोफ ठेवली आहे.गडावर एकूण दोन तोफा आहेत. या दरवाजापासून पुढे गेल्यानंतर दोन विहिरी पाहायला मिळतात.एक विहीर उंचावर तर दुसरी थोडीशी खाली आहे.
पन्हाळा पावनखिंड :
विशाळगडाच्या पूर्वेला दहा किलोमीटर अंतरावर पावनखिंड आहे.बाजीप्रभू देशपांडे यांच्या मृत्यूनंतर शिवाजी महाराजांनी गजापुरच्या खिंडीला पावनखिंड असे नाव दिले. पन्हाळा म्हटलं की डोळ्यासमोर जलद गतीने जाणाऱ्या ट्रेन सारख्या काही गोष्टी समोर येतात. सिद्धी जोहरच्या 40000 सैनिकांचा वेडा, हाती तलवार न घेता प्राणाची आहुती देणारे शिवा काशिद, स्वराज्याचा निर्माता सुखरूप रहावा यासाठी प्राणाची आहुती देणारे बाजीप्रभू देशपांडे. पन्हाळा गडाच्या मागच्या बाजूने गड उतरल्यानंतर मसाई पठार लागते.
हा संपूर्ण पठार हिरव्या शालूने वेढलेला आहे.पावसाळ्यामध्ये या पठाराचे रूप मोहक वाटते. पन्हाळा ते पावनखिंड प्रवास करत असताना वाटेत आपल्याला डोंगर रंगाचे दर्शन होते. लांबच लांब पसरलेली डोंगराची रांग, झाडाझुडपात लपलेली जंगल वाट,डोंगराच्या घळीतून वाहत येणारे ओढे, दुधावानी स्वच्छ पाण्याचे सौंदर्य हे सर्व अनुभवायला मिळतं.
मार्लेश्वर धबधबा :
मार्लेश्वर हे मारळ गावाजवळ आहे. मारलेश्वर डोंगराच्या डोंगर कपारीतून आणि शेताच्या बांधाच्या मधून पाण्याचे ओघळ वाहत असताना दिसतात. या मारलेश्वर डोंगराच्या थोडं पुढे गेल्यानंतर वाघाडी पॉईंट पाहायला मिळतो. मारळ गावाजवळ मारलेश्वर धबधबा आहे. येथे पर्यटकांची खूप गर्दी असते. मार्लेश्वराच्या धबधब्यातून डोंगरातून नदीच्या रूपाने मारळ गावात उतरणार पाणी पाहून मन अगदी आनंदित होऊन जातं. तसेच या परिसरात मार्लेश्वराचे शिवमंदिर सुद्धा आहे. हा धबधबा पाहण्यासाठी अंबा घाटातून एसटीची सुद्धा सोय केली आहे.
मानोली धबधबा :
मानोली धबधबा हा त्याच्या भौगोलिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. विशाल गडापासून मानोली हे अंतर तीन किलोमीटर एवढे आहे. मानोलीतले डोंगर हिरव्यागार शालिनी आच्छादले आहेत. मानोलीचा धबधबा प्रत्येकाला आपल्याकडे आकर्षित करून घेतो. हा धबधबा मानोली धरणाच्या पन्नास फूट अंतरावरून खाली कोसळतो. हा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची खूप गर्दी असते.
- नक्की वाचा: आंबोली घाटाची माहिती
जैवविविधता :
आंबा घाटातील जंगल एक महत्त्वाचे जंगल आहे. दोन मोठ्या जंगलांना जोडणारा पट्टा आहे असे अभ्यासकांचे म्हणणे आहे. या घाटात फिरताना लक्षात येते कि दक्षिणेकडील बावडामार्गे हे जंगल राधानगरी अभयारण्याला जोडलेले आहे तर उत्तरेकडे चांदोली राष्ट्रीय उद्यान मार्गे कोयना अभयारण्य व महाबळेश्वरला जोडलेले आहेत. या घाटात वन अभयारण्याचा आपल्याला जवळून अभ्यास करता येतो. घाटमाथ्यावरील बावळ पट्ट्यातील सदाहरित मिश्र सदाहरित व दमट पानझडी या तिन्ही प्रकारची जंगले विविध टप्प्यावर पाहायला मिळतात. रत्नागिरीच्या बाजूने आंबा चढून आला की पहिल्यांदा सदा हरित पट्टा लागतो.
कोल्हापूरच्या बाजूने आलं तर दमट पानझडीचा पट्टा लागतो. या जंगलात सांबर, गवा, बिबट्या, भेकर यासारखे प्राणी पाहायला मिळतो. तसेच या जंगलात अनेक पक्षी आपल्या मधुर आवाजाने पर्यटकांचे स्वागत करत आहेत असे वाटते.या जंगलात आपल्याला मोर, पावशा, बुलबुल असे अनेक पक्षी पाहायला मिळतात.
आंबा घाट फोटो
कसे जाल :
मुंबई-गोवा हायवेने जाताना संगमेश्वर नंतर डावीकडे वळून साखरपामार्गे 40 किलोमीटर अंतर पार करून आंबा घाटापर्यंत जाता येते. जर कोल्हापूर कडून जायचे असल्यास पन्हाळा चांदोली मार्गे 70 किलोमीटर अंतर पार करून घाटापर्यंत पोचता येते.
वरील सर्व गोष्टी पाहून आपणास अंदाज लागला असेलच, आंबा घाट amba ghat information in marathi wikipedia हा कसा आहे? कोठे आहे? तिथे पाहण्यासारखी ठिकाणे आणि तसेच त्यांची वैशिट्ये कोणती आहेत. amba ghat ratnagiri हा लेख आपल्याला आवडल्यास आपल्या मित्र परिवारासोबत फेसबुक ओट्सअप्प सारख्या विविध सोशियल मेडिया वरून माहिती पोहचवा. तसेच information about amba ghat in marathi हा लेख कसा वाटला व अजून काही आंबा घाटा विषयी राहिले असेल तर आपण comments द्वारे कळवू शकता धन्यवाद.
आम्ही दिलेल्या amba ghat kolhapur माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही amba ghat in marathi त्यामध्ये नक्की बदल करू. अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट