आंबोली घाट माहिती Amboli Ghat Information in Marathi

Amboli Ghat Information in Marathi आंबोली घाट महाराष्ट्राच्या निसर्ग संपत्तीचा कणा म्हणजे सह्याद्री. या सह्याद्रीमधील वळणावळणाची घाट पर्यटकांना नेहमीच खुणावतात. महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबोली हे ठिकाण आहे. या ठिकाणी पावसाळ्यामध्ये भरपूर पाऊस पडतो. त्यामुळे येथील हवामान थंड असते. सह्याद्रीच्या डोंगर रांगेतील आंबोली  घाट हा पर्यटकांचा सर्वाधिक आवडता आणि आकर्षित घाट आहे. त्याचे कारणही तसेच आहे. कारण या घाटामध्ये पारपोली गावाजवळ धबधबा आहे आणि हा धबधबा तेथील सर्वात मोठा धबधबा आहे. पावसाळ्याला सुरूवात झाली की धबधबे वाहू लागतात. महाराष्ट्रातील महत्वाचा असा हा घाटमार्ग असून पश्चिम महाराष्ट्र आणि कर्नाटकला जोडणाऱ्या या घाट मार्गातून प्रवास करण्याचा आनंद काही वेगळाच असतो. पावसाळ्याला सुरूवात झाली की धबधबे वाहू लागतात.

amboli ghat information in marathi
amboli ghat information in marathi / amboli falls

आंबोली घाट माहिती – Amboli Ghat Information in Marathi

आंबोली घाटमाहिती
लांबी३० किमी.
कोठे आहेमहाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबोली
पाहण्यासारखी ठिकाणेनांगरतास धबधबा, घनदाट जंगल , हिरण्यकेशी नदीचा उगम,  महादेव मंदिर, सनसेट पॉईंट, कावळेशेत पॉईंट इत्यादी

महाराष्ट्रातील महत्वाचा असा हा घाटमार्ग असून पश्चिम महाराष्ट्र आणि कर्नाटकला जोडणाऱ्या या घाट मार्गातून प्रवास करण्याचा आनंद काही वेगळाच असतो. तसेच नांगरतास धबधबा, घनदाट जंगल , हिरण्यकेशी नदीचा उगम,  महादेव मंदिर, सनसेट पॉईंट, कावळेशेत पॉईंट इत्यादी पाहण्यासारखी ठिकाणे आहेत. हे सर्व पाहण्यासाठी आंबोली घाटात पर्यटकांची खूप गर्दी असते. आंबोली घाटातील रस्ता नागमोडी वळणाचा आहे. तसेच आंबोली घाटाला महाराष्ट्राचे चेरापुंजी असे म्हणून सुद्धा ओळखले जाते. चहुबाजूंनी हिरवळ डोंगराच्या रांगा आहेत. तसेच ह्या घाटामध्ये एवढे धुके पडते समोरचे काहीच दिसत नाही. तेथील वातावरण हे माणसाला वेड लावून टाकण्यासारखे आहे.

धबधब्यावरच्या माणसांनी नटला

पाण्याच्या झोताने थाटला

चहुबाजूनी डोंगराच्या रांगा

हिरवळीन ह्या सजल्या

धबधबा वरची फेमस कनस भजी

आहेत आमच्या अंबोलीची

घाटातली धुके भासते जणू स्वर्गच

येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांना

दिसेना पुढचा मार्गच

आंबोलीतील धबधबा – Amboli Falls

महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली येथे सर्वाधिक पाऊस पडतो. पावसाळ्यात जुलै महिन्यामध्ये तेथील धबधबा पाहण्यासारखा असतो. पाऊस मोठा असल्यामुळे तेथील गाड्यांचा वेग ही कमीअसतो. आंबोली येथील धबधबा हा पर्यटकांसाठी मोठी पर्वणीच आहे. हा धबधबा पाहण्यासाठी आंबोली घाटामध्ये पर्यटकांची खूप गर्दी असते. वाहनांची, पर्यटकांची गर्दी असल्यामुळे तेथे पोलिस ही हजर असतात. हा धबधबा पाहण्यासाठी आंबोली घाटात एवढी गर्दी असते की तेथील पर्यटकांच्या वाहनांची पार्किंगची व्यवस्था ही धबधब्या पासून तीन किलोमीटर अंतरावर केलेली आहे. तिथे एका बाजूला मोठी दरी आणि दुसऱ्या बाजूला डोंगर कडा आहे.

आंबोली घाटात रस्त्याच्या कडेला असलेल्या कोठड्यावर माकडे आणि त्यांची छोटी छोटी पिल्ले खूप प्रमाणात आहे. धबधब्याकडे जाण्यासाठी तिथे पायर्‍या आहेत. उंचावरून पडणारे पाणी खूप मोठे असल्यामुळे ते पाणी पायऱ्या वरून सुद्धा खाली येत होते. धबधब्याचे दिसणारे दृश्य खूप मनमोहक आहे.

हिरण्यकेशी नदीचा उगम स्थान:

आंबोलीला गेल्यानंतर आवर्जून भेट देण्यासारखे ठिकाण म्हणजे हिरण्यकेशी नदीचा उगम. धबधब्यापासून तीन चार किलोमीटर अंतरावर  हिरण्यकेशी नदीचा उगम झालेला पाहायला मिळतो. ही नदी एका गुहेत उगम पावून पुढे वाहत जाते. ह्याच्या उगमस्थानी महादेवाचे मंदिर आहे. त्याच्या बाजूला जवळच एक कुंड आहे. तेथे बाहेरून आलेले पर्यटक आंघोळ करून घेतात. या नदी पासून थोड्याच अंतरावर  नांगरतास धबधबा सुद्धा आहे. हा धबधबा तेथून पुढे आठ किलोमीटर अंतरावर आहे. चिंचोळ्या पट्टीतून वाहणारा हा पांढराशुभ्र धबधबा नीट पाहता यावा म्हणून त्याच्याजवळ गॅलरी तयार करण्यात आली आहे व एक छोटासा पूल ही बांधला आहे या धबधब्याच्या प्रवाहामुळे नांगराने नांगरल्यानंतर जशा छटा दिसतात तशाच छटा या धबधब्यात दिसून येतात म्हणून या धबधब्याला नांगरतास धबधबा म्हणतात

कावळेशेत पॉइंट:

कावळेसाद पॉइंट हा अतिशय आकर्षक पॉइंट आहे. या पॉईंटला निसर्ग निर्मितीचा खजिना म्हटले तरी काय चुकीचे होणार नाही.समोर दिसणारी मोठी दरी आणि समोरून येणारे ढग आणि त्यातूनच येणारे सूर्य किरण यामुळे कावळेसाद पॉइंट ला आकर्षक असे सौंदर्य लाभले आहे. दरीच्या बाजूला लोखंडी कठडा केलेला आहे. तेथून निसर्गाचा मनमोहक देखावा पाहायला मिळतो. या दरी मध्ये कोणती वस्तू फेकली तर ती वस्तू उलट दिशेने आपल्याकडे परत येते. त्यामुळे तेथे येणारे पर्यटक या दरी मध्ये पाण्याच्या बॉटल, रुमाल आणि अजूनही अशा हलक्या वस्तू ज्या वाऱ्याबरोबर वाहू शकतील अशा वस्तू दरीमध्ये फेकून  मजा करतात.

आंबोली घाटात कसे जाल- where is amboli ghat

मुंबई, पुणे, सावंतवाडी, बेळगाव, गोवा या ठिकाणावरून आंबोली घाटात जाता येते. या घाटातून महाराष्ट्र-कर्नाटक बसेसची सोय केली आहे. तसेच आपण स्वतः कार घेऊन  जाऊ शकतो. गोव्याहून आंबोली घाट हा  117 किलोमीटर अंतरावर आहे. बेळगावहून जायचे असेल तर आंबोली घाट आपल्याला साठ किलोमीटर अंतरावर पाहायला मिळतो तर सावंतवाडीतून तीस किलोमीटर अंतरावर आहे.

संशोधन:

महाराष्ट्राची ओळख असलेल्या आंबोली परिसरात गेल्या काही वर्षात साप, बेडूक, सरड्यांच्या नवीन प्रजाती संशोधकांनी शोधल्या आहेत. संशोधकांच्या या मालिकेत आता नवीन भर पडली आहे. ती म्हणजे गवताच्या नवीन जातीची. कोणत्यातरी वनस्पतीला अंबोलीचे नाव पहिल्यांदाच देण्यात आले आहे.आघारकर संस्थेतील संशोधन शास्त्रज्ञांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली मध्ये गवताची नवीन प्रजाती शोधली आहे. “ईश्चिमम आंबोलीएन्स” असे नाव या गवताला देण्यात आले आहे.

आंबोली हे निसर्ग अभ्यासकांसाठी नंदनवन आहे. पश्चिम घाटातील विपुल जैवविविधता लाभलेल्या या जंगलामध्ये विविध प्रकारचे संशोधन सुरू आहे. आघारकर संशोधन संस्थेतील डॉक्टर रितेश कुमार चौधरी, डॉक्टर शुभदा ताम्हणकर, सारंग बोकील आणि डॉक्टर मंदार दातार या शास्त्रज्ञांनी अंबोली मध्ये गवताची नवीन जात शोधली आहे.आज पर्यंत आंबोली मध्ये अनेक नव्या सजीवांचा शोध लावला गेला आहे. आंबोली चा सन्मान करण्यासाठी गवताच्या नामकरणात या ठिकाणाचा उल्लेख केला गेला आहे. ईश्चिममच्या जगभरात 81 जाती आढळतात. यातील 61 जाती आपल्या देशात आढळतात. विशेष म्हणजे यातील 70 टक्क्याहून अधिक जाती या पश्चिम घाटात आढळतात. “ईश्चिमम आंबोलीएन्स” हे गवत पश्चिम घाटाच्या पायथ्याशी एका ओढ्यामध्ये आणि अंबोली गावातील भात खाचरामध्ये आढळले.

वरील सर्व गोष्टी पाहून आपणास अंदाज लागला असेलच, आंबोली घाट amboli ghat information in marathi language हा कसा आहे? कोठे आहे? तिथे पाहण्यासारखी ठिकाणे आणि तसेच त्यांची वैशिट्ये कोणती आहेत. amboli information in marathi हा लेख आपल्याला आवडल्यास आपल्या मित्र परिवारासोबत फेसबुक ओट्सअप्प सारख्या विविध सोशियल मेडिया वरून माहिती पोहचवा. तसेच information about amboli ghat in marathi हा लेख कसा वाटला व अजून काही आंबोली घाटा विषयी राहिले असेल तर आपण comments द्वारे कळवू शकता धन्यवाद.

आम्ही दिलेल्या amboli falls माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही amboli ghat in marathi त्यामध्ये नक्की बदल करू.  अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!