Malshej Ghat Information in Marathi माळशेज घाट पावसाळा आणि माळशेज घाट फक्त नावच खूप आहे. झाडा झाडातली धुक्याची ती शाल, नदी झऱ्यांचा पदर, भन्नाट रानवारा, फेसाळणारे धबधबे आणि ढगांचा तो खेळ, स्वप्नात स्वर्गच जणू. कल्याण-अहमदनगर महामार्गावर असणारा माळशेज घाट म्हणजे पावसाळी पर्यटकांना मोहित करणारा महाराष्ट्राचा काश्मीरच जणू. हिरवीगार नटलेली वनराई आणि आकाशाला गवसणी घालणारे उंच उंच पर्वत त्यावरून कोसळणारे पांढरेशुभ्र धबधबे ही माळशेजची प्रमुख आकर्षणे. कल्याणहुन निघाल्यावर मुरबाड पासून जवळपास पंचेचाळीस ते पन्नास किलोमीटर अंतरावर हा माळशेज घाट आहे. मुरबाड पासून निघाल्यावर निसर्गाच्या सानिध्यात वसलेले टोकावडे हे माळशेजपासून जवळच असलेले, मोठ्या लोकवस्तीचे गाव असावे बहुतेक.
या गावात आल्यावर घाटातील असणाऱ्या परिस्थितीचा थोडाफार अंदाज आपल्याला येऊन जातो. जशीजशी बस माळशेजकडे प्रस्थान करू लागते, तसतसा हा महामार्ग वेडीवाकडी सुबक वळणे घेत डोंगराच्या कुशीत शिरकाव करायला सुरुवात करतो. जस जसा घाट जवळ येईल तस-तसे अद्भुत निसर्गाचे दर्शन घडू लागते. पावसाळा ऋतु असल्यामुळे सर्वत्र हिरवळ पाहून मनाची आतुरता जाणवू लागते. टोकावडे पासून तासाभराच्या प्रवासानंतर आपण माळशेजच्या जवळ पोहोचतो जशा डोंगर रांगा दिसू लागतात तसतसे उत्सुकता शिगेला जाते.
माळशेज घाट माहिती – Malshej Ghat Information in Marathi
माळशेज घाट | माहिती |
लांबी | १३० किमी. पुणेपासून |
कोठे आहे | महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात |
पाहण्यासारखी ठिकाणे | हरिश्चंद्रगड, कृष्णा बेला, व्यू पॉइंट इत्यादी |
माळशेजच्या अगोदरच प्रसिद्ध अशा नाणेघाटाची कमान मोहित करते आणि खरा निसर्ग काय असतो याची जाणीव होते. नाणेघाटाच्या रस्त्यापासून आता खऱ्या अर्थाने डोंगररांग दर्शनाला येते. हिरवीगार नटलेली वनराई आणि ते विलोभनीय दृश्य पाहावयास मिळते. जसजसे आपण पुढे जाऊ तसतसे माळशेजची सुंदरता अजूनच खुलून दिसते. नागमोडी वळणे घेत बोगद्यातून जाणारा रस्ता, कड्यावरून कोसळणारे पावसाच्या पाण्याचे फवारे,पावसाच्या पाण्याचे जोरात फेसाळत येणारे धबधबे, लहान लहान असलेली कौलारू घरं, डोंगरांगावर नजर फिरवली असता डोंगराच्या कुशीत अलगद येणारे धुके दृष्टीस पडतात एका वेगळ्याच दुनियेत गेल्याचे भास होते.
- नक्की वाचा: आंबोली घाटाची माहिती
मोरोशी गावच्या थोडे पुढे गेले की लगेच हिरव्यागार शालू वरुण कोसळणारे धबधबे नजरेस पडतात. तिथे असणाऱ्या धबधब्याचे नाव काळू. तो धबधबा खडकावरून वाहत येऊन नदीला संगम पावतो. पावसाची रिमझिम चालूच असते तसेच सगळीकडे ओढे-नाले वाहत राहतात. अशा वातावरणात पर्यटक मनसोक्त भिजत असतात. आणि फोटोसेशन सुद्धा करतात. तेथे पर्यटकांची खूप गर्दी असते आणि त्यांना कंट्रोल करण्यासाठी पोलीसही नियुक्त झालेले आहेत. एखाद्या गोल्डमॅन च्या अंगावर जसे जागोजागी सोने असते तसे माळशेजच्या घाटाच्या अंगावर धबधबे दिसतात. रस्त्याच्या कडेने वाहणारे काही धबधबे लक्षणीय आहेत. त्यातील एक धबधबा तर डोंगराच्या कपारीत वरून डायरेक्ट रोडच्या मध्यभागी कोसळतो व तिथून जाणाऱ्या प्रत्येक गाडीला धुऊन काढतो असे वाटते.
तेथील रस्ता चढ-उतार असा आहे. डोंगरातून प्रवास करताना रस्त्याच्या कडेला आदिवासी बांधव रानमेवा घेऊन उभे असलेले आपल्याला पाहायला मिळतात. तिथून पुढं आल्यावर आता बस डोंगराच्या अगदीच कपारीतून जाऊ लागते.त्याच्या एका बाजूला खोल दरी आणि त्यावर पांघरून असलेली ढगांची चादर मन मोहून टाकते. दुसऱ्या बाजूला काळ्या खडकातून वाट काढत चाललेला घाटाचा उंचवटा आणि तीव्र कपारी लक्ष वेधून घेतात. घाट पाहण्यासाठी पर्यटकांची तेथे खूपच गर्दी असते. जोरात कोसळणारे माळशेजचे ते पांढरेशुभ्र धबधबे खूपच सुंदर आणि अप्रतिम आहेत.
हरिश्चंद्रगड :
तिथून पुढे गेल्यानंतर हरिश्चंद्रगडाच्या रांगा पाहायला मिळतात.तसेच समोर असणारी दरी त्यात घनदाट जंगल असल्यामुळे त्यात विविध प्रकारचे पक्षी जसे ससे, घोरपड, मुंगुस, बिबळ्या अशा प्रकारचे वन्य प्राणी वावरत असतात. माळशेज घाटाच्या डावीकडे अत्यंत दिमाखात असा उभा असणारा पर्वत म्हणजे हरिश्चंद्रगड होय. हरिश्चंद्रगडाला दोन चार हजार वर्षांपूर्वीची पौराणिक पार्श्वभूमी लाभली आहे. चहुबाजूंनी नटलेल्या रौद्रभीषण कडेकपारींनी नैसर्गिक संरक्षण लाभलेल्या या हरिश्चंद्रगडाचा उल्लेख प्राचीन अग्नीपुराणात आढळतो. 1747 -48 मध्ये हा किल्ला मराठ्यांनी मोगलांकडून घेतला आणि किल्लेदार म्हणून कृष्णाजी शिंदे यांची नियुक्ती केली गेली होती. महाराष्ट्रातील इतर पारंपारिक किल्ल्यांपासून हा किल्ला वेगळा आहे. इतर किल्ल्यांमध्ये आढळणारी तटबंदी येथे दिसत नाही.
या किल्ल्यावर प्राचीन लेणी आहेत. तसेच साधारणपणे 12 व्या शतकामध्ये जुने शालिवाहन काळातील शिव मंदिर आहे. सह्याद्रीतील अंत्यंत दुर्गम किल्ला म्हणून याची ओळख आहे. या किल्ल्यावर महादेवाचे सुंदर मंदिर आहे. केदारेश्वराची गुहा आहे. तारामती हे येथील सर्वात उंच शिखर आहे.कोकणकडा म्हणजे हरिश्चंद्रगडावरील सर्वात मोठे आकर्षण.कोकणकडा म्हणजे गिर्यारोहकांना आकर्षणाचे स्थान आहे. हरिश्चंद्रगडाच्या परिसरात जैविक विविधता मोठ्या प्रमाणात आहे.
कृष्णा बेला आणि व्यू पॉइंट :
माळशेज हा मुख्य घाट रस्ता असल्याने एसटी व बऱ्याच गाड्या पुण्या-मुंबईहून ये जा करत असतात. तिथून पुढे गेल्यानंतर आपल्याला एक बोगदा पहायला मिळतो अन त्यानंतर थोडा उतार चालू होतो बोगद्यातून बाहेर पडताच दोन पॉईंट लागतात. एक म्हणजे “कृष्णा बेला “आणि दुसरा” व्यूपॉईंट “हे पाहण्यासाठी पुढे गेले तर एक विलक्षण मूर्तीप्रमाणे खडकाची आकृती दिसत दिसते. जणू काही एखादा स्टेचू . बाहेरचा नजारा पाहिला असता निसर्गाचे नयनरम्य अद्भूत रूप. जणू काही स्वर्गात भ्रमंती करत असल्याचे जाणवते. निसर्गाचे मनमोहक रूप पाहायला मिळते. या ठिकाणी पर्यटकांची खूप गर्दी असते.
ही गर्दी पाहून तिथे बाजार भरल्यासारखं वाटते. तेथून सर्व घाट व खड एकाच वेळेस पाहायला मिळतात. तेथून अत्यंत विलोभनीय असे दृश्य दिसते. त्यात तेथे ढग लपंडाव खेळायचे कधी धुक यांची पूर्ण चादर खोर्यावर लपेटली जायची व काहीच दिसायचे नाही. तर कधी चार चाकीच्या वायफर सारखे वारे त्या धुक्याला एका झटक्यात बाजूला सरायचे व सर्व कसे स्वच्छ दिसायचे.
पठार :
घाट उतरणीचा प्रवास सुरू झाल्यानंतर घाट उतरताना सुरुवातीलाच जे पठार लागतं त्या पठारावर एमटीडीसीचे रिसॉर्ट आहे. जास्त काळ निसर्गाच्या सानिध्यात राहायचे असल्यास तिथे राहून निसर्गाचा आनंद लुटता येऊ शकतो. पठारावर पिवळ्या रंगाच्या फुलांची सर्वत्र पसरलेली जणूकाही बाग आणि त्यावर इथून तिथे भिरभिरणारी विविध रंगाची फुलपाखरे. असा सुंदर देखावा प्रत्यक्षात पाहायला मिळतो. हे पाहून एका कवितेच्या ओळी आठवतात
हिरवे हिरवे गार गालिचे
हरित तृणाच्या मखमालीचे
त्या सुंदर मखमालीवरती
फुलराणी ही खेळत होती
पठारापासून खुबी म्हणून गाव लागते. तिथून थोडं पुढे एक धरण लागतं. त्याला पिंपळगावचा डॅम असे नाव आहे. त्या सुंदरशा जलाशयाची खासियत अशी आहे की तिथे फ्लेमिंगो नामक पक्षी येतात. मराठी त्यांना रोहित पक्षी असे म्हणतात. फ्लेमिंगो नामक पक्षी सैबेरियातून जुलै ते सप्टेंबर या महिन्याच्या कालावधीत यांचे वास्तव्य कारणासाठी येतात. हे पाहुणे पक्षी डोंगरवाडी जवळील शेतजमिनीतील भक्ष टिपतानाचे दृश्य पाहायला मिळते.
माळशेज घाट फोटो – Malshej Ghat Mharashtra
कसे जाल :
मुंबईहून कल्याण-मुरबाड मार्गे जाता येते. मुंबई पासून अंतर 127 किलोमीटर इतके आहे. पुण्याहून नारायणगाव मार्गे माळशेज घाटात जाता येते.पुण्याहून एकशे वीस किलोमीटर अंतरावर माळशेज घाट आहे.
वरील सर्व गोष्टी पाहून आपणास अंदाज लागला असेलच, माळशेज घाट malshej ghat information in marathi language हा कसा आहे? कोठे आहे? तिथे पाहण्यासारखी ठिकाणे आणि तसेच त्यांची वैशिट्ये कोणती आहेत. malshej information in marathi हा लेख आपल्याला आवडल्यास आपल्या मित्र परिवारासोबत फेसबुक ओट्सअप्प सारख्या विविध सोशियल मेडिया वरून माहिती पोहचवा. तसेच information about malshej ghat in marathi हा लेख कसा वाटला व अजून काही माळशेज घाटा विषयी राहिले असेल तर आपण comments द्वारे कळवू शकता धन्यवाद.
आम्ही दिलेल्या malshej ghat maharashtra माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू. अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट
खूप सुंदर शब्दरचना व घाटचि वर्णन पृत्यक्ष घाट चढल्या ची अनुभूती घेतली
प्रतिसादाबद्दल धन्यवाद ..!