पावसाळा निबंध मराठी Pavsala Nibandh in Marathi

Pavsala Nibandh in MarathiRainy Season Essay In Marathi माझा आवडता ऋतू पावसाळा निबंध मराठी, पाऊस निबंध मराठी ‘पाऊस’ म्हटलं की किती जणांचे मन आनंदानं नाचू लागते? उन्हाळ्या नंतर धरती मातेलो शांत थंड करण्याचे काम करतो ‘पावसाळा. शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय पावसाळा लहान मुलांच्या आनंदाचा विषय ‘पावसाळा … हो माझा आवडता ऋतू आहे पावसाळा !!! नमस्कार आजच्या या लेखात आपण पावसाळा या विषयावर मराठी निबंध पाहणार आहोत. माझा आवडता ऋतू पावसाळा pavsala essay in marathi या निबंधाचा उपयोग आपण विविध स्पर्धा परिक्षामध्ये उत्तम गुण मिळवण्याकरीता करू शकता.

pavsala nibandh in marathi
pavsala nibandh in marathi/ pavsala essay in marathi

माझा आवडता ऋतू पावसाळा निबंध मराठी – Pavsala Nibandh in Marathi

पाऊस निबंध मराठी – Rainy Season Essay In Marathi

ये रे ये रे पावसा

तुला देतो पैसा

पैसा झाला खोटा

पाऊस आला मोठा

रणरणत्या उन्हाळ्याच्या झळा सोसत पावसाची वाट पहात नकळत लहानपणी हे ‘बालगीत’ सर्वांच्याच मुखात येत असे, आणि पाऊस आला रे आला की त्या धरणी मातेच्या अंगावर पडणारे पहिले टपोरे थेंब, त्यातून येणारा मातीचा सुवास. अहाहा! जंणू काही स्वर्गसूखच.

पावसाळा हा ऋतू आबालवृद्ध सर्वांच्याच आवडीचा. जूनच्या पहिल्या आठवड्यात पावसाची सुरवात होते. मग आकाशात काळे काळे, ढग जमू लागतात. सगळी कडे अंधार दाटून येतो. थंडगार वारा वाहू लागतो. विजांचा कडकडा होतो आणि मग पावसाला सुरवात होते. पहिला पाऊस खूपच आल्हाददायक असतो. सगळे वातावरण कसे अगदी थंडगार होते. मोर आनंदाने पावसात पंख पिसारा पसरून नाचू लागतो. चातक पक्षीही पावसाची वाट पहात आवासून बसलेला असतो.

तोही पावसाचा थेंब तोंडात पडला की तृप्त होतो. शेतकरी सुद्धा शेतीच्या कामाची आखणी सुरु करतो. लहान मुलांची नवीन छत्र्या, रेनकोट घेण्यासाठी पेपर बोट पेपरची होडी नाच पाण्यात सोडण्यासाठी लगबग चालू होते. अशा प्रकारे सगळीकडेच अगदी उत्साहाचे वातावरण निर्माण होते.

पावसाळ्यात धरणीमाता अगदी हिरवीगार साडी नेसलेली दिसते. वातावरण अगदी प्रसन्न बनते. पावसाळ्यात कुठे रिमझिम पाऊस, तर कुठे धो-धो पाऊस कोसळतो सर्व झाडे हिरवीगार होतात. शेतेसुद्धा अगदी आनंदाने डोलू लागतात. पुरेशा पावसाने शेतकरी राजा सुद्धा सुखावतो. या ऋतूमध्येच  ज्यावेळी ऊन-पावसाचा खेळ चालतो, त्यावेळी इंद्रधनुष्यती पहायला मिळतो. इंद्रधनुष्यही आपल्या सात रंगांची उधकन करून आकाश, वातावरण भारावून टाकतो.

लहान-लहान मुलही पावसाळ्यात छत्र्या, रेनकोट सांभाळत पेपरच्या होड्या पाण्यात सोडत नाचू लागतात आणि देवाकडे प्रार्थना करतात….

सांग सांग भोलानाथ

पाऊस पडेल काय?

शोळेभोवती तळे साचून

सुट्टी मिळेल काय?

हो.. मग जोरदार पाऊस झाला की मग शाळेला सुट्टी भेटते ना… पण काही वर्षात माणसांच्या चुकीमुळे अतिवृष्टीचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे पूर येवू लागले आहेत. भूमीचे स्खलन होवून मोठमोठाले डोंगर पर्वत कोसळून मनुष्यहानी, वित्तहानी होत आहे. गावेच्या गावे नष्ट होवू लागली आहेत. म्हणून माणसाने झाडे तोडू नयेत. प्रत्येकाने शक्य होईल तेवढी झाडे लावली पाहिजेत. तर “झाडे लावा झाडे जगवा” हा मंत्र सर्वांनी आचरीला पाहिजे, म्हणजे निसर्ग आपल्यावर कोपणार नाही,

धबधबे, नदया तलाव हे पावसात तुडूंब भरून वाहतात. व आपल्या आजूबाजूचा परिसर तुडुंब पाण्याखाली आणतात. त्यामुळे भरपूर घरांचे, शेतीचे नुकसान होते. ते टाळण्यासाठी आपण आधीपासूनच नदया, तलाव यांची स्वच्छता केली पाहीजे. म्हणजे पावसाचे प्रमाण जास्त असेल तरी आपले काही नुकसान होणार नाही. व आपल्याला पावसाला जा म्हणण्याची वेळ येणार नाही.

पावसाळ्यातच अनेक समांची रेलचेलही असते. बेंदूर, गणेशोत्सव, नागपंचमी, दहीहंडी, रक्षाबंधन श्रावणात अगदी हसरा, लाजरा श्रावणही पावसाता येतो. अगदी मोठमोठ्याला कवींनाही पावसावर कविता करण्याचा मोह आवरला नाही.

असा हा पावसाळा मला खूप खूप आवडतो.

आम्ही दिलेल्या माहितीमध्ये काहीही चुकीचे असल्यास आपण लवकरात लवकर आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे आपण दिलेली माहिती अचूक असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर “पावसाळा निबंध मराठी” विषयावर अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या pavsala nibandh in marathi language या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि maza avadata rutu pavsala nibandh in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका. तसेच आपण pavsala essay in marathi या लेखाचा वापर pavsala nibandh marathi असा देखील करू शकता. धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!