आवळ्याचा मुरंबा रेसीपी Amla Murabba Recipe in Marathi

Amla Murabba Recipe in Marathi – Morawala Recipe in Marathi आवळा मुरंबा रेसीपी मोर आवळ्या पासून वेगवेगळे पदार्थ बनवले जातात आणि त्यामधील लोकप्रिय असणारे पदार्थ म्हणजे आवळा कँडी आणि आवळा मुरंबा. लोक मोर आवळ्या पासून हे पदार्थ हमखास बनवतात आणि आणि ते वर्षभर टिकवून ठेवतात. आज आपण या लेखामध्ये आवळा मुरंबा कसा बनवायचा ते पाहणारा आहोत. बहुतेक आवळ्याचे एकूण दोन प्रकार असतात ते म्हणजे मोर आवळा आणि साधा आवळा जो आपण लहापणी सर्वांनी खाल्ला आहे. परंतु आवळा मुरंबा हि लिंबू सारख्या दिसणाऱ्या आणि लिंबूच्या आकाराच्या मोर आवळ्या पासून बनवला जातो.

मोर आवळ्यापासून अनेक वेगवेगळ्या रेसिपीज बनवतात जसे कि आवळा ज्यूस, मोर आवळ्याचे लोणचं, आवळा कँडी, आवळा बर्फी यासारखे अनेक पदार्थ बनवले जाता आणि हे पदार्थ उन्हाळ्यामध्ये बनवू शकतो कारण आवळा हा बाजारामध्ये उन्हाळ्यामध्ये येतो.

आवळा मुरंबा हि रेसिपी घरी बनवण्यासाठी खूप सोपी आहे आणि खूप कमी साहित्यामध्ये बनते परंतु हि बनण्यासाठी थोडा जास्त वेळ लागतो. चला तर मग आता आपण आवळा मुरंबा कसा बनवायचा ते पाहूयात.

amla murabba recipe in marathi
amla murabba recipe in marathi

आवळ्याचा मुरंबा रेसीपी – Amla Murabba Recipe in Marathi

तयारीसाठी लागणारा वेळ१५ ते २० मिनिटे
बनवण्यासाठी लागणारा वेळ १ तास ते दीड तास
एकूण लागणारा वेळ१ तास ५० मिनिटे
पाककलाभारतीय
बनवण्याची पध्दतखूप सोपी

आवळा मुरंबा कसा बनवतात ?

आवळा मुरंबा बनवताना सर्वप्रथम आवळे थोडे वाफवून घेतले जातात आणि मग ते वाफवल्यानंतर थोडे मऊ झाले कि त्याला काटे चमच्याने छिद्रे पाडून घ्या आणि मग साखरेचा पाक बनवा आणि ते वाफवलेले आवळे त्यामध्ये घाला आणि ते मंद आचेवर अगदी मऊ होईपर्यंत चांगले शिजवा.

आवळा मुरंबा बनवण्यासाठी लागणारे साहित्य – key ingredients

  • मोर आवळा : मोर आवळा हे एक फळ आहे जे आवळा मुरंबा बनवण्यासाठी महत्वाचा घटक आहे.
  • साखर : आवळा मुरांब्यामध्ये साखर घातल्यामुळे याला गोड पणा येतो आणि म्हणून साखर हा आवळा मुरंबा बनवण्यासाठी महत्वाचा घटक आहे.

आवळा मुरंबा रेसिपी – morawala recipe in marathi

आवळा मुरंबा हि एक पारंपारिक डिश आहे. म्हणजे हि रेसिपी भारतामध्ये खूप पूर्वीच्या काळापासून बनवली जाते आणि विशेषता हि रेसिपी मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये बनवली जाते. मोर आवळ्याचे किती तरी आरोग्य फायदे आहेत आणि म्हणूनच या आवळ्या पासून वेगवेगळ्या रेसिपी बनवल्या जातात. आवळा मुरंबा हि रेसिपी घरी बनवण्यासाठी खूप सोपी आहे आणि खूप कमी साहित्यामध्ये बनते. आता आपण मोर आवळ्या पासून मुरंबा कसा बनवायचा ते पाहणार आहोत आणि त्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूयात.

तयारीसाठी लागणारा वेळ१५ ते २० मिनिटे
बनवण्यासाठी लागणारा वेळ १ तास ते दीड तास
एकूण लागणारा वेळ१ तास ५० मिनिटे
पाककलाभारतीय
बनवण्याची पध्दतखूप सोपी

आवळा मुरंबा बनवण्यासाठी लागणारे साहित्य – ingredients needed to make amla murabba recipe 

आवळा मुरंबा बनवण्यासाठी आपल्याला मोर आवळा, साखर, पाणी आणि वेलची पावडर हे साहित्य लागते. साखर आणि वेलची पावडर हि आपल्या घरामध्ये अगदी सहजपणे उपलब्ध असते पण आवळे हे फक्त उन्हाळ्यामध्ये बाजारामध्ये उपलब्ध असतात त्यामुळे आपण उन्हाळ्यामध्ये आवळा मुरंबा बनवू शकतो. आवळा मुरंबा बनवण्यासाठी ताजे आवळे वापरा. चला तर आता आपण आवळा मुरंबा बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी पाहूयात.

  • अर्धा किलो आवळे.
  • अर्धा किली साखर.
  • अर्धी वाटी पाणी.
  • १ चमचा वेलची पावडर.

आवळा मुरंबा बनवण्यासाठी केली जाणारी कृती – how to make morawala

आवळा मुरंबा हि रेसिपी घरी बनवण्यासाठी खूप सोपी आहे आणि खूप कमी साहित्यामध्ये बनतो. चला तर मग आता आपण वर दिलेले साहित्य वापरून आवळा मुरंबा कसा बनवायचं ते पाहूयात.

  • आवळा मुरंबा बनवण्यासाठी ताजे मोर आवळे वापरा.
  • सर्वप्रथम एक स्टीमर घ्या आणि त्यामध्ये पाणी घाला आणि ते स्टीमरचे भांडे गॅसवर मध्यम आचेवर ठेवा आणि मग त्या स्टीमर मध्ये आवळे घाला आणि झाकण लावून आवळे १० ते १५ मिनिटे वाफवून घ्या.
  • १० ते १५ मिनिटे आवळे चांगले वाफवल्यानंतर गॅस बंद करा आणि त्यामधी आवळे एका ताटामध्ये काढा आणि त्याला काटे चमच्याच्या सहाय्याने आवळ्याला छिद्रे पाडून घ्या.
  • अश्या प्रकारे सर्व अवळ्यांना छिद्रे पाडून घ्या आणि ते बाजूला ठेवा.( आवळे शिजवून घेतल्यामुळे ते थोडे मऊ होतील आणि आपल्याला छिद्रे पडण्यास सोपे जाईल ).
  • आता गॅसवर मध्यम आचेवर एक भांडे ठेवा आणि त्यामध्ये अर्धा किलो साखर आणि पाणी घाला आणि ती सतत ढवळत राहून त्यामधील साखर विरघळली कि त्यामध्ये आवळे घाला आणि ते पाकमध्ये मिक्स करा.
  • आणि हे मिश्रण कमीत कमी १ तास शिजवा किंवा त्यापेक्षा देखील जास्ती शिजवले तरी चालतात. आवळे मऊ शिजले कि गॅस बंद करा.
  • आवळा मुरंबा तयार झाला.

टिप्स (Tips)

  • आवळा मुरंबा हवा बंद बरणीमध्ये घालून आपण फ्रीजमध्ये महिनाभर ठेवू शकतो.
  • आवळा जितका जास्त वेळ शिजवला जाईल तितके जास्त दिवस तो चांगला टिकू शकेल.
  • आवळे शिजवून घेतल्यामुळे ते थोडे मऊ होतील आणि आपल्याला छिद्रे पडण्यास सोपे होते.

आम्ही दिलेल्या amla murabba recipe in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर आवळ्याचा मुरंबा रेसीपी माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या morawala recipe in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि grated amla murabba recipe in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये amla murabba recipe in marathi language Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!