अशोक स्तंभ माहिती मराठी Ashok Stambh Information in Marathi

ashok stambh information in marathi अशोक स्तंभ माहिती मराठी, प्राचीन काळामध्ये अनेक वेगवेगळे राजे होऊन गेले आणि त्यांनी वेगवेगळी स्मारके नि इमारती बांधल्या त्या आज देखील तितक्याच महत्वपूर्ण आणि लोकप्रिय आहेत कारण त्याच्याशी एक चांगला इतिहास जोडला गेला आहे. त्याचप्रमाणे अशोक स्तंभ देखील एक प्राचीन स्मारक आहे जे प्राचीन काळामध्ये पराक्रमी सम्राट अशोक याने बांधला आणि त्याला अशोक स्तंभ असे नाव दिले. सम्राट अशोक हा मौर्य वंशाचा शासक होता आणि त्याने इ.स पूर्व २७३ मध्ये भारतावर राज्य केले. अशोक स्तंभ हे असे स्मारक आहे.

जे भारताच्या उत्तरेकडील उपखंडामध्ये सर्व ठिकाणी असणारी दगडी खांबांची एक मालिकाच आहे हे खांब पूर्णपणे दगडी असून या खांबांचे वजन हे जवळ पास ४८ ते ५० टनाच्या जवळपास आहे आणि या खांबांची उंची ४० ते ५० फुट इतकी आहे. चला तर खाली आपण अशोस्क स्तंभ विषयी सविस्तर माहिती पाहूया.

ashok stambh information in marathi
ashok stambh information in marathi

अशोक स्तंभ माहिती मराठी – Ashok Stambh Information in Marathi

स्तंभाचे नावअशोक स्तंभ
स्तंभाची उंची४० ते ५० फुट उंच
स्तंभाचे वजन४८ ते ५० टन
कोणी बांधलासम्राट अशोकाने
केंव्हा बांधलाइ.स.पूर्व २५०

अशोक स्तंभाविषयी महत्वाची माहिती – information about ashok stambh in marathi

भारताच्या उत्तरेकडील भागामध्ये असलेले अशोक स्तंभ हे ४० ते ५० फुट उंचीचे आहेत आणि या अशोक स्थाम्भाचे वजन हे ४८ ते ५० टन इतके आहेत. हे अशोक स्तंभ हे पायाशिवाय बांधलेले आहेत आणि खालून त्याचा आकार गोल आहे आणि मोठा आहे आणि जस जशी अशोक स्तंभाची उंची वाढत गेली तास तशी त्याचा आकार साधारण किंवा थोडा चिंचोळा होत गेला आहे आणि स्तंभाच्या टॉपला सिंहाची प्रतिकृती आहे.

असे म्हटले जाते कि सम्राट अशोकाने उत्तर भारतामध्ये अनेक स्तंभ बांधले आणि हे स्तंभ बांधण्याचे एकमेव कारण असे होते कि त्याला बुध्द धर्मच प्रचार या स्तंभांच्या मार्फत करायचे होते आणि म्हणून आपल्याला आज देखील पाहायला मिळते कि या स्तंभांच्यावर शिलालेख कोरलेले आहेत आणि या शिलालेखाच्या रुपामध्ये यावर बुध्द धर्माची शिकवण कोरलेली आहे.

सम्राट अशोकाने अनेक स्तंभ बांधले परंतु सारनाथ या ठिकाणी बांधलेला स्तंभ हा खूप लोकप्रिय झालेला स्तंभ आहे आणि हा स्तंभ सारनाथ मध्ये इ.स.पूर्व २५० मध्ये बांधला गेला आहे. सारनाथचा अशोकस्तंभाच्या टॉपला चार सिंह बसलेले आहेत आणि ते एकमेकांना पाठ लाऊन बसलेले आहेत आणि हा स्तंभ भारताचे राष्ट्रीय चिन्ह ठेवले आहे.

अशोक स्तंभाचा इतिहास – ashok stambh history in marathi

सम्राट अशोकाने इ.स पूर्व २७३ मध्ये भारतावर राज्य केले होते आणि त्यांने बौध्द धर्म स्वीकारला होता आणि त्यांनी बौध्द धर्माचा प्रचार करण्यासाठी अनेक स्तंभ बांधले. सम्राट अशोकाने भारतामध्ये अनेक वेगवेगळ्या ठिकाणी स्तंभ बांधले आणि त्यावर शिलालेख कोरले हे शिलालेख बुध्द धर्माची शिकवण देणारे होते आणि हे स्तंभ भारतामध्ये खूप लोकप्रिय झाले आणि त्याच्या काळामध्ये बौध्द धर्माचा प्रचार देखील मोठ्या प्रमाणात झाला.

भारतामधील अशोक स्तंभ

सम्राट अशोकाने इ.स पूर्व २७३ मध्ये भारतावर राज्य केले आणि त्यांने त्यावेळी बुध्द धर्माचा प्रचार केला आणि बुध्द धर्माचा प्रचार करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी अशोक स्तंभाचे बांधकाम केले आणि त्यावर शिलालेख रूपातील बुध्द धर्माची शिकवण कोरली. चला तर आता आपण खाली भारतामधील अशोक सम्राटाने बांधलेले अशोक स्तंभ पाहूया.

सारनाथचा अशोकस्तंभ 

सारनाथ या ठिकाणी बांधलेला स्तंभ हा खूप लोकप्रिय झालेला स्तंभ आहे आणि हा स्तंभ सारनाथ मध्ये इ.स.पूर्व २५० मध्ये बांधला गेला आहे. सारनाथचा अशोकस्तंभाच्या टॉपला चार सिंह बसलेले आहेत आणि ते एकमेकांना पाठ लाऊन बसलेले आहेत. या स्तंभावर तीन शिलालेख आहेत यातील एक सम्राट अशोकाच्या काळातील आहे तर राहिलेले दोन हे कुशाण आणि गुप्त काळातील आहेत.

सांचीमधील अशोकस्तंभ 

संचीमध्ये देखील अशोक स्तंभ आहे आणि हा स्तंभ बहुतेक तिसऱ्या शतकामध्ये बांधला आहे. परंतु हा स्तंभ जरी खूप प्राचीन जरी असला तरी हा सुस्थितीमध्ये आहे आणि हा स्तंभ सारनाथच्या स्तंभासारखा दिसतो. 

दिल्लीतील अशोकस्तंभ 

भारताच्या उत्तरेकडे अशोकाने अनेक स्तंभ बांधले होते आणि त्यामधील दिल्ली मध्ये असणारा एक स्तंभ जो फिरोजशाह कोटला या ठिकाणी आहे. हा स्तंभ १३ मीटर उंचीच आहे आणि दगडांच्या पासून बांधला आहे आणि हा अशोकाने सुमारे इ.सपूर्व तिसर्या शतकामध्ये बांधला आहे.

अलाहाबादमधील अशोकस्तंभ 

अलाहाबादमधील अशोक स्तंभ हा १६ व्या शतकामध्ये सम्राट अकबराने बांधला आहे आणि ह्या स्तंभावर अशोकाचे शिलालेख आहेत आणि हे ब्राह्मी लिपीमध्ये आहेत आणि हा स्तंभ अलाहाबाद किल्ल्याच्या बाहेर उभारण्यात आला आहे. परंतु या स्तंभाविषयी असे म्हटले जाते कि १८०० मध्ये हा स्तंभ पाडण्यात आला होता परंतु १८३८ च्या सुमारास तो ब्रिटिशांनी परत उभारला होता.

अशोक स्तंभविषयी विशेष तथ्ये – facts 

  • अशोक स्तंभ हे भारताचे राष्ट्रीय चिन्ह आहे आणि म्हणूनच भारत सरकार सर्व कामांच्यामध्ये अशोक चिन्हाचा वापर केला जातो.
  • अशोक स्तंभ हा खूप जुन्या काळामध्ये बांधला आहे आणि हा मौर्य वंशाचा सम्राट अशोक याने बौध्द धर्माचा प्रचार करण्यासाठी बांधला आहे.
  • सारनाथचा अशोक स्तंभ हा खूप प्रसिध्द अशोक स्तंभांपैकी आहे आणि त्यावर बौध्द धर्माचा प्रचार करणारे शिलालेख आहेत.
  • भारताच्या उत्तरेस बांधलेल्या अशोक स्तंभाची उंची हि ४० ते ५० फुट इतकी आहे.
  • भारताच्या नौदल, वायुदल आणि लष्करी सेनेच्या गणवेशावर देखील अशोक स्तंभाचे चिन्ह आहे.
  • अशोक स्तंभ हे आपले राष्ट्रीय चिन्ह आहे आणि या स्तंभाला राष्ट्रीय चिन्ह म्हणून २६ जानेवारी १९५० मध्ये मान्यता मिळाली.
  • अशोक स्तंभाच्या शिखरावर सिंहाची प्रतिकृती तयार केलेली आहे.
  • सारनाथ या ठिकाणी इ.स.पूर्व २५० मध्ये अशोक स्तंभ उभारला गेला आणि या स्तंभाच्या शिखरावर ४ सिंह पाठीला पाठ लावून बसलेले आहेत आणि यावर असणारे सिंह हे भारताचे राष्ट्रीय चिन्ह म्हणून स्वीकारण्यात आले आहे.
  • अशोक स्तंभाचे वजन जे जवळ जवळ जवळ ५० तन इतके आहे.

आम्ही दिलेल्या ashok stambh information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर अशोक स्तंभ माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या atm meaning in Marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि information about ashok stambh in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!