आयुष्मान भारत योजना मराठी माहिती Ayushman Bharat Yojana Information in Marathi

pradhan mantri ayushman bharat yojana information in marathi आयुष्मान भारत योजना मराठी माहिती आज आपण या लेखामध्ये आयुष्यमान भारत योजना या विषयावर माहिती लिहिणार आहोत. आयुष्यमान भारत योजना हि एक भारत सरकारने सुरु केलेली योजना आहे आणि हि योजना किंवा उपक्रम हा आपल्या देशाचे सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१८ मध्ये सुरु केली. आयुष्यमान भारत हि योजना सुरु करण्याचा मुख्य उद्देश हा आरोग्य सेवा वितरणाच्या क्षेत्रीय आणि विभागीय दृष्टीकोनातून व्यापक आरोग्य सेवा पुरवणे हे आहे.

आयुष्यमान भारत योजना ज्याला जन आरोग्य योजना या नावाने देखील ओळखले जाते अशी हि योजना केंद्र सरकारने अनेक आरोग्य सेवा देण्यासाठी सुरु केली. या योजनेची घोषणा हि २०१८ च्या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आली होती आणि हि योजना संपूर्ण भारतामध्ये १ एप्रिल २०१८ मध्ये लागू करण्यात आली होती. या योजनेमार्फत ज्या लोकांचे बीपीएल रेशन कार्ड आहे अश्या लोकांना अनेक प्रकारचे आरोग्य लाभ देण्याचा हेतू या योजनेचा आहे.

त्याचबरोबर ज्या लोकांच्याकडे बीपीएल रेशन कार्ड आहे अशा लोकांना तर या योजनेचा लाभ मिळतोच परंतु जे कुटुंब गरिब आहेत आणि त्यांच्याकडे चांगल्या प्रतीच्या आरोग्य सेवा घेण्यासाठी पैसे नाहीत किंवा ज्या लोकांच्याकडे बीपीएल रेशन कार्ड नाही अश्या लोकांना देखील या योजनेच्या मार्फत आरोग्य सेवा पुरवण्याचा मार्ग भारत सरकारने काढला.

या आयुष्यमान भारत योजनेमुळे भारतामध्ये २०२१ पर्यंत आरोग्य क्षेत्रामध्ये क्रांती झाली आणि या योजनेबद्दल एक महत्वाची बाब सांगायची म्हणजे या आरोग्य योजने अंतर्गत भारतामध्ये १.८४ कोटी रुग्नान्च्यावर उपचार करण्यात आले आणि म्हणून या योजनेला एक यशस्वी योजना म्हणून ओळखले जाते. भारतातील अनेक लोकांनी या योजनेसाठी आणि या योजनेतील लाभ मिळवण्यासाठी आपली नोंदणी केली आहे.

pradhan mantri ayushman bharat yojana information in marathi
pradhan mantri ayushman bharat yojana information in marathi

आयुष्मान भारत योजना मराठी माहिती – Ayushman Bharat Yojana Information in Marathi

योजनेच नावआयुष्यमान भारत योजना किंवा प्रधान मंत्री जन आरोग्य योजना 
केंव्हा सुरु झाली१ एप्रिल २०१८
कोणी सुरु केलीपंतप्रधान नरेंद्र मोदी ( केंद्र सरकार )
लाभार्थीबीपीएल धारक किंवा दारिद्र्य रेषेखालील लोक जे भारतातील नागरिक आहेत.
उदिष्ठ्येबीपीएल धारक किंवा दारिद्र्य रेषेखालील लोकांना आरोग्य उपचार करण्यासाठी वर्षाला ५ लाख रुपये देणे.

आयुष्यमान भारत योजना काय आहे ?

आयुष्यमान भारत योजना हि एक केंद्र सरकारने सुरु केलेली योजना आहे आणि या योजने अंतर्गत बीपीएल ( BPL ) रेशन कार्ड आहे अश्या लोकांना  अनेक प्रकारचे आरोग्य लाभ देण्याचा हेतू या योजनेचा आहे. या योजनेमार्फत द्ररीद्र्या रेषेखालील लोकांना वर्षाला ५ लाख रुपये उपचारासाठी सरकारकडून मिळू शकतात.

आयुष्यमान भारत योजना कोणी व केंव्हा सुरु केली ?

आयुष्यमान भारत योजना किंवा जन आरोग्य योजना हि केंद्र सरकारने म्हणजेच नरेंद्र मोदी पंतप्रधान असताना १ एप्रिल २०१८ मध्ये सुरु केली आहे.

आयुष्यमान भारत योजना – pradhan mantri ayushman bharat yojana information in marathi

आयुष्यमान भारत योजना हि दोन विभागामध्ये विभागलेली आहे आणि ती म्हणजे ग्रामीण भागातील लोकांच्यासाठी आयुष्यमान भारत योजना ( PMJAY ग्रामीण ) आणि शहरी भागातील लोकांच्यासाठी आयुष्यमान भारत योजना ( PMJAY शहरी ) असे दोन भाग आहेत.

( PMJAY ग्रामीण ) : ( PMJAY ग्रामीण ) हि ग्रामीण भागातील लोकांच्यासाठी आयुष्यमान भारत योजना आहे म्हणजे या योजनेच्या मार्फत ग्रामीण भागातील गरीब आणि दारिद्र्य रेषेखालील लोकांना ( ५ लाख रुपये पर्यंत ) मोफत आरोग्य सेवा पुरवण्याचे काम केले जाते. यामध्ये ग्रामीण भागातील अनुसूचित जाती जमाती मधील कुटुंबे, तसेच ज्या कुटुंबामध्ये प्रौढ व्यक्ती शारीरिकदृष्ट्या सक्षम नसतो, रोजच्या मजुरीवर काम करणारे लोक, आदिवासी जमातीतील कुटुंब, चांगल्या अवस्थेत नसलेली आणि पडक्या घरामध्ये राहणारे लोक, भिकेवर जगणारे लोक, सफाई कामगार अश्या लोकांच्यासाठी ( PMJAY ग्रामीण ) या योजनेचा लाभ मिळू शकतो.

( PMJAY शहरी ) : ( PMJAY शहरी ) हि शहरी भागातील लोकांच्यासाठी असणारी आयुष्यमान भारत योजना आहे ज्याच्या मार्फत शहरी भागातील गरीब आणि दारिद्र्य रेषेखालील लोकांच्यासाठी सरकार ५ लाखपर्यंत मोफत आरोग्यसेवा पुरवते. यामध्ये शहरी भागातील चौकीदार, स्वच्छता कर्मचारी किंवा सफाई कामगार, हस्तकला कामगार किंवा शिंपी, प्लंबर किंवा बांधकाम करणारे, इलेक्ट्रिशिय, माळी काम करणारे, दुरुस्ती काम करणारे, वाहतूक कामगार, डिलिव्हरी बॉय, फेरीवाले हे लोक ( PMJAY शहरी ) या योजनेसाठी पात्र असी शकतात.

आयुष्यमान योजनेसाठी पात्रता – eligibility 

  • बीपीएल ( BPL ) धारक किंवा दारिद्र्य रेषेखालील लोक आयुष्यमान भारत योजनेसाठी पात्र असू शकतात.
  • तसेच या योजनेसाठी अर्ज करणारा कोणताही व्यक्ती हा भारतीय नागरिक असला पाहिजे.
  • सरकारने राबवलेल्या कोणत्याही गृहनिर्माण योजनेचा लाभ त्या व्यक्तीने घेतलेला नसावा.
  • कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या नावावर पक्के घर नसावे.

आयुष्यमान भारत योजनेचे फायदे – benefits of ABY 

  • आयुष्यमान योजनेचा मुख्य फायदा म्हणजे द्रारिद्र्य रेषेखालील लोकांना वर्षाला ५ लाख रुपया पर्यंतचे उपचार हे मोफत मिळतात.
  • तसेच या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी किंवा नोंदणी करण्यासाठी वयाची कोणतीही आट नाही.
  • आयुष्यमान भारत योजना विमा जर एकाद्या व्यक्तीच्या नावावर उतरला असेल आणि त्याची तब्येत बरी नसेल तर त्याच्यावर लगेच उपचार सुरु केले जातात.
  • तसेच आपण या योजनेअंतर्गत कोणत्याही विमा कंपनीकडून आरोग्य विमा देखील उतरून घेवू शकतो.

आयुष्यमान भारत योजनेसाठी नोदणी कशी करावी – how to apply for ABY or PMJAY 

आयुष्यमान भारत हि योजना हि बीपीएल ( BPL ) धारक किंवा दारिद्र्य रेषेखालील  लोकांच्यासाठी आहे म्हणजेच अश्या पात्र लोकांच्यासाठी हि योजना राबवली जाते पण अश्या लोकांना या योजनेची नोंदणी ऑनलाईन करावी लागते.

  • आयुष्यमाना भारत योजनेच्या वेबसाईट वर जावे लागते आणि मग तेथे गेल्यानंतर मी पात्र आहे का या पर्यायावर क्लिक करावे लागते.
  • मग त्यानंतर त्यामध्ये कॅप्चा कोड आणि मोबाईल नंबर घाला आणि जनरेट ओटीपी या पर्यायावर क्लिक करा.
  • नंतर तुमचे नाव, HHD क्रमांक, रेशन कार्ड क्रमांक, मोबाईल क्रमांक आणि राज्य शोधा.
  • मग आपण शोध परिणामांच्यावर आधारित आपण आपले कुटुंब PMJAY योजनेसाठी समाविष्ट आहे का नाही हे पाहू शकता.

आयुष्यमान भारत योजनेविषयी महत्वाची माहिती – ayushman bharat yojana details in marathi

  • जे लोक किंवा कुटुंब योजनेसाठी पात्र आहेत म्हणजेच जे लोक बीपीएल ( BPL ) धारक किंवा दारिद्र्य रेषेखालील लोक जे भारतातील नागरिक आहेत अशा व्यक्तींनी आयुष्यमान हेल्थ कार्ड काढलेले असल्यास तुम्ही तुमच्या घराजवळ असेल्या कोणत्याही रूग्णालया मध्ये या योजनेचा लाभ घेवू शकता.

आम्ही दिलेल्या pradhan mantri ayushman bharat yojana information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर आयुष्मान भारत योजना मराठी माहिती बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या ayushman bharat yojana in marathi information या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि ayushman bharat yojana details in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!