भ्रमणध्वनी म्हणजे काय ? Mobile Phone Information in Marathi

Mobile Phone Information in Marathi भ्रमणध्वनी म्हणजे काय ? मोबाईल फोन म्हणजे काय ? मित्रहो, मोबाईल फोन हे एक प्रकारचे वायरलेस हँडहेल्ड साधन आहे. आजकाल मोबाईल फोनच्या वापरकर्त्यांना विविध वैशिष्ट्यांसह कॉल आणि संदेश एकमेकांना पाठवणे अधिक सोयीस्कर झाले आहे. ज्यावेळी मोबाईल फोनचा शोध लागला तेंव्हा सुरुवातीच्या काळात मोबाईल फोनच्या वापरकर्त्यांना केवळ कॉल करणे आणि आलेला कॉल  प्राप्त करणे इतकेच शक्य होते. पण, सध्याच्या काळात अस्तित्वात असलेले नवीन मोबाईल फोन हे अनेक  वैशिष्ट्यांनी भरलेले आहेत.

आजच्या मोबाईल फोनमध्ये वेब ब्राउझर प्रमाणे, गेम, कॅमेरे, व्हिडिओ प्लेयर आणि नेव्हिगेशनल सिस्टीम अशी नवीन विकसित झालेली काही प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. याशिवाय, संगणकासारखी प्रगल्भ आणि विकसित  वैशिष्ट्ये असलेल्या मोबाईल फोनला स्मार्टफोन असे म्हटले जाते. तर, नियमित वापरला जाणारा मोबाईल फोन हा फीचर फोन या नावानेही ओळखला जातो.

खरंतर, आपला आताचा मोबाईल फोन जास्तीत जास्त सेल्युलर नेटवर्कवर चालतो. सध्याचे मोबाईल फोन हे ग्रामीण भाग, शहर, देश तसेच अगदी डोंगराळ भागात पसरलेल्या सेल साइट्सशी देखील संबंधित आहेत. जर मोबाईल फोनचा उपयोग करणारा व्यक्ती कोणत्याही भागात स्थित असला म्हणजे ज्याठिकाणी सेल्युलर नेटवर्क प्रदात्याच्या अगदी कोणत्याही सेल साइटवरून कोणतेही सिग्नल येत नाहीत, अशावेळी त्याला सबस्क्राईब केले जाते.

mobile phone information in marathi
mobile phone information in marathi

भ्रमणध्वनी म्हणजे काय – Mobile Phone Information in Marathi

मोबाईल फोन चा शोध कोणी लावला – Mobile cha shodh koni lavla

Mobile cha shodh koni lavla मोबाईल फोनचा शोध मार्टिन कूपर नावाच्या शास्त्रज्ञाने लावला होता. या साध्या मोबाईल फोनचा स्मार्टफोन बनवण्यामागे असा उद्देश होता की मोबाईल फोनचे वापरकर्ते आपापसात आणि त्यासोबतच लांब अंतरावर असलेल्या इतर व्यक्तींशी सहजपणे संवाद साधू शकतील. परंतू, मार्टिन यांनी निर्माण केलेला हा मोबाईल फोन त्याकाळी वाढलेल्या दळणवळण प्रणालीवर कार्य करत नव्हता.

शिवाय, या फोनमध्ये कोणतीही कार्यक्षम अशी विशेष वैशिष्ट्ये नव्हती. या मोबाईल फोनचा उपयोग फक्त एकमेकांशी बोलण्यासाठी केला जात होता. पण, नंतरच्या काळात विकसित झालेल्या नवीन तंत्रज्ञानासह अनेक नवनवीन मोबाईल फोन निर्माण केले गेले; ज्यामुळे मोबाईल फोनच्या इतिहासामध्ये एक नवीन ठिणगी पेटली गेली.

मित्रहो, आजच्या एकविसाव्या शतकातील स्मार्टफोन हा आपल्या सर्वांच्या विचारांच्या पलीकडचा आहे. मला तर असे वाटते की येणाऱ्या पुढील काळामध्ये येणारे स्मार्टफोन इतके प्रगतशील होतील की साधारणतः हे फोन आपले ९०% काम सहजपणे करू शकतील.

मोबाईल फोनला मराठीमध्ये भ्रमणध्वनी असे म्हणतात. भ्रमणध्वनी हे एक इलेक्ट्रॉनिक्स साधन असून याचा वापर सगळीकडे दूरसंचारासाठी केला जातो. याला इंग्रजीमध्ये सेल्युलर फोन अथवा सेल फोन असेदेखील म्हटले जाते.

भ्रमणध्वनीच्या मदतीने संभाषणाची आणि माहितीची देवाणघेवाण सहजपणे करता येते. पूर्वीच्या काळापासून वापरली जाणारी पारंपरिक दूरध्वनी उपकरणे आपल्याला घरात एकाच ठिकाणी ठेवून वापरावी लागत होती.

परंतू, आधुनिक काळातील मोबाईल फोन हे संभाषणाशिवाय अनेक गोष्टींसाठी आवश्यक असणारे महाजाल म्हणजेच इंटरनेट न्याहाळणे, लेखी लघुसंदेशांची देवाणघेवाण, गाणी ऐकणे, छायाचित्र काढणे, रेडिओ ऐकणे, जीपीएस वापरणे, पैसे देणे व काढणे अशा अनेक कामांसाठी वापरले जातात.

नोकिया, मोटोरोला, अ‍ॅपल, सीमेन्स आणि सॅमसंग या कंपन्या मोबाईल फोन उत्पादक कंपन्यांपैकी ठराविक अशा सर्वांत मोठ्या कंपन्या आहेत. याखेरीज, सगळ्यात महत्वाचे म्हणजे दूरसंचारविषयासंबंधीच्या सेवांसाठी मोबाईल फोनमध्ये सिम कार्डचा वापर करणे खूप गरजेचे  असते.

एकविसाव्या शतकामध्ये भ्रमणध्वनीमुळे सगळी माणसे एकमेकांशी जोडली गेली आहेत. त्याचबरोबर, मोबाईलमुळे संपूर्ण जग एकमेकांच्या जवळ आले आहे. मोबाईल फोनमध्ये असलेले जीपीएस नावाचे वैशिष्ट्य वापरून पोलिसांना देखील गुन्हेगारांच्या मोबाईलची स्थिती शोधून काढता येते. या प्रक्रियेला इंग्रजीमध्ये ‘मोबाईल फोन ट्रॅकिंग’ असे म्हटले जाते.

मोबाईल फोनचा विजेरी संच

आजकाल मोबाईल फोनचा विजेरी संच हा नियमितपणे उदयास येत आहे. नवनवीन आणि विकसित झालेल्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून मोबाईल फोनचे आयुष्य वाढवण्यासाठी जोमाने प्रयत्न केले जात आहेत. परंतू, दुसरीकडे आपण पाहिले तर आपल्या लक्षात येईल की विजेरी संच फुटत असल्यामुळे अनेक अपघात देखील होत आहेत.

पण मित्रहो, या अपघातांचे प्रमाण अगदी नगण्य आहे. तरीसुद्धा अशा प्रकारच्या संकटांचे संकेत ओळखून भ्रमणध्वनी निर्माण करणाऱ्या अनेक मोठ्या कंपन्या या गोष्टीकडे अधिक नजर ठेवून आहेत आणि त्यासाठी आवश्यक असलेले सर्व संशोधन देखील करत आहेत.

यासाठी मित्रांनो, आपण सर्वांनी कायम लक्षात ठेवले पाहिजेत की मोबाईल फोनचा विजेरी संच हा मर्यादेपलीकडे जाऊन अजिबात ओव्हरचार्ज  करू नये. कारण, कोणताही रीचार्जेबल संच हा  मर्यादेपलीकडे जाऊन चार्ज केला असता तो लवकरात लवकर खराब होतो.

त्यासोबतच, या विजेरी संचाचे आयुष्य देखील कमी होते आणि दुसरा भयंकर धोका म्हणजे मोबाईल ओव्हरचार्ज होत असताना त्याची बॅटरी देखील फुटू शकते. त्यामुळे, मोबाईलचा विजेरी संच कधीही आपल्या खिशात किंवा पर्समध्ये ठेवण्याची रिस्क घेऊ नये.

कारण, विजेरी संचच्या टर्मिनलचा एखाद्या वेळी धातूच्या नाण्यांशी संपर्क आल्यास बॅटरी शॉर्टसर्किट होऊ शकतो आणि डिसचार्ज देख होऊ शकते किंवा अतिगरम होऊन फुटूही शकते. यासोबतच, मोबाईल फोनवर चार्जिंग लावून कुणाशीही बोलू नये. कारण, त्यामुळे देखील मोबाईल फोनची बॅटरी फुटण्याची शक्यता असते.

मोबाईल फायदे मराठी – Mobile Che Fayde in Marathi

मित्रहो, मोबाईल फोनच्या सहाय्याने आपण आपल्या मित्र-मैत्रिणींशी आणि नातेवाईकांशी वायरलेस पद्धतीच्या संप्रेषणाद्वारे गप्पागोष्टी करू  शकतो. याशिवाय, संदेश तसेच व्हिडिओ कॉल इत्यादी गोष्टीदेखील करू शकतो. आजकाल डिजिटल मार्केटिंगच्या या वाढत्या युगामध्ये मोबाईल फोनने आपल्या सर्वांचीच अनेक कामे सोपी केली आहेत.

तसेच, आता आपल्याला पतपेढीमध्ये पहिल्यासारखी  रांगा लावण्याची अजिबात आवश्यकता नाही. कारण  त्याऐवजी, आपण पैसे हस्तांतरित करू शकतो व  आपल्या स्मार्टफोनवरूनच लाईट बिल भरू शकतो आणि सगळ्यात सोयीस्कर म्हणजे ही सगळी कामे आपण अगदी आपल्या घरी बसून करू शकतो.

याखेरीज, स्मार्टफोनच्या सहाय्याने आपण कॅमेराद्वारे फोटो काढण्याचे आणि व्हिडिओ रेकॉर्ड करण्याचे  काम देखील करू शकतो. त्याचबरोबर, स्मार्टफोनच्या मदतीने आपण जगातील सर्व प्रकारची गाणी ऐकू शकतो, व्हिडिओ पाहू शकतो आणि आपल्या जुन्या आठवणी जतन करून ठेवू शकतो.

मोबाईल तोटे – Mobile Che Fayde Ani Tote in Marathi Language

मित्रांनो, वरील माहितीमध्ये आपण पाहिले की मोबाईल फोन आपल्याला आपल्या आयुष्याशी निगडीत अनेक कामांमध्ये मदत करून आपले जीवन सोपे करत आहे. पण, दुसऱ्या बाजूकडे आपण पाहिले तर आपल्याला दिसेल की मोबाईल फोन आपल्या जीवनात अनेक प्रकारची हानीसुध्दा करत आहे आणि आपण सगळेजण त्याच्यावर इतके अवलंबून राहिलो आहोत की त्याच्यामुळे होणाऱ्या दुष्परिणामांकडे आपण पूर्णपणे दुर्लक्ष करत आहोत. मित्रानो,

आपल्यापैकी अनेक जण असे असतात जे काही प्रमाणात मोबाईल फोनचा वापर करतात. जेणेकरून ते आपल्या ध्येयावर व्यवस्थितरीत्या लक्ष केंद्रित करू शकतात. परंतू, सतत आणि जास्त प्रमाणात मोबाईल फोनचा उपयोग केल्यामुळे किरणोत्सर्ग होतो. त्यामुळे, आपण हेदेखील लक्षात ठेवले पाहिजेत की मित्रांनो किरणोत्सर्जन आपल्या सर्वांच्या शरीरासाठी आणि आरोग्यासाठी हानिकारक आहे.

यामुळे, मानवाला हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. त्यामुळे मित्रहो, आपण मोबाईल फोनचे तोटे लक्षात घेऊन फक्त गरजेपुरता त्याचा उपयोग केला पाहिजेत. तरच, मोबाईल फोन आपणा सर्वांसाठी वरदान ठरेल!

                    तेजल तानाजी पाटील

                       बागीलगे, चंदगड.

आम्ही दिलेल्या mobile phone information in marathi language माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर भ्रमणध्वनी म्हणजे काय ? बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या android mobile phone information in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि phone in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Mobile Che Fayde in Marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

1 thought on “भ्रमणध्वनी म्हणजे काय ? Mobile Phone Information in Marathi”

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!