बाजीराव पेशवे माहिती मराठी Bajirao Peshwa Biography in Marathi

Bajirao Peshwa Biography in Marathi – Bajirao Peshwa Information in Marathi थोरले बाजीराव पेशवा जीवन परिचय. “अखंड हिंदुस्थानात हा एक झाला असे दिसते” हे युदनाथ सरकार यांनी लिहिलेलं वाक्य बाजीराव पेशवे यांच्या कर्तृत्वाची माहिती देतं. बाजीराव पेशवे हे अठराव्या शतकातील भारताच्या इतिहासातील महान योद्धे आणि हिंदू धर्माचे रक्षणकर्ते होते. छत्रपती शिवाजी महाराज यांनी मराठी राज्य विस्तार सीमेपार नेला आणि त्यांच्यानंतर हिंदू राजवटीचा पुनर्जन्म बाजीराव पेशव्यांच्या काळात आकारास आला. तलवारबाजीत पारंगत, उत्कृष्ट नेतृत्व धारक व मराठा राज्य संरक्षक आणि कुशल रणनिती व प्रभावशाली व्यक्तिमत्त्व म्हणून बाजीराव पेशवे यांचे नाव भारताच्या इतिहासात सुवर्ण अक्षरात कोरले गेलं. आजच्या लेखामध्ये आपण महान योद्धे बाजीराव पेशवे यांच्या विषयी माहिती जाणून घेणार आहोत.

bajirao peshwa biography in marathi
bajirao peshwa biography in marathi

बाजीराव पेशवे माहिती मराठी – Bajirao Peshwa Biography in Marathi

पूर्ण नाव (Name)थोरले बाजीराव पेशवा
जन्म (Birthday)१८ ऑगस्ट १७०० 
राष्ट्रीयत्व (Citizenship)भारतीय
ओळख (Identity)महान योद्धे
मृत्यू (Death)2८ एप्रिल १७४०

Bajirao Peshwa Information in Marathi

जन्म

बाजीराव यांचा जन्म पेशवा बाळाजी विश्वनाथ राव यांचा ज्येष्ठ पुत्र म्हणून १८ ऑगस्ट १७०० रोजी झाला. बाजीराव पेशवे यांनी पेशवे घराण्याचे नाव एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं. पेशवे घराण्यातील ते सर्वांत कर्तबगार योद्धा होते ज्यांनी स्वराज्य विस्तार दूर पर्यंत पसरवला. त्यांचं घराणं कोकणातील प्रतिष्ठित, पारंपारिक, ब्राह्मण घराणं होतं.

तरुण बाजीराव पेशवे यांनी आईच्या अनुपस्थितीत वडिलांसोबतचा त्यांचा सहवास म्हणजे राजकारणाची फिरती शाळा होती. अगदी लहान असताना ही वडिलांच्या लष्करी मोहिमेला क्वचितच चुकले. या कारणास्तव बाजीरावांना व्यवहारिक लष्करी शास्त्रात परिपक्वता प्राप्त झाली. बाजीरावांचे वडील बाळाजी यांनी बाजीरावांच्या आयुष्यामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका साकारली.

वैयक्तिक आयुष्य

बाजीराव पेशवे यांना थोरले बाजीराव किंवा पहिले बाजीराव या नावाने देखील ओळखले जाते. बाजीराव पेशवे यांची दोन लग्न झाली. त्यांचं पहिलं लग्न १७१३ मध्ये काशीबाई ही चासकर महादजी कृष्ण जोशी यांची कन्या होती. यांच्याशी बाजीराव पेशवे यांचा पहिला विवाह झाला. काशीबाई पासून बाजीराव यांना रामचंद्र उर्फ रघुनाथराव पेशवा, जनार्दन व बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब पेशवा असे तीन पुत्र झाले. १७५८ साली काशीबाई यांचा मृत्यू झाला. बाजीराव पेशवे यांचा दुसरा विवाह १७२९ मध्ये मस्तानी यांच्याशी झाला.

मस्तानीबाई यांच्यापासून बाजीराव यांना कृष्णसिंग उर्फ समशेर बहादूर अशी एक पुत्र प्राप्ती झाली. बाजीराव पेशवे यांनी कधीच जात-पात, धर्म या सर्व गोष्टींवर विश्वास ठेवला नाही अगदी लहानपणापासूनच त्यांनी बहुजन समाजातील सरदारांच्या सैनिकांच्या मांडीला मांडी लावून जेवण केलं होतं. मस्तानी जातीने मुसलमान असल्यामुळे ब्राह्मणांनी अगदी तांडव केला होता. त्यांनी बाजीराव पेशवे यांच्यावर बहिष्कार देखील घातला परंतु बाजीराव पेशवे यांनी जात व धर्म या गोष्टी मध्ये येऊन न देता मस्तानीशी विवाह केला होता.

मस्तानी साठी त्यांनी शनिवारवाड्यात महाल देखिल बांधला होता. बाजीराव पेशवे यांना त्यांच्या दोन्ही पत्नीवर समान प्रेम होतं. बाजीराव हे सहा फूट उंच होते. सोबतच बरेच लांब हात, भक्कम पिळदार शरीरयष्टी,तांबुस गौरवर्ण, निकोप प्रकृती, कोणीही मोहीत व्हाव असा चेहरा, तेजस्वी कांती, न्यायनिष्ठुर स्वभाव असे प्रभावी व्यक्तिमत्व होतं त्यांचं. शिवाय त्यांची राहणी अतिशय साधी होती झगमग पोशाख त्यांना आवडत नसे.

ते नेहमी पांढरे किंवा फिकट रंगाचे कपडे वापरायचे अतिशय नम्र स्वभावाचे असल्यामुळे त्यांना कधी नोकर-चाकर ची गरज भासली नाही. ते नेहमी स्वतःची कामे स्वतः करायचे. त्यांचे चार खाजगी घोडे देखील होते. निळा, गंगा, सारंग आणि अबलख अशी त्यांच्या घोड्यांची नावे होती.

बाजीराव पेशवे यांच्या कारकिर्दीत सुरुवात

२ एप्रिल १७१९ रोजी बाजीराव पेशवा यांचे वडील बाळाजी विश्वनाथ यांनी अखेरचा श्वास घेतला. बाळाजी विश्वनाथ यांच्या मृत्यूनंतर मराठा सत्तेची सर्व सूत्र सूत्रे त्यांचे पुत्र पहिले बाजीराव पेशवे यांच्याकडे सोपवण्यात आली. शाहू महाराजांच्या या निर्णयावर दरबारातील लोकांनी बाजीराव पेशवे यांना पेशवेपद देऊ नये असं इतर दरबारी लोकांचे म्हणणे होते. परंतु बाजीराव पेशवे यांचे वडील शाहू महाराजांच्या मराठा शासनाचे सेनापती व युद्ध गतिविधिचे कुशल नेतृत्व संचालक होते.

या व्यतिरिक्त शाहूमहाराजांच्या पडत्या काळामध्ये त्यांची सगळ्यात जास्त काळजी बाळाजी यांनी घेतली होती. म्हणूनच शाहू महाराज यांचा बाजीराव यांच्यावर जास्त जीव होता आणि इतर दरबारी लोकांच्या विरोधात जाऊन त्यांनी बाजीराव पेशवे यांना पेशवाईची वस्त्रे आणि शिक्के दिली. सत्ता हाती येताच बाजीराव पेशवे यांनी मराठी साम्राज्याचा विस्तार करायला सुरुवात केली आणि बघता बघता त्यांच्या वीस वर्षाच्या राजकीय आयुष्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या मराठा साम्राज्याच्या सीमा त्यांनी उत्तर भारतात विस्तारल्या.

बाजीराव पेशवा एक महान योध्दा होते. त्यांची कुशल रणनीतीच त्यांच्या राजकीय आयुष्यातील महत्त्वाची बाब ठरली. राजकीय आयुष्यामध्ये त्यांनी अनेक लढाया केल्या आणि प्रत्येक लढाई त्यांनी जिंकली होती. या लढाईमध्ये अगदी १७२३ पासून सुरू झालेली माळवा लढाई ते पुढे १७२४ मधील धार, औरंगाबाद, १७२८ मधील पालखेडची लढाई, अहमदाबाद, उदयपूर, फिरोजाबाद, दिल्ली आणि पेशावर, कंदाहार, काबुल, बलुचीस्थान आणि भारतातील भोपाळ येथे झालेली १७३८ मधील लढाई व १७ मे १७३९ रोजी घडलेली वसईची लढाई या सोबतच अजून ४७ मोठ्या लढायांचा समावेश आहे.

बाजीराव पेशवे यांच्याकडे असणारे युद्धकौशल्य अद्भुत होतं. वेगवान हालचाल करून शत्रू सावध होण्याआधीच त्याच्यावर हल्ला करायचा जेणेकरून शत्रूला सावरुन प्रतिकार करायला वेळ मिळायला नको हीच बाजीराव पेशवे यांची युद्ध रणनीती होती. त्यामुळे त्यांनी अनेक मोठ्या लढाया जिंकल्या. हैदराबादच्या निजामावर हल्ला करून त्याचा दणदणीत पराभव केला. सोबतच जिंजीचा सिद्धी, गोव्याचा पोर्तुगीज, मोगल दरबारातील सेनापति व प्रांत सरदार यांचा देखील पराभव केला.

बाजीराव पेशवे यांचे बाह्य शत्रू तर होतेच परंतु मराठा साम्राज्यातील हितशत्रू आणि सातारा दरबारातील गद्दार सेवक देखील त्यांचे शत्रू होते. बाजीराव पेशवे यांनी अतिशय चातुर्याने या सर्वांची तोंडे बंद केली. पालखेड ला निजामाचा पराभव, छत्रसाल राजाच्या राज्यावर आक्रमण करणाऱ्या मोहम्मद शाह बंगश याचा पराभव, जंजिऱ्याच्या सिद्धी चा पराभव अशा महत्त्वपूर्ण मोहिमेत बाजीराव पेशवे यांनी बाजी मारली. थोर मराठा सेनापती आणि राजकारणी पेशवा बाजीराव यांनी सतराव्या शतकाच्या मध्यात भारताचा नकाशा संपूर्णपणे बदलून टाकला. त्यांच्या लष्करी मोहिमा ही त्यांच्या प्रतिभेची उत्कृष्ट उदाहरणे होती.

औरंगजेबानंतर मुघलांनी चालू ठेवलेल्या धार्मिक असहिष्णुतेच्या कहरात बाजीराव पेशवे यांनी इस्लामिक राज्यकर्त्यांच्या हल्ल्यापासून हिंदू धर्माचे रक्षण केलं. त्यांनी हिंदू राज्याचा महाराष्ट्राच्या पलीकडे विस्तार केला. शिवाजी महाराजांनी सुरु केलेला स्वराज्य विस्तार व बाजीराव पेशवे यांनी विस्तारलेले हिंदू राज्य त्यांच्या मृत्यूनंतर वीस वर्षांनी त्यांच्या मुलाच्या नेतृत्वाखाली गेलं. अफगानांना पंजाबमधून हुसकावून लावल्यानंतर त्यांनी हिंदू चा भगवा ध्वज केवळ अटकेच्या भिंतीवरच नाही तर त्यापलीकडेही फडकवला.

या प्रकारे बाजीराव हे हिंदू धर्मातील एक महान योद्धा आणि भारताच्या इतिहासातील सर्वात प्रसिद्ध शासक म्हणून ओळखले जातात. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नंतर स्वराज्याची मोडलेली घडी पुन्हा बसविण्याच काम बाजीराव पेशवे यांनी केलं. अख्ख्या दिल्लीला हादरवून टाकणारे बाजीराव पेशवे हे एकटे महान योद्धा होते.

संपूर्ण भारतामध्ये त्यांनी आपल्या कारकीर्दीची ख्याती पसरवली. बाजीराव पेशवे यांनी अगदी शून्यातून सुरुवात केली होती. त्यांचं सैन्य त्यांच्या हाताखाली नेतृत्वाखाली तयार झालेलं होतं. फक्त चाळीस वर्षाच्या जीवनात सत्तेचाळीस लढाया जिंकल्या हे फक्त बाजीराव पेशवे यांना जमलं. उभ्या हिंदुस्थानामध्ये मराठ्यांना मानाचे स्थान मिळवून देणारे बाजीराव पेशवे होते. दिल्लीला ताळ्यावर आणणारे भारतातील एकच परमप्रतापी पुरुष म्हणजे बाजीराव पेशवे.

मृत्यू

बाजीराव पेशवे भारताच्या इतिहासातील प्रचंड पराक्रमी योद्धा ठरले. परंतु अचानक प्रकृतीत बिघाड झाल्यामुळे नर्मदातीरावर रावेर खेडी या गावांमध्ये विषमज्वराने बाजीराव पेशवे यांचा मृत्यू 2८ एप्रिल १७४० रोजी झाला. बाजीराव पेशवे यांनी खऱ्या अर्थाने शिवरायांच्या स्वराज्याचा वटवृक्ष केला. भारताच्या इतिहासात बाजीराव पेशवे यांची कारकीर्द नेहमीच अजरामर राहील.

आम्ही दिलेल्या bajirao peshwa biography in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर बाजीराव पेशवे माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या bajirao peshwa information in marathi language या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि information of bajirao peshwa in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!