Thorle Shahu Maharaj Information in Marathi थोरले शाहू महाराज “ऐसा राजा पुन्हा होणे नाही” याची प्रचिती शाहू महाराजांनी केलेल्या पराक्रम बघितल्यावर येते. छत्रपती संभाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर राजाराम राजे यांच्याकडे स्वराज्याचा कारभार गेला होता परंतु राजाराम राजे यांच्या काळात स्वर उरलेले जे काही स्वराज्य होतं ते संपूर्ण नष्ट झालं होतं. परंतु शाहू महाराजांनी त्यांच्या शासन काळात संपूर्ण हिंदुस्थानावर कब्जा केला जी श्रीं ची इच्छा होती. असेच महान आणि थोर असणारे थोरले शाहू महाराज यांचा इतिहास आजच्या लेखामध्ये आपण पाहणार आहोत.
थोरले शाहू महाराज माहिती – Thorle Shahu Maharaj Information in Marathi
नाव(Name) | थोरले शाहू महाराज |
जन्म (Birthday) | १८ मे १६८२ |
जन्मस्थान (Birthplace) | रायगड येथील माणगाव जवळील गांगवली |
राज्याभिषेक | १२ जानेवारी १७०८ |
वडील (Father Name) | छत्रपती संभाजी महाराज |
आई (Mother Name) | येसूबाई संभाजीराजे भोसले |
पत्नी (Wife Name) | अंबिकाबाई |
मुले (Children Name) | फत्तेसिंह पहिला आणि राजाराम दुसरा सातारा |
मृत्यू (Death) | १५ डिसेंबर १७४९ |
लोकांनी दिलेली पदवी | थोरले |
थोरले शाहू महाराज जन्म :
थोरले शाहू महाराज हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे नातू आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे पुत्र होते. थोरल्या शाहू महाराजांचा जन्म १८ मे १६८२ रोजी झाला. थोरल्या शाहू महाराजांचा जन्माच स्थळ हे रायगड येथील माणगाव जवळील गांगवली आहे. त्यांचं खरं नाव शिवाजी आहे परंतु ते लहानपणापासूनच औरंगजेबाच्या कैदेत असल्यामुळे औरंगजेबाला या नावाची चीड होती. परंतु शाहू महाराज त्यांचे लाडके होते म्हणून ते शाहू महाराजांना “साव” या नावाने हाक मारायचे परंतु या नावाचं पुढे “शावू” आणि मग “शाहू” असं रूपांतर झालं.
थोरले शाहू महाराज कैद :
संभाजी महाराज मोगलांच्या तावडीत सापडले होते. त्यानंतरच मोगलांनी संभाजी महाराजांची क्रूरपणे हत्या केली आणि संभाजी महाराजांच्या जाण्याने स्वराज्याची घडी पूर्णतः विस्कटली होती. मोगल स्वराज्य उद्ध्वस्त करण्याच्या पाठी लागले होते. त्यांनी आता राजाराम राजे यांना निशाण्यावर ठेवले होते.
स्वराज्याचा गाडा पुढे चालविण्यासाठी येसुबाई यांनी राजाराम राजे यांना जिंजी येथे जाण्यास सांगितले. चारी बाजूने स्वराज्य मोगलांच्या ताब्यात गेले होते. रायगडावर देखील मोगलांची सत्ता होती. नेमकं त्याच वेळी येसूबाई आणि शाहू महाराज यांना औरंगजेबाने कैद करून त्याच्यासोबत दिल्लीला नेलं. तब्बल २९ वर्षांनंतर महाराजांची आई येसूबाई यांची औरंगजेबाच्या तावडीतून सुटका झाली.
जेव्हा महाराज कैद झाले होते तेव्हा ते फक्त सात वर्षाचे होते. काही दिवसांनी औरंगजेब दख्खन येथे मरण पावला मग गादीवर हक्क गाजवण्यासाठी त्याच्या मुलांमध्ये ताणाताण सुरू झाली. तेव्हा शहाजादा आज्जम याने १७ वर्षानंतर शाहू महाराज यांना मोगलांच्या कैदेतून मुक्त केलं.
आता इतके वर्ष शाहू महाराज मोगलांच्या ताब्यात राहून आल्यामुळे मोगलांची विचारसरणी त्यांचे अंतर्गत कारभार या सगळ्या गोष्टी शाहू महाराजांना माहिती झाल्या होत्या. औरंगजेबाच्या व्यक्तिमत्वावर महाराजांनी जवळून अभ्यास केला होता. म्हणून त्यांनी त्यांची सुटका होताच मोगलांविरुद्ध युद्ध पुकारले.
परंतु राजाराम यांच्या मृत्यूनंतर त्यांची पत्नी ताराबाई यांनी मराठा साम्राज्याचा कारभार हाती घेतला होता. त्यांच्यामध्ये आणि शाहू महाराजांन मध्ये झालेल्या तहानुसार स्वराज्याची कोल्हापूर आणि सातारा अशा दोन भागांमध्ये विभागणी झाली आणि साताऱ्याचा भाग शाहू महाराजांच्या नशिबात आला.
थोरले शाहू महाराज विवाह:
जुल्फिकारखान हा औरंगजेबाचा सरदार होता. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर याने रायगडावर आक्रमण केलं आणि शाहू महाराज आणि त्यांच्या आई येसूबाई यांना कैद केलं. त्यांच्या सोबत जवळपास अडीचशे ते तीनशे इतर स्त्री आणि पुरुषांना देखील कैद केलं. त्यानंतर औरंगजेबाने शाहू महाराज आणि त्यांच्या घरच्यांची अत्यंत चांगल्या प्रकारे देखरेख केली. झिनित बेगम ही औरंगजेबाची कन्या होती. शाहू महाराज येसूबाई आणि बाकी लोकांची देखील छान प्रकारे काळजी घेतली.
एवढंच नव्हे तर औरंगजेबाने शाहू महाराजांना राजा बनण्याची मान्यता दिली आणि त्यासोबतच सात हजारांची मनसबही दिली. औरंगजेबाने शाहू महाराजांचं लग्न कन्हेरच्या शिंदे या घराण्यातील मुलीशी १७०३ मध्ये लावून दिलं. याच्या आधी शाहू महाराजांचं लग्न मनसिंहराव रुस्तमराव जाधवराव यांची कन्या अंबिकाबाई यांच्याशी झालं होतं परंतु त्या मरण पावल्या.
शाहू महाराज इतिहास – thorle shahu maharaj history in marathi
स्वराज्याची विस्कटलेली घडी शाहू महाराजांनी पुन्हा बसवायची असा निर्णय घेतला होता त्यासाठीच महाराजांनी सातारा येथे १२ जानेवारी १७०८ मध्ये राज्याभिषेक करून घेतला आणि ते स्वराज्याचे चौथे छत्रपती झाले. त्यांची हिंमत आणि धाडसी पणामुळे त्यांना छत्रपती पद मिळाले. अष्टप्रधान मंडळ देखील पुन्हा स्थापन केलं.
इतिहासातल्या नोंदीनुसार महाराजांनी स्वराज्याचा गाडा फार सुरळीतपणे चालू ठेवला त्यांनी स्वराज्य विस्तारामध्ये खूप मोठी भर घातली. संभाजी महाराजांच्या जाण्याने रायगड देखील मोगलांच्या ताब्यात गेले होते म्हणूनच पाहिलं लक्ष रायगड होतं. ८ जुन १७३३ मध्ये महाराज यांनी त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या साथीने आपला रायगड किल्ला पुन्हा मिळवून घेतला.
इतिहासात उल्लेख केल्याप्रमाणे हा किल्ल्याची लढाई महाराजांनी स्वतः लढली असं काही पुरावे नाही आहेत. कदाचित ती लढाई त्यांच्या सहकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली लढली गेली असेल. महाराजांच्या सोबत त्यांना स्वराज्याची घडी पुन्हा बसवण्यासाठी मदत करणारे सरदार म्हणजेच थोरले बाजीराव, सरदार मल्हारराव होळकर, महादजी शिंदे, आंग्रे, गायकवाड, दाभाडे.
थोरले शाहू अगदी त्यांचे वडील शूर संभाजी यांच्या सारखेच होते. महाराजांनी एकूण ४१ वर्ष राज्य केलं आणि या काळामध्ये महाराजांनी छत्रपती शिवाजी आणि छत्रपती संभाजी यांच्या जाण्यानंतर जे काही स्वराज्य उरलं होतं त्याला एक मोठ साम्राज्याचा स्वरूप दिलं. महाराजांमध्ये खूप कलागुण होते. थोरली गादी म्हणून साताऱ्याची राज्य गादी ओळखले जाते.
महाराजांना युद्धातल्या ज्ञान तसं फारसं नव्हत परंतु बाजीराव पेशवे, बाळाजी विश्वनाथ, राघोबादादा, चिमाजी आप्पा यांनी महाराजांना उत्तर हिंदुस्थान पर्यंतचा प्रदेश जिंकून देण्यात मदत केली. छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वप्न होतं हिंदुस्थान काबीज करण्याचं ते स्वप्न शाहू महाराजांनी पूर्ण करून दाखवलं. महाराजांना पुण्यश्लोक छत्रपती थोरले शाहू महाराज असे देखील म्हटले जाते.
शाहू महाराजांच्या काळात सातारा हे हिंदुस्थानाच प्रमुख राज्य बनलं होतं. स्वराज्याचे मुख्य आधारस्तंभ म्हणजेच छत्रपती संभाजी महाराज यांच्या जाण्याने स्वराज्य पूर्ण नासधूस झाली होती. शत्रूंना तोंड देण्यासाठी शाहू महाराजांकडे ना स्वतःचं राज्य होतं ना त्यांच्याकडे सैन्य होतं. शाहू महाराजांवर दुष्काळात तेरावा महिना अशी परिस्थिती होती.
या वाईट परिस्थिती मध्ये देखील महाराजांनी स्वतःचे राज्य निर्माण केलं स्वतः सैन्य निर्माण केल आणि शत्रूंशी लढा दिला. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी दक्षिण पासून तंजावर पर्यंत ते ओडिसा पासून बंगाल, गुजरात इथपर्यंत आपलं मराठा साम्राज्याचा विस्तार केला. शाहू महाराजांच्या या कारकीर्द मुळे मराठा साम्राज्य दिल्लीच्या पुढे देखील पसरले होते. समता आणि बंधुता यांचा आदर्श महाराजांनी स्वराज्य पुढे ठेवला.
त्यांच्या शांत स्वभावामुळेच त्यांना पुण्यश्लोक असेदेखील नावाजले जाते. असं म्हटलं जातं शत्रूला सुद्धा घात करण्याची इच्छा होऊ नये असा हा राजा होता. आणि म्हणूनच त्यांना अजातशत्रू असे देखील म्हटलं जायचं.
इतर माहिती :
शाहू महाराजांची तशी काही फारशी चित्र उपलब्ध नाही आहेत, पण जे काही मुख्य चित्र आहेत त्याच्यातून असे दिसून येते की शाहू महाराजांचे राहणीमान अगदी साधं होतं. ना भरजरित कपडे ना अंगावर मडलेले सोन्याचे दागिने. फक्त कमरेवर पंच्यासारखे वस्त्र आणि गळ्यामध्ये एक साधीशी मोत्याची माळ इतकच.
महाराजांना पशु आणि प्राण्यांची फार आवड होती असं त्यांच्या चित्रांवरून दिसून येतं. महाराजांना कुत्रं पाळण्याची फार आवड होती. त्यांनी खंड्या नावाचा एक पाळीव कुत्रा पाळला होता. महाराजांवर एकदा वाघाने हल्ला केला तेव्हा वाघापासून या खंड्याने त्यांचा बचाव केला होता. महाराजांचं खंड्या वर अतिशय जीवापाड प्रेम होतं.
मुंबईतील प्रिन्स ऑफ वेल्स या वस्तुसंग्रहालयात महाराजांचं एक प्रसिद्ध चित्र आहे. त्यामध्ये देखील महाराज यांच्या आजूबाजूला दोन कुत्रे आणि पशुपक्षी आहेत. त्यातील एक कुत्रा हा त्यांचा पाळीव खंड्या आहे. या चित्रांमध्ये महाराज घोड्यावर स्वार आहेत एक शुभ्र घोडा आणि त्यांच्यासोबत स्वारी साठी निघालेले हे पशु पक्षी आणि त्यांचे दोन कुत्रे देखील आहेत.
महाराजांना तसं तर राजेशाही कपडे घालण्याची आवड नव्हती परंतु या चित्रामध्ये महाराज खूप छान राजेशाही शृंगार घालून तयार होते. महाराजांनी केलेल्या साम्राज्य विस्तारामुळे महाराजांचे नाव संपूर्ण हिंदुस्थानामध्ये प्रसिद्ध झालं बहादुरशहा बादशहा यांच्यामते शाहु महाराज सर्व शूरवीरांमध्ये श्रेष्ठ आणि सर्व राज्यामध्ये थोर आहेत.
नादीरशहा इराणचा बादशहा यांच्यामते हिंदुस्तान चालवण्यासाठी हिन्दुपति शाहू हेच योग्य व्यक्ती आहेत. थोरले बाजीराव यांच्यामते छत्रपती महाराज शिवराय यांचा संपूर्ण हिंदुस्थान काबीज करावे असा संकल्प होता, त्यासाठी शाहूराजे स्वामींचा अवतार उदय झाला या शब्दांमध्ये त्यांनी शाहू महाराजां बद्दल असं त्यांचं मत व्यक्त केलं होतं.
थोरले शाहू महाराजांचे निधन केव्हा झाले:
शाहू महाराजांचे निधन १५ डिसेंबर १७४९ रोजी झाला.
वरील सर्व गोष्टी पाहून आपणास अंदाज लागला असेलच, थोरले शाहू महाराज यांची प्रतिमा कशी होती. thorle shahu maharaj information in marathi त्यांचा इतिहास काय आहे व कसा आहे? अशीच संपूर्ण माहिती आम्ही लेखाद्वारे थोडक्यात पूर्ण केली आहे. information about thorle shahu maharaj in marathi हा लेख आपल्याला आवडल्यास आपल्या मित्र परिवारासोबत फेसबुक ओट्सअप्प सारख्या विविध सोशियल मेडिया वरून माहिती पोहचवा. तसेच thorle shahu maharaj history in marathi हा लेख कसा वाटला व अजून काही थोरले शाहू महाराज यांच्या विषयी राहिले असेल तर आपण comments द्वारे कळवू शकता धन्यवाद.
आम्ही दिलेल्या thorle shahu maharaj mahiti marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू. अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट
Need to know where is Thorle Shahu Maharaj’s burial ground located? Also, the name of the river where he is buried. Thank you.