बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे Balkavi Information in Marathi

balkavi information in marathi बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे माहिती, आज आपण या लेखामध्ये बालकवी म्हणजेच त्र्यंबक बापुजी ठोंबरे यांच्याविषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत. त्र्यंबक बापुजी ठोंबरे यांना “बालकवी” म्हणून ओळखले जात होते आणि त्यांचा जन्म महाराष्ट्र राज्यातील जळगाव जिल्ह्यामधील धरणगाव या ठिकाणी १३ ऑगस्ट १८९० मध्ये झाला. त्र्यंबक बापुजी ठोंबरे यांचे वडील हे पोलीस खात्यामध्ये नोकरीसाठी होते आणि त्यांची बदली वेगवेगळ्या ठिकाणी होत होते त्यामुळे त्यांचे बालपण आणि शिक्षण हे वेगवेगळ्या ठिकाणी झाले आणि त्यांनी बेटावद, जामनेर, एनडोल या शहरामध्ये ते राहिले आणि ते चौथीच्या वर्गामध्ये असतानाच त्यांना काव्यलेखनाची आवड निर्माण झाली.

तसेच त्यांनी त्या वर्गामध्ये असतानाच श्रीधर महीपत यांच्या कविता देखील वाचल्या. महान निसर्ग आणि बालकवी म्हणून ओळखले जाणारे त्र्यंबक बापुजी ठोंबरे यांनी आपल्या कवितेतून आनंद आणि निराशा या दोन्हीही गोष्टी नेहमीन व्यक्त केले आणि त्यांच्या काही लोकप्रिय कावितामधील त्यांचे नाव घेता तोंडामध्ये येणारी कविता म्हणजे ‘आनंदी आनंद गडे इकडे तिकडे चोहीकडे. अश्या प्रकारे त्यांनी त्यांच्या कारकीर्दीमध्ये अनेक कविता लिहिल्या.

balkavi information in marathi
balkavi information in marathi

बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे – Balkavi Information in Marathi

नावत्र्यंबक बापुजी ठोंबरे
टोपणनावबालकवी
जन्म१३ ऑगस्ट १८९०
जन्म ठिकाणमहाराष्ट्र राज्यातील जळगाव जिल्ह्यामधील धरणगाव
वडिलाचे नावबापूराव देवराव ठोंबरे

बालकवी यांच्याविषयी महत्वाची माहिती – balkavi thombare information in marathi

बालकवी यांचा जन्म हा महाराष्ट्र राज्यातील जळगाव जिल्ह्यामधील धरणगाव या ठिकाणी १३ ऑगस्ट १८९० मध्ये झाला आणि त्यांच्या वडिलांचे नाव बापूराव देवराव ठोमरे असे होते आणि ते पोलीस खात्यामध्ये होते त्यामुळे त्याची बदली सतत होत होती परंतु त्यांची बदली जळगाव जिल्ह्यामध्येच होत असल्यामुळे बालकवी यांचे शिक्षण हे वेगवेगळ्या ठिकाणी झाले त्याच बरोबर त्यांचे लहानपण देखील वेगवेगळ्या ठिकाणी गेले.

त्यांच्या वडिलांच्या बदल्या ह्या जळगाव जिल्ह्यातील बेटावद, जामनेर, एनडोल आणि काही इतर भागामध्ये झाल्या आणि म्हणून बालकवींना आपले लहानपण हे या गावांच्यामध्ये घालवावे लागले. त्र्यंबक बापुजी ठोंबरे यांनी एक मोठी बहिण आणि एक मोठा भाऊ आणि एक त्यांच्या पेक्षा लहान भाऊ होता आणि अश्या प्रकारे ते चार बहिण भावंडे होते.

त्यांची बहिण जीजी ह्यांनी बालकवी म्हणजेच त्र्यंबक बापुजी ठोंबरे यांना संस्कृत शिकवले आणि त्यांना त्यांच्या बहिणीने कवितेकडे वळवले म्हणजेच त्यांनी बालकवींना कवितेच्या प्रवासाकडे नेले. तसेच त्यांनी पुढे संस्कृत मध्ये प्रभुत्व मिळवण्यासाठी स्वताहून अभ्यास केला. बालकवींनी वयाच्या अकराव्या वर्षी त्यांची पहिली कविता लिहिली परंतु त्याला कोणताही शीर्षक दिला नव्हता परंतु पुढे जाऊन त्याला प्रा. बी. एल. पाटणकर यांनी त्याला वनमुकुंद असा शीर्षक दिला.

त्यांचे दोन भावू हे स्वातंत्र्य चळवळी मध्ये सक्रीय होते त्यामुळे त्यांच्या घराची संपूर्ण जबादारी हि बालकवी यांच्यावर होती. त्यांच्या वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या आईने त्यांचे लग्न करण्याचे ठरवले आणि त्यांनी त्र्यंबक बापुजी ठोंबरे यांचे लागण पार्वतीबाई जोशी यांच्याशी लाऊ दिले. पुढे ते कुटुंबियांच्या दबावामुळे पुणे आणि अहमदनगर या ठिकाणी अधून मधून राहत होते.

बालकवी यांच्या प्रसिध्द कविता – balkavi kavita in marathi

बालकवी यांनी त्यांच्या १० ते १२ वर्षाच्या काळामध्ये एकूण १६३ कविता लिहिल्या आणि त्यामधील काही कविता प्रसिद्ध देखील झाल्या त्यामधील काही प्रसिध्द झालेल्या कविता आपण खाली पाहणार आहोत.

 • आनंदी अनाद गडे इकडे तिकडे चोहीकडे.
 • फुलराणी.
 • औदुंबर.
 • श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे.

बालकवी यांच्याविषयी विशेष तथ्ये – facts 

 • त्र्यंबक बापुजी ठोंबरे यांना “बालकवी” म्हणून ओळखले जात होते.
 • त्यांच्या वडिलांचे नाव बापूराव देवराव ठोमरे असे होते आणि ते पोलीस खात्यामध्ये काम करत होते त्यामुळे त्याची बदली सतत होत होती.
 • बालकवी यांनी त्यांच्या १० ते १२ वर्षाच्या काळामध्ये एकूण १६३ कविता लिहिल्या
 • त्र्यंबक बापुजी ठोंबरे यांनी एक मोठी बहिण आणि एक मोठा भाऊ आणि एक त्यांच्या पेक्षा लहान भाऊ होता आणि अश्या प्रकारे ते चार बहिण भावंडे होते.
 • बालकवी यांचे बालपण आणि शिक्षण हे वेगवेगळ्या ठिकाणी झाले आणि त्यांनी बेटावद, जामनेर, एनडोल या शहरामध्ये ते राहिले
 • बालकवी म्हणजेच त्र्यंबक बापुजी ठोंबरे यांचा मृत्यू हा ५ मे १९१८ मध्ये रेल्वेच्या रुळाखाली सापडून झाला.
 • त्यांची आनंदी अनाद गडे इकडे तिकडे चोहीकडे हि कविता खूप लोकप्रिय झाली होती.
 • बालकवींनी वयाच्या अकराव्या वर्षी त्यांची पहिली कविता लिहिली परंतु त्याला कोणताही शीर्षक दिला नव्हता परंतु पुढे जाऊन त्याला प्रा. बी. एल. पाटणकर यांनी त्याला वनमुकुंद असा शीर्षक दिला.
 • त्यांचे दोन्ही भाऊ स्वातंत्र्य चळवळी मध्ये सक्रीय होते त्यामुळे त्या दोन्ही भावांचे घराकडे लक्ष कमी होते त्यामुळे घर चालवण्याची जबाबदारी बालकवींच्यावर होती.

बालकवी यांचा मृत्यू – death 

बालकवी हे १९१८ च्या दरम्यान उन्हाळ्यामध्ये जीजींच्या म्हणजेच त्यांच्या बहिण्याच्या मुलीच्या लग्नासाठी खानदेशातील भादली या ठिकाणी गेले होते. त्यावेळी त्यांना त्यांचे कवी मित्र के. एम. सोनाळकर यांचे पत्र आले आणि त्यांना भेटण्यासाठी बालकवी घाईघाईने रेल्वे स्टेशनकडे चालू लागले आणि त्यांचा पाय हा रुलाकाहाली अडकल्याने त्यांचा रेल्वेखाली मृत्यू झाला आणि तो दिवस ५ मे १९१८ हा होता म्हणजेच त्यांचे वयाच्या आठविसाव्या वर्षी निधन झाले. त्यांनी त्यांच्या या अल्पश्या आयुष्यामध्ये त्यांनी एकूण १६३ कविता लिहिल्या.

आम्ही दिलेल्या balkavi information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या balkavi kavita in marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि balkavi thombare information in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!