बालुशाही रेसिपी मराठी Balushahi Recipe in Marathi

Balushahi Recipe in Marathi – Recipe of Balushahi in Marathi बालुशाही रेसिपी मराठी बालुशाही हा एक गोड पारंपारिक पदार्थ आहे ज्याचा स्वाद बहुतेक भारताच्या सर्व भागामध्ये घेतला जातो आणि हा पदार्थ सर्व ठिकाणी प्रसिध्दी मिळालेला एक पदार्थ म्हणून ओळखला जातो कारण हा पदार्थ मिठाई म्हणून दिला जातो तसेच हा पदार्थ सणासुदीला किंवा काही समारंभाच्या जेवणांमध्ये एक गोड पदार्थ म्हणून बनवला जातो. बालुशाही या पदार्थाला पारंपारिक म्हणायचे कारण हा पदार्थ बहुतेक पूर्वीच्या काळापासून बनवला जात असेल. बालुशाही आपण खात असतो त्यावेळी आपल्याला बालुशाही वरून थोडी कुरुकुरित आणि त्याचे वरचे कवच थोडे आपल्याला जाड वाटते.

आणि हा पदार्थ आतून खूप नरम आणि मऊ असतो. बालुशाही रेसिपी हि घरामध्ये बनवणे खूप सोपे आहे आणि खूप साहित्यामध्ये बालुशाही बनते. बालुशाही बनवण्यासाठी मैदा, तूप आणि साखर याबरोबर इतर काही साहित्य लागते. बालुशाही हि रेसिपी खास करून दसरा आणि दिवाळी यासारख्या भारतातील मोठ्या सणांच्यामध्ये बनवली जाते.

बालुशाही हि रेसिपी अनेक लोकांची प्रिय असते आणि हि बनवण्यासाठी खूप सोपी, कमी वेळेमध्ये आणि कमी साहित्यामध्ये बनते आणि कमी वेळेत आणि कमी साहित्यामध्ये बनून देखील हि रेसिपी खूप स्वादिष्ट लागते. म्हणून आज या लेखामध्ये आपण बालुशाही कशी बनवायची या बद्दल माहिती घेणारा आहोत.

balushahi recipe in marathi
balushahi recipe in marathi

बालुशाही रेसिपी मराठी – Balushahi Recipe in Marathi

बालुशाही म्हणजे काय ?

Recipe of Balushahi in Marathi बालुशाही हा एक भारतीय पारंपारिक गोड पदार्थ असून हा सणासुदीला, समारंभांना किंवा असाच कधी तरी खाऊ वाटल्यास केला जाणारा एक पदार्थ आहे. बालुशाही हा पदार्थ मैदा, तूप आणि साखर या मुख्य साहित्यापासून बनवला जातो. यामध्ये मैद्याच्या पिठाची बालुशाही बनवली जाते आणि ती तेलामध्ये चांगली तळली जाते आणि मग ती साखरेच्या पाकामध्ये टाकून ती अर्धा तास तशी ठेवली जाते आणि मग ती पाकातून बाहेर काढली जाते. बालुशाही या पदार्थाला काही ठिकाणी बालुशा किंवा खुरमी या नावाने देखील ओळखले जाते.

बालुशाही हा पदार्थ भारताच्या कोणत्या भागातील आहे ?

बालुशाही हा पदार्थ सध्या संपूर्ण भारतामध्ये आवडीने खाल्ला असला तरी हा पदार्थ मुळचा दक्षिण भारतातील पदार्थ आहे म्हणजेच हा पदार्थ सर्वप्रथम दक्षिण भारतात तयार झाला आणि आजही बालुशाही हा पदार्थ त्या भागातील एक विशेष पदार्थांपैकी एक असेल.

बालुशाही बनवण्यासाठी वापरले जाणारे मुख्य साहित्य – key ingredients

बालुशाही हा पदार्थ खूप सोपा आहे आणि हा पदार्थ बनवण्यासाठी खूप साहित्य देखील लागत नाही. बालुशाही बनवण्यासाठी काही महत्वाचे साहित्य लागते ज्या शिवाय बालुशाही बनू शकत नाही ते साहित्य आता आपण पाहूयात.

  • मैदा : मैदा हा घटक बालुशाही बनवण्यासाठी वापरला जाणारा मुख्य घटक आहे. मैद्यापासून बालुशाही गोळे बनवले जातात.
  • साखर : साखर हा देखील या रेसिपी मधील एक महत्वाचा घटक आहे कारण साखरेमुळेच आपली डिश गोड बनते. हा पदाथ बनवताना साखरेचा पाक बनवला जातो आणि त्यामध्ये तळलेल्या बालुशाही टाकून त्या अर्धा तास पाकमध्ये भिजवल्या जातात,
  • तूप : आपण बालुशाही गोळे बनवण्यासाठी पीठ मालत असतो त्यावेळी आपण जर पिठामध्ये तूप वापरले तर आपली बालुशाही एकदम खुसखुशीत आणि आतून खूप नरम होते. त्यामुळे तुम्ही बालुशाही मध्ये तेला ऐवजी तूप वापरले तर ते कधीही चांगले.
  • तेल : हा पदार्थ बनवताना तेलाचा वापर हा बालुशाहीचे गोळे तळण्यासाठी केला जातो.

बालुशाही हा पदार्थ कसा बनवतात – how to make balushahi recipe in marathi

बालुशाही हि रेसीपी अनेक लोकांची प्रिय असते आणि हि बनवण्यासाठी खूप सोपी, कमी वेळेमध्ये आणि कमी साहित्यामध्ये बनते आणि कमी वेळेत आणि कमी साहित्यामध्ये बनून देखील हि रेसिपी खूप स्वादिष्ट लागते. हा पदार्थ मिठाई म्हणून दिला जातो तसेच हा पदार्थ सणासुदीला किंवा काही समारंभाच्या जेवणांमध्ये एक गोड पदार्थ म्हणून बनवला जातो. आत्ता आपण बालुशाही कशी बनवायची आणि ती बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूयात.

बालुशाही बनवण्यासाठी लागणारे साहित्य – ingredients needed to make balushahi 

बालुशाही बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी खूप मोठी नसते आणि बालुशाही बनवण्यासाठी जे साहित्य लागते ते घरामध्ये अगदी सहजपणे उपलब्ध असू शकते. खाली आपण पाहूयात बालुशाही बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी.

बालुशाही गोळे बनवण्यासाठी लागणारे साहित्य 

  • २ वाटी मैदा.
  • १/४ वाटी तूप.
  • १/४ वाटी दही.
  • १ चमचा वेलची पावडर.
  • पाणी ( आवश्यकतेनुसार ).
  • सोडा ( आवश्यकतेनुसार )
  • मीठ ( चवीनुसार ).
  • १ छोटी वाटी पिस्ता आणि बदामाचे छोटे छोटे काप.

पाक बनवण्यासाठी लागणारे साहित्य 

  • २ वाटी साखर.
  • १ वाटी पाणी.
  • १/२ चमचा वेलची पावडर.

बालुशाही बनवण्यासाठी केली जाणारी कृती – balushahi recipe step by step in marathi

आता आपण बालुशाही कशी बनवतात तसेच त्याचा पाक कसा बनवतात याबद्दल माहिती घेणार आहोत. चला तर  मग बालुशाहीची कृती पाहूयात.

कृती १ : पाक बनवण्यासाठी केली जाणारी कृती

  • सर्वप्रथम एक भांडे किंवा पॅन गॅसवर मध्यम आचेवर ठेवा आणि त्यामध्ये २ वाटी साखर घाला आणि त्यामध्ये एक वाटी पाणी घाला.
  • आणि हे मिश्रण चमच्याने मध्यम आचेवर साखर विरघळूपर्यंत सतत चमच्याने हलवत रहा आणि त्याचा पाक बनवून घ्या.
  • पाक झाल्यानंतर गॅस बंद करा आणि पाक थोडा वेळ बाजूला ठेवा.

कृती २ : बालुशाही बनवण्यासाठी केली जाणारी कृती 

  • सर्वप्रथम आपण जे दही बालुशाहीमध्ये वापरणार आहोत ते दही चांगले खुसळून एकजीव करून घ्या त्यामध्ये गाठी राहणार नाहीत याची काळजी घ्या. आता ते दही थोडा वेळासाठी बाजूला ठेवा.
  • त्यानंतर एक मोठा बाऊल घ्या आणि त्यामध्ये मैदा घाला मग त्यामध्ये सोडा, मीठ आणि वेलची पावडर घाला आणि ते मिश्रण चांगले एकत्र करून घ्या.
  • आता त्यामध्ये थोडे कोमट तूप घाला आणि ते तूप संपूर्ण पिठाला चांगले लावून घ्या.
  • मग त्या पिठामध्ये दही खाला आणि ते चांगले मिक्स आणि आता या पिठामध्ये लागेल तसे पाणी घालून ते पीठ चांगले मऊ मळून घ्या आणि हे पीठ १० ते १५ मिनिटांसाठी चांगले भिजू द्या.
  • पीठ भिजले कि त्याच्या कडू एवढे गोळे बनवा आणि त्या गोळ्यांना मध्यभागी बोटाने दाबा म्हणजेच मध्यभागी गोळ्याला छिद्र पाडल्यासारखे करा.
  • अश्याप्रकारे सर्व बालुशाहीचे गोळे बनवून घ्या.
  • आता गॅसवर मध्यम आचेवर कढई ठेवा आणि त्यामध्ये बालुशाही तळण्यासाठी तेल घाला. एकदा तेल तापले कि त्यामध्ये बालुशाहीचे गोळे टाकून ते चांगले लालसर आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या ( टीप : तेलामध्ये जितके गोळे मावतात तितके गोळे घाला आणि तळून घ्या ).
  • अश्या प्रकारे तुम्ही बनवलेले सर्व गोळे टाळून घ्या.
  • जस जसे तुम्ही गोळे तळून काढता तस तसे गोळे पाकामध्ये घाला आणि कमीत कमी १५ मिनिटे गोळे पाकात राहू देत. अशीच पध्दत सर्व गोळ्यांच्यासाठी करा.
  • पाकातून बाहेर काढल्यानंतर लगेचच त्यावर पिस्ता आणि बदामाचे छोटे छोटे काप टाका.
  • आपली बालुशाही खाण्यासाठी तयार झाली.

टिप्स ( tips ) 

  • तुम्ही गोळे बनवता बनवता पाक बनवू शकता.
  • बालुशाहीचे पीठ मळण्यासाठी थंड पाण्याचा वापर करा.
  • बालुशाही तळताना मध्यम आचेवर किंवा मद आचेवर तळा त्यामुळे बालुशाही आतापर्यंत भाजली जाई.

आम्ही दिलेल्या balushahi recipe in marathi language माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर बालुशाही रेसिपी मराठी माहिती बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या balushahi kashi banvaychi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि balushahi recipe step by step in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये balushahi recipe in marathi chakali Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!