Shankarpali Recipe in Marathi – Khuskhushit Shankarpali Kashi Banvaychi खुसखुशीत शंकरपाळी रेसिपी मराठी शंकरपाळी हा एक गोड आणि कुरकुरीत पदार्थ आहे जो स्नॅक्स म्हणून खाल्ला जातो. आपण हा पदार्थ केंव्हाही बनवू शकतो आणि खाऊ शकतो. हा पदार्थ अगदी सोपा आणि झटापट बनणारा पदार्थ आहे हा बनवण्यासाठी आपल्याला कोणतेही विशेष कष्ट घ्यावे लागत नाहीत आणि हा लहानांपासून मोठ्यांपर्यंत या डिशचा कोणीही आनंद घेवू शकतो. शंकरपाळी हि आपण खासकरून दिवाळीमध्ये बनवतो आणि शंकरपाळी शिवाय आपले फराळाचे ताट पूर्ण झाल्यासारखे वाटत नाही त्यामुळे बहुतेक लोक दिवाळीमध्ये गोड किंवा खारी शंकरपाळी बनवतात.
शंकरपाळी या पदार्थाची विशेषता म्हणजे हा पदार्थ आपण १० ते १५ दिवस हवाबंद डब्यामध्ये ठेवू शकतो. हि गोड किंवा खारी शंकरपाळीचा आपण चहा सोबत आनंद घेवू शकतो.

खुसखुशीत शंकरपाळी रेसिपी मराठी – Shankarpali Recipe in Marathi
तयारीसाठी लागणारा वेळ | १५ मिनिटे |
तळण्यासाठी लागणारा वेळ | १५ मिनिटे |
एकूण लागणारा वेळ | ३० मिनिटे |
पाककला | भारतीय |
कॅलरी | २९७ |
- नक्की वाचा: बेसन लाडू रेसिपी
तयारीसाठी लागणारा वेळ | १५ मिनिटे |
तळण्यासाठी लागणारा वेळ | १५ मिनिटे |
एकूण लागणारा वेळ | ३० मिनिटे |
पाककला | भारतीय |
कॅलरी | २९७ |
शंकरपाळी हा पदार्थ घरी बनवण्यासाठी खूप सोपा आहे आणि हा कमी वेळामध्ये बनणारा पदार्थ आहे जो मैदा, साखर, तूप आणि दुध यापासून बनवला जातो. चला तर मग सविस्तरपणे पाहूयात शंकरपाळी बनवण्यासाठी लागणारे साहित्य आणि ती कशी बनवली जाते.
शंकरपाळी बनवण्यासाठी विशेष असे काही साहित्य लागत नाही आणि जे साहित्य लागते ते आपल्या घरामध्ये सहजपणे उपलब्ध असू शकते. खाली आपण शंकरपाळी बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी पाहूयात.
- ५०० ग्रॅम मैदा.
- ३ वाटी साखर.
- ६ चमचे तूप किंवा तेल ( आवडीनुसार ).
- २.५ वाटी दुध किंवा पाणी ( आवडीनुसार ).
- मीठ ( चवीनुसार ).
- १ चमचा वेलची पावडर.
- तेल ( तळण्यासाठी ).
- सर्वप्रथम एका भांड्यामध्ये २ ते अडीच वाटी दुध किंवा पाणी घ्या आणि मग त्यामध्ये ३ वाटी साखर घाला आणि त्यामधील साखर विरघळूपर्यंत ढवळत रहा एकदा त्यामधील साखर विरघळली कि ते काही वेळासाठी बाजूला ठेवा.
- आता एक पसरट ताट किंवा परात घ्या आणि त्यामध्ये ५०० ग्रॅम मैदा घ्या आणि मग ६ चमचे तूप घेवून ते गॅसवर चांगले गरम करून घ्या किंवा कडवून घ्या आणि ते कडलेले तूप मैद्यामध्ये घाला आणि ते तूप पिठाला चांगले घासून लावा.
- पिठाला चांगले तूप लावून झाल्यानंतर त्यामध्ये मीठ आणि वेलची पावडर मिक्स करून घ्या आणि मग साखरेचे दुध घालून चांगले मऊ मळून घ्या आणि ते मळलेले पीठ ८ ते १० मिनिटे पीठ भिजत ठेवा.
- मग त्या पीठाचे मध्यम आकाराचे गोळे करा आणि ते जाड लाटा आणि त्याचे चाकूने किंवा कोरण्याने शंकरपाळ्या कापून घ्या.
- एक कढईमध्ये तेल मध्यम आचेवर तेल गरम करण्यासाठी ठेवा.
- तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये थोड्या थोड्या शंकरपाळ्या घालून त्या चांगल्या कुरकुरीत आणि लालसर रंग येईपर्यंत टाळून घ्या.
- राहिलेल्या सर्व शंकरपाळ्या तेलामध्ये तळून घ्या.
- तुमच्या खमंग आणि कुरकुरीत शंकरपाळ्या तयार झाल्या.
खारी शंकरपाळी बनवण्यासाठी कोणकोणते साहित्य लागते आणि खमंग आणि खुशखुशीत खारी शंकरपाळी कशी बनवायची याबद्दल खाली आपण माहिती घेवूयात.
खारी शंकरपाळी बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी खाली दिलेली आहे.
- २०० ग्रॅम मैदा.
- १/२ वाटी पाणी.
- २ चमचे ओवा.
- मीठ ( चवीनुसार ).
- ४ चमचे तेल.
- खारी शंकरपाळी हि आपण स्नॅक्स म्हणून खाऊ शकतो आणि चहा सोबत देखील खाऊ शकतो. खारी शंकरपाळी कशी बनवली जाते ते आपण खाली पाहू.
- सर्वप्रथम एक मोठा बाऊल घ्या आणि त्यामध्ये २०० ग्रॅम मैदा घालून त्यामध्ये ओवा आणि मीठ घालून सर्व मिश्रण चांगले एकजीव करून घ्या.
- मग त्यामध्ये तेल घालून ते चांगले मिक्स करून घ्या आणि मैद्यामध्ये तेल घातल्यानंतर पिठामध्ये गुठळ्या होणार नाहीत याची काळजी घ्या.
- आता मैद्यामध्ये लागेल तसे कोमट पाणी घालून चांगले मऊ मळून घ्या ( टीप : पीठ जास्त मऊ होणार नाही याची काळजी घ्या ).
- मळलेले पिठावर झाकण घालून ते १० ते १५ मिनिटासाठी भिजू द्या.
- १० ते १५ मिनिटांनी ते पीठ चांगले भिजल्यानंतर त्याचे मध्यम आकाराचे गोळे करा आणि त्याचे पीठ लावून जाड पाने लाटून घ्या.
- त्याचे चाकूने किंवा कोरण्याने शंकरपाळ्या कापून घ्या.
- एक कढईमध्ये तेल मध्यम आचेवर तेल गरम करण्यासाठी ठेवा.
- तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये थोड्या थोड्या शंकरपाळ्या घालून त्या चांगल्या कुरकुरीत आणि लालसर रंग येईपर्यंत तळून घ्या.
- राहिलेल्या सर्व शंकरपाळ्या तेलामध्ये तळून घ्या.
- तुमच्या खमंग आणि कुरकुरीत खाऱ्या शंकरपाळ्या तयार झाल्या.
शंकरपाळी काश्यासोबत खाऊ शकतो – serving idea
शंकरपाळी हा पदार्थ आपण तसाच स्नॅक्स म्हणून खाऊ शकतो तसेच आपण शंकरपाळ्या चहा सोबत देळील खाऊ शकतो.
आम्ही दिलेल्या shankarpali recipe in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर खुसखुशीत शंकरपाळी रेसिपी मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या khari shankarpali recipe in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि shankarpali kashi banvaychi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये shankarpali recipe in marathi madhura Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट