केळी या फळाची माहिती Banana Information in Marathi

Banana Information in Marathi केळीची माहिती चवीला मधुर असणारे केळ हे जगात बहुदा सर्वत्र सापडणारे फळ आहे. शिकरण हा केळापासून बनवला जाणारा पदार्थ तर आपल्या सगळ्यांचा आवडता असतो. उपावासादिवशी ‘एकादशी दुप्पट खाशी’ या म्हणीला सार्थ करून आपला पोटोबा भरायला मदत करत ते फळ म्हणजे केळ banana in marathi. एखाद्या व्यक्तीला दवाखान्यात बघायला जाण्याचा गंभीर प्रसंग असो किंवा वास्तुशांती सारखा आनंददायी घरगुती कार्यक्रम असो पहिला मान हा केळीच्या घडाचाच. सर्वांना परवडणारे आणि सहज उपलब्ध होत असल्यामुळे केळी हे अतिशय लोकप्रिय फळ आहे. अश्या या केळीनामक गोड फळाबद्दल अजून थोड जाणून घेऊयात.

केळ हे फळ उष्णकटिबंधीय प्रदेशमध्ये पिकवले जाणारे  मूसा वंशाचे आणि Musaceae कुटुंबातील एक फळ आहे. काही बागायतदार मानतात की केळी हे पृथ्वीवरील पहिले फळ होते आणि या फळाचे मूळ दक्षिणपूर्व आशियात, मलेसीसच्या जंगलात आढळले होते. चौदाव्या शतकाच्या अखेरीस आंतरराष्ट्रीय पातळीवर केळीची विक्री होऊ लागली.

रेल्वेमार्गांचा विकास आणि रेफ्रिजरेटेड सागरी वाहतुकीतील तांत्रिक प्रगती नंतर केळीला जगातील सर्वाधिक व्यापारी फळ बनण्यास मदत झाली. इंडोनेशिया किंवा फिलिपिन्स जिथे जंगली केळीच्या अनेक जाती आजही वाढतात. त्याचबरोबर हे फळ जगातील सर्वात महत्वाच्या फळ पिकांपैकी एक आहे.

केळ हे असे फळ आहे कि जे झाडाला एका मोठ्या गुछामध्ये लागते किंवा समूहामध्ये लागते. ज्यावेळी केळीचे गुच्छ परिपक्व होण्याच्या मार्गावर असतात त्यावेळी ते काढले जाते आणि त्या गुच्छाचे छोटे छोटे भाग केले जातात. केळ हे फळ परिपक्व होण्याअगोदर हिरव्या रंगाचे असते आणि ज्या वेळी ते परिपक्व होते त्यावेळी त्याचा रंग पिवळा होतो.

केळी हा शब्द ‘बोट’ या अरब शब्दा मधून आला आहे. या फळाचा गाभा हा मऊ आणि पांढऱ्या रंगाचा असतो आणि हे फळ खूप गोड असते तसेच या फळाची साल खाल्ली जात नाही ती काढून टाकली जाते. केळी एक उच्च औषधी वनस्पती आहे जी १५ मीटर पर्यंत वाढू शकते. जगभरात केळीच्या १००० पेक्षा जास्त विविध जाती वाढल्या आहेत आणि ५० गटांमध्ये विभागल्या आहेत. काही गोड आहेत, जसे कॅव्हेंडिश विविधता, जी सर्वात सामान्य आणि सर्वात जास्त निर्यात केली जाते.

banana information in marathi
banana information in marathi / banana in marathi
अनुक्रमणिका hide
1 केळी या फळाची माहिती – Banana Information in Marathi

केळी या फळाची माहिती – Banana Information in Marathi

सामान्य नावकेळ
इंग्रजी नावbanana(keli in marathi)
वैज्ञानिक नावमुसा (musa)
कुटुंबMusaceae
रंगहिरवा ते पिवळा
केळीचा उगमया फळाचे मूळ दक्षिणपूर्व आशियात, मलेसीसच्या जंगलात आढळले होते.
वजन१२० ते १२५ ग्रॅम
आयुष्य२० ते २५ वर्ष
पोषक घटककेळ या फळामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी – ६ आणि पोटॅशियमचा उत्कृष्ट स्त्रोत त्याचबरोबर ते फायबर देखील प्रदान करतात

इतिहास

संशोधकांच्या अभ्यासानुसार १०००० वर्ष्यांचा पुरातन इतिहास या फळाला लाभलेला आहे. अलीकडेच याचे पुरावे ग्रीक पुराणशास्त्र, बुद्धकालीन पाली भाषा, प्राचीन चिनी तत्वज्ञान तसेच लॅटिन व अरबी भाषेत मिळालेले आहेत. इसवी सन पूर्व ५०० काळात संस्कृतमध्येसुद्धा केळीचा उल्लेख ‘कदलीफलम’ असा आहे.केळीचे मूळ दक्षिण-पूर्व आशियामधील मलाया पेनिनसुला तसेच इंडोनेशिया फिलिपिन्स व न्यू गिनी येथे आढळून आलेले आहे.

इसवी सन पूर्व ३२७ अरब विजेत्यांनी दक्षिण भागातून हे फळ पश्चिमेकडे आणले.पंधराव्या शतकाच्या उत्तरार्धात पोर्तुगीज खलाश्यांनी केळी दक्षिण आफ्रिकेतून युरोपमध्ये आणली. त्यानंतर विविध प्रदेशांच्या शोधार्थ निघालेल्या वेगवेगळ्या प्रवाशांकडून हे फळ जगभरात सर्वत्र पसरले गेले.

रोमन सम्राट ऑक्टाव्हियस ऑगस्टस याचे वैयक्तिक चिकित्सक अँटोनियस मूसा यांना केळीच्या लागवडीचे श्रेय देण्यात आले. अठराव्या शतकात (१८३४) केळीचे उत्पादन सुरू झाले असले तरी खऱ्या अर्थाने केळी बाजारात येण्यास एकोणिसावे शतक उजडावे लागले.

शब्दाची व्युत्पत्ती

‘बनाना’ हा केळीसाठी वापरला जाणारा इंग्रजी शब्द खरतर अरबी लोकांनी वापरलेल्या ‘बनान’ या शब्दापासून आलेला आहे. तसेच गिनी लोकांनी केळीसाठी वापरलेल्या ‘बनिमा’ या शब्दापासून देखील त्याचा उगम झाला असावा असे अभ्यासकांचे मत आहे.

वैज्ञानिक पार्श्वभूमी

वनस्पतीशास्त्रानुसार, केळी हे बेरी प्रकारातील फळ आहे. केळ्याच्या विविध प्रजाती मुसा नावाच्या वंशात आढळून येतात.त्यापैकी काही प्रजातींची नावे पुढीप्रमाणे – मुसा ॲक्युमिनाटा, मुसा बॅल्बीसिआना, मुसा पॅराडिसिका. यापैकी मुसा ॲक्युमिनाटा ही प्रमुख प्रजाती आहे. ॲक्युमिनाटा ही केळीच्या फुलासंदर्भात वापरली जाणारी संज्ञा असून त्याचा अर्थ निमुळते होत जाणारे फुल जे केळ या फळाची निर्मिती करते.मुसा सेपिएंटम हे वैज्ञानिक नावदेखील केळीसाठी होते जे आता वापरेल जात नाही .त्याचा अर्थ ‘शहाण्या माणसाचे फळ’ असा होतो.

वर्णन

वाढीनुसार जरी केळ हे झाड वाटत असले तरी ते वनस्पती या गटात मोडते. केळीचे रोप हे त्या त्या प्रदेशातील हवामानानुसार ५ ते १५ फूट लांब एवढे विस्तार पावते. पानांची लांबी ५ फूट लांब ते १ फूट रुंद अश्या पद्धतीने वाढते. केळीचे देठ हे मृदू आणि ओलसर असतात.पाने ही रोपाच्या वरच्या बाजूस फुटू लागतात.

आवश्यक असे उष्ण वातावरण मिळाल्यानंतर केळीची फुले वरून जमिनीच्या दिशेला निमुळत्या पद्धतीने वाढत येतात.या फुलांचा एक भरगच्च गुच्छ तयार होतो. उबदार वातावरण मिळाल्यानंतर त्या फुलांचे केळीच्या घडात रुपांतर होते.एका घडामध्ये साधारणतः १० फण्या असतात आणि एका फणीमध्ये ते १५ ते २० केळी असतात.

9 केळीचे प्रकार व जाती नावे

जगात सर्वत्र आढळून येणाऱ्या केळाचे १००० हून अधिक विविध प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. त्यापैकी काही खालीलप्रमाणे-

1. प्लॅंटेन-:

ही केळी चवीला तसेच आकाराने बटाट्यासारखी असतात. म्हणजेच गोडीला कमी असणाऱ्या गटात ह्या केळांचा समावेश होतो. इतर प्रकारच्या केळ्यांच्या तुलनेने यामध्ये स्टार्चचे प्रमाण जास्त असते. ऑरिनोको ,ब्लूगोइ,फेही,माचो,प्लॅंटेन आणि र्हायनो हाॅर्न अश्या पाच प्रकारच्या प्लॅंटेन केळी अस्तित्त्वात आहेत.

2.कॅव्हेन्डिश-:

ह्या प्रकाराला डेव्हनशायरचे 6 वे ड्यूक विल्यम कॅव्हॅन्डिश यांच्या नावावरून कॅव्हेन्डिश हे नाव देण्यात आले आहे. लांबीला थोडे अधिक ,पिवळ्या रंगाचे,बारीक, मोठे,काळे,तपकिरी ठिपकेअसणारी, थोडीशी गोड असणारी केळे म्हणजे कॅव्हेन्डिश केळे होय.जगभरात सर्वात जास्त प्रमाणात निर्यात केला जाणारा केळीचा प्रकार कॅव्हेंडीश आहे.

3.ग्रॉस मिशेल-:

या प्रकारच्या केळ्यांना बिग माईक असे देखील म्हणतात.याची चव आणि आकार हा कॅव्हेन्डिश केळ्यांसारखाच लागतो. ही केळी अद्यापही काही भागात आढळून येतात.१९५० च्या दरम्यान बुरशीमुळे खूप पिके नष्ट होण्याआधी ही सर्वात जास्त निर्यात केली जाणारी केळी होती.

4.ब्लू जावा:-

विशेषतः हवाईमध्ये आढळणाऱ्या या प्रकारच्या केळींना ‘आईस्क्रीम केळी’ असे देखील म्हणतात. याची चव व्हॅनिला आइस्क्रीमसारखी असल्याने त्याला हे नाव देण्यात आले आहे. चंदेरी निळी छटा असलेली ही केळी पिकल्यानंतर फिक्कट गुलाबी पिवळ्या रंगाची दिसू लागतात.

5.मॅंनझानो-:

चवीला अतिशय मधुर असणारी ही केळी हवाईच्या उष्ण कटिबंधातील जंगलामध्ये आढळून येतात. यांना ॲपल केळी असे देखील म्हणले जाते. कारण ही केळी लहान आणि गुबगुबीत असल्यामुळे ती सफरचंद आणि स्ट्रॉबेरी या फळांसारखी दिसतात. पूर्ण पिकल्यानंतर जेव्हा ती काळी पडतात तेव्हा ती चवीला अतिशय मधुर लागतात.त्यामुळेच त्यांना कँडी केळी असेही म्हणले जाते. उष्ण कटिबंधात ह्या फळापासून बनवले जाणारे गोड पदार्थ अतिशय लोकप्रिय आहेत.

6.पिसांग राजा-:

पिसांग राजा ही केळी जाड नी मलईदार असतात. ह्यांना ‘बौना’ प्रकारची केळी असेदेखील म्हणले जाते.ह्या प्रकारची केळी इंडोनेशियात उपलब्ध होतात. तिथे ह्या केळ्यांचा वड्यासारखा पदार्थ बनवला जातो. पिसांग राजा केळ्यांना मुसा बेल्ले केळी असेदेखील म्हणले जाते.

7.लाल केळी-:

लाल केळी ही अन्य केळींच्या तुलनेने छोटी पण गुबगुबीत असतात.ही केळी दिसायला अतिशय सुंदर असतात.तसेच चवीला देखील गोड असतात पण जेव्हा ती पूर्णपणे पिकून लाल होतील तेव्हाच.

8.प्रेईंग हॅंड्स-:

या प्रकारात दोन केळींचे घड एकमेकांना हात जोडल्यासारखे चिकटलेले असतात.त्यांच्या या रचनेमुळे त्यांना हे नाव दिलेले आहे. ही केळी साधारणतः इतर प्रकारांतील केळीच्या तुलनेत गोडीला कमी असतात.तसेच त्यांना किंचित व्हॅनिलासारखी चव असते.

9.लेडी फिंगर-:

४ ते ५ इंच लांबीची लहानशी, फिक्कट पिवळ्या रंगाची जाडसर साल असलेली केळी म्हणजे लेडी फिंगर केळी. अर्थातच ती छोटीशी पण चवीला कॅव्हेन्डिश पेक्ष्याही जास्त गोड असतात.

केळी खाण्याचे फायदे – banana benefits in marathi

केळ या फळामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी – ६ आणि पोटॅशियमचा उत्कृष्ट स्त्रोत त्याचबरोबर ते फायबर देखील प्रदान करतात आणि यामध्ये चरबी, कोलेस्टेरॉलमुक्त आणि सोडियम कमी असते त्यामुळे केळ या फळाचे अनेक आरोग्य फायदे आहेत ते आपण खाली पाहू.

  • उत्तम हृदयाचे आरोग्य

केळ हे शरीराला नियमित हृदयाचे ठोके, रक्तदाब कमी आणि शरीरातील पाण्याचे योग्य संतुलन राखण्यास मदत करते. ते पोटॅशियम समृध्द असल्यामुळे, केळे शरीराच्या रक्ताभिसरण प्रणालीला मेंदूला ऑक्सिजन पोहोचवण्यास मदत करतात. पोटॅशियम युक्त पदार्थ वृद्ध स्त्रियांमध्ये स्ट्रोकचा धोका कमी करण्यासाठी देखील ओळखले जातात.

  • पौष्टिकतेचे पॉवरहाऊस

हे फळ पोटॅशियम, कॅल्शियम, मॅंगनीज, मॅग्नेशियम, लोह, फोलेट, नियासिन, रिबोफ्लेविन आणि बी ६ सारख्या आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजांनी भरलेले आहे. हे सर्व शरीराच्या योग्य कार्यासाठी आणि आपल्याला निरोगी शरीरासाठी योगदान देतात.

  • चेहऱ्यावर हास्य ठेवते

केळ्यामध्ये थोड्या प्रमाणात ट्रिप्टोफॅन नावाचे एक अमीनो आम्ल असते जे केळीच्या नैसर्गिक व्हिटॅमिन बी ६ सह एकत्र केल्याने सेरोटोनिन ‘फील-गुड हार्मोन’ चे उत्पादन वाढण्यास मदत होते. हा मूड-रेग्युलेटिंग पदार्थ तुमच्या मनाला आणि शरीराला आराम करण्यास मदत करू शकतो जेणेकरून तुम्हाला आनंदी वाटेल.

  • उच्च फायबर सामग्री

केळी या फळामध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असतात. विरघळणाऱ्या फायबरमध्ये पचन कमी करण्याची प्रवृत्ती असते आणि तुम्हाला दीर्घकाळ तृप्त वाटत राहते. म्हणूनच केळी बर्‍याचदा नाश्त्याच्या जेवणात समाविष्ट केल्या जातात जेणेकरून आपण पुढील जेवणाची चिंता न करता आपल्या दिवसाची सुरुवात करू शकता.

  • एनर्जी बूस्टर

जेव्हा तुम्हाला दुपारी थकवा आणि आळस जाणवतो तेव्हा कॉफी किंवा शर्करायुक्त नाश्ता करू नका. त्याऐवजी एक केळी खा त्यामुळे तुमची उर्जा पातळी जास्त काळ टिकेल.

  • अशक्तपणाशी लढण्यास मदत करते

केळ्यात लोहाचे प्रमाण जास्त असते आणि ते अशक्तपणा ग्रस्त लोकांसाठी चांगले आहेत. अशक्तपणा ही अशी स्थिती आहे जिथे रक्तातील लाल रक्तपेशी किंवा हिमोग्लोबिनची संख्या कमी होते. यामुळे थकवा, दम लागणे आणि फिकटपणा येतो. त्यामुळे आपण जर रोज एक केळ खाल्ले तर आपल्याला अशक्तपणाशी लढण्यास मदत होते.

  • पचन मध्ये सुलभता

आयुर्वेदानुसार केळीला गोड आणि आंबट चव असते. गोड चव जडपणाची भावना आणते असे म्हटले जाते परंतु आंबट चव अग्नीला उत्तेजित करण्यासाठी ओळखले जाते, ज्यामुळे पचनास समर्थन मिळते आणि चयापचय वाढण्यास मदत होते.

  • रक्तदाब नियंत्रित ठेवते

केळ्यामध्ये कमी मीठाचे प्रमाण आणि पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते आणि केळीच्या याच गुणधर्मामुळे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होते. परंतु आपल्या आहारात ते जोडण्यापूर्वी आपण आपल्या पोषणतज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.

केळीच्या झाडाचे भाग – banana tree information in marathi

भारतामध्ये केळीचे रोप हे वृद्धी आणि पुनरुत्पादनाचे प्रतीक मानले जाते. केळीच्या रोपामधील सर्व भागांमध्ये औषधी गुणधर्म असल्याकारणाने त्याचा विविध पद्धतीने वापर केला जातो.या रोपाचे विविध भाग खालीलप्रमाणे-

1.खोड

इंग्रजीमध्ये ‘रायझोम’ नावाने ओळखले जाणारे केळीचे खोड हे एक प्रकारचे कंद असते. जमिनीखाली असणारी मूळे ही खोडामध्ये देखील वाढीस पावतात. म्हणून याला मुळरुपी कंद असेदेखील म्हणतात. यामध्ये खनिजे, जीवनसत्वे तसेच कॅल्शियम यांचा विपुल प्रमाणात साठा असतो. याचा उपयोग साखर तसेच कॉलेस्ट्रॉल नियंत्रणात आणण्यासाठी केला जातो. तसेच मूळव्याधीवर हे गुणकारी औषध मानले जाते. याच्यापासून आपण भाजी किंवा कोशिंबीरदेखील बनवू शकतो.

2.पान – banana leaves information in marathi

आकाराने विस्तीर्ण,जलरोधक,लवचिक आणि आकर्षक दिसणाऱ्या केळीच्या पानामध्ये जंतू विरोधक गुणधर्म असतात. याच कारणामुळे सणसमारंभाच्या प्रसंगी या पानामध्ये जेवण वाढले जाते. तसेच या पानांच्या विशिष्ट सुवासामुळे त्यामध्ये अन्न शिजवलेदेखील जाते.सणासुदीला या पानांचा उपयोग सजावटीसाठी देखील केला जातो.बहाराच्या सुमारास एका रोपाला ३० ते ४० पाने येतात. यामध्ये अन्न बराच वेळ सुरक्षित आणि गरम राहू शकत असल्याकारणाने त्याचा वेष्टण म्हणून देखील वापर केला जातो.

3.साल

केळीचे साल हे निरुपयोगी नसून त्यामधे पोटॅशियम, मॅग्नेशियम तसेच व्हिटॅमिन बी 6 आणि व्हिटॅमिन बी 12 भरपूर प्रमाणात आढळते. यामध्ये असणारे ट्रायटोफन हे व्हिटॅमिन बी 6 सह एकत्रितपणे डिप्रेशन तसेच मूड डिसऑर्डर यांसारख्या मानसिक आजाराची लक्षणे दूर करण्यास मदत करते.केळीच्या सालापासून केरळमध्ये चविष्ट अशी भाजी रस्सा बनवली जाते ज्याला ‘थोरण’ असे म्हणतात.

4.फूल

अतिशय सुंदर दिसणारे केळीचे फूल हे अँटीऑक्सिडंट्स,टॅनिन,अमिनो अॅसिड,जीवनसत्त्वे यांनी पुरेपूर आहे. हे फूल अनियमित येणारी मासिक पाळी तसेच पाळीच्यावेळी होणारी पोटदुखी यांवर अतिशय गुणकारी आहे. तसेच आपली चयापचय शक्ती वाढवण्यास मदत करते.या फुलापासून ‘पोरियल’ नावाची रसदार भाजी तामिळनाडूमध्ये बनवली जाते.

केळ हे फळ स्वयंपाकामध्ये कसे वापरले जाते 

  • केळ या फळाचा वापर केक, कुकीज, मफिन आणि क्विक ब्रेड बनवण्यासाठी केला जातो.
  • पाई, मिष्टान्न, सॉस, पुडिंग आणि कस्टर्ड बनवण्यासाठी देखील केळीचा वापर केला जातो.
  • केळाचे चिप्स देखील बनवतात.

केळ या फळाविषयी मनोरंजक तथ्ये – interesting facts about banana 

  • केळी हि फळे हवाईयन पाककृतीमध्ये विशेषता लोकप्रिय आहे.
  • केळ या फळामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी – ६ आणि पोटॅशियमचा उत्कृष्ट स्त्रोत त्याचबरोबर ते फायबर देखील प्रदान करतात आणि यामध्ये चरबी, कोलेस्टेरॉलमुक्त आणि सोडियम कमी असतात.
  • केळीच्या झाडांमधून घेतलेले फायबर कपडे बनवण्यासाठी वापरले जाऊ शकतात.
  • ब्राझीलियन स्वयंपाक पध्दती मध्ये केळ हे लोकप्रिय फळ पेयांमध्ये मिसळलेले, भाजलेले आणि पीठात मिसळलेले, उकडलेले आणि प्युरीमध्ये शिजवलेले, तळलेले, भाजलेले किंवा कच्चे खाल्ले जाते.
  • लेडी फिंगर केळी लहान, गोड असतात आणि तुलनेने पातळ कातडे असतात.
  • आजकाल बाजारामध्ये विकल्या जाणाऱ्या केळीचा सर्वात लोकप्रिय प्रकार म्हणजे कॅव्हेंडिश केळी, हे पनामा रोगाच्या प्रतिकारासाठी प्रतिरोधक आहे
  • १५० हून अधिक देशांमध्ये केळीची लागवड केली जाते आणि दरवर्षी ११० दशलक्ष टन फळे तयार केली जातात.
  • सरासरी केळीचे वजन सुमारे १२५ ग्रॅम असते आणि केळीमध्ये सुमारे ७५ % पाणी असते.
  • केळ्यामध्ये भरपूर पोटॅशियम असते ज्यामुळे ते इतर फळांपेक्षा अधिक किरणोत्सर्गी बनते. आपल्याला काळजी करण्याची गरज नाही कारण या नैसर्गिकरित्या होणाऱ्या किरणोत्सर्गाचा शरीरावर फार कमी परिणाम होतो.
  • परदेशात पाठवलेली केळी हिरव्या रंगात निवडली जातात आणि जेव्हा ते त्यांच्या गंतव्यस्थानावर पोहोचतात तेव्हा विशेष परिस्थितीत पिकवले जातात.
  • भारतामध्ये केळीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते.

उपयोग

  1. केळीची पाने खाण्याच्या पदार्थांसाठी वेष्टण/आवरण म्हणून वापरले जातात.
  2. केळीच्या झाडातील तंतूंचा वापर कपडे तयार करण्यासाठी केला जाऊ शकतो.
  3. केळीच्या सालांचा वापर झाडांसाठी वापरण्यात येणाऱ्या कंपोस्ट खतामध्ये करता येतो.
  4. वाळलेल्या केळीच्या सालामध्ये टॅनिन भरपूर प्रमाणात असल्यामुळे त्याचा उपयोग लेदरला काळा रंग लावण्यासाठी केला जातो.
  5. या रोपाच्या खोडाचा रस हा दोरी,कागद तसेच चटई बनवण्यासाठी केला जातो.

केळामधील पोषक घटक – nutrition value 

पोषक घटकप्रमाण
कॅलरी१०५
सोडियम१.२ ग्रॅम
फायबर३ ग्रॅम
व्हिटॅमिन सी१० मिली ग्रॅम
मॅग्नेशियम३२ मिली ग्रॅम
कर्बोदक२७ ग्रॅम
साखर१४ ग्रॅम
पोटॅशियम४२२ ग्रॅम
प्रथिने१.३ ग्रॅम

 १३५ हून अधिक देशांमध्ये आवडीने चाखले जाणारे हे फळ मधुर चवीबरोबरच विविध औषधी गुणधर्मांनी युक्त असे आहे.आपल्या छोट्याश्या रोपतून ते सतत काहीना काही राहत.आपल्याला देखील असाच दुसऱ्यांच्या उपयोगी येण्याचा आणि परस्परांतील गोडवा जपण्याचा संदेश छोटसं फळ देऊन जात.

वरील सर्व गोष्टी पाहून आपणास अंदाज लागला असेलच कि केळी banana information in marathi wikipedia या फळाचे फायदे तोटे आणि त्याची लागवड कशी करावी त्याचबरोबर रोग नियंत्रणासाठी कोणती उपाययोजना करावी हे सर्व या लेखातून आपल्याला भेटले आहे. banana information in marathi हा लेख आपल्याला आवडल्यास आपल्या मित्र परिवारासोबत फेसबुक ओट्सअप्प सारख्या विविध सोशियल मेडिया वरून माहिती पोहचवा. तसेच information of banana in marathi हा लेख कसा वाटला व अजून द्राक्षांबद्दल काही राहिले असेल तर आपण comments द्वारे कळवू शकता धन्यवाद.

banana fruit information in marathi या आम्ही दिलेल्या माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू. अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!