बांद्रा किल्ल्याची माहिती Bandra Fort Information in Marathi

bandra fort information in marathi बांद्रा किल्ल्याची माहिती, महाराष्ट्रातील मुंबई या शहराला देखील एक ऐतिहासील वारसा लाभलेला आहे त्यामुळे आपल्याला मुंबई मध्ये देखील अनेक ऐतिहासिक स्मारके पाहायला मिळतात तसेच छोटे छोटे किल्ले देखील पहायला मिळतात आणि त्यामधील एक किल्ला म्हणजे बांद्रा किंवा ज्याला वांद्रे किल्ला म्हणून देखील ओळखले जाते. बांद्रयाचा हा किल्ला १६४० च्या सुमारास पोर्तुगीजांनी बांधला होता आणि हा किल्ला माहीम उपसागर, पश्चिमेला अरबी समुद्र, दक्षिणेला वरळीची बेटे आणि नैऋत्येस माहीम शहराकडे लक्ष देण्यासाठी बांधला होता आणि बांद्रा हा किल्ला एक टेहळणी बुरुज म्हणून बांधला होता.

बांद्रा हा किल्ला महाराष्ट्र राज्याची राजधानी असणाऱ्या मुंबई या शहरामध्ये वसलेला आहे आणि हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपासून १७ किलो मीटर अंतरावर आहे आणि या किल्ल्याची उंची हि समुद्रसपाटीपासून २४ मीटर इतकी आहे आणि या किल्ल्याला कॅस्टेला डी अगुआडा या नावाने देखील ओळखले जाते आणि या किल्ल्यावर दिल चाहता हे आणि काही इतर चित्रपटांचे देखावे देखील या ठिकाणी झालेले आहेत.

bandra fort information in marathi
bandra fort information in marathi

बांद्रा किल्ल्याची माहिती Bandra Fort Information in Marathi

किल्ल्याचे नावबांद्रा किल्ला, वांद्रे किल्ला किंवा कॅस्टेला डी अगुआडा
स्थापनाइ.स १६४०
कोणी बांधलापोर्तुगीज
ठिकाणमुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपासून १७ किलो मीटर अंतरावर
किल्ल्याची उंची२४ मीटर

बांद्रा किल्ल्याचा इतिहास – bandra fort history in marathi

बांद्रा किल्ला हा १९४० मध्ये पोर्तुगीजांनी बांधला आहे आणि या किल्ल्याला वापर हा त्या भागातील पाहणी करण्यासाठी टेहळणी बुरुज म्हणून केला जात होता. १८ व्या शतकामध्ये पूर्वार्धात पोर्तुगीजांच्या अध:पतनानंतर इंग्रजांना मराठ्यांचा सर्वात मोठा धोका होता आणि म्हणून पोर्तुगीजांच्या अपरिहार्य पराभवाचा अंदाज घेऊन इंग्रजंनी किल्ल्याचा एक भाग पाडून टाकला जेणेकरून मराठी सैनिक किल्ल्याचा वापर हा ब्रिटीश सैन्याविरुद्ध करून घेऊ नये.

परंतु १७३९ मध्ये मराठा सैनिकांनी या किल्ल्यावर आक्रमण केले आणि हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला आणि हा किल्ला १७७४ पर्यंत मराठ्यांच्याकडे राहिला म्हणजेच हा किल्ला पहिल्या अँग्लो मराठा युध्दामध्ये हा किल्ला इंग्रजांच्याकडे गेला.

बांद्रा किल्ल्याविषयी काही मनोरंजक तथ्ये – facts

 • बांद्रा किल्ल्याला कॅस्टेला डी अगुआडा असे म्हणतात आणि या किल्ल्यालाव्र बुढा मिल गया, दिल चाहता हे या सारख्या अनेक हिंदी चित्रपटाचे शुटींग झाले आहे.
 • बांद्रा किल्ला हा पोर्तुगीजांनी एक टेहळणी बुरुज म्हणून बांधला होता आणि त्यामुळे या आजूबाजूच्या परिसरावर लक्ष ठेवणे सुलभ झाले.
 • २०३३ मध्ये बांद्रा किल्ला वाचवण्यासाठी वांद्रे राहिवासिंनी एक संवर्धन कार्यक्रम राबवला होता आणि या कार्यक्रमाची सुरुवात खासदार शबाना आझमी यांनी केली होती.
 • वांद्रे किल्ला हा भारतीय पुरातत्व सर्वेक्षणच्या मालकीचा आहे.
 • या परिसरामध्ये असणाऱ्या एका गोड्या पाण्याच्या झऱ्याने जाणाऱ्या जहाजांना पिण्याचे पाणी पुरवले त्यामुळे किल्ल्याला त्याचे नाव कॅस्टेला डी अगुआडा असे नाव पडले आहे.
 • बांद्रा किल्ला हा माऊंट चेरी चर्च पासून १ किलो मीटर अंतरावर आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पासून १७ किलो मीटर आहे म्हणजेच हे या किल्ल्याजवळचे सर्वात जवळचे विमानतळ आहे.
 • बांद्रा किल्ला हा पोर्तुगीजांच्या राजवटीमध्ये सात तोफांनी आणि इतर लहान तोफा संरक्षक म्हणून सज्ज होते.
 • इ.स १७३९ मध्ये मराठा सैनिकांनी या किल्ल्यावर आक्रमण केले आणि हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला होता.
 • हा किल्ला १७७४ पर्यंत मराठ्यांच्याकडे राहिला म्हणजेच हा किल्ला पहिल्या अँग्लो मराठा युध्दामध्ये हा किल्ला इंग्रजांच्याकडे गेला.
 • १८ व्या शतकामध्ये वांद्रे या ठिकाणी मराठी सत्तेच्या लढाईनंतर हा किल्ला इंग्रजांना मुंबईमधील त्यांच्या प्रदेशाची ढाल म्हणून धोका वाटत होता.

बांद्रा किल्ल्यावर काय पहावे – what to see in fort

बांद्रा किल्ल्यावर बहुतेकदा स्थानिक लोक विश्रांतीसाठी किंवा आराम करण्यासाठी येतात आणि या किल्ल्यावरून अरबी समुद्राचे विहंगमय आणि अविस्मरणीय दृश्य दिसते तर वांद्रे वरली सी लिंकचे एक सुंदर दृष्य देखील या किल्ल्यावरून आपल्याला पहायला मिळते.

या किल्ल्यावर दिल चाहता हे तसेच बुढा मिल गया या चित्रपटांचे काही देखावे शूट झाल्यामुळे हा किल्ला आणखीनच लोकप्रिय झाला आहे आणि जर आपण मुंबई मध्ये वांद्रे परिसरामध्ये गेलो तर बांद्रा किल्ला हा एक पाहण्यासारखे ठिकाण आहे./

बांद्रा किल्ल्यापर्यंत कसे पोहचायचे – how to reach

जर तुम्हाला वांद्रे ह्या किल्ल्याला भेट द्यायची असल्यास तुम्ही कोणत्याही मार्गाने मुंबई पर्यंत येऊ शकता म्हणजेच तुम्ही मुंबई या शहरामध्ये कोणत्याही मुख्य शहरातून बस, ट्रेन किंवा विमानाने येऊ शकता. जर तुम्हाला बसने जायचे असल्यास बसने तुम्ही मुंबई शहरामध्ये पोहचू शकता.

जर तुम्हाला विमानाने यायचे असल्यास तुम्ही विमानाने मुंबई मध्ये येऊ शकता किंवा ट्रेनने देखील तुम्ही वांद्रे रेल्वे स्थानकावर पोहचू शकता आणि तेथून टॅक्सी पकडून किल्ल्यापर्यंत पोहचू शकता.

टिप्स – tips

 • काही ठिकाणी ऐतिहासिक इमारती पाहण्यासाठी विशिष्ठ प्रवेश शुल्क घेतले जातात परंतु बांद्रा किल्ला पाहण्यासाठी कोणताही प्रवेश शुल्क घेतला जात नाही.
 • बांद्रा किल्ला हा पर्यटकांना पाहण्यासाठी सकाळी १० ते रात्री ८ पर्यंत उघडा असतो.
 • बांद्रा हा किल्ला पर्यटकांच्यासाठी आठवड्यातले सातही दिवस खुला असतो आणि या किल्ल्यावर स्थानिक लोक या किल्ल्यावर विश्रांती घेण्यासाठी येतात.

आम्ही दिलेल्या bandra fort information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर बांद्रा किल्ल्याची माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या bandra fort history in marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि information about bandra fort in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!