वडाच्या झाडाची माहिती Banyan Tree Information in Marathi

Banyan Tree Information in Marathi आपल्या भारतीय संस्कृती मध्ये वडाच्या झाडाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. आपल्याला माहीत असलेली सत्यवान – सावित्री ची कथा ह्या banyan tree in marathi वडाच्या झाडाशी इतकी निगडित आहे कि वटपौर्णिमेच्या दिवशी सर्व हिंदू स्त्रिया आजही श्रद्धेने आपल्या पतीचे दीर्घायुष्य वडाच्या झाडाचे पूजन करून मागतात. पूर्वीच्या काळातील बुद्धिमान, सावित्री वटवृक्षाचे महात्म्य म्हणजेच महत्व जाणत होती, म्हणूनच तिने मृर्च्छित सत्यवानाला वडाच्या झाडाखाली झोपवले, कारण वडाचे झाड इतर झाडांच्या तुलनेत सर्वात जादा म्हणजेच साठ टक्के प्राणवायू हवेत सोडते. तिला माहीत होते, की तिच्या मृत पतीला त्यावेळी प्राणवायूची जास्त गरज होती!

आधुनिक भाषेमध्ये विचार केला गेला तर वटवृक्ष हे नैसर्गिक व्हेण्टिलेटरचे काम करतो. जेणेकरून आपोआप त्याच्या अवती भोवती राहणाऱ्यांना प्राणवायू भेटत असतो. अशा ह्या वडाच्या झाडाची अजून माहिती आज आपण करून घेऊ.

banyan tree information in marathi
banyan tree information in marathi

वडाच्या झाडाची माहिती – Banyan Tree Information in Marathi

वडाचे झाड – Vadache Jhadमाहिती
कुटुंबमोरेसी
किंगडमप्लाँटी
ऑर्डररोजालेस
पोटजातफिकस
कूळमोरेसी
महत्वभारताचा राष्ट्रीय वृक्ष, वटपौर्णिमा हा सण

उत्पत्ती

वटवृक्ष (हिंदी :बड, गुजराती: वड, संस्कृत: वट, न्यग्रोध, कन्नड: आला, इंग्लीश: बनीयन ट्री, लॅटीन: फायकस बेंगोलेन्सिस, कूळ: मोरेसी). हा भारतीय उपखंडात आढळणारा एक मोठा वृक्ष आहे. वड म्हणजेच “फायकस” या प्रजातीतील येणारी फायकस बेंगालेन्सिस नावाची जात आहे. अति-विशाल, प्रचंड असा हा वृक्ष सर्वसाधारणपणे १५ ते २० मीटर उंच इतका वाढतो. याच्या फांद्यांना फुटलेली मुळे जमिनीपर्यंत जातात. त्यांनाच पारंब्या असे म्हणतात. जमिनीला पोचले असता या पारंब्यांना खोडांचा आकार येऊ लागतो व त्यातूनच झाडाच्या मुख्य खोडाभोवती बनलेल्या इतर खोडांचा विस्तार जलद गतीने होत जातो. पारंब्या वरून खाली येतात म्हणून या वृक्षाला ‘न्यग्रोध’ असेही नाव आहे. हे झाड पहिल्यांदा पश्चिम बंगालमध्ये दिसले गेले म्हणुन बेंगालेन्सिस असे संबोधतात, तर बंगालीत व्यापा-याला बनीया म्हणतात म्हणुन बन्यान ट्री असे इंग्रजीत नाव आहे.

रचना

वडाचे झाड हे ३० मीटर पर्यंत वाढत जाते. वडाच्या झाडाची पाने ही मोठी, तकतकीत, हिरवी आणि लंबवर्तुळ आकाराची असतात. अंजीरांप्रमाणेच पांनांच्या कळया दोन मोठ्या प्रमाणात आकर्षित करते. जसजसे पानांचे तराजू विकसित होतात तसतसे ते गोरळ होते. कोवळी पाने ही आकर्षक लाल रंगाची असतात. वडाच्या झाडाचे खोड हे मजबूत, गुळगुळीत व चीकयुक्त असते. ह्यांची जाळी वृक्षाच्छादित खोडांमध्ये परिपक्व एरियल प्रोप मुळे वैशिष्ट्यीकृत असतात, जे वयाबरोबरच्या प्राथमिक खोडांना चिकटून असतात.

जुने झाडे विस्तृत क्षेत्रामध्ये वाढण्यासाठी या पारंब्यंचा वापर करून उत्तरार्धात पसरतात. काही प्रजातींमध्ये, पारंब्या मुळे मोठ्या प्रमाणात झाडेच्याझाडे विकसित होतात आणि प्रत्येक खोड थेट किंवा अप्रत्यक्षपणे प्राथमिक खोडेशी जोडली जातात म्हणून या भव्य रूट सिस्टमच्या टोपोलॉजीमुळे पदानुक्रमित संगणक नेटवर्क ऑपरेटिंग सिस्टम ” बनियान व्हीआयएनईएस ” चे नाव प्रेरित झाले. हिरवट रंगाची फळे अतिशय लहान, चटकन नजरेत भरणारी असतात. पुष्कळ वेळा ती फळाप्रमाणे दिसतात.

पण तो पुष्पाशय असतो. याची फळे, पानाचे देठ आणि खोड यांच्या मधोमध, फांदीवर, खोडावरती येतात. सुरुवातीच्या वेळी ती हिरवी पण घट्ट असतात. पिकल्यावर लाल व मऊ होतात. वेगवेगळे पक्षी व माकडे यांना ती फळे खूप आवडतात. वडाची फळे देखणी असतात. पानांच्या देठालगत जोडीजोडीने ही फळे असतात. सहसा ह्या फळामध्ये लहान अळ्या व किडे असतात. त्यामुळे माणसे ही फळे सहसा खात नाहीत. फळांचा हंगाम फेब्रुवारी ते मे पर्यंत असतो.

उपयोग – Uses of Banyan Tree in Marathi

वडाच्या पानांचे पत्रावळी करून ते जेवणासाठी वापरतात. वडाच्या झाडाच्या प्रत्येक गोष्टीचा म्हणजे वडाची मुळे, पाने, फुले, चीक व साल या सर्वाचा रोजच्या वापरात औषध म्हणून उपयोग होतो. चीक हा जखमा भरून काढण्यासाठी व दातातील वेदना थांबविण्यासाठी वापरतात. वडाच्या पारंब्या घालून केशवर्धक तेल तयार केले जाते. वडाच्या पारंब्या शिकेकाई मध्ये घालून, उखळवून पाण्याने केस धुतल्यास केसांची वाढ सुंदर होते. 

एक पूर्ण वाढलेले वडाचे झाड एका तासाला तब्बल सातशेबारा किलो इतक्या प्रचंड प्रमाणात प्राणवायू म्हणजेच ऑक्सिजन वातावरणात सोडत असते. वडाच्या झाडाखाली जास्तीत जास्त वेळ व्यतीत करणे; म्हणजे शरीराला आवश्यक असणाऱ्या प्राणवायूची जास्तीत जास्त पूर्तता करून देणे. आयुर्वेद शास्त्रात वटवृक्षाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. वीर्य वाढवण्यासाठी तसेच गर्भाशयाच्या शुद्धीसाठी वडापासून औषध मिळते. सगळ्याचा विचार केला गेला असता वटवृक्षाला  संसारवृक्ष असेही म्हटले गेले आहे.कटिशूलसंधिवात

झाडाचा पांढरा चीख कटिशूल, दातदुखी, संधिवात इ. रोगांवर वर फार उपयोगी आहे. तळ पायांच्या भेगांवरती याचा जर लेप लावला तर भेगा दूर होतात. वडाच्या सालीचा काढा मधुमेहावर गुणकारी आहे. ह्याच्या मुळांची साल परम्यावर उपयुक्त आहे. पानांचे पोटीस गळवांवर बांधतात. वडाचे बी पौष्टिक व शीतकर (थंडावा देणारे) असते. या वृक्षाची पाने तोड्ल्यावर जो चीक निघतो त्याचा औषध मध्ये मलामा सारखा उपयोग होतो. विंचवाचे विष कमी होण्यासाठी किंवा चिखल्या ठिक होण्याासाठी पण चीक गुणकारी आहे.

कोणत्याही अवयवात लचक भरली किंवा संधिवातामुळे सांधे दुखणे यावर वडाची पाने तेल लावून थोडी गरम करून दुखणाऱ्या भागावर बांधून घेतल्यास सांधे दुखी कमी होते. ताप कमी होण्यासाठी झाडाच्या पारंब्यांचा रस देतात. त्यामुळे लगेच घाम येऊन शरीराचा दाह कमी होण्यास मदत होते. पोटात जंत झाले असल्यास पारंब्यांचे कोवळे अंकुर वाटून त्याचा रस दिला जातो.

त्याचबरोबर आव आणि अतिसार याच्यावर पारंब्या व तांदळाच्या धुवनात वाटून त्यामध्ये ताक घालून देतात व त्यामुळे लगेच आराम मिळतो. वडाचे पान हे अंगावरून पांढरे जाणे, गर्भाशयाला सूज येणे इ. विकारांवर सुद्धा औषध म्हणून उपयोगी पडते. तोंड आले असता याच्या काढ्याने गुळण्या कराव्या. गर्भ टिकून रहाण्यासाठी तसेच इच्छित संतती साठी वडाच्या कोंबाचा उपयोग केला जातो. उन्ह्याळ्यात या झाडामुळे हवेत आद्रता सोडली जाते त्यामुळे याच्या सावलीत गारवा हा खूप चांगला मिळतो.

इतर

वड हा मघा नक्षत्राचा आराध्यवृक्ष आहे. तसेच वड हा भारताचा राष्ट्रीय वृक्ष सुद्धा आहे. वटवृक्ष हा भारतीय संस्कृतीचा एक भाग आहे. वटपौर्णिमा हा सण आपण जो साजरा करतो तो याच झाडाशी संबंधित आहे. आपल्या पतीस दीर्घायुष्य लाभावे म्हणून यासाठी सुवासिनी स्त्रिया ह्या वटपौर्णिमेला या वृक्षाची मनोभावे पूजा करतात व हा सण साजरा करतात. एकूण चार वेदांपैकी ऋग्वेद व अथर्ववेदात वडाचा उल्लेख हा हमखास आढळतो.

एक अशी अख्यायिका आहे की कुरुक्षेत्री देवांनी महायज्ञ केला त्याचवेळी सोमचमसाची बाजू म्हणजेच मुख त्यांनी खालच्या बाजूला करून ठेवले व त्या सोमचमसाचा एक वटवृक्ष बनला अशी शतपथ ब्राह्मणात याच्या उत्पत्तीची कथा आहे. वड हा यज्ञीय वृक्ष असून विविध कार्यासाठी लागणारी यज्ञपात्रे ही वडाच्या झाडाच्या लाकडाची बनवतात. सृष्टी निर्माण होण्या अगोदर प्रलय-कालीन जला मध्ये श्रीविष्णू वटपत्रावर बालरूपात शयन करीत असत, अशी पौराणिक कथा आहे.

ब्रह्मदेवांचे ‘वड’ हे निवासस्थान आहे अशी हिंदू धर्मीयांची धारणा आहे. तसेच भगवान शिवांचेही या वृक्षावर निवासस्थान मानतात. “कृष्णवट” नावाचा एक वडाच्या झाडाचा प्रकार आहे. त्याची पाने ही किंचित वाकलेली असल्यामुळे ती द्रोणा-सारखी दिसतात. प्राणी व पक्ष्यांसाठी हे झाड अत्यंत उपयुक्त असल्याने ह्याला ” आधराचे झाड “ असेही म्हणतात. मोठ्ठ्या प्रमाणात बिया लावून देखील हे झाड उगवत नाही तर पक्ष्यांच्या विष्ठेद्वारा (पक्ष्यांनी फळे खाल्ल्यावर त्यांच्या पचन तंत्रातून) बिया बाहेर पडल्यावर त्यातूनच हा वृक्ष उगवतो.

अशा उपयुक्त झाडाच्या पारंब्या तोडून पर्यावरणाचे नुकसान न करता, शास्त्र आणि संस्कृती यांची सांगड घालून जिवंत वटवृक्षाची आपण सर्वजण पूजा करूया.

आम्ही दिलेल्या banyan tree information in marathi language माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर वडाच्या झाडाची अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या information on banyan tree in marathi language या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये vadache jhad Share करायला विसरू नका. तसेच आपण या लेखाचा वापर information about banyan tree in marathi language असा देखील करू शकता. धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

3 thoughts on “वडाच्या झाडाची माहिती Banyan Tree Information in Marathi”

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!