बप्पी लहिरी माहिती मराठी Bappi Lahiri Information in Marathi

Bappi Lahiri Information in Marathi – Bappi Lahiri Biography in Marathi बप्पी लहिरी माहिती मराठी भारतीय सुप्रसिध्द गायक म्हणून ओळख असणारे बप्पी लहिरी यांच्याबद्दल आज आपण या लेखामध्ये माहिती घेणार आहोत. बप्पी लाहिरी यांचा जन्म २७ नोव्हेंबर १९५२ मध्ये कोलकत्ता या ठिकाणी झाला आणि त्यांचे खरे नाव अलोकेश बप्पी लहिरी असे होते पण त्यांना गायन क्षेत्रामध्ये आज त्यांची बप्पी लहिरी अशी ओळख आहे. तसेच यांना आज संगीत क्षेत्रामध्ये डिस्को किंग ऑफ इंडिया आणि बप्पी दा या नावाने ओळखले जाते. बप्पी लाहिरी यांना डिस्को किंग ऑफ इंडिया असे नाव पडण्याचे कारण यांना आय एम अ डिस्को डान्सर हे गाणे गायल्या नंतर त्यांना खूप प्रसिध्दी मिळाली आणि त्यांनी तेव्हापासून लोकांच्या मनामध्ये घर केले आणि म्हणून त्यांना डिस्को किंग ऑफ इंडिया म्हणत होते.

बप्पी लाहिरी यांच्या वडिलांचे नाव अपरेश लहिरी आणि आईचे नाव बन्सरी लहिरी असे होते आणि त्यांचे आई आणि वडील दोघेहि गायन क्षेत्रामध्ये असल्यामुळे त्यांना देखील गायनाची आवड लहानपणी पासून होती आणि त्यांनी वयाच्या तिसऱ्या वर्षापासून संगीत क्षेत्रामध्ये आपले लक्ष घातले.

त्यांनी वयाच्या तिसऱ्या वर्षी तबला हे वाद्य वाजवायला शिकले मग नंतर त्यांनी गिटार, पियाने यासारखी वाद्य देखील वाजवायला शिकली. चला तर मग बप्पी लहिरी यांचे जीवन चरित्र, कुटुंब, लहानपण तसेच त्यांची संगीत क्षेत्रातील कामगिरी याबद्दल जाणून घेवूया.

bappi lahiri information in marathi
bappi lahiri information in marathi

बप्पी लहिरी माहिती मराठी – Bappi Lahiri Information in Marathi

पूर्ण नावअलोकेश बप्पी लहीरी
जन्म२७ नोव्हेंबर १९५२
टोपण नावडिस्को किंग ऑफ इंडिया आणि बप्पी दा
ओळखगायक आणि संगीतकार
वडिलांचे नावअपरेश लहिरी
आईचे नावबन्सरी लहिरी
पत्नीचीत्रानी
मुलेमुलगा – बप्पा लहिरी

मुलगी – रेमा लहिरी

बप्पी लहिरी यांची कौटुंबिक माहिती – family information 

बप्पी लहिरी ज्यांचे पूर्ण नाव अलोकेश बप्पी लहीरी असे आहे आणि यांचा जन्म २७ नोव्हेंबर १९५२ मध्ये कोलकत्ता या शहरामध्ये झाला होता. बप्पी लाहिरी यांच्या वडिलांचे नाव अपरेश लहिरी आणि आईचे नाव बन्सरी लहिरी असे होते आणि त्यांचे आई आणि वडील दोघेहि गायन क्षेत्रामध्ये असल्यामुळे त्यांना देखील गायनाची आवड लहानपणी पासून होती.

बप्पी लहिरी यांचे लग्न २४ जानेवारी १९७७ मध्ये चीत्रानी लहिरी हिच्याशी झाले होते आणि त्यांना एक मुलगा बप्पा लहिरी आणि मुलगी रेमा लहिरी अशी दोन मुले आहेत. बप्पी लहिरी यांना सोन्याचे दागिने खूप आवडतात आणि म्हणून ते कायम सोन्याचे वेगवेगळे दागिने घालतात आणि त्यांना काळा चष्मा देखील घालायला खूप आवडतो.

बप्पी लहिरी यांची गायन सुरुवात – early career 

बप्पी लहिरी यांचे आई आणि वडील हे दोघेही गायन क्षेत्रातील असल्यामुळे त्यांना देखील गायनाची आवड हि लहानपणीपासूनच लागती आणि त्यांनी वयाच्या तिसऱ्या वर्षापासून गायनाला सुरुवात केली. त्यांनी सुरुवातीला काही वाद्य वाजवायला शिकली आणि त्यामधील पहिले वाद्य हे तबला होते जे त्यांनी तिसऱ्या वर्षी शिकले होते.

तसेच त्यांनी गिटार, पियानो, ड्रम आणि बोगो यासारखी वाद्य शिकली. बप्पी लहिरी यांनी १९७३ मध्ये पहिल्यांदा नन्हा शिकारी या हिंदी चित्रपटासाठी संगीत दिले आणि संगीत क्षेत्रामध्ये संगीतकार म्हणून पदार्पण केले तसेच त्यांनी १९७४ मध्ये दादू या बंगाली चित्रपटाला देखील संगीत दिले आणि तेथून त्यांची गायक म्हणून वाटचाल सुरु झाली.

बप्पी लहिरी यांची गायन क्षेत्रातील कामगिरी

  • बप्पी लहरी यांनी १९७३ मध्ये पहिल्यांदा नन्हा शिकारी या हिंदी चित्रपटासाठी संगीत दिले आणि संगीत क्षेत्रामध्ये संगीतकार म्हणून पदार्पण केले तसेच त्यांनी १९७४ मध्ये दादू या बंगाली चित्रपटाला देखील संगीत दिले. तसेच त्यांनी १९७५ मध्ये जखमी या चित्रपटामध्ये संगीतकार म्हणून त्यांना प्रचंड प्रसिध्दी मिळाली.
  • त्यांनी १९७६ मध्ये चलते चलते, १९८२ मध्ये डिस्को डान्सर, नामक हलाल, १९८४ मध्ये शराबी, १९९७ मध्ये धर्म कर्मा अश्या अनेक चित्रपटांच्यासाठी संगीतकार म्हणून काम केले.
  • १९८२ मध्ये डिस्को डान्सर या चित्रपटातील त्यांनी गायलेले आय एम अ डिस्को डान्सर ह्या गाण्यामुळे त्यांना खूप प्रसिध्दी मिळाली आणि त्यांना तेंव्हापासून डिस्को किंग ऑफ इंडिया असे नाव देखील पडले.
  • तसेच त्यांनी सध्या प्रसिध्द झालेल्या चित्रपटांच्यासाठी देखील गाणी गायली आणि ते चित्रपट म्हणजे २०११ मधील ‘द डर्टी पिक्चर ‘ आणि २०१७ मधील बद्रीनाथ कि दुल्हनिया.
  • बप्पी लहिरी यांची ५००० हून अधिक गाणी आहेत आणि त्यामधील डिस्को डान्सर मधील आय एम अ डिस्को डान्सर, साहेब मधील यार बिना चैन कहा रे, आज रपत जाये, देदे प्यार दे, रात बाकी हि त्यांची काही प्रसिध्द गाणी आहेत.
  • तसेच त्यांनी कन्नड चित्रपटांमध्ये देखील संगीत दिग्दर्शक म्हणून काम केले आणि ते म्हणजे कृष्ण नी बेगाने बारो, गुरु, पोलीस मथु दादा इत्यादी चित्रपट होते. तसेच त्यांनी सिंहासनम, स्टेट रावडी, रावडी इन्स्पेक्टर अश्या तेलगु आणि पदूम वानमपाडी अश्या अनेक तमिळ चित्रपटांना संगीत दिले.
  • तसेच त्यांनी २०१६ आणि २०१७ मध्ये डबिंग कलाकार म्हणून देखील काम केले.
  • त्यांनी एका वर्षामध्ये ३३ चित्रपटामध्ये काम करण्याचा विक्रमी विजय केला आणि हि नोंद गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये आहे.
  • बप्पी लाहिरी यांनी २००८ मध्ये शाहरुख खानची टीम कोलकत्ता नाइट रायडर्स या संघासाठी देखील संगीत दिले.
  • तसेच १९८३ ते १९८५ या कालावधीमध्ये त्यांनी १२ सुपरहिट चित्रपटांना संगीत देण्याचा विक्रमी विजय त्यांच्या नावावर आहे.

पुरस्कार – awards

  • बप्पी लहिरी यांना २०१८ मध्ये त्यांना ६३ व्या फिल्मफेयर पुरस्कारामध्ये फिल्मफेयर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच त्यांना डिस्को डान्सर या चित्रपटातील जिमी जिमी या गाण्यासाठी चायना गोल्ड पुरस्कार जिंकणारे हे पहिले संगीतकार होते.

निधन – death

आपल्या आवाजाने आणि गाण्यांनी सर्वांना वेढ लावणारे आणि मशूर संगीतकार म्हणून ओळख असणारे बप्पी लहिरी यांचे बुधवार दिनांक १६ फेब्रुवारी २०२२ या दिवशी निधन झाले. बप्पी लहिरी यांची तब्येत काही दिवसापूर्वी खालावली होती म्हणून त्यांना मुंबई मधील क्रीटी केयर या खाजगी दवाखान्यामध्ये उपचार चालू होते पण त्यांचे बुधवारी सकाळी अचानक निधन झाले. त्यांची संगीत क्षेत्रातील मोलाची कामगिरी सर्वांच्या कायम लक्षात राहील अशी आहे.

आम्ही दिलेल्या bappi lahiri information in marathi language माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर बप्पी लहिरी माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या bappi lahiri biography in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि information of bappi lahiri in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये bappi lahiri information in marathi wikipedia Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!