गिटार वाद्याची माहिती Guitar Information in Marathi

Guitar Information in Marathi गिटार मराठी माहिती बोटांनी तारा छेडल्यानंतर त्यातून अतिशय सुरेल संगीत निर्माण करणारे एक वाद्य म्हणजे गिटार होय. जगाच्या पाठीवर सर्वत्र आढळणारे हे वाद्य तरुणाईमध्ये विशेष लोकप्रिय आहे. संगीत निर्मिती करण्यासाठी लागणाऱ्या वाद्यवृंदामध्ये गिटारला अनन्यसाधारण महत्व आहे. अतिशय कोमल स्वरांनी आपल्या मनावर हळुवार फुंकर घालणारे हे गिटार विविध बँड्समध्ये अतिशय उत्साहवर्धक अशी धून तयार करून सर्वत्र धुमाकुळ माजवते. एखाद गाण जेव्हा बनवल जात त्यावेळी त्यामधील शब्द जितके महत्त्वाचे असतात त्याचप्रमाणे त्याच पार्श्वसंगीतदेखील तितकीच महत्त्वाची भूमिका बजावते.

guitar information in marathi
guitar information in marathi
अनुक्रमणिका hide
1 गिटार वाद्याची माहिती – Guitar Information in Marathi

गिटार वाद्याची माहिती – Guitar Information in Marathi

गिटार – guitar marathi mahitiमाहिती
प्रकारअकॉस्टिक गिटार, क्लासिकल गिटार, स्टील स्ट्रिंग अकॉस्टिक गिटार, इलेक्ट्रिक गिटार
शोध लावला१६ व्या शतकाच्या सुमारास
आद्याक्षरे६-E, ५-A, ४-D, ३-G, २- B आणि १-E.

यामध्ये जी विविध वाद्य वाजवली जातात त्यामध्ये बहुतांशी गिटारच्या माध्यमातून निर्माण केले जाणारे संगीत म्हणजे दूधात साखरच. अश्या या संगीक्षेत्रातील मानाच पान असलेल्या गिटारबद्दल अजून थोडस जाणून घ्यायला पाहिजे नाही का..?

उत्पत्ती:

आकाराने लांब असलेल्या गिटार ह्या वाद्याचे नाव कसे प्रचलित आले याचीदेखील एक मोठी साखळी आहे. संशोधकाच्यां मते संस्कृतमध्ये असणाऱ्या ‘तार’ या शब्दामध्ये या सर्व इतिहासाची पाळेमुळेरुजली आहेत. प्राचीन फारसी शब्द ‘सितार’ (Sehtar) पासून ग्रीक शब्द ‘किथरा’ (Kithara) उदयास आला आहे. त्यानंतर किथरापासून एक नवीन लॅटिन शब्द निर्माण झाला जो होता ‘सिथरा’ (Cithara). याच सिथरापासून पोर्तुगीज शब्द ‘गिटारा’ (Guitarra) आणि स्पॅनिश शब्द ‘गितार’ (Gitter) हे दोन शब्द सर्वदूर पसरले. यातूनच खऱ्या अर्थाने गिटार हा शब्द अस्तित्वात आला.

इतिहास:

इसवी सन पूर्व ३२०० च्या दरम्यान गिटारसारखे दिसणारे वाद्य इराकमधील दक्षिणी मेसोपोटामियामध्ये वाजविण्यास प्रारंभ झाला. परंतु खऱ्या अर्थाने गिटार या नावाने या वाद्याचा प्रसार सोळाव्या शतकाच्या सुरुवतीला स्पेनमध्ये सुरू झाला. सुरुवातीला गिटारमध्ये फक्त चारच तारा असत. तीन तारा या दुहेरी असत आणि उरलेली एक तर ही एकेरी असे. सोळाव्या शतकापासून या वाद्यामध्ये मोठ्या प्रमाणात बदल होत गेले. हे वाद्य ल्युट या जातकुळीतील असून पूर्वीचे गिटार अतिशय अरुंद होते. हळूहळू त्याच्या रचनेमध्ये बदल होत गेला आणि आता तयार होणाऱ्या गिटार या तुलनेने हलक्या नी रुंद असतात.

रचना:

गिटारच्या रचनेचे प्रामुख्याने दोन भाग पडतात. ते खालीलप्रमाणे :

अ. नेक-:

गिटारच्या मध्यभागी बॉडी पासून निमुळता होत गेलेला भाग म्हणजे नेक होय. हेडस्टॉकपासून ते बॉडीदरम्यान असलेला पातळ लाकडापासून बनवलेला गिटारचा हा भाग खालील विविध उपभागांपासून तयार झालेला आहे.

१. हेडस्टॉक(Headstock)-:

गिटारचा सर्वात वरचा भाग म्हणजे हेडस्टॉक. यामध्ये संगीताची धून(tune) आणि ताल यामध्ये लय निर्माण केली जाते.

२. ट्युनिंग किज्(Tunning Keys)-:

गिटारमध्ये असलेल्या तारांमध्ये जो ताण निर्माण होतो तो समायोजित (adjust) करण्याचे काम ह्या किज् करतात.

३. नट (Nut)-:

कठीण आवरणापासून बनवलेल्या छोट्याश्या तुकड्याला नट असे म्हणतात. हे नट हेडस्टॉकजवळ असणाऱ्या तारांना आधार देण्याचे म्हणजेच स्थिर राहण्यास मदत करतात.

४. फ्रेट्स(Frets)-:

फ्रेटबोर्डवर असणाऱ्या छोट्या धातूच्या पट्ट्या म्हणजे फ्रेट्स होय. जेव्हा एखादी फ्रेटजवळील तार आपण छेडतो तेव्हा विशिष्ट फ्रेट आणि ब्रिज यांमध्ये कंपन पावून त्यातून उच्च स्वर(High pitch) निर्माण होतात.

५. फ्रेटबोर्ड(Fretboard)-:

गिटारमध्ये असलेल्या नेक(Neck)मधील वरचा भाग ज्यावर सर्व फ्रेट्स एकत्रित बसवलेले असतात त्या लाकडी पट्टीस फ्रेटबॉर्ड संबोधले जाते. बोटांच्या साहाय्याने छेडलेल्या तारा या विविध फ्रेटस् असलेल्या लाकडी भागास स्पर्श करून कंपन पावतात त्यामुळे त्यास फ्रेटबोर्ड म्हणतात.

६. पोझिशन मार्कर्स(Position Markers)-:

विशिष्ट फ्रेटचा नंबर माहिती करून घेण्यासाठी असलेल्या छोट्या ठिपक्यांना पोझिशन मार्कर्स म्हणले जाते. सर्वच गिटारमध्ये असे पोझिशन मार्कर्स असतातच असे नाही.

७. तारा(Strings)-:

साधारणतः गिटारमध्ये सहा तारा असतात. बोटांच्या साहाय्याने तारा छेडून त्यामधून स्वर निर्माण केले जातात. अकॉस्टिक आणि इलेक्ट्रिक गिटारमध्ये स्टीलच्या तारा असतात आणि क्लासिकल गिटारमध्ये नायलॉनच्या तारा वापरल्या जातात.

ब. बॉडी(Body)-:

नेकचा भाग हे जर गिटारच हृदय असेल तर बॉडीचा भाग हा गिटारचा मेंदू मानला जातो. लाकडापासून बनवला जाणारा हा भाग इतर सर्व भागांना एकत्र बांधून ठेवण्याच काम करतो. गिटारची बॉडी ही काही विशिष्ट भागांपासून बनवली जाते. ते भाग खालीलप्रमाणे,

१. सॅडल(Saddle):-

हाडाचा किंवा प्लॅस्टिकचा जाडसर तुकडा म्हणजे सॅडल. हा तुकडा ब्रिजला जोडलेला असतो जेणेकरून तारा एका विशिष्ट उंचीपर्यंत पोहोचल्या जाव्यात. त्यामुळे ध्वनीची कंपने ब्रिजच्या माध्यमातून साऊंडहोलपर्यंत जाऊन नादमधुर स्वरांची निर्मिती होते.

२. ब्रिज(Bridge)-:

ब्रिजच मुख्य काम म्हणजे तारांना नेकपासून बॉडीपर्यंत जोडणे हे आहे. तारांमध्ये निर्माण होणारी कंपने संपूर्ण गिटारमध्ये परावर्तित करण्यासाठी ब्रिजची आवश्यकता असते.

३. एन्ड पिन(End-Pin):-

ही एक छोटीशी आणि पोकळ अशी लाकडी किंवा सिंथेटिक पिन असते जी गिटारच्या बॉडीमध्ये शेवटच्या टोकाला जोडलेली असते. गळयात अडकविण्यासाठी असलेली पट्टी या एन्ड पिनद्वारे जोडली जाते.

इलेक्ट्रिक गिटारमध्ये असणारे भाग

१. पिकअप्स(Pick-ups)-:

तारांच्या कंपणांची ऊर्जा विद्युत ऊर्जेत रुपांतरीत करण्याचे काम पिकअप्स करतात. यामुळे स्वर तसेच टोन यांवर बराच प्रभाव पडतो.

२. इलेक्ट्रॉनिक नियंत्रणे(Electronic Controls)-:

गिटारमध्ये असलेले छोटे ठोके जे आवाजाची तीव्रता आणि आवाजाची लय दोन्हींमध्ये बदल घडवून आणू शकतात त्यांना इलेक्ट्रॉनिक नियंत्रणे असे म्हणतात.

अकॉस्टिक गिटारमध्ये असणारे भाग

१. साऊंडबोर्ड-:

अकॉस्टिक गिटारमधील एक महत्त्वाचा भाग म्हणजे साऊंडबोर्ड. साऊंडबोर्ड हा कंपन पावून स्वरांची निर्मिती करतात.

२. साऊंडहोल:-

साधारणतः अकॉस्टिक गिटारमधील आवाज एकत्रित करण्यासाठी असलेले छोटे भोक म्हणजे साऊंडहोल होय.

प्रकार

गिटारचे त्याची रचना, आवाजाची निर्मिती आणि आकार यानुसार खालीलप्रमाणे विविध प्रकार पडतात.

१. अकॉस्टिक गिटार:-

या गिटारच्या रचनेनुसार प्रामुख्याने दोन प्रकार पडतात. ते खालीलप्रमाणे,

अ. क्लासिकल गिटार:-

प्रामुख्याने शास्त्रीय तसेच फ्लेमेन्को संगीत वाजविण्यासाठी या गिटारचा वापर केला जायचा. मात्र आता कोणत्याही प्रकरचे संगीत यावर वाजविले जाऊ शकते. स्पॅनिश गिटार या नावाने ओळखले जाणाऱ्या ह्या गिटारच्या तारा या नायलॉनपासून बनवल्या जातात. ज्यामुळे बोटांची हालचाल सुलभ होऊन त्यातून स्टीलच्या तारांच्या तुलनेने सुमधुर असे संगीत निर्माण होते. आपल्या विशिष्ट आवाज निर्मितीने, कोणत्याही आकारात उपलब्ध होत असल्याने तसेच अत्यंत स्वस्त दरात मिळत असल्याने क्लासिकल गिटार हे नावशिक्यांमध्ये खूप लोकप्रिय आहे.

ब. स्टील स्ट्रिंग अकॉस्टिक गिटार:-

रचनेने क्लासिकल गिटारप्रमाणेच असणाऱ्या अकॉस्टिक गिटारच्या तारा मात्र स्टीलपासून बनवल्या जातात. या गिटारमधून एखाद्या धातूने हलकासा प्रहार केल्यानंतर येणाऱ्या लयबध्द आवाजाची निर्मिती होते. तसेच याचा आवाजही तुलनेने बराच मोठा असतो.

२. इलेक्ट्रिक गिटार:-

वरील दोन्ही प्रकारांपासून इलेक्ट्रिक गिटार ही पूर्णतः वेगळी आहे. कारण यामध्ये तारांच्या कंपणांचे विद्युत लहरींमध्ये रूपांतरित करून आवाजाची निर्मिती केली जाते. तसेच हे गिटार वरील दोन गिटारांसारखे पोकळ नसून भरीव रचनेचे असते. इलेक्ट्रिक गिटार वाजविण्यासाठी आपल्याला अॅम्प्लीफायर लागतो जो ह्या विद्युत लहरींना परावर्तित करतो.

याशिवाय गिटारचे आणखी काही प्रकार म्हणजे आर्चटॉप गिटार, रेजोनेटोर, टच गिटार, बास गिटार, डब्बल नेक गिटार, स्टील गिटार, बारा तारा असलेल्या गिटार आणि इलेक्ट्रो-अकॉस्टिक गिटार होय.

गितरमधील तारा आणि त्यांचे अनुक्रमांक-आद्याक्षरे

गिटार वाजविण्यास शिकण्यासाठी काही प्राथमिक माहिती गरजेची असते. गिटारमध्ये असणाऱ्या सहा तारांपैकी सर्वात वरची सहावी तार ही जाडसर असून सर्वात खालची म्हणजेच पहिली तार ही पातळ असते. सहाव्या तारेपासून उलट क्रमाने पहिल्या तारेला काही आद्याक्षरे नेमलेली आहेत. ती म्हणजे ६-E, ५-A, ४-D, ३-G, २- B आणि १-E. या आद्याक्षरे नी अनुक्रमांकामुळे आपल्याला गिटार वाजविण्यास सहजसोपे होते.

वादक

लोकप्रिय असणारे गिटार वादक खूप मोठ्या प्रमाणात आहेत. त्यापैकी काही वादक म्हणजे आपल्या बोटांच्या वैविध्यपूर्ण शैलीने सोलो गिटार क्षेत्रातला अढळ ध्रुवतारा असलेला टॉमी इमॅन्युएलब्रायन, गिटार क्षेत्रात सर्वप्रथम व्हॉम्मी बारचा वापर करणारे जिमी हेंड्रिक्स, गिटारच्या नेकजवळ दोन्ही हातांनी टॅपिंग करण्यासाठी प्रसिद्ध असलेले एडी व्हॅन हॅलेन, १००० हून अधिक अल्बममध्ये गिटार वादक असलेले ब्रेंट मेसन, आपल्या अंगी असलेल्या तांत्रिक क्षमतेचा कोणत्याही संगीत प्रकारात वापर करणारे गथरी गोवन.

जगाच्या पाठीवर संगीतप्रेमी लोकांच्या पाठीवर दिसणारे हे गिटार म्हणजे एक सुंदर चांदणी आहे जिच्या प्रकाशाने अवघ संगीतक्षेत्र दिपून निघालेल आहे. सतत प्रयत्न केले तर कधी ना कधी अपल्या जीवनातील सगळ्या तारा व्यवस्थित छेडल्या जाऊन त्यातून मधूर अस संगीत निर्माण होऊ शकत असा संदेश तर गिटार आपल्याला देत नाही ना…!

information of guitar in marathi वरील सर्व गोष्टी पाहून आपणास अंदाज लागला असेलच कि हा गिटार हे वाद्य कसे आहे त्याची रचना व त्याचे कार्य कसे आहे. guitar information in marathi language हा लेख आपल्याला आवडल्यास आपल्या मित्र परिवारासोबत फेसबुक ओट्सअप्प सारख्या विविध सोशियल मेडिया वरून माहिती पोहचवा. तसेच information about guitar in marathi हा लेख कसा वाटला व अजून काही गिटार या वाद्याबद्दल काही राहिले असेल तर आपण comments द्वारे कळवू शकता धन्यवाद.

आम्ही दिलेल्या guitar a musical instrument information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही guitar instrument information in marathi त्यामध्ये नक्की बदल करू. अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

2 thoughts on “गिटार वाद्याची माहिती Guitar Information in Marathi”

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!